🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५* 🌺
मागील ४ लेखांमध्ये आपण महाभारतात उल्लेख केलेल्या विविध वैज्ञानिक संदर्भांची माहिती घेतली. *आजच्या शेवटच्या लेखात आपण महाभारतातील गर्भविज्ञान* ह्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
*महाभारत शांति पर्व अंतर्गत मोक्षधर्म पर्व अध्याय ३२०* मध्ये मनुष्यशरीरात *गर्भधारणा* कशी होते ह्याचे विवेचन केले आहे.
🚩 बिन्दुन्यासादयोSवस्था: *शुक्रशोणितसम्भवाः*
यासामेव निपातेन *कललं* नाम जायते ||११७||
🚩
वीर्य म्हणजे पुरूबीज आणि शोणितबीज म्हणजे स्त्रीबीज ह्यांच्या मिश्रणातून गर्भाशयात एक घटक तयार होतो त्याला *कलल* (Cellular level) असे म्हणतात.
🚩कललाद् बुद्बुदोत्पत्तिः पेशी च बुद्बुदात् स्मृता |
पेश्यास्त्वङ्गाभिनिर्वृत्तिर्नखरोमाणि चाङ्गतः ||११८ || 🚩
कलल पासून *बुडबुडा* निर्माण होतो. त्या बुडबुड्यापासून पुढे *पेशी आणि मांस* तयार होते. विविध अवयव तयार होतात, *नखे आणि केस* तयार होतात.
स्त्री - पुरुष ह्यांच्या संयोगातून स्त्रीच्या शरीरात गर्भधारणा होते हे आपल्याला ज्ञात आहेच. *आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने गर्भधारणेतील सर्व टप्पे आपण पाहू शकतो.* परंतु, इ. स. पू. ५००० पेक्षासुद्धा अधिक पुरातन असलेल्या *महाभारतात ह्या ग्रंथात (द्वापार युग) गर्भधारणेच्या प्राथमिक अवस्थेतचे वर्णन* केले आहे. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय, सोनोग्राफीशिवाय *गर्भधारणेतील प्राथमिक टप्पा म्हणजेच कलल - बुडबुडा - मांस, पेशी - अवयव निर्मिती ह्याचे अगदी योग्य वर्णन महर्षी व्यास ह्यांनी केले आहे. हे सर्व अचंबित करणारे आहे.*
महाभारत युद्धात अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरण्यात आली. महाभारतातील *ब्रह्मास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब सदृश* होय. त्याकाळी उपयोगात येणारी अनेक शस्त्रास्त्रे आधुनिक शस्त्रास्त्रांशी मिळतीजुळती आहेत.
अर्जुनाचा पुत्र *अभिमन्यूला मातेच्या गर्भात प्राप्त झालेले ज्ञान म्हणजेच गर्भसंस्कार* आणि गर्भातील *बाळाच्या मेंदूची प्रगत अवस्था* ह्याचे वर्णन केलेले आपल्याला आढळते.
महाभारत हा ग्रंथ म्हणजे नुसती *कविकल्पना नाही तर प्रत्यक्ष घडलेला इतिहास* आहे. त्याचे पुरावे वेळोवेळी समोर येत असतात. महाभारत म्हणजे फक्त *कौरव - पांडव युद्ध आणि श्रीमद्भगवद्गीता नाही* तर अनेक *आधुनिक वैज्ञानिक संदर्भ आणि त्याची पाळेमुळे* आपल्याला महाभारत ह्या ग्रंथात सापडतात. महाभारत ह्या ग्रंथात *खगोलशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, भूगोल, स्थापत्यशास्त्र, युद्धकलाशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र* अशाप्रकारे अनेक विषय समाविष्ट आहेत. जगातील एकही असा विषय नाही जो महाभारतात नाही म्हणूनच *व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*
अशी उक्ती आहे. म्हणजे जगातील सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे केले आहे. ह्याचा अर्थ असा की व्यासांनी जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे.
*महाभारत आणि विज्ञान* ह्या विषयावर माझ्या सर्व लेखांना आपल्यासारख्या जाणकार वाचकांनी *उत्तम प्रतिसाद दिला* त्याबद्दल *मी सर्वांचा ऋणी* आहे. *आजचा हा शेवटचा भाग पाठवून मी महाभारतावरील लेखांचा समारोप करीत आहे.* पुढच्या वेळी *नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू.* तोपर्यंत *जयतु वेदविज्ञानम्*
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment