माझा परिचय

Showing posts with label यजुर्वेद. Show all posts
Showing posts with label यजुर्वेद. Show all posts

Sunday, 30 April 2023

वेदविज्ञानरंजन - ५३

 

#वेदविज्ञानरंजन_५३

🌺 *पृथ्वी - सूर्य संबंध* 🌺

आजच्या लेखात आपण सूर्य आणि पृथ्वी ह्यांचे परस्पर संबंध पाहू.

यजुर्वेद अध्याय ३३ मंत्र ४३ खालीलप्रमाणे आहे

🚩 आ कृष्णेन रजसा वर्तमानः निऽवेशयन् अमृतम् मर्त्यम् च हिरण्येन सविता रथेन आ देवः याति भुवनानि पश्यन् ||४३ || 🚩

हे मनुष्याः! यथा एतद्भूगोलाद्यैर्लोकैः सह तस्य सूर्य्यस्याकर्षणं यो वृष्टिद्वारा अमृतात्मकमुदकं वर्षयति यश्च सर्वेषां मूर्तद्रव्याणां दर्शयितास्ति तथा सूर्य्यादयोपीश्वराकर्षणेन ध्रियन्त इति वेद्यम्॥४३॥

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

सूर्य (सविता ) भूगोल (पृथ्वी ) आणि इतर गोलांना म्हणजे ग्रहांना *आपल्या शक्तीने आकर्षून घेतो* आणि वृष्टीद्वारे अमृतरूपी जलवर्षाव करतो.

ऋग्वेद - मण्डल  १; सूक्त  ३५ ; मन्त्र ९ खालीलप्रमाणे आहे.

🚩 हिरण्यपाणिः । सविता । विचर्षणिः । उभे इति । द्यावापृथिवी इति । अन्तः । ईयते । अप । अमीवाम् । बाधते । वेति । सूर्यम् । अभि । कृष्णेन । रजसा । द्याम् । ऋणोति॥ 🚩

। हे सभापते यथायं सूर्योबहुभिर्लोकैः सहाकर्षणसंबन्धेन वर्त्तमानः सर्वं वस्तूजातं प्रकाशयन् प्रकाशपृथिव्योरान्तर्यं करोति तथैव त्वया भवितव्यमिति ॥९॥

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

जसा हा सूर्य पुष्कळ गोलांना म्हणजे अनेक ग्रहांना आपल्या *आकर्षण शक्तीने स्थिर ठेवतो* (बांधून ठेवतो ), सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे पृथ्वी आणि द्युलोक म्हणजे आकाश यांचा संयोग करतो, तसेच आचरण ठेवावे.

ऋग्वेद आणि यजुर्वेद ह्यांनी पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण, पृथ्वी - सूर्य ह्यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती इत्यादी खगोलीय सिद्धांतांचे अतिशय उत्तम रीतीने विश्लेषण केले आहे. वेद हे अनादी काळापासून अस्तित्वात असून त्यांचा काळ निश्चित करणे सुद्धा अवघड आहे. जगातील पहिले लिखित वाङ्मय म्हणून सर्व वेदांना जगाने मान्यता दिली आहे.
गुरुत्वाकर्षण शक्ती, पृथ्वी गोल आहे अशा अनेक सिद्धांताचे श्रेय न्यूटन, कोपर्निकस, गॅलिलिओ अशा परदेशी शास्त्रज्ञांना देण्यात आले आहे. परंतु, अनादिकाळापासून असलेल्या वेदांना मात्र ह्याचे श्रेय नाही. मेकॉले ह्यांनी लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आपले पुरातन वाङ्मय नजरेआड झाले आणि आपले अपरिमित नुकसान झाले आहे. माझी सर्वांनाच विनंती आहे की आपल्या मुलांना ही सर्व माहिती द्यावी.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Friday, 23 December 2022

वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

आजच्या लेखात आपण सूर्य - चंद्र - पृथ्वी यांचा परस्पर संबंध आणि ब्रह्मांडातील अनेक सूर्य  यांची माहिती घेणार आहोत. 

ऋग्वेद मंडल १०, सूक्त ८५, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सत्येन उत्तभिता भूमिः सूर्येण उत्तभिता द्यौः ऋतेन आदित्याः तिष्ठन्ति दिवि सोमः अधि श्रितः ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(भूमिः सत्येन उत्तभिता ) म्हणजे पृथ्वी अग्नीद्वारा सांभाळली जाते. (द्यौः सूर्येण उत्तभिता ) म्हणजे प्रकाशित तारांगण आणि आकाश सूर्यामुळे सांभाळले जाते. (आदित्याः ऋतेन तिष्ठन्ति ) सूर्याची आदान शक्ती आहे. (दिवि सोमः अधिश्रितः ) चंद्र सूर्याच्या आश्रयाला आहे. 

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ब्रह्माने पृथ्वीला आकाशात धारण केले आहे. 

म्हणजेच ब्रह्मांडात पृथ्वी आहे. 

सूर्य हा द्युलोकाला म्हणजे नक्षत्र तारामंडल यांना प्रकाशित करतो. त्यानंतर सोम म्हणजे चंद्र हा सूर्याचा आश्रित आहे. म्हणजेच तोसुद्धा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधला गेला आहे आणि सूर्यामुळे तो प्रकाशित होतो. 

यजुर्वेद अध्याय १८ मंत्र ४० मध्ये म्हटले आहे की 

सुषुम्णः सूर्यरश्मिश्चन्द्रमा नक्षत्राणि अप्सरसः भेकुरयः नाम 

ह्याचा अर्थ पाहू : ज्यामुळे उत्तम सुख प्राप्त होते असा सूर्य चंद्राला प्रकाशित करतो. आकाशात पसरलेली नक्षत्रे ही चंद्राच्या अप्सरा आहेत असे वाटते. ह्यात सूर्याने चंद्र प्रकाशित होतो असे स्पष्ट दिसते. 

माझ्या माहिती प्रमाणे  ग्रीस तत्त्ववेत्ता, गणितज्ञ अनेक्सागोरस (Anaxagoras ) ( जन्मः इ. स. पू. ४९९ आणि मृत्यू इ. स. पू. ४२८ ) ह्यांनी असे विधान केले होते की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. तो सूर्याच्या किरणांनी प्रकाशित होतो. त्याला ह्या वक्तव्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. म्हणजे त्या काळी चर्चच्या विरोधात काही वक्तव्य केले की लगेच शिक्षा करीत असत.

 (https://mathshistory.st-andrews.ac.uk/Biographies/Anaxagoras/) 

आपले वेद तर इ. स. पू. हजारो वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत आणि त्यात ह्या सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. मग मला सांगा की आपण मागास का आपल्याला मागास म्हणणारे पाश्चात्य विद्वान मागास? 

अनेक सूर्य, अनेक ब्रह्मांड

अथर्ववेद कांड १३, सूक्त ३, मंत्र १० मध्ये सात सूर्याचा उल्लेख आहे

यस्मिन् सूर्या अर्पिताः सप्त साकम् ||१०||

ब्रह्मांड जे एकत्र झालेल्या तेजाने व्यापले आहे त्यात सात सूर्य एकत्र राहतात. त्यांची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्ररूप


 ताण्ड्य ब्राह्मण ग्रंथातील अध्याय २३, खंड १५, मंत्र ३ मध्ये पुन्हा एकदा सात सूर्यांचा उल्लेख केला आहे.

त्रि वै सप्त सप्तादित्याः ||३||

ऋग्वेद मंडल ९, सूक्त ११४, मंत्र ३  ह्या मध्ये अनेक सूर्यांचा उल्लेख केला आहे. 

सप्तदिशो नानासूर्याः सप्त होतार ऋत्विज:|

देवा आदित्या ये सप्त तेभिः सोमाभि रक्ष न 

इन्द्रायेन्दो परि स्रव||

सात दिशा, ऋतू, यज्ञकर्ता सात ऋत्विज आणि सात सूर्य आहेत. हे सोमा! त्यांच्या बरोबर आमचे पण रक्षण कर आणि तू इंद्रासाठी वाहत रहा. 

आपले आधुनिक विज्ञान अजून पर्यंत सात सूर्य कोणते आहेत ते शोधू शकले नाहीत. इथे मी म्हणतो की आमच्या वेदांत उल्लेख आहेत पण आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाही. आज इथेच थांबतो पुढील लेखात नवीन विषय घेऊन भेटू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १३ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

 वेदविज्ञानरंजन - १३ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

ह्या  लेखांमध्ये आपण पृथ्वी गोल आहे ह्या सिद्धांताची वैदिक ग्रंथांतील उदाहरणे पाहिली. आजच लेखात आपण पृथ्वीचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे ) , परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे ), दिवस- रात्र यांचे चक्र ह्याविषयी माहिती घेऊया. 

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

अथर्ववेद कांड १२, सूक्त १ आणि मंत्र ४८  मध्ये लिहिले आहे :

म॒ल्वं बिभ्र॑ती गुरु॒भृद्भ॑द्रपा॒पस्य॑ नि॒धनं॑ तिति॒क्षुः।

व॑रा॒हेण॑ पृथि॒वी सं॑विदा॒ना सू॑क॒राय॒ वि जि॑हीते मृ॒गाय॑ ॥१.४८॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

मल्वम् । बिभ्रती । गुरुऽभृत् । भद्रपापस्य । निऽधनम् । तितिक्षु: । वराहेण । पृथिवी । सम्विदाना । सूकराय । वि । जिहीते । मृगाय 

मल्वम् म्हणजे धारण सामर्थ्य , गुरुभृत् म्हणजे गुरुत्व, बिभ्रति म्हणजे धारण करणारी (अशी आपली पृथ्वी आहे ) (इथे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ति कार्यरतआहे हे सांगितले आहे. त्यासाठी आपल्याला न्यूटनची आवश्यकता नाही.) 

भद्रपापस्य म्हणजे चांगले, वाईट, निऽधनम् समूह, तितिक्षु: म्हणजे सहन करणारी (अशी पृथ्वी ) वराहेण म्हणजे मेघांबरोबर (काळ्या ढगांबरोबर )(येथे वराह ह्याचा अर्थ डुक्कर असा नसून मेघ असा आहे )   सम्विदाना म्हणजे मिळालेली पृथिवी सूकराय म्हणजे सुखद किरणे असणार्‍या , मृगाय    म्हणजे सूर्यासाठी, वि  जिहीते म्हणजे विविध प्रकार प्राप्त करते.

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

 पृथ्वी आपल्या धारण शक्तीमुळे (गुरूत्वबल ) सर्व पदार्थांना आपल्याकडे धरून ठेवते. पृथ्वी सूर्यासमोरून चालते त्यामुळे पाणी आकाशात चढते (मेघ ) आणि  पृथ्वीवर वर्षाव होतो. प्रस्तुत श्लोकातून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीवर गुरूत्वबल आहे ह्या दोहोंचा अर्थबोध होतो.

आता आपण पृथ्वीच्या परिभ्रमणाचा यजुर्वेदामधील उल्लेख पाहू. यजुर्वेद अध्याय ३ मंत्र ६ मध्ये खालील श्लोक आहे. 

आयं गौः पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन् मा॒तरं॑ पु॒रः। पि॒तरं॑ च प्र॒यन्त्स्वः॑ 

आता ह्याचा अन्वयार्थ पाहू :

आ। अयम्। गौः। पृश्निः। अक्रमीत्। असदत्। मातरम्। पुरः। पितरम्। च। प्रयन्निति प्रऽयन्। स्वरिति स्वःआ) अभ्यर्थे (अयम्) प्रत्यक्षः (गौः) यो गच्छति स भूगोलः। गौरिति पृथिवीनामसु पठितम्। (निघं॰१.१) गौरिति पृथिव्या नामधेयम्। यद् दूरं गता भवति। यच्चास्यां भूतानि गच्छन्ति (निरु॰२.५) (पृश्निः) अन्तरिक्षे। 


ही गोलरूपी पृथ्वी  पितरम्  म्हणजे पालन करणार्‍या, स्वः म्हणजे सूर्यलोकाच्या, पुरः म्हणजे पुढे पुढे, मातरम् म्हणजे आपल्या योनीरूप जलासमवेत, पृश्निः म्हणजे अंतरिक्ष - अंतराळात, आक्रमित म्हणजे चारही बाजूंनी फिरते. 

ह्याचा सोपा अर्थ पाहू : 

माणसांनी हे जाणले पाहिजे की, जल व अग्नी यांनी निर्माण झालेली ही पृथ्वी जलासह अंतरिक्षामध्ये सूर्याभोवती आपल्या कक्षेत फिरत असते त्यामुळेच क्रमाक्रमाने दिवस व रात्र शुक्ल किंवा कृष्णपक्ष, ऋतू व अयन इत्यादी काल विभाजन होत असते.

अथर्ववेद कांड १२, सूक्त १, मंत्र १० मध्ये लिहिले आहे : 

याम॒श्विना॒वमि॑मातां॒ विष्णु॒र्यस्यां॑ विचक्र॒मे।

ह्याचा अर्थ पाहू :

(याम्)  ज्या (भूमीवर ) (अश्विनौ) दिन आणि रात्र (अमिमाताम्) मोजतात म्हणजेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र असे चक्र सुरु असते कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते (पृथ्वीचे परिवलन) 

अथर्ववेद कांड १२, सूक्त १, मंत्र १८ मध्ये लिहिले आहे : 

म॒हत्स॒धस्थं॑ मह॒ती ब॒भूवि॑थ म॒हान्वेग॑ ए॒जथु॑र्वे॒पथु॑ष्टे।

महती म्हणजे तू खूप मोठी आहेस, महत् सधस्थम् म्हणजे तुझा सहवास सुद्धा खूप मोठा आहे. महान्वेग: म्हणजे तुझा मोठा वेग एजथुः म्हणजे चालणे (सूर्याभोवती फिरणे ) आणि वेपथुः म्हणजे हालणे (स्वतःभोवती फिरणे ) हेसुद्धा मोठे आहे. 

सर्व विद्वानांनी वेदांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला तर अजून काही नवीन सिद्धांत सापडतील की जे अजून आधुनिक विज्ञानाने मांडले नाहीत. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...