माझा परिचय

Monday 26 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३८ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ६

 वेदविज्ञानरंजन_३८

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ६

प्रभू श्रीरामचंद्र आणि लंकाधिपती रावण यांच्या युद्धात कुंभकर्ण ह्या अतिप्रचंड राक्षसाचा उल्लेख आला आहे. सहा महिने झोप घेतल्यावर कुंभकर्णाला राक्षससेनेने महत्प्रयासाने जागे केले आणि ते प्रचंड धूड रणांगणावर उभे ठाकले. त्या अवाढव्य आणि अजस्र राक्षसाला पाहून वानरसेना घाबरून पळू लागली. ते पाहून प्रभू श्रीरामचंद्र यांनी बिभिषणाला विचारले की हा राक्षस कोण आहे?

आचक्ष्व सुमहान् कोऽसौ रक्षो वा यदि वासुरः।

न मयैवंविधं भूतं दृष्टपूर्वं कदाचन ॥ ७ ॥

विभीषणा ! सांग बरे ! हा इतक्या मोठ्‍या शरीरयष्टीचा कोण पुरुष आहे ? कोणी राक्षस आहे अथवा असुर आहे ? मी पूर्वी अशा प्राण्याला कधी पाहिलेले नाही. ॥७॥

लंकेत यायच्या आधी श्रीरामांनी ताटिका, खर, दूषण, मारिच अशा अनेक राक्षसांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे राक्षस कसे असतात, कसे दिसतात हे त्यांना पक्के ठाऊक होते. इथे मात्र कुंभकर्णाला पाहून श्रीराम म्हणतात की मी ह्याच्या आधी असा राक्षस कुठेच पाहिला नाही. इतर राक्षसांपेक्षा हा काहीतरी वेगळाच दिसतोच. हा यंत्रमानव असल्याने तो इतर राक्षसांपेक्षा निश्चित वेगळा दिसत असावा. 

उच्यन्तां वानराः सर्वे यंत्रमेतत् समुच्छ्रितम् ।

इति विज्ञाय हरयो भविष्यन्तीह निर्भयाः ॥ ३३ ॥

सर्व वानरांना हे सांगितले जावे की, ही कुणी व्यक्ती नाही; माया द्वारा निर्मित उंच यंत्रमात्र आहे. असे कळल्यावर वानर निर्भय होऊन जातील. ॥३३॥

प्रक्षिप्ताः कुम्भकर्णेन वक्त्रे पातालसंनिभे |

नासापुटाभ्यां निर्जग्मुः कर्णाभ्याम् चैव वानरा: ||

ह्या कुंभकर्णाचे तोंड म्हणजे जणू काही पाताळातील प्रचंड मोठे विवर असावे असे भासत होते. वानरसेना त्याच्या तोंडातून आत जाऊन नाकातून बाहेर येत होती. आता पहा सजीव प्राण्याच्या तोंडातून आत जाऊन नाकातून बाहेर येणे शक्य आहे का? त्यामुळे कुंभकर्ण हा यंत्रमानव असावा ह्याची शक्यता बळावते. 

वरील श्लोक बिभीषण श्रीरामांना उद्देशून म्हणतो. ह्यात बिभिषण सांगतो की हे प्रभो! ह्या प्रचंड धूडाला पाहून जे वानर भयभीत होऊन पळत आहेत त्यांना आपण सांगावे की कुंभकर्ण ही कोणीही व्यक्ती नाही. तर मायेद्वारा निर्माण करण्यात आलेले यंत्र आहे. हे कळल्यावर वानर घाबरणार नाहीत. येथे बिभीषण स्वतःच म्हणतोय की अतिप्रचंड विस्तार असलेला हा कुंभकर्ण म्हणजे एक यंत्र आहे. ज्यांच्याकडे रामायण आहे त्यांनी प्रस्तुत श्लोक आणि त्याचा अर्थ रामायणात नक्की वाचा. मी इथे माझ्या स्वतःचे वेगळे असे काही लिहीत नाहिये. असे जर असेल तर यंत्रमानव (Robot ) तयार करण्याचे आजच्यापेक्षा प्रगत तंत्र त्रेतायुगातील रावणाला अवगत होते. 

आता तुम्ही म्हणाल की कुंभकर्णाचे लग्न झाले होते. मग तो यंत्रमानव कसा? कुंभकर्णाच्या पत्नीचे नाव वज्रमाला होते तसेच त्यास मुलेदेखील होती. हनुमंताने युद्धात त्याच्या मुलांचा वध केला. हा जो काही अतिप्रचंड असा यंत्रमानव होता त्याच्या आत बसून कुंभकर्ण तो यंत्रमानव चालवित असावा. त्यामुळे त्या यंत्रमानवालासुद्धा कुंभकर्ण असेच नाव प्राप्त झाले असावे असे वाटते. 

युद्धासाठी उपयुक्त अशी सर्व यंत्रसामग्री रावणाकडे होती. विविध प्रकारचे अग्निबाण (Missiles ), युद्धात वापरली जाणारी अत्याधुनिक विमाने (Fighter planes ) रावणाचा मुलगा मेघनाद ह्यांच्याकडे होती आणि उत्तम प्रकारचे सर्व सोयींनी युक्त असे पुष्पक विमान रावणाकडे होते. अशा प्रकारची सुसज्ज यंत्रसामग्री असणार्‍या रावणाकडे यंत्रमानव असणे सहज शक्य आहे. 

टीप : वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून रामायणाचा अभ्यास करताना मी वरील मत मांडले आहे. माझ्या मताशी सगळेच सहमत असतील असेही नाही.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ३७ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ५

 वेदविज्ञानरंजन - ३७

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ५

जगातील सर्वांत पहिला highway कोणी बांधला? 

त्रेतायुगात म्हणजे अंदाजे इ. स. पू. १२,०००  वर्षे आधी रामायण घडले अशी मान्यता आहे. 

वाल्मीकी रामायणातील अयोध्याकांड सर्ग क्र ८० मध्ये high way कसा बांधला आहे ह्याचे खूप छान वर्णन आहे. राम वनवासात गेल्यावर सर्वानुमते भरताला राज्याभिषेक करावा असे ठरले. त्यावेळी श्रीरामांना भेटण्यासाठी गंगातटापर्यंत जाण्याचे भरत ठरवितो आणि अयोध्येतील सर्व कुशल कारागीरांना अयोध्येपासून गंगातटापर्यंत एक सुंदर राजमार्ग ( high way ) तयार करण्याची आज्ञा देतो. आपण त्यातील निवडक श्लोक पाहू. 

अथ भूमिप्रदेशज्ञाः सूत्रकर्मविशारदाः |

स्वकर्माभिरताः शूराः खनका यन्त्रकास्तथा ||१||

कर्मान्तिकाः स्थपतयः पुरुषा यन्त्रकोविदाः तथा वर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ||२ ||

सूपकाराः सुधाकारा वंशकर्मकृतस्तथा |

समर्था ये च द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे ||३ ||

High way तयार करण्यासाठी कोणी कोणी प्रस्थान केले ह्याची माहिती पाहू. 

भूमीचे ज्ञान असणारे भूमिप्रदेशज्ञाः (भूशास्त्रज्ञ ) छावणी वगैरे तयार करण्याचे ज्ञान असलेले सूत्रकर्मविशारद, शूरवीर, भूमी खोदणारे, सुरूंग वगैरे बनविणारे खनकाः ह्यांनी पुढे प्रस्थान केले. रामायण काळात सुद्धा आजच्यासारख्या वैज्ञानिक शाखा होत्या की ज्यामध्ये भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रे शिकविली जात असत. 

स्थपतयः म्हणजे स्थापत्यशास्त्र जाणणारे वास्तुविशारद तसेच यन्त्रकोविदाः म्हणजे यंत्रांची माहिती उत्तम प्रकारे जाणणारे असे mechanical engineers सुद्धा अयोध्येत होते. त्या सर्वांनी मिळून एकत्र काम करून तो राजमार्ग तयार केला. 

बबन्धुर्बन्धनीयांश्च क्षोद्यान् सञ्चुक्षुदुस्तथा |

बिभिदुर्भेदनीयांश्च तांस्तान् देशान् नरास्तदा ||१० ||

जेथे पूल बांधण्यास पाणी आहे तेथे पूल बांधले. म्हणजे रामसेतूच्या आधीच भरताच्या स्थापत्यविशारदांनी पूल बांधले होते. पूल बांधण्याचा तंत्रज्ञान प्राचीन काळापासून भारतीयांना अवगत होते. भरताचे सैन्यदल आणि रथ, हत्ती इत्यादी सर्व त्या पुलावरून व्यवस्थित जाऊ शकेल असा भक्कम पूल बांधायचे ज्ञान अवगत होते.

अचिरेण तु कालेन परिवाहान् बहूदकान् |

चक्रुर्बहुविधाकारान् सागरप्रतिमान् बहून् ||१||

लहान लहान झरे, ज्यांतील पाणी सर्व बाजूंनी वाहत होते त्यांना बांध घालून त्यामध्ये अधिक पाणी साठेल असे तयार केले. म्हणजे धरणे बांधण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. भिन्न भिन्न आकारांची बरीच सरोवरे तयार केली आणि जलाने भरून गेल्यामुळे ती सरोवरे समुद्रासारखी भासू लागली.मोठे मोठे तलाव खोदणे हे यंत्रांशिवाय शक्य नाही. त्याकाळी बुलडोझर सारखी यंत्रे असावीत असे वाटते. 

जाह्नवीं तु समासाद्य विविधद्रुमकाननाम् |

शीतलामलपानीयां महामीनसमाकुलाम् ||  २१ ||


सचन्द्रतारागणमण्डितं यथा |

नभः क्षपायाममलं विराजते |

नरेन्द्रमार्गः स तदा व्यराजत |

क्रमेण रम्यः शुभशिल्पिनिर्मितः |

अनेक प्रकारच्या वृक्षांना सुशोभित, शीतल, निर्मल जलाशयांनी युक्त असलेला तो रमणीय राजमार्ग अत्यंत शोभून दिसत होता. चांगल्या कारागीरांनी (शुभशिल्पिनिर्मितः ) तो निर्माण केला होता. 

अलीकडे जेव्हा महामार्ग (high way ) तयार केला जातो त्यावेळी त्या महामार्गावर food-mall, मोठमोठे बगीचे, तारांकित हॉटेल्स तयार केली जातात. त्रेतायुगात असाच राजमार्ग, जो भरताच्या कारागीरांनी तयार केला होता, त्यावर उत्तम सरोवरे, जलाशये, विहीरी आदिंचे बांधकाम केले होते. त्याचप्रमाणे सैन्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा केली होती.

रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती. 

ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382* 

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Sunday 25 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३६ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

 वेदविज्ञानरंजन- ३६

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

वानरराज सुग्रीव यांनी जनकनंदिनी सीतेच्या शोधार्थ वानरसेनेला पूर्व दिशेस जायला सांगितले आणि त्या अनुषंगाने कोणकोणते देश, पर्वत, समुद्र पार करावे लागतील ह्याची संपूर्ण माहिती दिली. 

किष्किंधा कांड ४० श्लोक ५३,५४ आणि ५५

त्रिशिराः काञ्चनः केतुः तालस्तस्य महात्मनः |

स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ||

पर्वाच्या वर त्या महात्म्यांची ताडाच्या चिह्नांनी युक्त सुवर्णमय ध्वजा फडकत आहे. त्या ध्वजेच्या तीन शिखा (त्रिशिराः ) आहेत आणि खालच्या आधार भूमीवर वेदी बनवलेली आहे. अशा प्रकारे त्या ध्वजाला खूप शोभा प्राप्त झाली आहे. 

पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः |

ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ||५४ ||

हाच तालध्वज पूर्व दिशेच्या सीमेचे सूचक चिह्न ह्या रुपात देवतांच्या द्वारे स्थापित केला गेला आहे. त्यानंतर सुवर्णमय पर्वत आहे, जो दिव्य शोभेने संपन्न आहे. 

भारताच्या पूर्वेकडे भ्रमण करीत गेले असता सध्याचा पेरु देश लागतो. त्या देशात अँडीज (मूळ संस्कृत शब्द - अद्री) नावाचा पर्वत आहे त्यावर तीन शिखांनी युक्त असा मोठा त्रिशूल खोदलेला (कोरलेला ) आहे. त्याच्या तळाशी आयताकृती वेदी आहे जी आजही स्पष्ट दिसू शकते त्याला आजच्या भाषेत The Paracas Candelabra किंवा Candelabra of the Andes असे नाव आहे. आत्ताच्या भूगोलानुसार पेरु हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. 

वरील श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे हा त्रिशूल - तालध्वज पूर्व सीमेचे चिह्न आहे कारण त्यानंतर भूभाग नाही. आकाशातून उडणाऱ्या विमानांसाठी पूर्व दिशा दर्शविणारे चिह्न तयार केले गेले असावे. रामायणकाळी विमाने अस्तित्वात होती. अर्थात ह्याची माहिती आपण पुढे कधीतरी घेऊ. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या तालध्वजाचे वर्णन वानरराज सुग्रीव यांनी केले आहे तो आजही अस्तित्वात आहे. हा तालध्वज त्यांनी स्वतः पाहिलेला असल्याने त्याचे हुबेहुब वर्णन त्यांनी केले आहे. मग भारतातून पूर्वेकडील पेरू देशापर्यंत सुग्रीव कसे गेले असतील? समुद्रमार्गे गेले असतील का आकाशमार्गे गेले असतील?  मागच्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे वानरराज सुग्रीव यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केली असल्याने त्यांना पृथ्वी गोल आहे हे सुद्धा ज्ञात होते. 

अरण्यकांडातील सर्ग क्र. २३ मध्ये सूर्यग्रहण पाहिल्याचे वर्णन आहे. जेव्हा श्रीराम आणि खर राक्षस यांचे युद्ध झाले त्यावेळी सूर्यग्रहण होते त्याचा उल्लेख खालील प्रमाणे :

श्यामं रुधिरपर्यन्तं बभूव परिवेषणम् ।

अलातचक्रप्रतिमं परिगृह्य दिवाकरम् ॥ ३ ॥

सूर्यमण्डलाच्या चारी बाजूस अलात चक्राप्रमाणे गोलाकार घेरा दिसून येऊ लागला, ज्याचा रंग काळा आणि कडेचा रंग लाल होता. ॥३॥

येथे अलात चक्र ह्याचा अर्थ fire ring. साहसी खेळांमध्ये ज्वालांनी वेढलेल्या गोलातून आरपार उड्या मारतात तो गोल होय. सूर्यबिंब काळे (झाकोळलेले ) आणि कडेचा रंग लाल होता म्हणजे हे निश्चित खग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण असावे

बभूव तिमिरं घोरं उद्धतं रोमहर्षणम् ।

दिशो वा प्रदिशो वापि न च व्यक्तं चकाशिरे ॥८॥

सर्वत्र अत्यंत भयंकर तसेच रोमांचकारी दाट अंधकार पसरला. दिशांचे अथवा कोनांचे स्पष्ट रूपाने भान होत नाहीसे झाले होते. ॥८॥

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी अंधःकार होतो हे आपल्याला माहिती आहेच. 


कबन्धः परिघाभासो दृश्यते भास्करान्तिके ॥११॥

जग्राह सूर्यं स्वर्भानुरपर्वणि महाग्रहः ।

प्रवाति मारुतः शीघ्रं निष्प्रभोऽभूद् दिवाकरः ॥१२ ॥

सूर्याच्या जवळ परिधा प्रमाणे कबंध (शिरकापलेले धड) दिसून येऊ लागले. महान ग्रह राहु अमावस्या नसतांनाच सूर्याला ग्रासू लागला. वारा तीव्र गतीने वाहू लागला तसेच सूर्यदेवाची प्रभा फिकी पडली. ॥११-१२॥

उत्पेतुश्च विना रात्रिं ताराः खद्योतसप्रभाः ।

संलीनमीनविहगा नलिन्यः शुष्कपङ्‌कजाः ॥१३॥

रात्र नसतांनाच काजव्यांप्रमाणे चमकणारे तारे आकाशात उदित झाले.  सरोवरात मासे आणि जलपक्षी विलीन होऊन गेले. त्यांतील कमळे सुकून गेली. ॥१३॥

तस्मिन् क्षणे बभूवुश्च विना पुष्पफलैर्द्रुमाः ।

उद्धूतश्च विना वातं रेणुर्जलधरारुणः ॥ १४ ॥

फुले आणि फळे गळून गेली. वारा नसतांनाही ढगांप्रमाणे धूसर रंगाची धूळ उंच जाऊन आकाशात पसरली गेली. ॥१४॥

प्रस्तुत सर्व श्लोकांमध्ये सूर्यग्रहणाचे वर्णन केले आहे असे स्पष्टपणे दिसून येते. सर्वांत पहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय Bruce Masse ह्याला ( नेहमीप्रमाणे परदेशी लोकांना श्रेय देण्यात आले आहे) देण्यात आहे आहे. 

Archaeologist Bruce Masse, who putative links an eclipse that occurred on May 10, 2807, BC

रामायणाचा काळ अंदाजे इ. स. पू. १२ हजार वर्षे - त्रेतायुगातील आहे म्हणजे सर्वांत पहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय रामायणाकार महर्षी वाल्मिकी किंवा प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांना द्यावयास हवे. सूर्यग्रहणे झाल्याचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आहे. परंतु, रामायणात त्याचे अधिक विस्तृत वर्णन दिले आहे.

रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - ३५ - रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 #वेदविज्ञानरंजन_३५

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

जनकनंदिनी सीतेच्या शोधार्थ वानरसेनेला वानरराज सुग्रीव यांनी चारही दिशांना पाठवले आणि पृथ्वीच्या भौगोलिक प्रदेशांचे वर्णन केले होते ह्याची माहिती आपण घेतली. त्यावेळी श्रीरामांनी सुग्रीवाला विचारले की तुला सर्व भौगोलिक प्रदेशांची माहिती कशी काय मिळाली? त्यावर सुग्रीव म्हणाले की वाली माझा पाठलाग करीत होता तेव्हा मी संपूर्ण पृथ्वी फिरलो. त्यासंबंधीचे श्लोक पाहू.

किष्किंधा कांड सर्ग ४६, श्लोक १

गतेषु वानरेंद्रेषु रामः सुग्रीवमब्रवीत् ।

कथं भवान् विजानीते सर्वं वै मण्डलं भुवः ॥ १ ॥ 

ते समस्त वानरयूथपती निघून गेल्यावर श्रीराम सुग्रीवाला विचारतात, " हे सख्या!  तू समस्त भूमंडलातील स्थानांचा परिचय कसा जाणतोस?" 

ह्या इथे भूमंडल असा शब्द श्रीरामांनी योजला आहे म्हणजे पृथ्वी चपटी नसून गोल होती हे रामायणकाळी ज्ञात होते. 

किष्किंधा कांड सर्ग ४६, श्लोक १२, १३

ततोऽहं वालिना तेन सोऽनुबद्धः प्रधावितः ।

नदीश्च विविधाः पश्यन् वनानि नगराणि च ॥ १२ ॥

आदर्शतलसंकाशा ततो वै पृथिवी मया ।

अलातचक्रप्रतिमा दृष्टा गोष्पदवत् कृता ॥ १३ ॥

वाली माझ्या मागे लागला होता आणि मी जोरजोराने पळून चाललो होतो. त्यावेळी मी वेगवेगळ्या नद्या, वने आणा देश पाहत संपूर्ण पृथ्वी गाईच्या खुराप्रमाणे समजून तिची परिक्रमा केली. पळून जाताना मला ही पृथ्वी दर्पण आणि अलातचक्राप्रमाणे दिसली.

दर्पण म्हणजे आरशासारखी पृथ्वी दिसली असे वर्णन आहे म्हणजे पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात जलसाठे तीन चतुर्थांश पाणी असल्याने आणि त्रेतायुगात ते पाणी आरशासारखे स्वच्छ आल्याने त्यात प्रतिबिंब दिसत असावे. त्यामुळे सुग्रीवाने आरशाची उपमा योजिली असावी. तसेच सुग्रीवाला ही पृथ्वी अलातचक्राप्रमाणे दिसली असेही वर्णन केले आहे. अलातचक्र म्हणजे एखादे जळत असलेले लाकूड गोलाकार फिरविले तर जसे अग्नीचे तेजस्वी वर्तुळ दिसते तसे चक्र होय. उदबत्ती हातात धरून आपण गोलाकार फिरविली तर एक तेजस्वी वर्तुळ आपल्याला दिसते. त्याप्रमाणे सुग्रीवाला संपूर्ण पृथ्वी गोलाकार भासली. म्हणजेच पृथ्वी गोल आहे ह्याचे वर्णन रामायणात केले आहे.

किष्किंधा कांड सर्ग ४६, श्लोक  २४

एवं मया तदा राजन् प्रत्यक्षमुपलक्षितम् ।

पृथिवीमण्डलं सर्वं गुहामस्यागतस्तः ॥ २४ ॥ 

वानरराज सुग्रीव म्हणतो, " हे प्रभो! अशा प्रकारे मी त्या दिवसांत समस्त भूमंडलास प्रत्यक्ष पाहिले होते त्यानंतर ऋष्यमूक पर्वतांतील गुहेत मी आलो.

पृथ्वी गोल आहे ह्याचा प्रत्यक्ष पुरावा ( आँखो देखा हाल ) सुग्रीव याने दिला आहे. असे असताना अजून कुठला पुरावा आवश्यक आहे?

संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचे श्रेय Ferdinand Magellan (September 1591) ह्याला दिलेले आहे. वास्तविक पाहता त्याचे श्रेय वानरराज सुग्रीव यांना मिळायला हवे कारण संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा \ परिक्रमा केल्याचे वर्णन आणि त्याचा स्पष्ट पुरावा रामायणात आहे.

रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ३४ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - २

 वेदविज्ञानरंजन - ३४

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - २

महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील किष्किंधा कांडात वानरराज सुग्रीव यांनी काही भौगोलिक संदर्भ दिलेले आहेत. त्याची माहिती घेऊ. सीतेच्या शोधार्थ वानरराज सुग्रीव यांनी चारही दिशांना आपल्या वानरांना पाठविले होते. त्यातील दक्षिण दिशेचे वर्णन करताना सुग्रीव आपल्या वानरांना खालील श्लोक सांगतात 

किष्किंधा कांड सर्ग ४१, श्लोक क्रमांक १२ 

नदीं गोदावरीं चैव सर्वमेवानुपश्यत ।

तथैवांध्रांश्च पुण्ड्रांश्च चोलान्

पाण्ड्यानश्च केरलान् ॥ १२ ॥

हे वानरांनो! जनकनंदिनी सीतामाईचा शोध घेण्यासाठी तुम्ही दक्षिण दिशेकडे जा. तिथे आंध्र , पुंड्र, चोळ, पांड्य आणि केरळ ह्या देशांत सीतेचा शोध घ्या.

रामायण हे त्रेतायुगात घडले म्हणणे आजपासून दोन युगे आधीच घडले आहे. त्यातील आंध्र आणि केरळ ही राज्ये त्याच नावाने आजही अस्तित्वात आहेत.

किष्किंधा कांड सर्ग ४१, श्लोक क्रमांक ४४ आणि ४५

ततः परं न वः सेव्यः पितृलोकः सुदारुणः |

राजधानी यमस्यैषां कष्टेन तमसाऽऽवृता ॥ ४४ ॥

हे वानरांनो!  त्याच्या पुढे (दक्षिण ध्रुव  ) अत्यंत भयानक पितृलोक आहे, तेथे तुम्ही लोकांनी जाता कामा नये. ही भूमि यमराजाची राजधानी आहे, जी कष्टमय अंधःकाराने आच्छादित आहे. ॥४४ १/२॥

येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अंधःकाराने आच्छादित अश्या भूमीचे वर्णन केले आहे. दक्षिण ध्रुवावर सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते असे आधुनिक विज्ञान सांगते. येथे वानरराज सुग्रीव याला आणि पर्यायाने महर्षी वाल्मिकी यांना सुद्धा पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे आणि तिथे अंधःकार असतो ही गोष्ट ज्ञात होती. सुग्रीव हा संपूर्ण पृथ्वी फिरलेला होता आणि त्याला संपूर्ण भूगोलाचे ज्ञान होते. 

एतावदेव युष्माभिः वीरा वानरपुंगवाः ।

शक्यं विचेतुं गंतुं वा नातो गतिमातां गतिः ॥ ४५ ॥

वीर वानरपुंगवांनो! दक्षिण दिशेला एवढ्याच अंतरापर्यंत तुम्हाला जायचे आहे. त्याच्या पुढे पोहोचणे असंभव आहे कारण त्यापुढे प्राण्यांची वस्ती नाही.

ह्याचा अर्थ कोणत्याही परदेशी शास्त्रज्ञाच्या आधी वानरराज सुग्रीव यांनी दक्षिण ध्रुवाविषयी भाष्य केले होते हे मी आवर्जून सांगतो.

किष्किंधा कांड सर्ग ४०, श्लोक क्रमांक ५९

उत्तरेण परिक्रम्य जंबूद्वीपं दिवाकरः ।

दृश्यो भवति भूयिष्ठं शिखरं तन्महोच्छ्रयम् ॥ ५९ ॥

सूर्यदेव उत्तर दिशेस फिरून जंबूद्वीपाची परिक्रमा करून येतात आणि सौमनस नामक अत्यंत उंच शिखरावर स्थित होतात तेव्हा जंबूद्वीपातील लोकांना सूर्यदेवांचे अधिक स्पष्ट दर्शन होते. 

येथे वाननराज सुग्रीव यांनी सूर्यदेव उत्तर दिशेस फिरुन येतात असे म्हंटले आहे म्हणजे येथे *सूर्याच्या उत्तरायणाचा संबंध आहे. जंबूद्वीपातील लोकांना सूर्याचे अधिक स्पष्ट दर्शन होते म्हणजे उत्तरायणात सूर्य जास्त वेळ तळपतो आणि दिवस जास्त मोठा असतो. पावसाची चिह्ने नसल्याने डिसेंबर ते मे महिन्यात आकाश निरभ्र असते आणि त्यामुळे जंबूद्वीपातील लोकांना म्हणजे भारतीय लोकांना सूर्य अधिक स्पष्ट दिसतो. 

किष्किंधा कांड सर्ग ४३, श्लोक क्रमांक ५५

स तु देशो विसूर्योऽपि तस्य भासा प्रकाशते ।

सूर्यलक्ष्म्या ऽभिविज्ञेयः तपतेव विवस्वता ॥ ५५ ॥

तो देश सूर्यहित आहे तरीही सोमगिरीच्या प्रभेने सदा प्रकाशित होत राहतो. तप्त सूर्याच्या प्रकाशाने जे देश प्रकाशित होतात त्याप्रमाणेच त्याला सूर्यदेवाच्या प्रभेने प्रकाशित आल्यासारखे मानले पाहिजे. 

वानरराज सुग्रीव यांनी सीतेच्या शोधासाठी वानरांना उत्तर दिशेकडे जायला सांगितले आहे. त्यावेळी उत्तर दिशेकडील देशांचे वर्णन सुग्रीव यांनी केले आहे.  येथे असे काही देश आहेत की जेथे सूर्योदय होत नाही. आधुनिक विज्ञानाने सांगितले आहे की उत्तरेकडील (उत्तर ध्रुवाजवळील ) नॉर्वे, ग्रीनलँड, डेन्मार्क, फिनलँड, कॅनडा आणि रशिया यांचा उत्तरेकडील भाग येथे पूर्ण सूर्योदय होत नाही

तेथील देश सोमगिरीच्या प्रभावाने प्रकाशित होतात असेही वानरराज सुग्रीव सांगतात. Northern lights असे नाव आधुनिक विज्ञानाने दिले आहे. नॉर्वे देशातील आकाशात निरनिराळ्या रंगांची उधळण होत असते आणि त्यामुळे ते आकाश प्रकाशमान दिसते. तेथे पूर्ण सूर्यास्त आणि सूर्योदय होत नाही. ह्या northern lights चा खेळ पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक तिथे जातात.

आता हे northern lights कसे तयार होतात ते पाहू :

When particles meet the earth's magnetic shield, they are led towards an oval round the magnetic north pole where they interact with the upper parts of the atmosphere. After that the released energy is called as Northern Lights. 

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे प्रकाश किरण वातावरणाशी संयोग पावतात आणि त्यामुळे विविध रंगांच्या प्रभा आकाशात दिसतात. 

वानरराज सुग्रीव सांगतात की सोमगिरीच्या प्रभेने तो देश सदा प्रकाशित होत राहतो.  ह्यातील सोमगिरी म्हणजे पृथ्वीचा उत्तर ध्रुव असावा. आता Northern Light ह्याचा शोध लावल्याचे श्रेय रामायणातील वाननराज सुग्रीव यांना द्यावयास हवे. परंतु, ते श्रेय आपण गॅलिलिओला देऊन मोळके झालो.  Google वर शोधल्यास खालील माहिती मिळते.

The northern lights were first described and named by galileo galilei in 1619

मग ह्या आधी अनेक हजार वर्षे ह्याचा उल्लेख रामायणात करून वाननराज सुग्रीव ह्यांनी त्याचे निरीक्षण नोंदले आहे. सुग्रीव उत्तर ध्रुवाच्या देशापर्यंत कसे पोहोचले असतील? त्यांनी कशाच्या सहाय्याने प्रवास केला असेल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ३३ : रामायणातील वैज्ञानिक संदर्भ - भाग - १

 वेदविज्ञानरंजन - ३३ : भाग - १

रामायणातील वैज्ञानिक संदर्भ - भाग - १

आज आपण सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग (सौरकलंक ) (Sunspot) आणि सौरज्वाला (Solar flares ) ह्याबद्दल पुरातन वैदिक ग्रंथांतील माहिती घेऊ. 

आधी सौरडाग कसे तयार होतात हे पाहू :

सूर्याच्या पृष्ठभागावरील काही विवक्षित ठिकाणी होणाऱ्या चुंबकीय घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या तापमानात घट होते. अशा ठिकाणाचे तापमान आजूबाजूच्या भागापेक्षा कमी झाल्यामुळे तो भाग आपल्याला डागांच्या रूपात काळ्या रंगाचा दिसतो.

आता ह्या सौरडागांचे निरीक्षण सर्वप्रथम प्रभूश्रीरामचंद्रांनी केले आणि त्याचा स्पष्ट उल्लेख रामायणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी केला आहे. रामायण युद्धकांड सर्ग ४१, श्लोक १८ मध्ये ह्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.


ह्रस्वो रूक्षोऽप्रशस्तश्च परिवेषः सुलोहितः

आदित्यमण्डले नीलं लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ||१८||

ह्याचा अर्थ पाहू :

हे लक्ष्मणा! सूर्यमंडलात (आदित्यमण्डले ) लहान (ऱ्हस्वः ), रूक्ष (रूक्ष ), अमंगलकारी (अप्रशस्तः ) आणि अत्यंत लाल वर्तुळ (परिवेषः सुलोहितः) दिसून येत आहे. त्याचबरोबर तेथे काळे (नीलम् ) डाग म्हणजे चिह्न (लक्ष्म ) दृष्टिगोचर आहे.

सौरज्वाला :

रक्तचंदन्दनसंकाशा संध्या परमदारुणा ।

ज्वलच्च निपतत्येतदाद् आदित्यादग्निमण्डलम् ॥

अत्यंत दारूण संध्या रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसून येत आहे. सूर्यापासून हा जळत्या आगीचा पुंज खाली कोसळत आहे. येथे सौरज्वालेचा स्पष्ट उल्लेख आहे. 

रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काही अशुभ सूचक संकेत श्रीराम देत आहेत. त्यामुळे राक्षसकुळाचा नाश होणार हे निश्चित आहे. ह्यात श्रीरामांनी सौरडाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग पाहिले असा स्पष्ट उल्लेख आहे. येथे नीलम् असा शब्द जरी असला तरी त्याचा एक अर्थ निळा आणि दुसरा अर्थ सावळा, काळा असाही आहे. आपल्याला जर मार लागला तर अंगावर काळेनिळे डाग पडून ते प्रचंड दुखतात. त्यामुळे येथे नीलम् ह्याचा अर्थ निळा नसून काळा असाच आहे आणि तसेच स्पष्टपणे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे.  आता जे महाभाग रामायण ही कविकल्पना आहे, राम जन्मलाच नव्हता अशी पोरकट विधाने करता त्यांना किती समजवणार? 

सौरडाग नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही.  मुळात सूर्याकडेच नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही (उगवत्या - मावळत्या सूर्याकडे पाहता येते. पण त्यावेळी डाग दिसू शकत नाहीत ) श्रीराम हा साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याने तेही अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत त्यामुळे हे सौरडाग त्यांना सहज दिसले असणार. आता त्यांना सामान्य माणूस मानले तर त्याकाळी निश्चित प्रगत दुर्बिणी (telescope ) असणार ज्यायोगे त्यांनी सौरडागांचे अवलोकन केले असेल.दुर्बीण कशी तयार करावी ह्याचे वर्णन भृगुशिल्पसंहितेत दिले आहे. ह्याबाबत माझ्या आधीच्या लेखात सर्व माहिती दिलेली आहेच. रामायण ही कविकल्पना नाही तर घडून गेलेला इतिहास आहे. त्याचे पुरावे निश्चित आहेत.महर्षी वाल्मिकी अत्यंत ज्ञानी होते त्यामुळे सर्व बारीकसारीक घडामोडी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. रामायण अभ्यासकांनी रामायणातील वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांकडेसुद्धा लक्ष देऊन शास्त्रीय दृष्टीने त्यांचा अभ्यास करावा असे माझे मत आहे. 

ह्याचा अजून एक उल्लेख ऋग्वेदात सापडतो. 

ऋग्वेद मंडल १, सूक्त १६४, मंत्र १४

सूर्यस्य चक्षु रजसैत्यावृतम् |

सूर्याचे डोळे (सौरडाग ) धुळीने व्यापलेले  (आवृत्त असतात ) येथे सौरवादळ किंवा सूर्यावरील हेलियम वायू यासंबंधी उल्लेख असावा असे वाटते. 

नेहमीप्रमाणे सौरडाग अवलोकन करण्याचे श्रेय आपण परदेशी वैज्ञानिकांना दिले. सौरडाग पाहिल्याची नोंद (I Ching ) ह्या चिनी शास्त्रज्ञाने साधारण इ. स. पू. ३६४ मध्ये केली आहे.  परंतु, त्याच्या हजारो वर्षे आधीच त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्र यांनी सौरडाग पाहिल्याचे उल्लेख असून सुद्धा त्याचे श्रेय श्रीरामांना, रामायणाला नाही. माझी सर्वांना विनंती आहे की महर्षी वाल्मिकी ह्यांनी लिहिलेले रामायण मुळातून वाचावे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अर्थ समजून घ्यावा.रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवद्गीता हे ग्रंथ फक्त देवाची स्तुती करण्यासाठी लिहिलेले नसून त्यात शास्त्रीय ज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत आहेत हेसुद्धा लक्षात घ्यावे.

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३२ : श्रीमद्भगवद्गीतेतील विज्ञान

 #वेदविज्ञानरंजन - ३२ : श्रीमद्भगवद्गीतेतील विज्ञान

श्रीमद्भगवद्गीतेतील विज्ञान

वेदविज्ञानरंजन - ३१ ह्या मागील लेखात आपण श्रीमद् आद्यशंकराचार्य ह्यांनी मांडलेला सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहिला. आता अंदाजे इ.स.पू. ५००० वर्षांपेक्षा अधिक पुरातन असलेल्या श्रीमद् भगवद्गीतेतील सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहू. गीतेतील ४ थ्या अध्यायातील १८ वा श्लोक खालील प्रमाणे आहे. 

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः |

स बुद्धिमानमनुष्येषु स युक्त: कृत्सनकर्मकृत् ||१८ ||

ह्याचा अर्थ इंग्रजी भाषेत पाहू 

He who sees action (or motion) in inaction (or inertia ) and who see the inaction (or inertia ) in action ( or motion) is an intelligent ones among humans 

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

जी व्यक्ती स्वतः काही कर्म न करता (अकर्म ) (स्वतः स्थिर राहून ) कर्म पाहते (गतीचा अनुभव घेते ) आणि जी व्यक्ती कर्म करून ( गतीशील असून ) अकर्म पाहते ( स्थिर अनुभव घेते  ) ती व्यक्ती अतिशय बुद्धिमान गणली जाते. 

ह्यातील सोपा अर्थ पाहू :

जो माणूस स्वतः स्थिर असून त्याने वेग असलेले दृश्य पाहिले तर त्याला ते दृश्य अस्थिर दिसते. ह्याउलट जो माणूस वेग असलेल्या दृश्यात असेल तर त्याला स्थिर असलेले अस्थिर दिसते. आता एक सोपे उदाहरण घेऊया. 

समजा आपण ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वर उभे आहोत (जो स्थिर आहे) तर वेगात जाणारी ट्रेन आपल्याला दिसून येते म्हणजेच तिचा वेग जाणवतो कारण ती अस्थिर  आहे. ह्याउलट आपण जर ट्रेन मध्ये बसलेलो असू आणी ट्रेन वेगात असेल तर, स्थिर असलेला प्लॅटफॉर्म आपल्याला वेगात मागे मागे जाताना दिसतो. 

आता साक्षात भगवंताच्या मुखातून सापेक्ष गतीचा नियम गीतेत सांगितलेला आहे.  खरे म्हणजे   आईन्स्टाईनप्रमाणेच ह्या सापेक्ष गतीचे श्रेय भगवान श्रीकृष्णांना द्यावयास हवे. ह्यावरून सापेक्ष गतीचा सिद्धांताचे मूळ भारतीय आहे असे सिद्ध होते. 

गीतेच्या अध्याय क्रमांक १५ (पुरुषोत्तमयोग)  मध्ये पहिलाच श्लोक आहे.

ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् | छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ||

मुळे वर आणि फांद्या खाली असलेला अश्वत्थ वृक्ष वर्णिलेला आहे. ह्यातील वैज्ञानिक अर्थ घेणे खूप आवश्यक आहे. आपला मेंदू म्हणजे आपले मूळ आणि मेंदूपासून शरीरात पसरलेल्या नाड्या / शिरा म्हणजे त्या मेंदूरूपी मुळाच्या फांद्या आहेत. शरीरशास्त्रातील अगदी प्राथमिक ज्ञान भगवंतांनी आपल्या गीतारूपी बोधात दिले आहे. शरीरशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांनी ह्याचा उल्लेख जरूर करावा अशी माझी विनंती आहे. 

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - ३१ : सापेक्ष गतीचा (Relative Motion ) सिद्धांत

 वेदविज्ञानरंजन - ३१ : सापेक्ष गतीचा (Relative Motion ) सिद्धांत

हिंदू धर्माचे प्रवर्तक भगवत्पूज्यपाद श्रीमद् आद्यशंकराचार्य विरचित शांकरभाष्य ह्या ग्रंथात आईन्स्टाईनच्या कित्येक शतके आधीच सापेक्ष गतीचा (Relative Motion ) सिद्धांत मांडला आहे. त्यातील श्लोक आपण पाहू.

नौस्थस्य नावि गच्छन्त्या तटस्थेषु अगतिषु नगेषु प्रतिकूलगतिदर्शनात् |

दूरेषु चक्षुषा असन्निकृष्टेषु गच्छत्सु गत्याभावदर्शनात् ||

ह्याचा अर्थ इंग्रजी भाषेत पाहू :

A person going by boat will see the trees on the banks moving backwards, though they are stationary. However he will see the heavenly bodies such as stars and planet above are stationary even if they are in constant motion. This is called the example of relative motion.

ह्याचा मराठी भाषेतील अर्थ असा आहे :

जेव्हा नावाडी होडी मधून प्रवास करीत असतो, तेव्हा काठावरची झाडे त्या नावाड्याला मागे मागे म्हणजे होडीच्या विरुद्ध दिशेने पळताना दिसतात. परंतु ती झाडे प्रत्यक्षात मात्र काठावर स्थिर असतात. ह्याउलट पृथ्वीवरील माणसाला आकाशातील ग्रह स्थिर दिसतात, परंतु, प्रत्यक्ष मात्र ते फिरत असतात. ह्या प्रकाराला सापेक्ष गती असे म्हणतात.

पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ग्रहसुद्धा स्वतःभोवती फिरतात हेच अप्रत्यक्षरित्या येथे सांगितले आहे. त्यामध्ये असलेल्या सापेक्ष गतीमुळे पृथ्वीवरून पाहणार्‍या माणसाला ग्रह स्थिर आहेत असे वाटते. पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या ग्रहांच्या गतीचा अभ्यास त्या काळी केला जात असे, त्यासाठी वेधशाळा होत्या. ह्याचा अर्थ पाश्चात्य शास्त्रज्ञांनी सांगायच्या कितीतरी शतके आधीच अनेक खगोलीय घटना भारतीयांना ज्ञात होत्या. पहा बरे! किती प्रगत संस्कृती होती आपली! 

बरेच वेळा ट्रेन मधून जाताना आपल्याला हा अनुभव येतो. आपली ट्रेन एखाद्या विशिष्ट वेगात चालली असते. शेजारील ट्रॅक वरून दुसरी ट्रेन वेगात येते. एक क्षण असा येतो की आपली ट्रेन आणि शेजारील ट्रॅक वरून येणारी दुसरी ट्रेन ह्यांची गती, वेग समान होतो आणि त्या दोन्ही ट्रेन स्थिर असल्या सारखा भास होतो.  ह्यालाच सापेक्ष गती (Relative Motion ) असे म्हणतात.

आता  आईन्स्टाईन ह्यांनी मांडलेला सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहू :

It is possible to define relative motion as comparing one object's motion with that of another object moving with the same velocity.

आता वरील उदाहरणात असे दिसून येते की आईन्स्टाईनच्या अनेक शतके आधीच आद्य शंकराचार्य यांनी सापेक्ष गतीचा सिद्धांत मांडला होता. परंतु, त्याचे श्रेय मात्र दुर्दैवाने आईन्स्टाईनला दिले जाते.

माझी सर्व पालकांना, आणि शिक्षकांना विनंती आहे की आपल्या मुलांना वरील लेख जरूर वाचून दाखवावा. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - ३० : गतीचे प्रकार

 वेदविज्ञानरंजन - ३० : कणाद 

आजच्या लेखात आपण महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक दर्शन ह्या ग्रंथात लिहिलेली भौतिक शास्त्राशी संबंधित माहिती पाहू.

महर्षी कणाद गतीचे प्रकार सांगितले आहेत. 

उत्क्षेपणामवक्षेपणामकुञचनम् प्रसारणम् गमन् इति कर्मणि

उत्क्षेपण (upward motion) - वस्तूला वर फेकणे 

अवक्षेपण (downward motion) - वस्तूला 

आकुञ्चन (shearing motion )

प्रसारण (Motion due to release in tensile strength)

गमन (rectilinear motion)

ह्या सर्व गतींचे ज्ञान प्रयोगांवर आधारित असून महर्षी कणाद यांनी त्या गतींना दिलेली नावेसुद्धा सार्थ आहेत. 

आपल्या निसर्गातील तत्वे पंचमहाभूतांनी तयार झालेली आहेत. आधुनिक विज्ञानसुद्धा ह्याला मान्यता देते. 

पृथ्वी, आप (जल ), वायू, तेज आणि आकाश ह्या पाच तत्त्वांनी द्रव्य तयार झाले आहे असे महर्षी कणाद म्हणतात. आधुनिक विज्ञानात हेच शिकविले जाते. The matter has 5 stages viz. Solid (पृथ्वी ), Liquid (जल ), Gas (वायू ), Energy (तेज ), Plasma (आकाश ) 

वैशेषिक ग्रंथात 2.2.1. ते 2.2.4 ह्या सूत्रांमध्ये द्रव्याच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे :

१. स्थायू अवस्था : 

रूपरसगन्धस्पर्शवती पृथिवी |

महर्षी कणाद यांनी पृथ्वीला स्थायू द्रव्याची उपमा दिलेली आहे. 

वरील सूत्राचा अर्थ पाहू :

रूप (color ), रस (taste ), गन्ध (smell ), स्पर्श (temperature ) 

एखाद्या स्थायू पदार्थाचा रंग आपण पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, स्पर्श म्हणजे तापमान अनुभवू शकतो. 

२. द्रव अवस्था :

रूपरसस्पर्शवत्य आपो द्रवाः स्निग्धाः |

वरील सूत्राचा अर्थ पाहू :

रूप (color ), रस ( taste), स्पर्श (temperature )

म्हणजे आपण द्रव पदार्थाचा रंग पाहू शकतो, चव घेऊ शकतो, त्याचे तापमान अनुभवू शकतो. 

हे नियम सामान्य द्रव पदार्थाला लागू आहेत. उदा. पाणी (ह्यालाही काही अपवाद आहेत. कारण काही द्रव पदार्थांना वासही असतो. ) 

३. वायू अवस्था :

स्पर्शवान् वायु: |

वरील सूत्राचा अर्थ पाहू :

आपण फक्त स्पर्शाने वायू अनुभवू शकतो. शुद्ध हवेसाठी हा नियम लागू आहे (ह्यालाही अपवाद आहे. काही वायूंना वास आणि रंग असतो) 

ह्यातील महत्त्वाचा मुद्दा असा की पदार्थाच्या (द्रव्याच्या) अवस्थांचे दस्तऐवजीकरण (Documentation ) आपल्या संस्कृतीत खूप खूप आधीच झालेले आहे. महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे. इतक्या वर्षांपूर्वी प्रयोग करून, त्यातील निष्कर्ष पडताळून पाहून ते सूत्रबद्ध रितीने लिहून ठेवण्याचे महान कार्य महर्षी कणाद यांनी केले आहे. दुर्दैवाने ह्याची माहिती खुद्द भारतीयांनाच नाही. शालेय पाठ्यपुस्तकांतून ह्याचा कुठेही उल्लेख नाही.

संदर्भग्रंथ : PHYSICS IN ANCIENT INDIA 

लेखक : Narayan Gopal Dongre and Shankar Gopal Nene

ज्यांना महर्षी कणाद ह्यांच्या वैशेषिक दर्शन ग्रंथांतील सूत्रांची अधिक माहिती हवी असेल त्यांनी वरील पुस्तक नक्की विकत घेऊन वाचावे. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - २९ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - २

 वेदविज्ञानरंजन - २९ :  न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - २

आजच्या लेखात आपण न्यूटनचा गतिविषयीचा पहिला नियम (Newton's law of motion ) पाहिला होता. आज आपण अजून दोन नियम पहाणार आहोत. आपल्या सर्वांना शाळेत असताना हे तीन नियम शिकवलेले असतात, ते विज्ञानाच्या पुस्तकात. हेच नियम महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक ग्रंथात नमूद केले आहेत. याचे विवेचन आपण पाहू. 

न्यूटनचा गतिविषयीचा दुसरा नियम

(Newton's second law of motion ) 

The rate of change of motion of the body is directly proportional to the force applied. 

वस्तूच्या गतीत होणारा बदल, वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या समानुपाती असतो. 

वेगः निमित्तापेक्षात कर्मणो जायते नियतदिक क्रियाप्रबन्धहेतु

(Change of motion is proportional to the motive force impressed and is made in the direction of the right line in which the force is impressed)

एखाद्या वस्तूवर जेव्हढे अधिक बल (force) लावले जाते तेव्हढी त्या वस्तूची गती (velocity ) अधिक वाढते, अधिक त्वरण (acceleration ) निर्माण होते 

प्रयत्नविशेषान्नोदनविशेषः    वैशेषिक ५.१.६ 

Particular efforts results in particular impulse. 

न्यूटनचा गतिविषयीचा तिसरा नियम

Every action has equal and opposite reaction 

कार्यविरोधि कर्मः. वैशेषिक ५.१.६ 

वेगः संयोगविशेषविरोधी 

(Every action there is always an equal and opposite reaction)

The Effect (KARYA ) always opposes the Action (KARMA)

नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला एखादी होडी पाण्यात ढकलायची असेल तर किनाऱ्यावरील जमिनीच्या दिशेने बल लावावे लागते तेव्हा त्याच्या विरुद्ध दिशेने होडी पाण्यात ढकलली जाते.न्यूटन यांनी सांगितलेले हे तीन नियम आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कमी अधिक प्रमाणात वापरत असतो.

आज आपण जे न्यूटनचे गतिविषयीचे नियम वाचतो ते मुळात महर्षी कणाद यांचे आहेत. महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे आणि न्यूटन यांचा काळ इ. स. १६४३ ते इ. स.१७२७ असा आहे. ह्याचा अर्थ न्यूटनच्या आधीच साधारण १००० वर्षे महर्षी कणाद यांनी गतिविषयीचे नियम त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत आणि त्याचे दस्तऐवजीकरणसुद्धा (Documentation ) केले आहे. हे सर्व समोर दिसत असून सुद्धा सर्व श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी न्यूटन यांना दिले गेले. वैदिक संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती असून हिंदू धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे. परंतु, पाश्चिमात्य विद्वानांनी जाणीवपूर्वक भारतीयांचे खच्चीकरण करून आपल्याला मागास ठरवले. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आपल्या वैज्ञानिक ऋषींची उपेक्षा का? भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या भारतातील एकाही संस्थेला दाखल घ्यावी असे वाटले नाही का? 

माझी भारत सरकारला आणि मराठी विज्ञान परिषद अशा संस्थांना हात जोडून विनंती आहे की ह्यासंदर्भात योग्य तो पाठपुरावा करून प्राचीन भारतीय ऋषींच्या कार्याला, त्यांच्या वैज्ञानिक शोधांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी.

खालील चित्रांत महर्षी कणाद यांचे गतिविषयीचे नियम दर्शविले आहेत. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - २८ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - १

 वेदविज्ञानरंजन - २८ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - १

आजच्या लेखात आपण न्यूटनचे गतिविषयीचे नियम (Newton's law of motion ) पाहणार आहोत. आपल्या सर्वांना शाळेत असताना हे तीन नियम शिकवलेले असतात ते विज्ञानाच्या पुस्तकात. हेच नियम महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक ग्रंथात नमूद केले आहेत. याचे विवेचन आपण पाहू. 

न्यूटनचा पहिला नियम : (Newton's first law of motion ) 

The change of motion is due to impressed force (Principia)

An object at rest will stay at rest and an object in motion will stay in motion unless acted by  the net external force. 

ह्या नियमाचे मराठी भाषांतर पाहू :

एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, गतीमान असेल तर गतिमान राहते. जोपर्यंत तिच्यावर बाह्यबलाचा प्रभाव पडत नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या गतीत काहीही बदल होत नाही. 

आता महर्षी कणाद यांचे सूत्र पाहू :

वेगः निमित्तविशेषात कर्मणो जायते| 

वस्तूच्या गतीत बदल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते 

(change of motion is due to impressed force ) 

संयोगविभागवेगानां कर्म समानम् ।  वैशेषिक-१,१.२०

( if two bodies have to collide or move away, the cause of is common which is KARMA - Force ) 

दोन वस्तूंची टक्कर होण्यासाठी किंवा त्या दोन वस्तू एकमेकांपासून दूर जाण्यासाठी बलाची आवश्यकता आहे.

न द्रव्याणाम् कर्म |   वैशेषिक-१. १.२१

The KARMA (Force ) can not come from the bodies. It has to be external 

म्हणजेच दोन वस्तूंवर जे बल प्रयुक्त केले असते ते बाह्यबल असते.. ह्याचा सोपा अर्थ असा की 

(change of motion is due to impressed force) वेग हा कर्म केल्यामुळे म्हणजे बलामुळे (force ) निर्माण होतो. 

येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले ऋषी हे अत्यंत प्रयोगशील होते. निरनिराळे प्रयोग करून त्याच्यावर खूप संशोधन करून त्यांनी निष्कर्ष मांडले आहेत. महर्षी कणाद ह्यांचा वैशेषिक दर्शन हा एक उत्कृष्ठ वैज्ञानिक ग्रंथ आहे. त्यात विविध वैज्ञानिक सिद्धांत सामावलेले आहेत. आज आपण जे न्यूटनचे गतिविषयीचे नियम वाचतो ते मुळात महर्षी कणाद यांचे आहेत. *महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे आणि न्यूटन यांचा काळ इ. स. १६४३ ते इ. स.१७२७ असा आहे*. ह्याचा अर्थ न्यूटनच्या आधीच साधारण १००० वर्षे महर्षी कणाद यांनी गतिविषयीचे नियम त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत आणि त्याचे दस्तऐवजीकरणसुद्धा (Documentation ) केले आहे. हे सर्व समोर दिसत असून सुद्धा सर्व श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी न्यूटन यांना दिले गेले*. वैदिक संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती असून हिंदू र्म हा वैज्ञानिक धर्म आहे. परंतु, पाश्चिमात्य विद्वानांनी जाणीवपूर्वक भारतीयांचे खच्चीकरण करून आपल्याला मागास ठरवले. आता आपल्याला *स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आपल्या वैज्ञानिक ऋषींची उपेक्षा का? भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या भारतातील एकाही संस्थेला दाखल घ्यावी असे वाटले नाही का?* 

माझी भारत सरकारला आणि मराठी विज्ञान परिषद अशा संस्थांना हात जोडून विनंती आहे की ह्यासंदर्भात *योग्य तो पाठपुरावा करून प्राचीन भारतीय ऋषींच्या कार्याला, त्यांच्या वैज्ञानिक शोधांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी.


पुढच्या लेखात  महर्षी कणाद यांचे अजून काही गतिविषयीचे नियम पाहू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - २७ : जलचक्र भाग - २

 वेदविज्ञानरंजन - २७ : जलचक्र भाग - २

शाळेत आपण जे जलचक्र (Water Cycle) शिकलो होतो त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत कसा केला आहे ते आपण पाहू. 

महर्षी कणाद कालावधी सुमारे (इ. स. पू. ४०० - ६००)यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रे ह्या ग्रंथात जलचक्राची सूत्रे लिहिली आहेत. ती खालील प्रमाणे 

ह्या आधीच्या लेखात वेदविज्ञानरंजन - २६ आपण जलचक्राशी संबंधित सूत्रे अभ्यासली होती. उर्वरित सूत्रे आजच्या लेखात  पाहू :

नोदनापीडनात्  संयुक्तसंयोगाच्च 

नोदन आपीडनात् : नोदन नावाच्या विशेष वातचक्राच्या दाबामुळे ढग तयार होण्यास पोषक वातावरण तयार होते. 

संयुक्त संयोगात् च : जल आणि वायू यांच्या एकत्रित संयोगामुळे ढग आकाशात पोहोचतात*. ढगातील पाण्याच्या बिंदूंमध्ये आंतरिक संघनन होते (condensation) आणि पाण्याने भरलेले ढग तयार होतात. 

अपां संयोगाभावे गुरुत्वात् पतनम्

अपाम् : पावसाळी मेघ 

संयोगाभावे : संयोगाच्या अभावामुळे म्हणजेच पाण्याच्या कणांमधील बंध म्हणजेच संघनित अवस्था निघून जाते* पाण्याचे कण वेगवेगळे होतात आणि त्याचा भार सहन न झाल्याने 

गुरुत्वात् पतनम् : गुरुत्वाकर्षणामुळे खाली जमिनीवर पडतात म्हणजेच पाऊस सुरू होतो

 इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महर्षी कणाद यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख केला आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती ही संकल्पना भारतीयांनाही इ. स. पू. काळापासून ज्ञात होती. परंतु, आपण त्याचे श्रेय मात्र न्यूटनला देऊन बसलो हीच खरी शोकांतिका आहे. 

७२५ वर्षांपूवी ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या ओव्यांमध्ये जलचक्राचे वर्णन करतात :

तया उदकाचेनि आवेशे |

प्रगटले तेज लखलखीत दिसे ||

मग तया विजेमाजी असे |

सलील कायी ||

मी सूर्याचेनि वेषे |

तपे तै हे शोषे ||

पाठी इंद्र होवोनि वर्षे |

मग पुढती भरे ||

माऊली म्हणतात की सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते. मी म्हणजे परमात्माच पाणी शोषून घेतो. त्या वाफेचे ढग बनतात. आणि मीच इंद्रदेवाच्या रूपाने पाऊस पाडतो.

आधुनिक पाश्चात्य विज्ञानाने जलचक्राची प्रक्रिया शोधून काढली असली तरी, महर्षी कणाद आणि ज्ञानेश्वर माऊली यांना त्याआधीच कितीतरी शतके जलचक्र प्रक्रिया अवगत होती. 

जलचक्र ह्या नैसर्गिक घटनेचे अतिशय उत्तम पद्धतीने दस्तऐवजीकरण (Documentation) आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवले आहे परंतु, आपण मात्र त्याचे श्रेय निल्स वालेरियस ह्या स्वीडीश शास्त्रज्ञाला देण्यात धन्यता मानतो हे आपले दुर्दैव आहे. 

Nils Wallerius (1 January 1706 - 16 August 1764) was a Swedish physicist, philosopher and theologian. He was one of the first scientists to study and document the characteristics of evaporation through modern scientific methods

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Friday 23 December 2022

वेदविज्ञानरंजन - २६ : जलचक्र भाग - १

 


वेदविज्ञानरंजन - २६ : जलचक्र - भाग 

शाळेत आपण जे जलचक्र (Water Cycle) शिकलो होतो त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत कसा केला आहे ते आपण पाहू. 

महर्षी कणाद कालावधी सुमारे (इ. स. पू. ४०० - ६००)) यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रे ह्या ग्रंथात जलचक्राची सूत्रे लिहिली आहेत. ती खालील प्रमाणे 

द्रवत्वात् स्यन्दनम् 

द्रवत्वात् : द्रव पदार्थात द्रवण (fluidity) गुणधर्म असल्यामुळे 

स्यन्दनम् : द्रवात स्यन्दन म्हणजेच वाहण्याची क्रियाघडते. 

वरील सूत्रात पाणी का वाहते याचे कारण सांगितले आहे. 

The water is having the phenomenon of fluidity. Due to which water flows on the earth. 

ह्याचा अर्थ असा की fluidity ही संकल्पना पाश्चात्य वैज्ञानिकांच्या कितीतरी वर्षे आधी प्राचीन भारतीय ऋषींना माहीती होती. परंतु, fluidity संकल्पनेचे श्रेय नेहमी प्रमाणेच भारतीय ऋषींना न देता पाश्चात्य वैज्ञानिकांना दिले गेले.

नाड्यो वायुसंयोगादारोहणम्

नाड्य : सूर्याची किरणे (सूर्याची उष्णता)

वायुसंयोगात् : वायूबरोबर संयोग झाल्यामुळे

आरोहणम् : पाण्याची वाफ वर (आकाशात) जाते.

सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते. त्याचा वायूबरोबर संयोग होऊन ती वाफ वर (आकाशात जाते ). येथे महर्षी कणाद यांनी बाष्पीभवन (Evaporation ) ही संकल्पना मांडली आहे.

Water evaporates due to the heat received from the Sun and goes up in the sky. 

Nils Wallerius  (1 January 1706 - 16 August 1764) was a Swedish physicist, philosopher and theologian. He was one of the first scientists to study and document the characteristics of evaporation through modern scientific methods

पुन्हा एकदा बाष्पीभवन ह्या सिद्धांताचे श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी निल्स वालेरियस ह्या स्वीडीश शास्त्रज्ञाला देण्यात आले आहे. 

 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - २५ : बौधायन - पायथागोरस प्रमेय

 वेदविज्ञानरंजन - २५ : बौधायन - पायथागोरस प्रमेय

भूमिती विषयांतील पायथागोरस चे प्रमेयाचे मूळ आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांत आहे. ह्याबद्दल आपण माहिती घेऊया.

बौधायन नावाचे महान गणिती इ. स. पू. १२०० मध्ये होऊन गेले.  कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेशी संबंधित शुल्ब सूत्रात बौधायन आचार्यांनी अगदी स्पष्टपणे प्रमेयाचा सिद्धांत (भुजकोटिकरणीन्यायम्) मांडला आहे. भुज म्हणजे पाया आणी कोटि म्हणजे उंची आणि करणी म्हणजे कर्ण. त्याचा श्लोक पाहू :

दीर्घचतुरश्रस्याक्ष्णया रज्जुः पार्श्वमानी तिर्यग् मानी च यत् पृथग् भूते कुरूतस्तदुभयं करोति ॥

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पुढीलप्रमाणे :

दीर्घचतुरश्रस्य : चौकोन (Square) 

अक्ष्णया : कर्ण (Diagonal ) 

रज्जुः दोरी (Rope ) 

पार्श्वमानी : लंबरूप (perpendicular ) 

तिर्यग् मानी च : क्षितिजसमांतर (आडवी रेघ ) horizontal 

यत् पृथग् भूते कुरूत : चौरसांची बेरीज (area of sum of squares ) 

तदुभयम् करोति : कर्णाच्या क्षेत्रफळाएव्हढी बेरीज  (equals area of diagonal ) 

काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर एक दोरी खेचून धरली असता त्यामुळे तयार होणार्‍या चौकोनाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंमुळे तयार होणाऱ्या चौकोनाच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतके असते.

ह्याचा अर्थ इंग्लिश भाषेत पाहू :

A rope stretched along the length of diagonal produces an area which the vertical and horizontal sides make together.

आयामं आयामगुणं विस्तारं विस्तरेण तु |

समस्य वर्गमूलं यत् तत् कर्णं तद्विदो विदुः ||

आयामं आयामगुणं - the length multiplied by itself (l*l) 

विस्तारं विस्तरेण तु - and indeed the breadth (b*b) 

 समस्य वर्गमूलं - the square root of the sum (h*h) 

तत् कर्णम् - that is hypotenuse 

तद्विदो विदुः - those versed in the discipline say so 

l*l + b*b =h*h

 थोर भारतीय गणिती आर्यभट्ट यांनी त्यांच्या गणितपाद ग्रंथात प्रमेयाचा सिद्धांत मांडला आहे त्याचा श्लोक पाहू :

यश्चैव भुजावर्गः कोटीवर्गश्च कर्णवर्गः सः

ह्याचा अर्थ पुढीलप्रमाणे :

(काटकोन त्रिकोणात ) पाया बाजूचा वर्ग आणि लंब बाजूचा वर्ग यांची बेरीज कर्णाच्या वर्गाइतकी असते.

ह्याचा अर्थ इंग्लिश भाषेत पाहू :

(In right angled triangle ) the square of the base plus the square of the upright is the square of the hypotenuse.The diagonal of the rectangle produces both (areas ) which it's length and breadth produces seperetly.

पायथागोरस यांचा काळ इ. स. पू. ५०० पासून सुरू होतो. परंतु, त्याआधी साधारण ८०० वर्षे बौधायन आचार्यांनी हाच सिद्धांत मांडला होता. परंतु, आज ह्याचे श्रेय पायथागोरस यांना दिले गेले आणि आचार्य बौधायन मात्र उपेक्षित राहिले ही खरी शोकांतिकाच आहे भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत तरीही आपले प्राचीन भारतीय विद्वान उपेक्षित राहिले आहेत. सर्व सत्य समोर दिसत असून सुद्धा कोणाही शिक्षणमंत्र्यांनी किंवा अभ्यासक्रम ठरविणाऱ्या समितीने ह्या बौधायन प्रमेयाची दखल घेतली नाही ह्याचे खूप वाईट वाटते. 

माझी सर्व पालकांना आणि शिक्षकांना विनंती आहे की आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना वरील श्लोक आणि त्याचा अर्थ जरूर सांगावा. जेणेकरून प्राचीन भारतीय गणितातील प्रगती त्यांच्या लक्षात येईल. माझी भारत सरकारला विनंती आहे की गणिताच्या पाठ्यपुस्तकांमधून पायथागोरसच्या नावाबरोबरच आचार्य बौधायन यांचे नाव आणि प्रस्तुत श्लोक समाविष्ट करावा.

टीप : प्रस्तुत लेखात पायथागोरसचे महत्व कमी करण्याचा हेतू नसून आचार्य बौधायन आणि आर्यभट्ट यांचे महत्व विषद करण्याचा प्रयत्न आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - २४ : वेदांतील संख्यांचा उल्लेख

वेदविज्ञानरंजन  - २४ : वेदांतील संख्यांचा उल्लेख

शुक्ल यजुर्वेद ग्रंथांत अध्याय १७ श्लोक २ मध्ये १० च्या पटीतील संख्यांचा स्पष्ट उल्लेख आहे.

इमा मे ऽ अग्न ऽ इष्टका धेनवः सन्त्व् एका च दश च दश च शतं च शतं च सहस्रं च सहस्रं चायुतं चायुतं च नियुतं च नियुतं च प्रयुतं चार्बुदं च न्यर्बुदꣳ समुद्रश् च मध्यं चान्तश् च परार्धश् चैता मे ऽ अग्न इष्टका धेनवः सन्त्व् अमुत्रामुष्मिंल् लोके ॥

ह्याचा अर्थ आणि त्यामधील गणित आपण पाहू :

हे अग्नदेवता!  ह्या विटा (इष्टका ) (यज्ञात वापरल्या जाणाऱ्या विटा ) माझ्यासाठी गाई होवोत ( म्हणजे गाईप्रमाणे फळ देणाऱ्या, मदत करणाऱ्या )(पुढे त्या विटांची संख्या सांगितली आहे ) एक (१)  दश (१०)  शत (१००)  सहस्र (१,०००) अयुत (१०,०००) नियुत (लक्ष या १००,०००)  प्रयुत (१,०००,०००)  अर्बुद (१००,०००,०००) न्यर्बुद (अब्ज १,०००,०००,०००) समुद्र (१००,०००,०००,०००,०००) मध्य (१,०००,०००,०००,०००,०००)  अन्त्य (१०,०००,०००,०००,०००,०००)  परार्ध (१००,०००,०००,०००,०००,०००)  


१ ह्या संख्येवर सतरा शून्ये ठेवल्यानंतर तयार होणाऱ्या संख्येला सुद्धा त्यात परार्ध असे नावे होते. ह्या सर्व संख्यांचा उपयोग यज्ञवेदीची रचना करण्यासाठी व्हावयाचा. यज्ञवेदी कशा आकाराची असावी, त्यात किती विटा  असाव्यात ह्याचे शास्त्र असायचे. उगाचच काहीतरी रचून यज्ञ केले जात नसत त्याला शास्त्रीय बैठक होती. आता वरील संख्यांना अजून काही नावे दिली आहेत तीही पाहू :

भास्कराचार्य यांच्या लीलावती (१०-११) ग्रंथात 

खालील उल्लेख आहेत :

एक-दश-शत-सहस्रायुत-लक्ष-प्रयुत-कोटयः क्रमशः।

अर्बुदमब्जं खर्व-निखर्व-महापद्म-शङ्कवस्तस्मात्॥

जलधिश्चान्त्यं मध्यं परार्धमिति दशगुणोत्तराः संज्ञाः।

संख्यायाः स्थानानां व्यवहारार्थं कृताः पूर्वैः॥

ह्याचा अर्थ पाहू :

eka (एक): one (10^0=1)

daśa (दश): ten (10^1=10)

śata (शत): hundred (10^2=100)

sahasra (सहस्र): thousand (10^3=1,000)

ayuta (अयुत): ten thousand (10^4=10,000)

lakṣa (लक्ष): hundred thousand (10^5=100,000)

prayuta (प्रयुत): million (10^6=1,000,000)

koṭi (कोटि): ten million (10^7=10,000,000)

arbuda (अर्बुद): hundred million (10^8=100,000,000)

abja (अब्ज): billion (10^9=1,000,000,000)

kharva (खर्व): ten billion (10^10=10,000,000,000)

nikharva (निखर्व): hundred billion (10^11=100,000,000,000)

mahāpadma (महापद्म): trillion (10^12=1,000,000,000,000)

śaṅku (शङ्कु): ten trillion (10^13=10,000,000,000,000)

jaladhi (जलधि): hundred trillion (10^14=100,000,000,000,000)

antya (अन्त्य): quadrillion (10^15=1,000,000,000,000,000)

madhya (मध्य): ten quadrillion (10^16=10,000,000,000,000,000)

parārdha (परार्ध): hundred quadrillion (10^17=100,000,000,000,000,000)


कृष्ण यजुर्वेदात संख्या चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या आहेत.

सकृत्ते अग्ने नमः | द्विस्ते नमः |....

दशकृत्वस्ते नमः | शतकृत्वस्ते नमः |

आसहस्रकृत्वस्ते नमः |

अपरिमितकृत्वस्ते नमः |


O fire, salutations to you once, twice, thrice...

Salutations ten times, hundred times, thousand time,

Salutations to you unlimited times

हे अग्नीदेवता!   तुला एकदा, दोनदा, तीनदा, दहा वेळा, शंभर वेळा, हजार वेळा नमस्कार असो. वरील श्लोकात दिसून येते. की संख्येच्या पुढे शून्य ठेवले असता संख्येची किंमत बदलते ही गोष्ट भारतीयांना वेदकाळापासून ज्ञात होती. 

तैत्तिरीय संहिता ७.२.४९ ह्यात दहाच्या पटीत खालील संख्यांचा उल्लेख आहे. 

शताय स्वाहा सहस्राय स्वाहा अयुताय स्वाहा नियुताय स्वाहा प्रयुताय स्वाहा अर्बुदाय स्वाहा न्यर्बुदाय स्वाहा समुद्राय स्वाहा मध्याय स्वाहा अन्ताय स्वाहा... परार्धाय स्वाहा

 वरील श्लोकात पुन्हा एकदा दहाच्या पटतील संख्यांचा चढता क्रम दिसून येतो. 

ऋग्वेद २.१८.५ ह्यात खालील मंत्र आहे 

आ विंशता त्रिंशता याह्यर्वाङ् चत्वारिंशता हरिभिर्युजानः |

आ पञ्चाशता सुरथेभिरिन्द्रा षष्ट्या सप्तत्या सोमपेयम् ||५ ||

हे इंद्र! तू वीस, तीस घोड्यांद्वारे आमच्या जवळ ये. चाळीस घोड्यांनी युक्त असा तू आमच्या पर्यंत ये. पन्नास, साठ, सत्तर घोड्यांनी युक्त अश्या रथात बसुन सोमरस पिण्यासाठी आमच्याकडे ये. 

परकीय आक्रमण सातत्याने होत राहिल्यामुळे आपण आपल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानापासून वंचित राहिलो. इंग्रजांनीच सर्व काही आपल्याला शिकविले ह्याच भ्रमात आपण आहोत आणि आपण भारतीय कसे मागास होतो हेच बिंबवण्याचे कार्य इंग्रजांनी केले.

शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी  वेद हे अतिप्राचीन असून जगातील पहिले लिखित वाङ्मय म्हणून त्यास मान्यता आहे. ह्यावरून आपल्याला प्राचीन भारतीय ग्रंथातील ज्ञानाची ओळख होते. प्राचीन गणितज्ञ आणि ऋषी यांच्या बुद्धीची चमक दिसून येते. त्यामुळे आम्हाला आम्ही ह्या श्रेष्ठ संस्कृती मध्ये जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



वेदविज्ञानरंजन - २३ : संस्कृत भाषा संगणकाची भाषा

वेदविज्ञानरंजन - २३ : संस्कृत भाषा संगणकाची भाषा

आजचा  हा लेख IT (माहिती तंत्रज्ञान ) , Computers (संगणक) क्षेत्रात कार्यरत असणार्‍या किंवा Engineering (अभियांत्रिकी ) करणार्‍या सदस्यांनी जरूर वाचावा ही विनंती


जगातील सर्वांत जुनी असलेली भाषा म्हणजे संस्कृत भाषा होय. हीच संस्कृत भाषा संगणकाची भाषा आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध आहे. आता ही भाषा संगणकासाठी अतिशय उपयुक्त कशी आहे ह्याचे उदाहरण पाहू. 

अंदाजे इ. स. पू. २०० ते ३०० वर्षांपूर्वी पिंगलाचार्य ऋषींनी छंदःशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे संस्कृत भाषेत श्लोक म्हणताना विशिष्ट लयीत, शब्दांवर विशिष्ट आघात करून, स्वर वर खाली करून म्हणायचे असतात. मराठी शाळेमध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा पुस्तकात लघु - गुरू अशी जोडी असायची. वृत्तबद्ध काव्य लिहिताना ही जोडी अतिशय महत्त्वाची आहे. त्यावरून वृत्ताचा प्रकार, नाव ठरत असे. ह्या लघु (ल) - गुरू (गु ) (L - लघु, G- गुरू ) ह्याचा अतिशय सुंदर विस्तार पिंगलाचार्य ऋषींनी केला आहे आणि सध्याच्या युगात उपयोगात असणार्‍या द्विआधारी संख्या (Binary Numbers) ह्यांचा पाया रचला आहे. छंदःशास्त्र ग्रंथातील ८ व्या अध्यायातील २०,२१ आणि २२ सूत्रांत ही माहिती दिली आहे. 

द्विकौ ग्लौ ||२०||

म्हणजे फक्त २ गण

गु 

मिश्रौ च ||२१ || 

म्हणजे ह्या लघु - गुरू गणांचे मिश्रण :

ल  ल

गु  ल 

ल  गु 

गु   गु 

पृथग्ल मिश्र ||२२|| 

म्हंजे त्यांचे पुन्हा मिश्रण करा :

ल  ल  ल

ल  ल  गु

ल  गु  ल

ल  गु   गु

गु  ल  ल

गु   ल  गु

गु   गु   ल

गु   गु   गु

ह्या ठिकाणी ल =1 आणि गु = 0 मानू

ल  ल  ल       1 1 1       7

ल  ल  गु        1 1 0       6

ल  गु  ल        1 0 1       5

ल  गु   गु       1 0 0        4

गु  ल  ल        0 1 1       3

गु   ल  गु       0 1 0        2

गु   गु   ल       0 0 1        1

गु   गु   गु        0 0 0        0

Information technology (माहिती तंत्रज्ञान ) ह्या क्षेत्रात कार्य करणार्‍या लोकांना ह्या Binary Number System चा उपयोग चांगलाच माहिती आहे. ही प्रणाली अगदी अलिकडे पाश्चात्य वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. आपण मोबाईल फोन वर जे बोलतो,  चित्र पाहतो त्याच्या मुळाशी हेच  द्विआधारीत संख्याशास्त्र आहे. पुन्हा एकदा त्याचे श्रेय पिंगलाचार्य ऋषींना देण्यात आले नाही. श्रेय तर सोडाच पण पिंगलाचार्य ऋषींचा साधा नामोल्लेख सुद्धा कुठेही आढळत नाही ह्याचे खूप दुःख वाटते. आता इथे एक प्रश्न विचारला जातो की एव्हढे प्रगत तंत्रज्ञान होते तर मग ते सर्व कसे काय लोप पावले?  प्रगत तंत्रज्ञान होते तर त्याचा पुरावा  काय? 

भारतावर जी अनेक आक्रमणे झाली त्यात आपले महत्त्वाचे दस्तऐवज  परकीयांनी लुटून नेले. तक्षशिला सारख्या विद्यापीठांत आपले अनेक उत्तम ग्रंथ जाळले गेले. आजही आपल्याकडील काही दुर्मिळ ग्रंथ परदेशी ग्रंथालयात ठेवले आहेत . त्यामुळे सर्व प्रगत तंत्रज्ञान लोप पावले आणि त्यातील ज्ञानास आपण मुकलो आहोत. परंतु, ज्याअर्थी सिद्धांत मांडले आहेत त्याअर्थी विविध  प्रयोग करुन त्याचे निष्कर्ष पाहून ह्या सर्व सिद्धांतांची मांडणी केलेली आहे हे निश्चित सांगता येते. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

आजच्या लेखात आपण सूर्य - चंद्र - पृथ्वी यांचा परस्पर संबंध आणि ब्रह्मांडातील अनेक सूर्य  यांची माहिती घेणार आहोत. 

ऋग्वेद मंडल १०, सूक्त ८५, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सत्येन उत्तभिता भूमिः सूर्येण उत्तभिता द्यौः ऋतेन आदित्याः तिष्ठन्ति दिवि सोमः अधि श्रितः ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(भूमिः सत्येन उत्तभिता ) म्हणजे पृथ्वी अग्नीद्वारा सांभाळली जाते. (द्यौः सूर्येण उत्तभिता ) म्हणजे प्रकाशित तारांगण आणि आकाश सूर्यामुळे सांभाळले जाते. (आदित्याः ऋतेन तिष्ठन्ति ) सूर्याची आदान शक्ती आहे. (दिवि सोमः अधिश्रितः ) चंद्र सूर्याच्या आश्रयाला आहे. 

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ब्रह्माने पृथ्वीला आकाशात धारण केले आहे. 

म्हणजेच ब्रह्मांडात पृथ्वी आहे. 

सूर्य हा द्युलोकाला म्हणजे नक्षत्र तारामंडल यांना प्रकाशित करतो. त्यानंतर सोम म्हणजे चंद्र हा सूर्याचा आश्रित आहे. म्हणजेच तोसुद्धा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधला गेला आहे आणि सूर्यामुळे तो प्रकाशित होतो. 

यजुर्वेद अध्याय १८ मंत्र ४० मध्ये म्हटले आहे की 

सुषुम्णः सूर्यरश्मिश्चन्द्रमा नक्षत्राणि अप्सरसः भेकुरयः नाम 

ह्याचा अर्थ पाहू : ज्यामुळे उत्तम सुख प्राप्त होते असा सूर्य चंद्राला प्रकाशित करतो. आकाशात पसरलेली नक्षत्रे ही चंद्राच्या अप्सरा आहेत असे वाटते. ह्यात सूर्याने चंद्र प्रकाशित होतो असे स्पष्ट दिसते. 

माझ्या माहिती प्रमाणे  ग्रीस तत्त्ववेत्ता, गणितज्ञ अनेक्सागोरस (Anaxagoras ) ( जन्मः इ. स. पू. ४९९ आणि मृत्यू इ. स. पू. ४२८ ) ह्यांनी असे विधान केले होते की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. तो सूर्याच्या किरणांनी प्रकाशित होतो. त्याला ह्या वक्तव्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. म्हणजे त्या काळी चर्चच्या विरोधात काही वक्तव्य केले की लगेच शिक्षा करीत असत.

 (https://mathshistory.st-andrews.ac.uk/Biographies/Anaxagoras/) 

आपले वेद तर इ. स. पू. हजारो वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत आणि त्यात ह्या सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. मग मला सांगा की आपण मागास का आपल्याला मागास म्हणणारे पाश्चात्य विद्वान मागास? 

अनेक सूर्य, अनेक ब्रह्मांड

अथर्ववेद कांड १३, सूक्त ३, मंत्र १० मध्ये सात सूर्याचा उल्लेख आहे

यस्मिन् सूर्या अर्पिताः सप्त साकम् ||१०||

ब्रह्मांड जे एकत्र झालेल्या तेजाने व्यापले आहे त्यात सात सूर्य एकत्र राहतात. त्यांची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्ररूप


 ताण्ड्य ब्राह्मण ग्रंथातील अध्याय २३, खंड १५, मंत्र ३ मध्ये पुन्हा एकदा सात सूर्यांचा उल्लेख केला आहे.

त्रि वै सप्त सप्तादित्याः ||३||

ऋग्वेद मंडल ९, सूक्त ११४, मंत्र ३  ह्या मध्ये अनेक सूर्यांचा उल्लेख केला आहे. 

सप्तदिशो नानासूर्याः सप्त होतार ऋत्विज:|

देवा आदित्या ये सप्त तेभिः सोमाभि रक्ष न 

इन्द्रायेन्दो परि स्रव||

सात दिशा, ऋतू, यज्ञकर्ता सात ऋत्विज आणि सात सूर्य आहेत. हे सोमा! त्यांच्या बरोबर आमचे पण रक्षण कर आणि तू इंद्रासाठी वाहत रहा. 

आपले आधुनिक विज्ञान अजून पर्यंत सात सूर्य कोणते आहेत ते शोधू शकले नाहीत. इथे मी म्हणतो की आमच्या वेदांत उल्लेख आहेत पण आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाही. आज इथेच थांबतो पुढील लेखात नवीन विषय घेऊन भेटू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



Thursday 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - २१: सूर्य पृथ्वी आकर्षण

वेदविज्ञानरंजन - २७ : सूर्य पृथ्वी आकर्षण 

सूर्य आणि पृथ्वी यांतील आकर्षण सबंध ह्यावर आजचा लेख आहे. आपण सविस्तर माहिती घेऊ. जगातील सर्वांत प्राचीन अश्या ऋग्वेदातील मंडल १०, सूक्त १४९, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सविता यंत्रैः पृथिवीम् अरम्णात् अस्कम्भने सविता द्याम् अदृंहत् अश्वम् इव अधुक्षत् धुनिम् अन्तरिक्षम् अतूर्ते बद्धम् सविता समुद्रम् ||

(सविता ) सूर्य (यंत्रैः ) नियंत्रण सामर्थ्याने (पृथिवीम् ) पृथ्वीला (अस्कम्भने ) निरालंब अंतराळात (अरम्णात् ) सांभाळतो, अवलंबित करतो (द्याम् ) द्युलोक (अदृंहत् ) वर ताणतो (अतूर्ते अन्तरिक्षम् ) अभेद्य, सूक्ष्म, अचल अशा अंतराळात (बद्धम् ) अवरुद्ध (समुद्रम् ) येथे तारकांचा नक्षत्रांचा समुद्र (धुनिम् )  मेघ (अश्वम् इव ) घोड्याप्रमाणे (अधुक्षत् ) घोडेस्वारासारखा उत्तेजित करतो.

आता वरील मंत्राचा सोपा अर्थ पाहू. अंतराळातील सूर्य स्वतःच्या नियंत्रण सामर्थ्याने म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीला सांभाळतो म्हणजेच पृथ्वीला योग्य कक्षेत फिरवतो. द्युलोकाला म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे जे आकाश आहे त्याला ताणून धरतो. घोडेस्वार जसे चाबकाचे फटके मारून किंवा लगामाच्या मदतीने घोड्याला उत्तेजित करतो, त्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी मेघांना उत्तेजित (मेघाला वृष्टीसाठी आंदोलित करतो ) करतो आणि पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होते.

म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये आकर्षण शक्ती आहे हे व्यवस्थित स्पष्टपणे लिहिले आहे.हा सिद्धांत समजण्यासाठी परदेशी वैज्ञानिकांनांची मदत घेण्याची आवश्यकता नाही.

ह्याच सूक्तातील पुढचा मंत्र पाहू :

ऋग्वेदातील मंडल १०, सूक्त १४९, मंत्र २ मध्ये खालील मंत्र आहे :

यत्र समुद्र : स्कभित वि औनत् अपाम् नपात् सविता तस्य वेद अतः भू अतः आ उताथितम् रजः अतः द्यावापृथिवी इति अप्रथेताम् ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(यत्र) ज्याच्या आश्रयाला (समुद्रः स्कभित ) आकाशातील समुद्र, जलाशय वायूद्वारा सांभाळलेला आहे (वि औनत् ) भूमीला ओले करतो (अपां नपात् ) भूमीवर पाणी पडते (सविता तस्य वेद ) परमात्मा सूर्य त्याला जाणतो (अतः भू - अतः रजः उताथितम् )  ह्यातून अंतरिक्ष उत्पन्न होते (अतः द्यावापृथिवी अप्रथेताम् ) द्यावापृथिवी उत्पन्न होतात. आता सोपा अर्थ पाहू :

परमात्म्याच्या (सूर्याच्या ) आश्रयाने आकाशाचा जलाशय वायू सांभाळतो म्हणजे आकाशात मेघ दाटले आहेत त्यात पाणी आहे म्हणजे आकाशात जलाशय, समुद्र आहे असे म्हटले आहे. हे फक्त सूर्यच जाणतो. त्यापासून द्युलोक म्हणजे दीप्तमान आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील पर्जन्यवृष्टी सांगितलेली आहे. तसेच सूर्याकडून पृथ्वीची निर्मिती झाली असे विधान केले आहे. महत्त्वाचा भाग असा की सूर्याने नुसती पृथ्वी निर्माण करून सोडून दिले नाही. तर तो तिला सांभाळतोय म्हणजे आपल्या कक्षेत फिरवून गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधून ठेवतो आहे सूर्यापासून इतर सर्व ग्रह उत्पन्न झाले असे आधुनिक विज्ञान सांगते. त्यासाठी Big Bang theory शिकविली जाते. पण मग आपल्या ऋग्वेदात पण हेच सांगितले आहे हे वरील दोन मंत्रांवरून स्पष्ट समजते. अर्थात ह्यासाठी ऋग्वेदात नासदीय सूक्त दिले आहे. त्याचा अभ्यास आपण पुढे नक्कीच करणार आहोत. 

थोर खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी आपल्या आर्यभटीयम् गोलपाद - ३७ ह्या ग्रंथात  ग्रहण कसे होते हे सांगितले आहे. 

छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया |

 अन्वयार्थ : शशी सूर्यं छादयति च महती भूच्छाया शशिनं (छादयति ) |

आता ह्याचा अर्थ पाहू :

चंद्र सूर्याला आच्छादित करतो आणि पृथ्वीची मोठी सावली चंद्राला आच्छादित करते  शेवटी ग्रहण म्हणजे काय? हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, जेव्हा हे तिघे सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते असे आधुनिक विज्ञान सांगते. आपण ह्याचे श्रेय केप्लर (इ. स. १६०५ ) यांना देतो. पण आपल्याच आर्यभट्टांनी( इ. स. ४७६ - इ. स. ५५०) केप्लरच्या कितीतरी आधीच ह्याचे ग्रहण होण्याचे कारण दिलेले आहे. 

 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन २० - संस्कृत भाषा

 वेदविज्ञानरंजन - २० - संस्कृत भाषा

 संगणकासाठी अतिशय उपयुक्त आणि सर्वाधिक शुद्ध अशी ही आपली अभिजात भाषा आहे. ह्या भाषेचे संवर्धन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेदविज्ञानरंजन ह्या लेखांसाठी संशोधन करताना जे जे संदर्भ मी पाहतो ते सर्व संस्कृत भाषेतच आहेत म्हणूनच आज संस्कृत भाषेतील शब्द विश्वातील विविध भाषांमध्ये कशा प्रकारे सामावलेले आहेत ह्याचा आपण अभ्यास करूया. 

खालील प्रदेशांच्या भाषा ह्या संस्कृतोद्भव आहेत. 

Avestan of ancient persia, ancient Greek, ancient Latin in Italy and Lithuania and Baltik Nations


सन २०१९ मध्ये लिथुआनिया सरकारने एक पुस्तक प्रसिद्ध केले होते ज्यात लिथुआनिया भाषेतील १०,००० संस्कृत शब्द दिलेले आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती मा. वैंकय्या नायडू यांना हे पुस्तक लिथुआनिया सरकारकडून भेट देण्यात आहे होते. भारतीय मीडियाने ही बातमी दाखवल्याचे मला तरी स्मरत नाही. इथेच आपली चूक होते. आपणच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवणे गरजेचे आहे. आता संस्कृत आणि लिथुआनिया भाषेतील काही साम्य असलेले शब्द पाहू. संस्कृत भाषेतील मूळ शब्द अपभ्रंश स्वरुपात जगातील भाषांमध्ये वापरले जातात.


English        Sanskit            Lithuanian

Fire             agni (अग्नी )    Ugnis (उग्नीस ) 

God.            Deva (देव )     Deivas (देईवास) 

Death.        Mrutyu(मृत्यू )    Mirtis (मिर्तीस) 

Day.             Dina.(दिन )        Diena (दिएना ) 

Tooth.           Dant (दंत )      Dantis (दंतिस ) 


आता इतर काही भाषांमधील संस्कृतोद्भव शब्द पाहू


*Spanish language (स्पॅनिश भाषा )*

English          Sanskit             Spanish 

Name            naam (नाम )  nombre (नोम्ब्रे) 

Day               Din (दिन )      Dias (दिआस ) 

You             twam (त्वम् )     tu, tus (तू,तूस ) 

Father.          Pita (पिता )        Pedre (पेद्रे ) 

Mother         Mata (माता )     Madre (माद्रे ) 

One.                    Un (उन )         Uno (उनो ) 

Two                 Dwau (द्वौ )        Dos (दोस ) 

Three                  Tri (त्रि)           Tres (त्रेस ) 


Dutch  Language डच भाषा

English      Sanskit                   Dutch 

Name      Naam (नाम ).        Naam (नाम) 


Japanese Language जपानी भाषा


English           Sanskit            Japanese

The word usedto ask 

questions    Kim (किम् )             Ka (का ) 

Name       Naam (नाम)   Namaye (नामाए ) 

Service  seva(सेवा )          Seva (सेवा ) 


संस्कृत भाषेतून तयार झालेली विविध देशांची नावे :

Egypt (इजिप्त) - अजपती म्हणजे राम. इजिप्त मध्ये जे प्राचीन शासक होते त्यांची नावे रामेशिस १, रामेशिस २  रामेशिस ह्या शब्दाचा संदर्भ राम +ईश म्हणजेच श्रीरामांशी आहे. आपल्याला माहिती आहे की अरबस्तानात उत्तम प्रकारच्या घोड्यांची पैदास होत असे. अर्व म्हणजे घोडा त्यांचे स्थान म्हणजे अर्वस्थान - अरबस्तानात म्हणजे (Arbastan)

Russia हे नाव ऋषीय ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. ह्या प्रदेशात वैदिक संस्कृतीमध्ये बरेच ऋषी राहत असत. वैदिक ऋषींचे जनक कश्यप ऋषी त्यांच्या नावावरुन समुद्राला कश्यपीय समुद्र Caspian sea असे नाव देण्यात आले. आपल्याला मक्का - मदीना माहिती आहे. मुसलमान धर्मीय हज यात्रेला जातात आणि काबाला प्रदक्षिणा घालतात.काबा हे प्राचीन शिवलिंग आहे असेही काही ठिकाणी वाचनात आले आहे. तर मक्का हा मूळ संस्कृत शब्द मखः म्हणजे यज्ञ ह्या पासून आणि मदिना हा शब्द मेदिनी म्हणजे भूमी ह्या संस्कृत शब्दांतून तयार झालेला आहे. ह्याचा एकत्रित अर्थ 

मक्का - मदिना - मखः मेदिनी म्हणजे यज्ञभूमी असा आहे. 

Atlantic हा शब्द अटलांटिक अ- तल - अन्त (अथांग, अतल)  Guatemala- गौतमालय 

प्राचीन काळी  मद्र साम्राज्याचा भाग असलेल्या स्पेन ह्या देशाची राजधानी Madrid (माद्रिद) महाभारतातील पांडूची पत्नी माद्री हिच्याशी संबंध असणारे नाव आहे हे. 

इटली ह्या देशातील Vatican city (वाटिकन) ह्याचे मूळ नाव वाटिका असे होते. इटली देशाचे जुने नाव एट्रूटिया असे होते. हे नाव मूळ शब्द - एट्री -अत्री म्हणजेच अत्री ऋषींच्या नावाशी साधर्म्य साधणारे हे नाव आहे. मी हे सर्व मला वाटले म्हणून सांगत नाहिये. Vatican city येथे उत्खनन करण्यात आले तेव्हा तेथे शिवलिंग सापडले. ह्याचा उल्लेख Encyclopedia Britannica एट्रूटिया शीर्षक ह्याचा मध्ये आहे. ज्याना इच्छा असेल त्यांनी इंटरनेट वर ह्या संबंधी माहिती वाचावी. 

Rome ह्या शहराचे नाव राम ह्याच्या नावावरून आणि Ravenna शहराचे नाव रावण ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. प्राचीन काळी (ख्रिस्तपूर्व काळी ) संपूर्ण विश्वात वैदिक संस्कृती नांदत होती आणि संस्कृत भाषा सर्वत्र प्रचलित होती ह्याचे पुरावे अधून मधून मिळत असतात परंतु, राजकीय हेतूने हे पुरावे जगासमोर आणले जात नाहीत. 

आपल्यावर इंग्रज सरकारने राज्य केले आणि इंग्रजी भाषेचा प्रसार केला. ह्या इंग्रजी भाषेतील कितीतरी शब्द मूळ संस्कृत शब्दापासून तयार झाले आहेत. त्याची थोडी उदाहरणे आपण पाहू :


English                           Sanskit


Drop.                             Draps ( द्रप्स ) 

Father (papa )              Pita (पिता ) 

Mother (mummy )       Mata (माता ) 

Sister                              स्वसा 

Brother.                           भ्राता 

Master                       महा स्तर - उच्च प्रतिभा 

College - Sollage C चा उच्चार स असाही होतो जसे की census, celcius. त्यानुसार सॉला आणि शाला - ज निर्माण होणे म्हणजे शाळेपासून निर्माण होणे 

शाला - ज - सॉला-ज- sollage - college 

Education                      अध्ययन 


Dictionary                      दीक्षान्तरी 

Matrimonial          मातृमनल - मातृत्वाची आस     असणारे मन 


Patient                            प्रशांत 

Impatient                     अ- प्रशांत 

Hand                               हस्त 

Mouth                             मुख 

Pancreas                पाचनक्रियास पचनासाठी उपयोगात येणारा अवयव 

Sergon                             शल्यजन 

One                                    उन 

Two                                    द्वौ 

Door                                    द्वार 

Tree                                      तरु 

Preacher                           प्रचारक 

Navy                                  नावि 

Son                                    सूनु 

Sweat                                स्वेद 

अशाप्रकारे अनेक शब्द आहेत आणि त्याची यादी खूप मोठी आहे.  उदाहरणासाठी मी वर काही शब्द दिले आहेत. जगातील अनेक भाषांमध्ये संस्कृत शब्द आहेत आणी ह्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. 

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - १९ : ध्वनीशास्त्र भाग - ३

 वेदविज्ञानरंजन - १९ : ध्वनीशास्त्र भाग - ३

समर्थ रामदास स्वामी दासबोध १२-२५-८ मध्ये वाणीच्या प्रकाराचे वर्णन करताना म्हणतात -

उन्मेष परा ध्वनि पश्यन्ती | नाद मध्यमा शब्द* *चौथी | वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्ने ||

परा वाणी हे सर्वांत सूक्ष्म असे ॐ काराचे स्फुरण आहे. ते वायुरूप आहे. मणिपूर चक्र हे परावाणीचे उगमस्थान आहे आणि उदान वायू हा त्याच परावाणीचा कारक आहे. उदान वायू हा उर्ध्वदिशेने जाणारा वायू असून त्यापासून अतिसूक्ष्म अशी परावाणी उत्पन्न होते. जेव्हढे सूक्ष्म तेव्हढा त्याचा परिणाम अधिक असतो. हे आपल्याला अणुऊर्जा अभ्यासल्यावर लक्षात येते. ही अतिसूक्ष्म परावाणी सर्वोच्च घोषात परावर्तित होते त्यालाच आपण बेंबीच्या देठापासून ओरडणे असे म्हणतो. बेंबी म्हणजे नाभी जे परावाणीचे उगमस्थान आहे.

आपण वैखरीने जितके बोलतो त्यापेक्षा कितीतरी जास्त संभाषण आतल्या आत करीत असतो आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. समर्थ रामदास स्वामी सांगतात -

पुढे वैखरी राम आधी वदावा

म्हणजे काय? तर वैखरीतून बोलण्याआधी राम शब्दांचा उगम तीन वाणींमधून होतो त्यालाच अजपा असेही म्हणतात. अजपाजप हा शास्त्रातील एक प्रकार आहे. परावाणीद्वारे आपला आत्माच जप करू लागतो म्हणजेच जप करण्याचा विचार मनांत येण्याआधीच जप सुरु होतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |

तसेच अथर्वशीर्षात म्हटले आहे की -

त्वं चत्वारि वाक्पदानि

म्हणजे चारही वाणीचे मूळ तूच (गणपती )आहेस.

श्रीदेवीच्या आरतीत संत नरहरी महाराज म्हणतात - 

चारी श्रमले परंतु न बोलवे काही

ह्यातील चारी श्रमले म्हणजे देवीची स्तुती करून चारही वेद दमले, श्रमले त्याचप्रमाणे परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी ह्या चारही वाणी निःशब्द झाल्या आहेत इतका देवीचा महिमा अगाध आहे. 

सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा महाविस्फोट झाला (Big Bang Theory - नासदीय सूक्त ) त्यावेळी *ॐकारनाद उत्पन्न झाला. मांडूक्य उपनिषदात ॐकारनादाचे वर्णन केले आहे.

ओमित्येतदक्षरमिदं सर्वम् । तस्योपव्याख्यानं* *भूतं भवद् भविष्यदिति ॥

सर्वमोङ्कार एव । यच्चान्यत् त्रिकालातीतं* *तदप्योङ्कार एव ॥ १ ॥

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत  ८ व्या अध्यायात १३ व्या श्लोकात सांगितले आहे की 

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ||

जो माझे नित्य ध्यान करतो आणि मृत्यूसमयी ॐ कार उच्चारण करतो तो *उत्तम गतीला प्राप्त* होतो म्हणजेच त्याला उत्तम गती मिळते. 

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

अ- कार चरणयुगल। उ-कार उदर विशाल।

म-कार महामंडल। मस्तका-कारे॥११॥

हे तिन्ही एकवटले। तेच शब्दव्रह्म कवत्तल।

ते मियां गुरुकृपा नमिले। आदि बीज ॥२०॥

जसे सूर्य किरणांपासून सात रंग तयार होतात तसेच ॐकारनादातून सात स्वर तयार होतात. हाच ॐकारनाद आपल्या नाभीतून म्हणजेच परावाणीतून प्रगट होतो. नाद हा चैतन्यस्वरुप आहे

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जग्दात्मना 

नादो ब्रह्म तदानंदंमन्दिली यमुपास्म्हे ।।

नादोपास्नयादेवा ब्रह्मा विष्णु महेश्वरा:

भवन्त्युपासितानूनं यस्मादेते तादात्मका: ।।

नादब्रह्म हे सर्व प्राणिमात्रांमध्ये चैतन्यस्वरुपात वास करते. ते अतिशय आनंदमय असून ह्याच्या उपासनेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उपासना केल्याचे फळ मिळते. 

संपूर्ण विश्वात नाद, कंपने भरुन राहिली आहेत. 

संगीतरत्नाकर ग्रंथात नादाची महती सांगितलेली आहे. 

न नादेन विना गीतं न नादेन विना स्वरः |

न नादेन विना नृत्यं तस्मान्नादात्मकं जगत् ||

नादाशिवाय गीत नाही, स्वर नाही, नादाशिवाय नृत्यसुद्धा नाही. संपूर्ण जगात नाद व्यापून राहिला आहे. 

पाणिनीयशिक्षा* ह्या ग्रंथात खालील श्लोक वाचावयास मिळतो. 

आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान् मनो युङ्क्ते विवक्षया ।

मनः कायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ॥

मारुतस्तूरसि चरन् मन्द्र्ं जनयति स्वरम् ॥

अष्टौ स्थानानि वर्णानामुरः कण्ठः शिरस्तथा ।

जिह्वामूलं च दन्ताश्च नासिकौष्टौ च तालु च ॥


आता ह्याचा अर्थ पाहू :

आपल्या शरीरातील आत्मा बुद्धीचा उपयोग करून अर्थाची संगती लावतो आणि आपल्या मनाला बोलण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यानंतर जठरामधील अग्नी म्हणजे मणिपूर चक्र असलेला भाग वायूला म्हणजे उदान वायूला प्रेरणा देतो. हा वायू अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र असलेल्या भागात म्हणजे हृदय, कंठ ह्या भागात पसरतो आणि मंद स्वर उत्पन्न करतो. 

उच्चारांची स्थाने आठ आहेत. ती खालीलप्रमाणे :

१. उरः, २. कण्ठः, ३. शिरः (मूर्धा), ४. जिह्वामूलम्, ५. दन्ता, ६. नासिका, ७. ओष्ठौ, ८. तालुः

ध्वनीलहरींच्या ठिकाणी सृजनशक्ती असते. ह्या ध्वनीलहरींचा योग्य तो उपयोग मंत्रशास्त्रात करण्यात येतो. विशिष्ट मंत्र विशिष्ट आघात करून म्हटले असता त्याचे योग्य ते परिणाम दिसून येतात. आपल्या संस्कृतीत मौखिक परंपरा आहे. गुरू कडून शिष्याला सर्व ज्ञान मौखिक परंपरेने देण्यात येत असे. त्यामुळे बारकाव्यासहित सर्व गोष्टी समजण्यास मदत होई. गुरूने शिकवलेले प्रत्येक वाक्य अन् वाक्य लिहून ठेवणे शक्य नसे त्यामुळे मौखिक परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या जुन्या शिक्षण पद्धतीत सुद्धा पाठांतराला खूप महत्व होते. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात घोकंपट्टी - पाठांतर करणे आवश्यक आहे. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बोलू शकतो, ध्वनीमुद्रण ऐकू शकतो. 

आपल्या संस्कृतीत गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देत असत तेव्हा सर्व पुस्तके, ग्रंथ वाचण्यास सांगत नसत. संक्षिप्त स्वरुपात मंत्र तयार करून त्यांची संथा देत जेणेकरून शिष्याच्या मेंदूतील ज्ञान - आकलनक्षमतेची वृद्धी होत असे. एखाद्या ठिकाणी दडलेल्या खजिन्याची चावी मिळाली तर हव्या त्या वस्तू घेता येतात त्याप्रमाणेच *मंत्रशक्तीने कार्य साधत* असे. ह्या सर्वाचा परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी ह्या वाणींशी संबंध आहे.


 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩


प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती. 

ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382* 

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

वेदविज्ञानरंजन - १८ : ध्वनीशास्त्र भाग - २

 वेदविज्ञानरंजन- १८ - ध्वनीशास्त्र भाग - २

आपण  ध्वनीशास्त्र अभ्यासत आहोत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्यांचा अजून विस्तृत अभ्यास करू.

पंडित शारंगदेव (देवगिरी राजाच्या दरबारात ते राजगायक होते ) यांनी साधारण इ. स. १३ व्या शतकात संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला होता. त्यात नादोत्पत्तिक्रमः अध्यायात ते म्हणतात :

आत्मा विवक्षमाणोयं मनः प्रेरयते |
मनः नाभिस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् |
ब्रह्मग्रंथीस्थितो नादः क्रमादूर्ध्वपथे चरन् |
नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भवति स ध्वनिः |


ह्याचे विवेचन पाहू :

आत्मा विवक्षमाणोयं मनः प्रेरयते म्हणजे आत्मा (inner person ) आपल्या मनाला प्रेरणा देतो, उद्युक्त करतो. कशासाठी? तर ध्वनी निर्मितीसाठी.

मनः नाभिस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम्

आणि हे मन काय करते? तर आपल्या नाभीजवळ असलेल्या अग्नीला उत्तेजित करते आणि आणि आल्या शरीरातील वायूला (श्वासोच्छ्वास ) प्रेरणा देते. आपण प्राधान्याने उच्छ्वास सोडताना बोलतो  तुम्ही प्रयोग करून पहा श्वास घेताना बोलणे कठीण असते. उच्छ्वास सोडताना बोलणे सोपे होते.

ब्रह्मग्रंथीस्थितो नादः क्रमादूर्ध्वपथे चरन्

आपल्या शरीरातील अवयवांद्वारे अग्नी आणि वायू यांचा संयोग झालेला नाद उर्ध्व दिशेने येतो आणि स्वरयंत्राशी संयोग पावतो.

नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भवति स ध्वनिः

अशाप्रकारे नाभी, हृदय, कण्ठ, मुख यांद्वारे ध्वनीची निर्मिती होते. म्हणजेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चार पायऱ्यांतून ध्वनी उत्पन्न होतो.

आता आपण ह्याच वाणीच्या चार प्रकारांचा उलट्या क्रमाने अभ्यास करू म्हणजेच वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा

वैखरी शब्दनिष्पत्तिः मध्यमा स्मृतिगोचरा
द्योतिकार्थस्य पश्यंती  सूक्ष्मा ब्रह्मैव केवलम्


वैखरी ही शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते. पण हे शब्द जे मध्यमा वाणीतून येतात त्यांचे उत्पत्तीस्थान काय? तर आपली शब्दसंपदा (Vocabulary) आपली भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द हवे ते आपल्या मेंदूतून, स्मृतीतून येतात म्हणून मध्यमा स्मृतिगोचरा असे म्हटले आहे. आणि कुठले शब्द योजून वाक्य बोलायचे ह्यासाठी योग्य विचार आवश्यक असतो तो विचार म्हणजे द्योतिकार्थस्य पश्यंती. त्यानंतर येणारी परा वाणी जी अत्यंत सूक्ष्म रुपात आपल्या नाभीतून उत्पन्न होते.  थोडक्यात सांगायचे तर शब्द बोलताना शरीरशास्त्र (Biology ) आणि मानसशास्त्र (Psychology) यांचा मेळ जमावयास हवा. तर योग्य प्रकारे आपण बोलू शकतो.

समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या दासबोध ह्या ग्रंथात ह्याच वाणीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.


नाभीपासून उन्मेषवृत्ती |
तेचि परा जाणिजे श्रोती |
ध्वनीरूप पश्यंती हृदयी वसे ||
नाभिस्थानी परावाचा |
तोचि ठाव अंतःकरणाचा |
अंतःकरणपंचकाचा |
निवाडा ऐसा ||


नाभिस्थानी मणिपूर चक्र आहे. तेथे परावाणी प्रगट होते.  हृदयात अनाहत चक्रामध्ये पश्यंती वाणी प्रगट होते. कंठात विशुद्ध चक्रात मध्यमा वाणी प्रगट होते. शेवटी मुखातून वैखरी वाणी प्रगट होते.

पहा किती सुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्या पुरातन वाङ्मयात ध्वनीच्या उत्पत्तीचे वर्णन केले आहे. कुठल्याही परदेशी वैज्ञानिकांनी अश्या प्रकारचे विवेचन ७००-८०० वर्षांपूर्वी केलेली नाही असे मी आवर्जून नमूद करतो.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - १७ : ध्वनीशास्त्र भाग - १

वेदविज्ञानरंजन - १७ : ध्वनीशास्त्र भाग - १

आज आपण ध्वनीशास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या नाभीतून ध्वनी निर्माण होऊन आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. ह्या सर्व प्रक्रियेचे शास्त्रोक्त विवेचन आपल्या  पुरातन ग्रंथांत विद्वानांनी केले आहे. ह्याची माहिती पाहू.

ऋग्वेद मंडल १ - सूक्त क्र १६४ - मंत्र ४५ मध्ये वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे :

च॒त्वारि॒ वाक्परि॑मिता प॒दानि॒ तानि॑ विदुर्ब्राह्म॒णा ये म॑नी॒षिणः॑ ॥

गुहा॒ त्रीणि॒ निहि॑ता॒ नेङ्ग्॑यन्ति तु॒रीयं॑ वा॒चो म॑नु॒ष्या वदन्ति ||

वाचेचे चार प्रकार गणले आहेत, ते सर्व प्रकार जे ज्ञानसंपन्न ब्राह्मण (येथे ब्राह्मण म्हणजे जातीवाचक शब्द नसून ज्ञानी असा अर्थ आहे) आहेत त्यांना ठाऊक असतात. कारण पहिले तीन प्रकार गुप्त आहेत, ते समजण्यांत येत नाहींत, व मनुष्यें बोलतात तो चौथा प्रकार होय

आता ह्याचे सविस्तर विवेचन पाहू :

आता हे वाणीचे चार प्रकार कोणते? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार आहेत.


परा वाणी म्हणजे आपल्या नाभीतून उगम पावलेला ध्वनी. पश्यंती वाणी म्हणजे त्या ध्वनीचा शरीरातील वायूबरोबर झालेला संयोग आणि त्यातून निर्माण झालेली वाणी, मध्यमा वाणी म्हणजे गळ्यातील स्वरयंत्रातून उत्पन्न झालेली वाणी. हे तीन प्रकार आपल्या शरीराच्या आत घडतात त्यामुळे ते लक्षात येत नाहीत.  त्यानंतर जीभ, दात यांच्या मदतीने जी बोलण्याची क्रिया होते, जे शब्द कानी पडतात, तुम्ही आम्ही सर्वजण जे ऐकतो ती वैखरी वाणी होय. ही वैखरी वाणी आपण अनुभवू शकतो आणि ध्वनीमापक यंत्राने मोजता येऊ शकते.

पाणिनी (अंदाजे इ. स. पू. ७०० वर्षे ) हे एक महान व्याकरणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे नियम तयार केले. त्यांनी *शब्द आणि नाद*  ह्यांच्या उत्पत्तीसंदर्भात अतिशय उत्तम विवेचन केले आहे. 

आकाश वायु शरीरात् वक्त्रमुपैति नादः

स्थानान्तरेषु प्रविभाज्यमानो वर्णत्वं आगच्छति यः सः शब्दः ||

आपले शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे. आकाश म्हणजे आपल्या शरीरातील पोकळी वायू म्हणजे आपल्या शरीरातील वायू म्हणजे श्वास आणि उच्छ्वास. जेव्हा ह्यांचा संयोग होतो तेव्हा नाद  तयार होतो. जेव्हा ह्या नादाचे स्थानांतरण होते म्हणजेच स्वरयंत्रातून तो नाद मुखात येतो त्यावेळी त्याचे शब्द तयार होतात आणि मुखावाटे बाहेर पडतात.

नाद, शब्द हे मनोरंजनासाठी उपयुक्त आहेतच पण त्यापुढे जाऊन आपल्याला आत्मरंजनाकडे जावयाचे आहे. म्हणूनच योग साधनेत प्रवीण असलेल्या ऋषीमुनींना ध्यानावस्थेत अनाहत नाद ऐकू येत असे. 

नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्।

उद्धर्तुकामः सनकादिसिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालम् ॥

तांडवनृत्य समाप्त करण्याच्या वेळी नटराजाने म्हणजेच शिवाने सनकादि ऋषी यांची सिद्धी आणि कामना यांच्या पूर्ततेसाठी (ननाद ढक्कां नवपञ्चवारम् ) नऊ आण आणि पाच वेळा आपला डमरू वाजवला.  अशाप्रकारे चौदा वेळा डमरू वाजल्यामुळे  शिवसूत्रांचे जाळे म्हणजे (वर्णमाला) प्रगट झाली. 

ही वर्णमाला खालीलप्रमाणे :

१.अइउण् २. ऋलूक्, ३. एओङ्, ४. ऐऔच् ५. हयवरट् ६. लण् ७. अमङणनम् ८. झभञ् ९. घढधष् १०. जबगडदश् ११. खफछठथ चटतव १२. कपय् १३. शषसर् १४. हल्

ह्याचा अजून एक अर्थ असू शकतो. आपले शरीर म्हणजे डमरू आणि श्वासोच्छ्वास म्हणजे डमरूच्या दोन दोऱ्या. त्यांच्या सहाय्याने आपल्या शरीरात ध्वनीची निर्मिती होते. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


Wednesday 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १६ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ४

 वेदविज्ञानरंजन_३६ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ४

पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे आणि सूर्याभोवती फिरणे, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ति, पृथ्वीवरील अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांची संकल्पना इत्यादी विविध विषयांवर आपले वेद, पुराणे आणि ऋषींनी लिहिलेले ग्रंथ ह्यांच्यातील उदाहरणे गेल्या ३ भागांत आपण पाहिली. आजच्या भागात अजून काही उदाहरणे आपण पाहणार आहोत आणि पृथ्वीचे परिवलन - परिभ्रमण  ह्या विषयावरील शेवटचा भाग आहे

 पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ४

अथर्ववेदात म्हटले आहे की पृथ्वी सूर्यापासून निर्माण झाली. खालील मंत्रात हे स्पष्टपणे लिहिले आहे. 

अथर्ववेद १८.३.२५ ते १८.३.३५ - 

बाहुच्युता पृथिवी द्यामिवोपरि |

आपण बरेचदा पदच्युत असा शब्द वाचतो म्हणजे पदावरून पडलेला, ढळलेला. येथे बाहू म्हणजे हात आणि च्युत म्हणजे पडणे, ढळणे. बाहुच्युता म्हणजे हातातून पडलेली, ढळलेली

हातातून पडलेली, निर्माण झालेली पृथ्वी कोणाच्या हातातून? सूर्याच्या हातातून. वेदकालीन वाङ्मयात निसर्गातील, विश्वातील शक्तींना देवता मानून त्या पद्धतीने लिखाण केले आहे त्यामुळे सूर्यास देव मानून म्हणजे ज्याला हात,पाय असे अवयव आहेत असे समजून त्याच्या हातातून पृथ्वी निर्माण झाली आहे असे म्हणावयाचे आहे. आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्यापासून निर्माण झाले आहेत.

 पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण ह्या संदर्भात खालील मंत्र आहे. 

अथर्ववेद १२.१.३७

याप सर्पं विजमाना विमृग्वरी यस्यामासन्नग्रयो ये अप्सवन्त :|

परा दस्यून् ददती देवपीयूनिन्द्रं वृणाना पृथिवी न वृत्रम् ||

येथे विजमाना अपसर्प - जी हलत डुलत चालते ती पृथ्वी असा अर्थ आहे. म्हणजे पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते ह्याचे स्पष्ट उदाहरण ह्यातून मिळते. 

खालील मंत्रात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र यांचे चक्र सुरु राहते असे सांगितले आहे. 

ऋग्वेद ६.९.१

अहश्च कृष्णमहरर्जुनं च विवर्तते रजसी वेद्याभिः |

कृष्णं अह: कृष्ण वर्णाची रात्र, च अर्जुनं च अहः शुक्ल वर्णाचा दिन रजसी वेद्याभिः विवर्तेते, आपल्या योजनेनुसार वारंवार संचार* करतात म्हणजे चक्राकार होतात. दिवस, रात्र यांचे चक्र अव्याहत सुरू आहे.

आत्तापर्यंत बर्‍याच लेखांमध्ये आपण सूर्य, ग्रह, तारे, पृथ्वी यांची वर्णने वाचली. आधुनिक विज्ञानाने जे सिद्धांत अगदी अलीकडे मांडले आहेत त्याच्या कितीतरी आधी हजारो वर्षे आपल्या वेदांनी हे सिद्धांत मांडले आहेत हे आपण सप्रमाण सिद्ध केले आहे आता एक प्रश्न उरतो की ह्या सर्व ग्रहांचे, तार्‍यांचे इतके अचूक निरीक्षण कसे केले असेल??  ह्याची उत्तरे 3 प्रकारे देता येतील.

पहिला प्रकार म्हणजे योगसाधनेच्या बळावर सूक्ष्मरूपाने नश्वर देहाबाहेर येऊन मनोवेगाने त्या ठिकाणी जाऊन, माहिती घेऊन पुन्हा देहात प्रवेश करणे.  हे फक्त आणि फक्त यौगिक क्रियांच्या माध्यामातून शक्य आहे. आधुनिक विज्ञानाने आजपर्यंत ह्यावर विशेष संशोधन केलेले नाही. परंतु ह्याचा अर्थ ही पद्धत अस्तित्त्वातच नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

दुसरे उत्तर म्हणजे प्रत्यक्ष अंतराळ प्रवास (space travel ) करून ग्रह, तारे ह्यासंदर्भात माहिती मिळविली असण्याची शक्यता आहे. वेदकाळी अंतराळयाने अस्तित्वात होती आणि त्याद्वारे प्रवास शक्य होता ह्याची अनेक उदाहरणे आहेत. ह्याची माहिती मी माझ्या ह्या लेखमालिकेअंतर्गत पुढे कधीतरी नक्कीच देईन.

तिसरे उत्तर म्हणजे उत्तम प्रकारच्या दुर्बिणींच्या मदतीने ग्रह, तारे यांचे निरीक्षण करणे शक्य आहे. पुरातन काळी दुर्बिणी अस्तित्वात होत्या आणि त्या कशा प्रकारे तयार करायच्या ह्याचे ज्ञान होते हे खालील श्लोकांतून समजते

मनो: वाक्यं समाधाय तेन शिल्पीन्द्रः शाश्वत:|

यन्त्रं चकार सहसा दृष्ट्यर्थ्यं दूरदर्शनम्||

पलल-अग्नौ दग्धमृदां कृत्वा काचम् अनश्वरं|

शोधयित्वा तु शिल्पीन्द्रो निर्मलीक्रियया च सः||

चकार बलवत् स्वच्छं पातनं सूपविष्कृतम्|

वंशपर्व-समाकारं धातुदण्डप्रकल्पितम्|

तत् -पश्याद्-अग्र-मध्येषु मुकुरं च विवेश सः|

येथे शिल्पीन्द्र म्हणजे कारागीर, इंजिनिअर यांना उद्देशून म्हटले आहे की

यन्त्रं चकार सहसा दृष्ट्यर्थ्यं दूरदर्शनम् |

दूरचे पाहण्यासाठी (दूरदर्शनम् ) एखादे यंत्र तयार करावे.

पलल-अग्नौ दग्धमृदां कृत्वा काचम् अनश्वरं

म्हणजे अग्नी आणि वाळू (मृदा ) यांच्या पासून काच तयार करावीत जी न फुटणारी असेल.

शोधयित्वा तु शिल्पीन्द्रो निर्मलीक्रियया च सः |

त्यावर कारागिरीने योग्य ती प्रक्रिया करावी आणी काच तयार करावी.

चकार बलवत् स्वच्छं पातनं सूपविष्कृतम् |

येथे सूपविष्कृतम् ह्याचा अर्थ ओतकाम असा घ्यावा कारण काच तयार व्हायच्या आधी ती द्रवरूपात असते.

वंशपर्व-समाकारं धातुदण्डप्रकल्पितम्|

तत् -पश्याद्-अग्र-मध्येषु मुकुरं च विवेश सः|

एक धातूचा दंड घ्यावा म्हणजे नळी घ्यावी. त्या नळीच्या सुरुवातीच्या टोकाला, मध्यभागी आणि शेवटच्या टोकाला आतील बाजूने काच, भिंग (मुकुरं ) बसवावे म्हणजे दूरची वस्तू स्पष्टपणे पाहता येईल.  अशाप्रकारे दुर्बीण तयार करावी.

आपल्या पूर्वसुरींनी अनेकविध प्रकारचे ज्ञान ग्रंथांत लिहून ठेवले आहे. परंतु, ते संस्कृत भाषेत असल्याने आपल्याला समजत नाही. माझी नवीन पिढीला, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जशा परदेशी भाषा शिकतो, त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेली संस्कृत भाषा आवर्जून शिका तर आणि तरच नवीन ज्ञानाची दालने आपल्याला उघडणे शक्य आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - १५ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ३

 

वेदविज्ञानरंजन - १५ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ३

ह्या आधीच्या  लेखामध्ये आपण पृथ्वीचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे ) , परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे ), दिवस- रात्र यांचे चक्र ह्याविषयी काही उदाहरणे पाहिली. आज आणखी काही उदाहरणे पाहू. 

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ३

श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ आणि अध्याय २१ मध्ये पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण त्यामुळे निर्माण होणारे दिवस रात्र यांचे चक्र तसेच अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची कल्पना ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. आपण सविस्तर पाहू.


एतेन हि दिवो मण्डलमानं तद्विद उपदिशन्ति

यथा द्विदलयोर्निष्पावादीनां ते अन्तरेणान्तरिक्षं

तदुभयसन्धितम् ॥ 

वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

तद्विदः हि एतेन यथा निष्पावादीनां द्विदलयोः (तथा) दिवः मंडलमानं उपदिशन्ति ते अन्तरेण तदुभयसंधितम् अन्तरिक्षं (अस्ति)|

तज्ञ लोक खरोखर ह्या भूमंडलप्रमाणावरून जसे पावटा वगैरेंच्या दोन पानांचे तसे स्वर्गाच्या वर्तुळाचे प्रमाणे सांगतात त्याच्या मध्ये त्या दोघांच्या सांध्यावर लागून ठेविलेले आकाश आहे. 

 येथे मंडलमानम् असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजेच ही पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीवरून दिसणारे आकाश सुद्धा आपल्याला गोल भासते आणि क्षितिजाला टेकलेले दिसते. 

यत्रोदेति तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति

यत्र क्वचन स्यन्देनाभितपति तस्य हैष

समानसूत्रनिपाते प्रस्वापयति तत्र गतं न पश्यन्ति

ये तं समनुपश्येरन् ||

वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

यत्र उदीत तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति एषः यत्र क्वचन स्यंदेन अभितपति तस्य ह समानसूत्रनिपाते प्रस्वापयति ये तं समनुपश्येरन् ते तत्र गतं न पश्यन्ति |

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ज्याठिकाणी उदयाला येतो, त्याच ठिकाणच्या सारख्या सुताच्या समोरील समांतररेषेत अस्ताला जातो, हा सूर्य ज्याठिकाणी कोठेतरी घाम येण्याइतक्या उन्हाने उष्ण प्रकाश देतो, त्याच्याच सारख्या सुताच्या समोरील समांतर रेषेत असणार्‍यांना गाढ झोपी नेतो, जे त्या सूर्याला स्वतःच्या प्रदेशात पहातात, ते समोरील समांतर रेषेतील मध्यरात्री झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात पहात नाहीत.

वरील श्लोकात पृथ्वीच्या गोलार्धाचे वर्णन केले आहे. ज्या गोलार्धात सूर्यप्रकाश असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात अंधार असतो. 

गोलार्ध म्हणजेच पृथ्वीचा अर्धा भाग. काल्पनिक रेषांनी पृथ्वीचे दोन भाग आधुनिक विज्ञानाने केले आहेत. अक्षवृत्त : उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, रेखावृत्त : पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. 

पृथ्वी गोल आहे आणि तिचे परिवलन आणि परिभ्रमण यांमुळे दिवस रात्र चक्र घडते ही क्रिया प्राचीन ऋषींना ज्ञात होती त्यांनी वरील श्लोकात समांतर सूत्र (म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त ह्यांचा) उल्लेख केला आहे. श्रीमद्भागवत हा आपल्या संस्कृतील अतिशय मान्यताप्राप्त आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळे त्यातील उल्लेखावर शंका घेण्याचे कारण नाही. पृथ्वी गोल असल्याने वेगवेगळ्या वेळी सूर्याची वेगवेगळी स्थिती दिसून येते ह्याची संपूर्ण माहिती भारतीय ऋषींना होती. श्रीमद्भागवत पुराणांत ह्याची सविस्तर माहिती दिली आहे. सर्व भागवत आचार्यांना माझी विनंती आहे की भागवतातील श्रीकृष्ण चरित्राबरोबरच इतर स्कंदांतील माहिती सुद्धा सांगावी म्हणजे आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातील वैज्ञानिक तत्वे शोधता येतील. 


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...