माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७९

 

#वेदविज्ञानरंजन_७९

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३*

समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. ह्यातील यंत्रार्णव अध्यायातील खालील श्लोक पाहूया.
🚩
*दंडैश्चक्रैच दंतैश्च सरणिभ्रमणादिभि: |*
शक्तेरूत्पांदनं किं वा चालानं *यंत्रमुच्यते* ॥
🚩

दंड- Lever , चक्र- Pulley, दंत- toothed wheel, सरणि- inclined plane, भ्रमण- Screw ‌
ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता शक्ती निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी असते. म्हणजेच, दंड, चक्र, दंत, सरणि, भ्रमण ह्यांच्या मदतीने शक्तीचे उत्पादन होते आणि गती प्राप्त होते.

ह्या यंत्रांची गती कश्या प्रकारे असावी ह्याचे वर्णन पुढील श्लोकात केले आहे :

🚩
*तिर्यगूर्ध्वंमध: पृष्ठे पुरत: पार्श्वयोरपि |*
*गमनं सरणं पात इति भेदा: क्रियोद्भवा:॥*
🚩

(१) तिर्यग्‌- slanting (२) ऊर्ध्व upwards (३) अध:- downwards (४) पृष्ठे- backwards (५) पुरत:-forward (६) पार्श्वयो:- sideways

वरील श्लोकात गतीचे विविध प्रकार वर्णिले आहेत. तिरकी, उर्ध्वगामी, अधोगामी, पुढे जाणारी, मागे जाणारी, बाजूला वळणारी अश्याप्रकारे गतीची दिशा सांगितली आहे. ह्यावरून प्राचीन भारतात भौतिकशास्त्र किती प्रगत होते ह्याची कल्पना येते.

*जलविद्युत निर्माण करण्यासाठी उपयोगात येणारे यंत्र (जनित्र )* ह्याचा उल्लेख भोजराजा ह्याच्या *समरांगण सूत्रधार* ह्या ग्रंथात आहे
🚩
धारा च जलभारश्च पयसो भ्रमणं तथा॥
यथोच्छ्रायो यथाधिक्यं यथा नीरंध्रतापि च।
एवमादीनि भूजस्य जलजानि प्रचक्षते॥
🚩

वाहणाऱ्या, प्रवाहित जलधारेचा उपयोग म्हणजे त्यातील शक्तीचा उपयोग *जलविद्युत* निर्माण करण्यासाठी होतो. ह्या जलधारेच्या वेगामुळे चक्र फिरते. ही जलधारा उंचावरून पडणारी असेल (धबधबा ) तर तिचा वेग अधिक असतो आणि त्यामुळे जनित्र फिरते आणि त्यातून *शक्ती* (विजेची ) निर्मिती होते.

अशाप्रकारचे अतिशय आधुनिक तंत्रज्ञान प्राचीन भारतात अवगत होते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...