🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४* 🌺
*चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे. आता ह्याविषयी अधिक माहिती घेऊ.
वेदव्यास ह्यांनी महाभारतात लिहिले आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर जे डाग आहेत ते डाग म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.
🚩 यथा हि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मानः |
एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले ||१६ || 🚩
ज्याप्रमाणे पुरूष आपले तोंड आरशात पाहतो, म्हणजेच प्रतिबिंब पाहतो, त्याप्रमाणे *सुदर्शन द्वीप चंद्रावर* दिसतो (त्याचे प्रतिबिंब चंद्रावर दिसते ) म्हणजेच पृथ्वीवरील भूभागाचे *प्रतिबिंब* दिसते.
आता पृथ्वीचे प्रतिबिंब सूर्यावर कसे दिसेल? त्यासंबंधी पुढील श्लोक पाहू
🚩द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशे च शशो महान् |
सर्वौषधिसमावायः सर्वतः परिवारितः ||१७ ||🚩
त्याच्या *दोन अंशात पिंपळ ( पिंपळाची पाने ) आणि दोन अंशांत ससा* दिसतो. त्याच्या सर्व बाजूंनी औषधी वनस्पती आहेत.
ह्याचे विवेचन पाहू. चंद्राच्या पृष्ठभागावर जो डाग दिसतो तो ससा ह्या प्राण्याच्या आकारासारखा दिसतो हे आपल्याला माहितीच आहे. जणू काही *चंद्राच्या मांडीवर ससा आहे अशी कल्पना करून चंद्राला शशाङ्क* असे म्हणतात (अङ्क म्हणजे मांडी ) आता ह्या सश्याचे चित्र म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे. संपूर्ण पृथ्वीचा एकसंध नकाशा तुम्ही गूगल वर पाहिलात तर तो नकाशा ससा आणि पिंपळाच्या पानांसारखा दिसतो. ह्या लेखाबरोबर मी चित्र पाठविली आहेत.
* भीष्मपर्व जम्बूखण्डविनिर्माणपर्व अध्याय क्र. ५*
🚩 (स वै सुदर्शनद्वीपो दृश्यते शशवद् द्विधा )
यां तु पृच्छसि मां राजन् दिव्यामेतां शशाकृतिम्
पार्श्वे शशस्य द्वे वर्षे उक्ते ये दक्षिणोत्तरे
कर्णौ तु नागद्वीपश्च काश्यपद्वीप एव च 🚩
अशाप्रकारे मी सुदर्शन द्वीपाचे वर्णन केले. तो द्वीप म्हणजे पृथ्वीचे चित्र दोन भागांत विभागले आहे आणि चंद्रावरील डागांच्या स्वरुपात (सश्याचा आकार ) आपल्याला दिसतो. दक्षिण आणि उत्तर दिशेत स्थित (भारत आणि ऐरावत ) नावाचे जे दोन द्वीप सांगितले आहेत ते दोन्ही त्या सशाचे पार्श्वभाग आहेत. नागद्वीप आणि काश्यपद्वीप हे त्या सशाचे दोन कान आहेत.
🚩आपस्ततोSन्या विज्ञेयाः शेषः संक्षेप उच्यते ||१८ ||🚩
ह्या सर्व भूभागाव्यतिरिक्त उरलेली जागा जलमय समजावी. असेही स्पष्ट वर्णन आढळते. पृथ्वीवरील सर्व खंड, त्यांचा विस्तार आणि उरलेल्या भागात पाणी आहे ह्याचे अचूक ज्ञान महर्षी व्यास ह्यांना होते. *उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका अशा सर्व खंडांचे वर्णन, आणि त्यांचे आकार ह्यांचे वर्णन वेदव्यास ह्यांनी कसे काय केले असेल?*
ह्या सर्व खंडांच्या आकाराचे वर्णन करण्यासाठी ते उंचावरून म्हणजे आकाशातून किंवा अवकाशातून पहावे लागतील. आजकाल अवकाशातील उपग्रहांच्या सहाय्याने आपल्याला अचूक नकाशे तयार करता येतात. इथे २-३ गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पृथ्वीच्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीची माहिती होण्यासाठी *पृथ्वीची प्रदक्षिणा* करणे आवश्यक आहे. म्हणजे वेदव्यास ह्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा केली असणार. *खंडांच्या आकाराची कल्पना येण्यासाठी ते उंचावर जाऊन पहावे लागतील.* ह्याचा अर्थ *विमानासारख्या यंत्रात बसून वेदव्यास आकाशात किंवा अवकाशात गेले असावेत* कारण महाभारत काळी म्हणजे *अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षे विमाने अस्तित्वात होती.* हेही मान्य नसेल तर वेदव्यास ह्यांनी *योगबळावर सूक्ष्मरूपाने विश्वात संचार करून सर्व माहिती मिळविली असणार त्यातून भारतीय योगशास्त्र किती प्रगत होते हे मान्य करावेच लागेल.* अशाप्रकारे इथून पुढे जगाचा नकाशा सर्वप्रथम कोणी तयार केला? असा प्रश्न विचारल्यास, वेदव्यास ह्यांनी महाभारत ह्या ग्रंथात ह्या नकाशाची विस्तृत माहिती दिली आहे असे अभिमानाने सांगावे. आज इथेच थांबतो.
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment