माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७५

 

#वेदविज्ञानरंजन_७५

*रसायनशास्त्र विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा लेख जरूर पाठवावा ही नम्र विनंती.*

*प्राचीन भारतीय रसायनशास्त्र भाग - १*

आजच्या भागात आपण प्राचीन भारतीय
रसायनशास्त्राची माहिती घेणार आहोत.

वाग्भट ह्यांनी लिहिलेल्या *रसरत्नसमुच्चय* ह्या ग्रंथात रसशाळा (Chemistry Lab )  ह्याचे छान वर्णन केले आहे.

🚩
रसशालां प्रकुर्वीत सर्वबाधाविवर्जिते
सर्वोषधिमये देशे रम्ये कूपसमन्विते ||१||
🚩

रसशाळा म्हणजे प्रयोगशाळा अश्या ठिकाणी असावी की जी बाहेरील गोंधळापासून मुक्त असेल. प्रयोगशाळेभोवती *विविध औषधी वनस्पती* असलेला प्रदेश असावा आणि *मुबलक प्रमाणात पाणी* असावे.
🚩
यक्षत्र्यक्षरसहस्राक्षदिग्विभागसुशोभने
नानोपकरणोपेतां प्रकारेण सुशोभिताम् ||२||
🚩

प्रयोगशाळेच्या भोवती उंच कुंपण ( भिंत असावी ) प्रयोगशाळेत *विविध प्रकारची उपकरणे* असावीत
🚩
शालायाः पूर्वदिग्विभागे स्थापयेद्रसभैरवम् |
वह्निकर्माणि चाग्नेये याम्ये पाषाणकर्म च ||३ ||
🚩

*रसभैरव* म्हणजे प्रयोगशाळेची देवता *पूर्व दिशेला* स्थापन करावी. *प्रयोगशाळेतील भट्टी* किंवा अग्नीचे स्थान *आग्नेय दिशेस* आणि *दगडांचे साहित्य दक्षिणेस* ठेवावे.

🚩
नैऋत्ये शस्त्रकर्माणि वारुणो क्षालनादिकम् |
शोषणं वायुकोणे च वेधकर्मोत्तरे तथा ||४ ||
🚩

कापण्यासाठी उपयोगात असणार्‍या सुऱ्या किंवा इतर *शस्त्रे नैऋत्य दिशेस* असावीत आणि *पश्चिम दिशेस धुण्याची आणि साफसफाईची जागा* असावी. *ईशान्य दिशेकडे प्रयोगशाळेतील साहित्य वाळवावे.*

🚩
स्थापनं सिद्धवस्तूनां प्रकुर्यादीशकोणके |
पदार्थसंङ्ग्रहः कार्यो रससाधनहेतुकः ||५ ||
🚩

*धातुकाम उत्तर दिशेकडे* करावे आणि प्रयोगशाळेत तयार झालेली द्रव्ये ईशान्य दिशेकडे साठवावीत.

अशाप्रकारे, प्रयोगशाळेची रचना कशी असावी ह्याचे वर्णन आपल्याला वरील श्लोकांत दिसून येते.

रसार्णव ह्या ग्रंथात धातूंचे गुणधर्म सांगितले आहेत.
ते खालीलप्रमाणे आहेत.
🚩
सुवर्णं रजतं ताम्रं तीक्ष्णं वङ्गं भुजङ्ममम् |
लोहन्तु षड्विधं तच्च  यथापूर्वम् तदक्षयम् ||
🚩

Gold, silver, copper, iron, lead, zinc are the 6 types of metals, their stability (resistance towards corossion / reactivity ) is in the reverse order of the above.

सोने, चांदी, तांबे, लोह, शिसे आणि जस्त असे धातूंचे काही प्रकार सांगितले आहेत.

रसरत्नसमुच्चय ह्या ग्रंथात ६ प्रकारचे लवण (Sault) सांगितले आहे. ते खालीलप्रमाणे :

🚩
लवणानि षडुच्यन्ते सामुद्रं सैन्धवं बिडम् |
सौर्वचलं रोमकञ्च चूल्लिकालवणं तथा ||
🚩

अशाप्रकारे प्राचीन भारतात रसायनशास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...