माझा परिचय

Sunday 26 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४६ श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

 


🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १* 🌺


*श्रीमद्भागवत स्कंध ३ अध्याय ११*


🚩

चरमः सद्विशेषाणां अनेकोSसंयुतः सदा |

*परमाणुः* स विज्ञेयो नृणामैक्यभ्रमो यतः ||१ ||

🚩


पृथ्वीचा जो *सूक्ष्मतम अंश* आहे, ज्याचे आणखी *विभाग होऊ शकत नाहीत*, ज्याचा इतर परमाणूंबरोबर संयोग झालेला नाही त्याला *परमाणू* असे म्हणतात. 


वरील श्लोकाचे विवेचन पाहू. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्या कितीतरी शतके आधीच *महर्षी कणाद* ह्यांनी अणूचा शोध लावला अशी मान्यता आहे. 

त्यांच्याही कितीतरी शतके आधीच श्रीमद्भागवत ह्या ग्रंथात अणूची व्याख्या केलेली आपल्याला आढळते.  *पृथ्वीच्या सूक्ष्मतम, अविभाज्य अंशास अणू असे म्हणतात* अशी व्याख्या वरील श्लोकात आपल्याला आढळते. येथे पृथ्वीचा सूक्ष्मतम अंश म्हणजे *पदार्थाचा (matter) अंश* असा अर्थ घ्यायचा आहे. पृथ्वी ह्याचा अर्थ ग्रह असा नसून पदार्थ ( matter ) असा आहे. तो अजून *विभाजित करता येत नाही* म्हणजेच तो परमाणू आहे.


🚩

अणुर्द्वौ परमाणु स्यात् त्रसरेणुस्त्रयः स्मृतः |

*जालार्करश्म्यवगतः*  खमेवानुपतन्नगात् ||५||

🚩


दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो. म्हणजेच जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. 


 वरील श्लोकाचे विवेचन पाहू. 


श्लोक क्र. १ मध्ये आपण अणूची व्याख्या पाहिली आता रेणू म्हणजे काय ते समजून घेऊ. *दोन किंवा आधिक अणूंचा संयोग झाला की रेणू तयार होतो*. त्याला *त्रसरेणु* असे म्हणतात. ह्याचाच अर्थ दोन अणूंचा संयोग होण्यासाठी जी *रासायनिक प्रक्रिया* होते त्याचे ज्ञान त्या काळी भारतात अवगत होते. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा की मुळात *अणू, रेणू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत.* त्यांचा अभ्यास करण्यासाठी *सूक्ष्मदर्शक यंत्राचा (Microscope)* उपयोग करावा लागतो. ज्याअर्थी अणूपासून रेणू तयार होतो हे विधान श्रीमद्भागवत पुराणांत केले आहे त्याअर्थी त्या काळी अणूचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र असावे. तरच अणू, रेणू ह्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. *शिल्पभृगुसंहिता* ह्या ग्रंथात दुर्बिण कशी तयार करतात ह्याची माहिती आहे. माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये ह्यासंबंधीचे श्लोक आपण वाचले आहेत. *जर दुर्बीण तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत होते तर सूक्ष्मदर्शक यंत्र तयार करण्याचे तंत्रज्ञान सुद्धा निश्चितच माहिती असणार.* 


वरील श्लोक क्र. ५ मध्ये लिहिले आहे की अणूंच्या संयोगातून तयार झालेला रेणू झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. आता इथे अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. श्रीमद्भागवत पुराणांत म्हटले आहे की हा जो *रेणू आहे तो सूर्यप्रकाशात उडताना दिसतो.* आधुनिक विज्ञानानुसार सूर्यप्रकाशात दिसणाऱ्या *अणूला प्रकाशाणू (Photon )* असे म्हणतात. प्रकाशाणू हा *प्रकाशाचा अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेला एक कण अथवा पुंजकण* आहे. *बोसॉन* ह्या वर्गात त्याचे वर्गीकरण करता येते. 


*A photon is an elementary particle that is the quantum of the electromagnetic field, including electromagnetic radiation such as light and radio waves. Photons are massless and always move at the speed of light.*


Statistic : Bosonic 

Family : Gauge boson 


इंग्रजी भाषेत लिहलेले हे सर्व फोटॉनचे वर्णन भौतिकशास्त्र जाणाऱ्या, त्यात पदवी घेतलेल्या परदेशी वैज्ञानिकांनी लिहिलेले आहे. *फोटॉनची व्याख्या करण्याचा मान आईन्स्टाईन* ह्यांना जातो. 

श्रीमद्भागवत ग्रंथाचे जनक *महर्षी व्यास ह्यांनी साधारण इ.स.पू. ५००० किंवा त्याहून अधिक वर्षांपूवी अणू, रेणू, प्रकाशाणू ह्याचे संदर्भ त्यांच्या ग्रंथात दिले आहेत.* महर्षी व्यास हे पदार्थविज्ञान शास्त्रात पदवीधर नव्हते तरीसुद्धा ह्या *सर्व कणांचे अचूक वर्णन* त्यांनी लिहून ठेवले आहे. तरुण पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. 


आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो. 

श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया. 


🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Friday 17 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४५: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५


🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५* 🌺

मागील ४ लेखांमध्ये आपण महाभारतात उल्लेख केलेल्या विविध वैज्ञानिक संदर्भांची माहिती घेतली.  *आजच्या शेवटच्या लेखात आपण महाभारतातील गर्भविज्ञान* ह्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

*महाभारत शांति पर्व अंतर्गत मोक्षधर्म पर्व अध्याय ३२०* मध्ये मनुष्यशरीरात *गर्भधारणा* कशी होते ह्याचे विवेचन केले आहे.

🚩 बिन्दुन्यासादयोSवस्था: *शुक्रशोणितसम्भवाः*
यासामेव निपातेन *कललं* नाम जायते ||११७||
🚩
वीर्य म्हणजे पुरूबीज आणि शोणितबीज म्हणजे स्त्रीबीज ह्यांच्या मिश्रणातून गर्भाशयात एक घटक तयार होतो त्याला *कलल* (Cellular level) असे म्हणतात.

🚩कललाद् बुद्बुदोत्पत्तिः पेशी च बुद्बुदात् स्मृता |
पेश्यास्त्वङ्गाभिनिर्वृत्तिर्नखरोमाणि चाङ्गतः ||११८ || 🚩

कलल पासून *बुडबुडा* निर्माण होतो. त्या बुडबुड्यापासून पुढे *पेशी आणि मांस* तयार होते. विविध अवयव तयार होतात, *नखे आणि केस* तयार होतात.

स्त्री - पुरुष ह्यांच्या संयोगातून स्त्रीच्या शरीरात गर्भधारणा होते हे आपल्याला ज्ञात आहेच. *आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने गर्भधारणेतील सर्व टप्पे आपण पाहू शकतो.*  परंतु, इ. स. पू. ५००० पेक्षासुद्धा अधिक पुरातन असलेल्या *महाभारतात ह्या ग्रंथात (द्वापार युग) गर्भधारणेच्या प्राथमिक अवस्थेतचे वर्णन* केले आहे. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय, सोनोग्राफीशिवाय *गर्भधारणेतील प्राथमिक टप्पा म्हणजेच कलल - बुडबुडा - मांस, पेशी - अवयव निर्मिती ह्याचे अगदी योग्य वर्णन महर्षी व्यास ह्यांनी केले आहे. हे सर्व अचंबित करणारे आहे.*

महाभारत युद्धात अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरण्यात आली. महाभारतातील *ब्रह्मास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब सदृश* होय. त्याकाळी उपयोगात येणारी अनेक शस्त्रास्त्रे आधुनिक शस्त्रास्त्रांशी मिळतीजुळती आहेत.

अर्जुनाचा पुत्र *अभिमन्यूला मातेच्या गर्भात प्राप्त झालेले ज्ञान म्हणजेच गर्भसंस्कार* आणि गर्भातील *बाळाच्या मेंदूची प्रगत अवस्था* ह्याचे वर्णन केलेले आपल्याला आढळते.

महाभारत हा ग्रंथ म्हणजे नुसती *कविकल्पना नाही तर प्रत्यक्ष घडलेला इतिहास* आहे. त्याचे पुरावे वेळोवेळी समोर येत असतात. महाभारत म्हणजे फक्त *कौरव - पांडव युद्ध आणि श्रीमद्भगवद्गीता नाही* तर अनेक *आधुनिक वैज्ञानिक संदर्भ आणि त्याची पाळेमुळे* आपल्याला महाभारत ह्या ग्रंथात सापडतात. महाभारत ह्या ग्रंथात *खगोलशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, भूगोल, स्थापत्यशास्त्र, युद्धकलाशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र* अशाप्रकारे अनेक विषय समाविष्ट आहेत. जगातील एकही असा विषय नाही जो महाभारतात नाही म्हणूनच *व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*
अशी उक्ती आहे. म्हणजे जगातील सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे केले आहे. ह्याचा अर्थ असा की व्यासांनी जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे.
*महाभारत आणि विज्ञान* ह्या विषयावर माझ्या सर्व लेखांना आपल्यासारख्या जाणकार वाचकांनी *उत्तम प्रतिसाद दिला* त्याबद्दल *मी सर्वांचा ऋणी* आहे. *आजचा हा शेवटचा भाग पाठवून मी महाभारतावरील लेखांचा समारोप करीत आहे.* पुढच्या वेळी *नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू.* तोपर्यंत *जयतु वेदविज्ञानम्*

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Saturday 11 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४४: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४


🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४* 🌺

*चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे. आता ह्याविषयी अधिक माहिती घेऊ.
वेदव्यास ह्यांनी महाभारतात लिहिले आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर जे डाग आहेत ते डाग म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.

🚩 यथा हि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मानः |
एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले ||१६ || 🚩

ज्याप्रमाणे पुरूष आपले तोंड आरशात पाहतो,  म्हणजेच प्रतिबिंब पाहतो, त्याप्रमाणे *सुदर्शन द्वीप चंद्रावर* दिसतो (त्याचे प्रतिबिंब चंद्रावर दिसते ) म्हणजेच पृथ्वीवरील भूभागाचे *प्रतिबिंब* दिसते.

आता पृथ्वीचे प्रतिबिंब सूर्यावर कसे दिसेल? त्यासंबंधी पुढील श्लोक पाहू

🚩द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशे च शशो महान् |
सर्वौषधिसमावायः सर्वतः परिवारितः ||१७ ||🚩

त्याच्या *दोन अंशात पिंपळ ( पिंपळाची पाने ) आणि दोन अंशांत ससा* दिसतो. त्याच्या सर्व बाजूंनी औषधी वनस्पती आहेत.

ह्याचे विवेचन पाहू. चंद्राच्या पृष्ठभागावर जो डाग दिसतो तो ससा ह्या प्राण्याच्या आकारासारखा दिसतो हे आपल्याला माहितीच आहे. जणू काही *चंद्राच्या मांडीवर ससा आहे अशी कल्पना करून चंद्राला शशाङ्क* असे म्हणतात (अङ्क म्हणजे मांडी ) आता ह्या सश्याचे चित्र म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे. संपूर्ण पृथ्वीचा एकसंध नकाशा तुम्ही गूगल वर पाहिलात तर तो नकाशा ससा आणि पिंपळाच्या पानांसारखा दिसतो. ह्या लेखाबरोबर मी चित्र पाठविली आहेत.

* भीष्मपर्व जम्बूखण्डविनिर्माणपर्व अध्याय क्र. ५*

🚩 (स वै सुदर्शनद्वीपो दृश्यते शशवद् द्विधा )
यां तु पृच्छसि मां राजन् दिव्यामेतां शशाकृतिम्
पार्श्वे शशस्य द्वे वर्षे उक्ते ये दक्षिणोत्तरे
कर्णौ तु नागद्वीपश्च काश्यपद्वीप एव च 🚩

अशाप्रकारे मी सुदर्शन द्वीपाचे वर्णन केले. तो द्वीप म्हणजे पृथ्वीचे चित्र दोन भागांत विभागले आहे आणि चंद्रावरील डागांच्या स्वरुपात (सश्याचा आकार ) आपल्याला दिसतो. दक्षिण आणि उत्तर दिशेत स्थित (भारत आणि ऐरावत ) नावाचे जे दोन द्वीप सांगितले आहेत ते दोन्ही त्या सशाचे पार्श्वभाग आहेत. नागद्वीप आणि काश्यपद्वीप हे त्या सशाचे दोन कान आहेत.

🚩आपस्ततोSन्या विज्ञेयाः शेषः संक्षेप उच्यते ||१८ ||🚩

ह्या सर्व भूभागाव्यतिरिक्त उरलेली जागा जलमय समजावी. असेही स्पष्ट वर्णन आढळते. पृथ्वीवरील सर्व खंड, त्यांचा विस्तार आणि उरलेल्या भागात पाणी आहे ह्याचे अचूक ज्ञान महर्षी व्यास ह्यांना होते. *उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका अशा सर्व खंडांचे वर्णन, आणि त्यांचे आकार ह्यांचे वर्णन वेदव्यास ह्यांनी कसे काय केले असेल?*

ह्या सर्व खंडांच्या आकाराचे वर्णन करण्यासाठी ते उंचावरून म्हणजे आकाशातून किंवा अवकाशातून पहावे लागतील. आजकाल अवकाशातील उपग्रहांच्या सहाय्याने आपल्याला अचूक नकाशे तयार करता येतात. इथे २-३ गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पृथ्वीच्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीची माहिती होण्यासाठी *पृथ्वीची प्रदक्षिणा* करणे आवश्यक आहे. म्हणजे वेदव्यास ह्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा केली असणार. *खंडांच्या आकाराची कल्पना येण्यासाठी ते उंचावर जाऊन पहावे लागतील.* ह्याचा अर्थ *विमानासारख्या यंत्रात बसून वेदव्यास आकाशात किंवा अवकाशात गेले असावेत* कारण महाभारत काळी म्हणजे *अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षे विमाने अस्तित्वात होती.*  हेही मान्य नसेल तर वेदव्यास ह्यांनी *योगबळावर सूक्ष्मरूपाने विश्वात संचार करून सर्व माहिती मिळविली असणार त्यातून भारतीय योगशास्त्र किती प्रगत होते हे मान्य करावेच लागेल.* अशाप्रकारे इथून पुढे जगाचा नकाशा सर्वप्रथम कोणी तयार केला? असा प्रश्न विचारल्यास, वेदव्यास ह्यांनी महाभारत ह्या ग्रंथात ह्या नकाशाची विस्तृत माहिती दिली आहे असे अभिमानाने सांगावे. आज इथेच थांबतो. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Friday 3 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४३ : महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 

#वेदविज्ञानरंजन_४३

🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३* 🌺

गेल्या शनिवारच्या लेखात आपण चंद्र- सूर्यग्रहण तसेच सूक्ष्मजीव ह्यांचा महाभारतातील उल्लेख ह्यावर माहिती घेतली होती. आज *पृथ्वीच्या आकारासंबंधी* अजून माहिती घेऊ
महाभारत भीष्मपर्व अंतर्गत *जम्बूखंडविनिर्मण पर्व* ह्यात सुदर्शन द्वीप म्हणजे *पृथ्वीचे वर्णन* केले आहे.

संजय धृतराष्ट्राला सांगतात की..

सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन |
*परिमण्डलो* महाराज द्वीपोSसौ चक्रसंस्थितः ||१३ ||

हे कुरुनन्दन! मी सुदर्शन नावाच्या द्वीपाचे म्हणजेच पृथ्वीचे वर्णन करतो. महाराज *पृथ्वी ही चक्रासारखी गोलाकार* आहे.

महाभारताचे लेखक वेदव्यास ह्यांनी संजय आणि धृतराष्ट्र ह्यांच्यातील वरील संवाद लिहून ठेवला आहे. येथे *पृथ्वी गोलाकार आहे* असे म्हटले आहे. आता पृथ्वी गोल आहे हे इतके अचूक विधान करण्यासाठी त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि ती *सर्व माहिती संजय ह्यांना होती.* पृथ्वी गोल आहे ह्याची माहिती *सर्वांत आधी अंदाजे इ.स.पू.५०० वर्षे ग्रीक तत्ववेत्त्यांना होती* असे आपल्याला गूगल सांगते. परंतु, आपल्या महाभारत ग्रंथात हीच माहिती एव्हढेच नव्हे तर *पृथ्वीवरील सर्व खंडांची पूर्ण वर्णन दिलेले आहे.* महाभारत हे अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षांपूर्वी लिहिले गेले असल्याने *पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडण्याचा मान महाभारत ग्रंथास आणि वेदव्यास, संजय ह्यांना मिळायला हवा* . *रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ* ह्या माझ्या लेखमालिकेत मी लिहिले होते की पृथ्वी गोल आहे ह्याचा सर्व संदर्भ वाल्मीकी रामायण, किष्किंधा कांड ह्यात दिलेला असून *वानरराज सुग्रीव ह्यांनी पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत*  मांडला आहे. आपले *वेद हे जगातील अत्यंत प्राचीन लिखित वाङ्मय* आहे. त्यातसुद्धा पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडला आहे. वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेअंतर्गत मी  *पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण ह्याचा वेदांतील उल्लेख* ह्या लेखांमध्ये पृथ्वी गोल आहे ह्याचा उल्लेख केला आहे. थोडक्यात काय तर वेद, रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांत पृथ्वी गोल आहे ह्याचा स्पष्ट उल्लेख असताना ह्याच्या *सिद्धांताचे श्रेय मात्र परदेशी वैज्ञानिकांना* दिले गेले. आपल्या स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली तरीही आपण अजूनही *गुलामगिरीच्या मानसिकतेत* आहोत. आपल्याच ग्रंथातील *अनेक वैज्ञानिक संदर्भ* आपण पुढे आणत नाही, ह्या सर्व ग्रंथांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करीत नाही. ह्याची *खूप खंत वाटते.*  आपला *सनातन धर्म हा विज्ञानावर आधारलेला असून अनेक वैज्ञानिक संदर्भ आपल्याला आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करताना सापडतात आणि आपण अचंबित* होतो. परंतु, त्याचा अभ्यास न करता आपण * परदेशी शास्त्रज्ञांचे गोडवे* गाण्यात धन्यता मानीत आहोत. ही सर्व माहिती *पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली तरच नवीन पिढीला समजेल* आणि त्यावर अधिक संशोधन होऊ शकेल.   ह्यासाठी *सरकार दरबारी पाठपुरावा* करणे आवश्यक आहे. तूर्तास आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ही सर्व माहिती द्यावी आणि *रामायण, महाभारत असे ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वाचण्यास उद्युक्त* करावे.

महाभारतात चंद्र- पृथ्वी आणि चंद्रावरील डाग ह्यांची खूप छान माहिती मिळते. ती खालीलप्रमाणे

पश्यन्नपि यदा *लक्ष्म जगत् सोमे* न विन्दति
एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ||८|| 

चंद्रावर जो कलंक आहे ते पृथ्वीचे चिह्न आहे परंतु, ते फक्त पृथ्वीचे चिह्न आहे. प्रत्यक्ष पृथ्वी नाही.
त्याप्रमाणे प्रत्येकाला *मी आहे* ह्या स्वरुपात आत्म्याचे ज्ञान आहे परंतु, संपूर्ण आत्म्याचे यथार्थ ज्ञान नाही.

आपल्याला *चंद्रावर डाग दिसतात ते डाग म्हणजे चंद्रावर संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.*  चंद्रावर डाग हा फक्त पृथ्वीचा नकाशा आहे पण प्रत्यक्ष पृथ्वी नाही. याचाच अर्थ प्रत्येकाला स्व चे म्हणजे आत्म्याचे अगदी थोडे ज्ञान असते त्यावरून आत्म्याची कल्पना करता येते. परंतु, संपूर्ण आत्म्याचे ज्ञान होणे खूप कठीण आहे. *चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे. आता चंद्रावरील डाग हे पृथ्वीचा नकाशा कसा? ह्याची *रंजक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.*  तोपर्यंत
जयतु वेदविज्ञानम् 


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...