माझा परिचय

Showing posts with label श्रीमद्भागवत पुराण. Show all posts
Showing posts with label श्रीमद्भागवत पुराण. Show all posts

Sunday, 30 April 2023

वेदविज्ञानरंजन - ५२

 

#वेदविज्ञानरंजन_५२

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ६* 🌺

*अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्यांची संकल्पना* 

*श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ आणि अध्याय २१* मध्ये पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण त्यामुळे निर्माण होणारे दिवस रात्र यांचे चक्र तसेच *अक्षवृत्त आणि रेखावृत्त* यांची कल्पना ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. आपण सविस्तर पाहू.
🚩
एतेन हि दिवो मण्डलमानं तद्विद उपदिशन्ति
यथा द्विदलयोर्निष्पावादीनां ते अन्तरेणान्तरिक्षं
तदुभयसन्धितम् ॥
🚩
वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

तद्विदः हि एतेन यथा निष्पावादीनां *द्विदलयोः* (तथा) दिवः मंडलमानं उपदिशन्ति ते अन्तरेण तदुभयसंधितम् अन्तरिक्षं (अस्ति)|

तज्ञ लोक खरोखर ह्या *भूमंडलप्रमाणावरून* जसे पावटा वगैरेंच्या दोन पानांचे तसे स्वर्गाच्या *वर्तुळाचे प्रमाणे* सांगतात त्याच्या मध्ये त्या दोघांच्या सांध्यावर लागून ठेविलेले आकाश आहे.
येथे *मंडलमानम्* असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजेच ही *पृथ्वी गोल* आहे आणि पृथ्वीवरून दिसणारे आकाश सुद्धा आपल्याला गोल भासते आणि क्षितिजाला टेकलेले दिसते.

🚩
यत्रोदेति तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति
यत्र क्वचन स्यन्देनाभितपति तस्य हैष
समानसूत्रनिपाते प्रस्वापयति तत्र गतं न पश्यन्ति
ये तं समनुपश्येरन् ||
🚩

वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

यत्र उदीत तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति एषः यत्र क्वचन स्यंदेन अभितपति तस्य ह समानसूत्रनिपाते प्रस्वापयति ये तं समनुपश्येरन् ते तत्र गतं न पश्यन्ति |

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ज्याठिकाणी उदयाला येतो, त्याच ठिकाणच्या सारख्या *सुताच्या समोरील समांतररेषेत अस्ताला जातो*, हा सूर्य ज्याठिकाणी कोठेतरी *घाम येण्याइतक्या उन्हाने उष्ण प्रकाश देतो*, त्याच्याच सारख्या सुताच्या समोरील समांतर रेषेत असणार्‍यांना *गाढ झोपी नेतो*, जे त्या सूर्याला *स्वतःच्या प्रदेशात* पहातात, ते समोरील *समांतर रेषेतील मध्यरात्री झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात पहात नाहीत.*

वरील श्लोकात पृथ्वीच्या गोलार्धाचे वर्णन केले आहे. ज्या *गोलार्धात सूर्यप्रकाश असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात अंधार असतो.*
गोलार्ध म्हणजेच पृथ्वीचा अर्धा भाग. काल्पनिक रेषांनी पृथ्वीचे दोन भाग आधुनिक विज्ञानाने केले आहेत. अक्षवृत्त : उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, रेखावृत्त : पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध.
पृथ्वी गोल आहे आणि तिचे परिवलन आणि परिभ्रमण यांमुळे दिवस रात्र चक्र घडते ही क्रिया प्राचीन ऋषींना ज्ञात होती त्यांनी वरील श्लोकात *समांतर सूत्र (म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त ह्यांचा) उल्लेख* केला आहे. श्रीमद्भागवत हा आपल्या संस्कृतील अतिशय मान्यताप्राप्त आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळे त्यातील *उल्लेखावर शंका घेण्याचे कारण नाही.* पृथ्वी गोल असल्याने वेगवेगळ्या वेळी सूर्याची वेगवेगळी स्थिती दिसून येते ह्याची संपूर्ण माहिती भारतीय ऋषींना होती. श्रीमद्भागवत पुराणांत ह्याची सविस्तर माहिती दिली आहे. सर्व भागवत आचार्यांना माझी विनंती आहे की भागवतातील श्रीकृष्ण चरित्राबरोबरच इतर स्कंदांतील माहिती सुद्धा सांगावी म्हणजे आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातील वैज्ञानिक तत्वे शोधता येतील.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.*

श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ ही लेखमालिका इथे समाप्त होत असून पुढील शनिवारपासून *वेदांतील विज्ञान ही लेखमालिका चालू होईल*

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Thursday, 6 April 2023

वेदविज्ञानरंजन - ५१:शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे

 

#वेदविज्ञानरंजन_५१

🚩 *शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे?* 🚩

*वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेची आज वर्षपूर्ती* होत आहे. ह्या वर्षभरात *महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी वाचकांचा खूप छान प्रतिसाद* ह्या लेखमालिकेला मिळाला. ह्यासाठी मी *सर्व वाचकांचे आभार* मानतो. ह्या निमित्ताने *विविध ठिकाणी व्याख्याने देऊन वेदविज्ञानचा प्रसार करण्याचे भाग्य* मला लाभले. आपल्या *सर्वांचा लोभ असाच कायम राहावा* अशी प्रार्थना करतो. ह्या लेखमालिकेतील काही *लेखांचे videos तयार केले असून ते खालील you tube link* वर जाऊन पाहता येतील.
https://youtube.com/playlist?list=PLxUd5Q3xIze11_fIwWBoUR0wdlxuYYM7l

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ६* 🌺

आजच्या भागात पृथ्वीसंबंधीत श्रीमद्भागवत ग्रंथातील काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत

🌺 *पृथ्वी गोल आहे* 🌺

श्रीमद्भागवत पुराण स्कंध ५ - अध्याय २५ (श्रीसंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती ) (भूविवरविध्युपवर्णनम्) - श्लोक २ आणि श्लोक १२

🚩
श्लोक :२

यस्येदं क्षितिमण्डले भगवतोऽनन्तमूर्तेः
सहस्रशिरस एकस्मिन्नेव शीर्षणि ध्रियमाणं
सिद्धार्थ इव लक्ष्यते ॥ २ ॥
🚩

यस्य अनंतमूर्तेः सहस्रशिरसः भगवतः एकस्मिन् एव शीर्षणि ध्रियमाणं इदं क्षितिमंडलं सिद्धार्थः इव उपलक्ष्यते |

ज्या असंख्यस्वरूपी हजारो मस्तके असणार्‍या शेषावतारी भगवंताच्या एकाच मस्तकावर धारण केलेले हे *पृथ्वीमंडळ* (पृथ्वी गोल आहे ) मोहरीच्या दाण्याप्रमाणे अगदी अल्पसे दिसते. ॥२॥

ह्या भगवान *अनंताची (शेषाची ) एक हजार मस्तके आहेत.* ह्यापैकी एका मस्तकावर ठेवलेले हे *क्षितिमंडल* (क्षिती =पृथ्वी ) पृथ्वीमंडल ( *गोल पृथ्वी*  ) *मोहरीच्या दाण्याएवढी* दिसते. (सिद्धार्थः इव उपलक्ष्यते) *सिद्धार्थः म्हणजे अतिशय छोटा दाणा*

🚩
मूर्धन्यर्पितमणुवत्सहस्रमूर्न्घो ।
*भूगाेलं*  सगिरिसरित्समुद्रसत्वम् || १२||
🚩

अन्वयार्थ :
सगिरिसरित्समुद्रसत्त्वं *भूगोलं* सहस्रमूर्ध्नः मूर्धनि *अणुवत्* अर्पितं सहस्रजिह्वः कः आनंत्यात् अनिमितविक्रमस्य भूम्नः वीर्याणि अधिगणयेत् |

पर्वत, नद्या, समुद्र व प्राणी ह्यांसह *भूगोल* हजार फणांच्या *शेषाच्या मस्तकावर* *अणूसारखा* ठेवला आहे (तोलला आहे ) . इथे *शेषावर पृथ्वी कशी काय आहे?* अंतराळवीरांना तर शेष कुठेच दिसला नाही 😝 अशी टिंगल करण्यात येते. *शेष शब्दाचा अर्थ नीट जाणून न घेतल्यामुळे झालेला हा गैरसमज आहे*. तुम्हाला गणितातील *निःशेष भागाकार ही संज्ञा* माहिती असेल. *भागाकार केल्यावर बाकी काहीच राहत नाही ती शून्य असते* म्हणजेच *शेष काही राहत नाही त्याला निःशेष भागाकार* म्हणतात. ह्याचा अर्थ *शेष म्हणजे उरलेले* आणि निःशेष म्हणजे न उरलेले किंवा संपलेले.

आता इथे *शेष म्हणजे अंतराळ* कारण आपल्या आकाशगंगेत ग्रह,नक्षत्र, तारे व्यापलेले आहेत. आणि जे काही उरलेले आहे म्हणजे शेष आहे ते म्हणजे अंतराळ, अंतरिक्ष. आपण नीट अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की आपल्या ब्रह्मांडांत अनेक आकाशगंगा आहेत. येथे *सहस्रमूर्ध्नः* हा शब्द *अनेक*  (हजारो )ह्या अर्थी योजला आले. आपण इंटरनेट वर आकाशगंगा (Galexy ) पाहतो. त्यात *आकाशगंगा सर्पिलाकृती* म्हणजे सापाच्या आकृतीसारख्या दिसतात. वेटोळे घातलेला साप आहे असा भास होतो. *हबल ह्या दूर्बिणीद्वारे* नासाने आकाशगंगांची छायाचित्रे टिपली आहेत. आपले आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की अनेक आकाशगंगा आहेत. *अंतराळात हा भूगोल म्हणजे पृथ्वी अगदी अणू एव्हढी* आहे. ह्याचा अर्थ *अणू* ही संकल्पना भारतीयांना कणाद ऋषींच्या आधीपासून ज्ञात होती. कणाद ऋषींनी अणूवर विस्तृत भाष्य केले आहे ते पुढे कधीतरी पाहूच.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक *भागवत सप्ताह* होतात त्यात *स्कंध १० मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र* आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने आणि इतर स्कंध त्यामानाने दुर्लक्षित असल्याने इतर स्कंधांतील *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही.*  माझी सर्व आचार्यांना विनंती आहेत की भागवत सप्ताहात श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.
पहा *किती विचार केला आहे आपल्या ऋषींनी!*  अतिप्रचंड विस्तार असलेल्या ह्या ब्रह्मांडातील एक भूगोल हा अगदी छोट्या कणा एवढा म्हणजेच अणूएवढाच दिसतो. इथे हा भूगोल *तोलला* आहे म्हणजे balance केलेला आहे कारण *पृथ्वीचे स्वतःचे गुरूत्वबल, सूर्याचे आणि इतर ग्रहांचे पृथ्वीवर असणारे आकर्षण बल यांचा तोल (balance) साधून पृथ्वी शेषावर (अंतराळात ) परिभ्रमण करीत आहे. *माझा हा लेख वाचून तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ती गोष्ट आपल्या प्राचीन ग्रंथांत लिहिली आहे.* ह्यापुढे जर कोणीही पृथ्वीचा भार शेषावर आहे ह्यासंदर्भात *हेटाळणी* केली तर त्याला *सडेतोड उत्तर द्या.*
*एव्हढा स्पष्ट दाखला श्रीमद्भागवत पुराणांत देऊन सुद्धा* आपल्याकडील विद्वान शास्त्रज्ञांच्या मनात ह्यावर *अधिक संशोधन करावे असे येत नाही का?* आपण असे किती दिवस  पाश्चात्य वैज्ञानिकांचे गोडवे गाण्यात धन्यता मानणार आहोत? असो. ह्यापुढे तरी आपल्या *धर्मग्रंथांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करावा ही नम्र विनंती.*

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Saturday, 18 March 2023

वेदविज्ञानरंजन_४९ - श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

 

#वेदविज्ञानरंजन_४९

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४* 🌺

*जगातील सर्वांत पहिला सरोगेट गर्भ कोणता?*

आधुनिक विज्ञानाने मान्य केलेली *सरोगेट मदर ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी श्रीमद्भागवत ग्रंथात मांडली आहे.*  सरोगेट मदर ह्याचा अर्थ *एका मातेच्या उदरात तयार झालेला जीव, गर्भ दुसर्‍या मातेच्या उदरात ठेवून त्याद्वारे त्याची प्रसूती करणे.*
सरोगसी म्हणजे एक स्त्री आणि दुसरे जोडपे किंवा एकल पालक (सिंगल पॅरेन्ट) यांच्यातील करार होय. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सरोगसी म्हणजे 'सरोगेट गर्भ'. जेव्हा पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत (किंवा जन्म देऊ इच्छित नाहीत) तेव्हा दुसऱ्या स्त्रिच्या पोटातून मुलाला जन्म देण्यास सरोगसी म्हणतात. *ज्या स्त्रिच्या गर्भाला मूल जन्माला घालण्यासाठी भाड्याने घेतले जाते, तिला सरोगेट मदर असे म्हणतात*

वासुदेव आणि देवकी ह्यांना कंसाने कारागृहात ठेवले होते. देवकीच्या पुत्राकडून आपले मरण आहे ह्याची कंसाला कल्पना होती त्यामुळे देवकी प्रसूत झाली की त्या बाळाला कंस अतिशय निर्दयतेने ठार मारीत असे. कंसाने देवकीची सहा मुले मारली. आता सातव्या वेळी देवकी गर्भवती राहिली.
🚩
सप्तमो वैष्णवं धाम यं अनन्तं प्रचक्षते ।
गर्भो बभूव देवक्या हर्षशोकविवर्धनः ॥ ५ ॥
🚩

तेव्हा देवकीच्या *सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले.* त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले.

🚩
भगवान् अपि विश्वात्मा विदित्वा कंसजं भयम् ।
यदूनां निजनाथानां योगमायां समादिशत् ॥ ६ ॥
🚩
यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा *भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली.*

🚩
गच्छ देवि व्रजं भद्रे गोपगोभिः अलंकृतम् ।
रोहिणी वसुदेवस्य भार्याऽऽस्ते नन्दगोकुले ।
अन्याश्च कंससंविग्ना विवरेषु वसन्ति हि ॥ ७ ॥
🚩

देवी ! कल्याणी ! *तू गोकुळात जा*. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात *वसुदेवांची पत्‍नी रोहिणी राहात आहे.* त्यांच्या इतर पत्‍न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत.
🚩
देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धाम मामकम् ।
तत् संनिकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय ॥ ८ ॥
🚩
सध्या माझा *शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव.* इथे वरवर पाहता ही एक कविकल्पना किंवा अशक्य गोष्ट वाटते. आपलेच हिंदू लोक ह्या गोष्टीची टिंगल करताना मी ऐकले आहे. कसे काय शक्य आहे बुवा? असा गर्भ एका गर्भाशयातून दुसर्‍या गर्भाशयात नेऊन ठेवता येतो का? आपल्या पुराणांत काहीही वाट्टेल ते लिहिले असते असे ऐकू येते. पण आता आधुनिक विज्ञाने सिद्ध केले आहे की असे करता येते. त्यामुळे आत्ता जर ही गोष्ट शक्य आहे तर द्वापारयुगात योगमायेने हे काम उत्तमरीत्या पार पाडले होते. देवकीच्या गर्भातून काढून म्हणजे त्याचे संकर्षण करून रोहिणीच्या गर्भात स्थापन केला म्हणून बलरामास *संकर्षण* असे म्हणतात.

🚩
सन्दिष्टैवं भगवता तथेत्योमिति तद्वचः ।
प्रतिगृह्य परिक्रम्य गां गता तत् तथाकरोत् ॥ १४ ॥
🚩
जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने *जशी आपली आज्ञा* असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. येथे योगमाया म्हणजे आजच्या भाषेत प्रसूतीतज्ज्ञ स्त्री होय. धर्मग्रंथांतील कथांचे वैज्ञानिक पद्धतीने अर्थ लावल्यास आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Saturday, 11 March 2023

वेदविज्ञानरंजन - ४८:श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 

#वेदविज्ञानरंजन_४८


*श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३*

          *डायनॉसोर - अजस्र प्राणी*

पृथ्वीवर डायनॉसोर सारखे अजस्र प्राणी काही लाख वर्षांपूर्वी वावरत होते असे आधुनिक विज्ञान सांगते. भूगर्भ शास्त्रज्ञांनी जमिनीखाली दडलेले डायनॉसोर सारख्या प्राण्यांचे सांगाडे शोधून काढून त्यांचे विविध प्रकार आणि त्यांची कालनिश्चिती केली आहे. परंतु, *डायनॉसोर सारखे अजस्र प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याची नोंद* पाश्चिमात्य देशांनी केलेली नाही. जगातील सर्वात श्रेष्ठ असलेल्या आपल्या *सनातन धर्मात श्रीमद्भागवत स्कंध १० अध्याय ६४* मध्ये असा प्राणी पाहिल्याचा उल्लेख आहे.

🚩
एकदोपवनं राजन् जग्मुर्यदुकुमारकाः ।
विहर्तुं साम्बप्रद्युम्न चारुभानुगदादयः ॥ १ ॥
🚩
श्रीशुकदेव सांगतात -
श्रीशुक म्हणातात- परीक्षिता ! एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले.

🚩
क्रीडित्वा सुचिरं तत्र विचिन्वन्तः पिपासिताः ।
जलं निरुदके कूपे ददृशुः सत्त्वमद्‌भुतम् ॥ २ ॥
🚩

तेथे पुष्कळा वेळापर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत *एक विचित्र प्राणी* दिसला. त्याला विचित्र प्राणी म्हंटले आहे कारण असा प्राणी त्यांनी ह्याआधी कधीच पाहिला नव्हता.

🚩
कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः ।
तस्य चोद्धरणे यत्‍नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥ ३ ॥
🚩

तो प्राणी म्हणजे *पर्वताच्या आकाराचा एक सरडा* होता. त्याला पाहून ते *आश्चर्यचकित* झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करू लागले. *डायनॉसोर म्हणजे प्रचंड आकाराचा सरड्यासारखा दिसणारा प्राणी होता हे जीवाश्म पुराव्यांवरून आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे.* Hollywood मध्ये Jurassic Park नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी होता आणि त्यावेळी तो खूप गाजला होता. परंतु, *कोणत्याही पाश्चिमात्य देशांतील ग्रंथात डायनॉसोर सारख्या प्राण्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख नाही. परंतु, तो श्रीमद्भागवत पुराणांतील स्कंधात आहे.*

🚩
चर्मजैस्तान्तवैः पाशैः बद्ध्वा पतितमर्भकाः ।
नाशक्नुवन् समुद्धर्तुं कृष्णायाचख्युरुत्सुकाः ॥ ४ ॥
🚩
परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकले नाहीत, तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली.

🚩
तत्रागत्यारविन्दाक्षो भगवान् विश्वभावनः ।
वीक्ष्योज्जहार वामेन तं करेण स लीलया ॥ ५ ||
🚩
जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरड्याला पाहून आपल्या *डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले*. येथे श्रीकृष्णाच्या शक्तीची कल्पना आपल्याला येते. एकतर त्यांनी डाव्या हाताने खेचून त्याला बाहेर काढले असावे किंवा डाव्या हातात पकडून त्याला उचलून बाहेर काढले असावे. काहीही जरी असले तरी पर्वताच्या आकाराएव्हढ्या अजस्र प्राण्याला बाहेर काढायचे असेल तर श्रीकृष्णाचा डावा हात तेव्हढाच शक्तिशाली आणि मोठा असला पाहिजे. ह्यावरून असा तर्क करता येतो की पर्वताच्या आकाराच्या सरड्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने विराट रूप घेतले असावे. त्यामुळे त्यांनी त्या सरड्याला सहज, अलगद बाहेर काढले. महाभारत युद्धात अर्जुनाला श्रीकृष्णाने विराट रूप दाखवले होते. त्याचप्रमाणे ह्यावेळी सुद्धा विराट रूप घेतले असावे असे वाटते.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Wednesday, 1 March 2023

वेदविज्ञानरंजन - ४७ : श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २

 

#वेदविज्ञानरंजन_४७

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग -  २

आजच्या लेखात आपण *समय यात्रा म्हणजेच time travel* ह्या आधुनिक *वैज्ञानिक सिद्धांताची माहिती* घेणार आहोत. श्रीमद्भागवत ग्रंथातील
स्कंध ९ अध्याय ३ मध्ये खालील श्लोक दिले आहेत. त्याचा आपण अभ्यास करूया.
🚩
तस्य पुत्रशतं जज्ञे ककुद्मि ज्येष्ठमुत्तमम् ।
ककुद्मी रेवतीं कन्यां स्वामादाय विभुं गतः ॥ २९ ॥
🚩
सत्ययुगात *काकुद्मी नावाचा राजा* होता. त्याची *कन्या रेवती अतिशय सुंदर आणि सदाचारसंपन्न* होती. काकुद्मी राजाने तिच्यासाठी *योग्य वरसंशोधन* सुरू केले. परंतु, संपूर्ण पृथ्वीवर कन्या रेवतीसाठी *सुयोग्य वर न मिळाल्याने तो चिंतातुर* झाला.
🚩
कन्यावरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकमपावृतम् ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितोऽलब्धक्षणः क्षणम् ॥ ३० ॥
🚩
आपल्या मुलीचे नशीब लिहिणाऱ्या ब्रह्म देवालाच विचारावे ह्या उद्देशाने *काकुद्मी आपली कन्या रेवती हिच्यासह अतिवेगाने ब्रह्मलोकी गेला* आणि ब्रह्मदेवासमोर उभा राहिला. त्यावेळी ब्रह्मदेवासमोर *गंधर्वांचे गायन चालू असल्याने काकुद्मीला थोडा वेळ तिथे थांबावे लागले.*
🚩
तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
तच्छ्रुत्वा भगवान् ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह ॥ ३१ ॥
🚩
त्यानंतर काकुद्मीने ब्रह्मदेवाला त्याचे येण्याचे प्रयोजन सांगितले आणि *पृथ्वीवरील कोणता वर रेवतीसाठी योग्य आहे?* अशी विचारणा केली.
🚩
अहो राजन् निरुद्धास्ते कालेन हृदि ये कृताः ।
तत्पुत्रपौत्रनप्तॄणां गोत्राणि च न शृण्महे ॥ ३२ ॥
🚩
त्यावेळी ब्रह्मदेव त्याला म्हणाला, हे राजन्! तुझ्या रेवतीसाठी मी ज्या वराला योजले होते तो *वर काळगतीत नष्ट झाला आहे. त्याचा वंश, नातलग आणि गोत्रसुद्धा कालौघात संपले आहे. आता तर सत्तावीस चतुर्युगे संपून द्वापारयुग चालू झाले आहे.*
🚩
कालोऽभियातस्त्रिणवचतुर्युगविकल्पितः ।
तद् गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः ॥ ३३ ॥
🚩
देवादिधेव परमेश्वराचा अंश असलेल्या *बलरामाने आता पृथ्वीवर अवतार* घेतला आहे.
🚩
कन्यारत्‍नमिदं राजन् नररत्‍नाय देहि भोः ।
भुवो भारावताराय भगवान् भूतभावनः ॥ ३४ ॥
🚩
पृथ्वीवरील सज्जनांचा भार हलका करण्यासाठी त्याने अवतार घेतला असून तो *श्रीकृष्णांचा मोठा भाऊ आहे. त्याला तू तुझी कन्या दे.*
🚩
अवतीर्णो निजांशेन पुण्यश्रवणकीर्तनः ।
इत्यादिष्टोऽभिवन्द्याजं नृपः स्वपुरमागतः ।
त्यक्तं पुण्यजनत्रासाद्‍ भ्रातृभिर्दिक्ष्ववस्थितैः ॥ ३५ ॥
🚩
सुतां दत्त्वानवद्याङ्‌गीं बलाय बलशालिने ।
बदर्याख्यं गतो राजा तप्तुं नारायणाश्रमम् ॥ ३६ ॥
🚩
ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन *काकुद्मी रेवतीसह पृथ्वीवर आला तर त्याला सर्वच गोष्टी बदललेल्या दिसल्या आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत असे त्याला वाटले.* त्यानंतर त्याने पुष्कळ शोध घेऊन  *बलरामाशी रेवतीचा विवाह लावून दिला*. त्यानंतर तपश्चर्या करण्यासाठी काकुद्मी बद्रिनारायणास निघून गेला.

वरवर पाहता ही एक *अतिरंजित कथा वाटत असली तरी ती एक सत्य घटना आहे* आणि त्यात खूप मोठा वैज्ञानिक सिद्धांत आहे. त्याचे विवेचन आपण पाहू.

*राजा काकुद्मी आणि रेवती दोघेही पृथ्वीवरून दुसऱ्या लोकात म्हणजे ब्रह्मलोकांत* गेले. ह्याचा अर्थ *विमान किंवा अंतराळयान ह्या सारख्या वाहनांत बसून त्यांनी प्रवास केला असणार. रामायण, महाभारत कालखंडात प्रगत विमाने अस्तित्वात होती ह्याचे अनेक लिखित पुरावे आहेत.*  ब्रह्मलोकात म्हणजे एखाद्या ग्रहावर काकुद्मी आणि रेवती *अंतराळ यानात बसून* गेल्याची शक्यता आहे.

H. G. Wells ह्या परदेशी व्यक्तीने The Time Machine नावाची कादंबरी इ. स. १८९५ मध्ये लिहिली होती. *सुमारास आईन्स्टाईन ह्यांनी सुद्धा time travel and theory of relativity असा सिद्धांत मांडला.* त्यांच्या सिद्धांतानुसार *एखाद्या व्यक्तीने जर अतिवेगाने, प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर तेथे काळ थांबतो.* त्याला time contraction असे म्हणतात. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करण्यासाठी अतिप्रचंड उर्जेची गरज असते. ह्या त्याच्या सिद्धांताला अनेक *शास्त्रज्ञांनी मान्यता* दिली आणि त्यावर इंग्रजी भाषेत चित्रपट सुद्धा निघाले. आता हा *सिद्धांत आईन्स्टाईन ह्या परदेशी शास्त्रज्ञाने सांगितल्यावर आपण त्याचा उदो उदो केला.* पण हीच गोष्ट *रूपकात्मक पद्धतीने आपल्याच श्रीमद्भागवत ग्रंथात लिहिली आहे हे आपणास माहिती नाही*. काकुद्मी आणि रेवती *दोघांनीही प्रकाशाच्या वेगाने, अतिवेगाने प्रवास केला असणार त्यामुळे त्या दोघांसाठी काळ थांबला.* परंतु, बाकीच्या जगासाठी मात्र काळ पुढे गेला असल्याने *सत्तावीस चतुर्युगांचे चक्र संपले* असे समजते. आधुनिक विज्ञानाने मांडलेल्या अनेक *सिद्धांताचा पाया, त्यांचे मूळ आपल्याच सनातन धर्मातील ग्रंथांत आहे असे आपल्या लक्षात येईल.*

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Sunday, 26 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४६ श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

 


🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १* 🌺


*श्रीमद्भागवत स्कंध ३ अध्याय ११*


🚩

चरमः सद्विशेषाणां अनेकोSसंयुतः सदा |

*परमाणुः* स विज्ञेयो नृणामैक्यभ्रमो यतः ||१ ||

🚩


पृथ्वीचा जो *सूक्ष्मतम अंश* आहे, ज्याचे आणखी *विभाग होऊ शकत नाहीत*, ज्याचा इतर परमाणूंबरोबर संयोग झालेला नाही त्याला *परमाणू* असे म्हणतात. 


वरील श्लोकाचे विवेचन पाहू. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्या कितीतरी शतके आधीच *महर्षी कणाद* ह्यांनी अणूचा शोध लावला अशी मान्यता आहे. 

त्यांच्याही कितीतरी शतके आधीच श्रीमद्भागवत ह्या ग्रंथात अणूची व्याख्या केलेली आपल्याला आढळते.  *पृथ्वीच्या सूक्ष्मतम, अविभाज्य अंशास अणू असे म्हणतात* अशी व्याख्या वरील श्लोकात आपल्याला आढळते. येथे पृथ्वीचा सूक्ष्मतम अंश म्हणजे *पदार्थाचा (matter) अंश* असा अर्थ घ्यायचा आहे. पृथ्वी ह्याचा अर्थ ग्रह असा नसून पदार्थ ( matter ) असा आहे. तो अजून *विभाजित करता येत नाही* म्हणजेच तो परमाणू आहे.


🚩

अणुर्द्वौ परमाणु स्यात् त्रसरेणुस्त्रयः स्मृतः |

*जालार्करश्म्यवगतः*  खमेवानुपतन्नगात् ||५||

🚩


दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो. म्हणजेच जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. 


 वरील श्लोकाचे विवेचन पाहू. 


श्लोक क्र. १ मध्ये आपण अणूची व्याख्या पाहिली आता रेणू म्हणजे काय ते समजून घेऊ. *दोन किंवा आधिक अणूंचा संयोग झाला की रेणू तयार होतो*. त्याला *त्रसरेणु* असे म्हणतात. ह्याचाच अर्थ दोन अणूंचा संयोग होण्यासाठी जी *रासायनिक प्रक्रिया* होते त्याचे ज्ञान त्या काळी भारतात अवगत होते. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा की मुळात *अणू, रेणू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत.* त्यांचा अभ्यास करण्यासाठी *सूक्ष्मदर्शक यंत्राचा (Microscope)* उपयोग करावा लागतो. ज्याअर्थी अणूपासून रेणू तयार होतो हे विधान श्रीमद्भागवत पुराणांत केले आहे त्याअर्थी त्या काळी अणूचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र असावे. तरच अणू, रेणू ह्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. *शिल्पभृगुसंहिता* ह्या ग्रंथात दुर्बिण कशी तयार करतात ह्याची माहिती आहे. माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये ह्यासंबंधीचे श्लोक आपण वाचले आहेत. *जर दुर्बीण तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत होते तर सूक्ष्मदर्शक यंत्र तयार करण्याचे तंत्रज्ञान सुद्धा निश्चितच माहिती असणार.* 


वरील श्लोक क्र. ५ मध्ये लिहिले आहे की अणूंच्या संयोगातून तयार झालेला रेणू झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. आता इथे अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. श्रीमद्भागवत पुराणांत म्हटले आहे की हा जो *रेणू आहे तो सूर्यप्रकाशात उडताना दिसतो.* आधुनिक विज्ञानानुसार सूर्यप्रकाशात दिसणाऱ्या *अणूला प्रकाशाणू (Photon )* असे म्हणतात. प्रकाशाणू हा *प्रकाशाचा अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेला एक कण अथवा पुंजकण* आहे. *बोसॉन* ह्या वर्गात त्याचे वर्गीकरण करता येते. 


*A photon is an elementary particle that is the quantum of the electromagnetic field, including electromagnetic radiation such as light and radio waves. Photons are massless and always move at the speed of light.*


Statistic : Bosonic 

Family : Gauge boson 


इंग्रजी भाषेत लिहलेले हे सर्व फोटॉनचे वर्णन भौतिकशास्त्र जाणाऱ्या, त्यात पदवी घेतलेल्या परदेशी वैज्ञानिकांनी लिहिलेले आहे. *फोटॉनची व्याख्या करण्याचा मान आईन्स्टाईन* ह्यांना जातो. 

श्रीमद्भागवत ग्रंथाचे जनक *महर्षी व्यास ह्यांनी साधारण इ.स.पू. ५००० किंवा त्याहून अधिक वर्षांपूवी अणू, रेणू, प्रकाशाणू ह्याचे संदर्भ त्यांच्या ग्रंथात दिले आहेत.* महर्षी व्यास हे पदार्थविज्ञान शास्त्रात पदवीधर नव्हते तरीसुद्धा ह्या *सर्व कणांचे अचूक वर्णन* त्यांनी लिहून ठेवले आहे. तरुण पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. 


आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो. 

श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया. 


🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १५ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ३

 

वेदविज्ञानरंजन - १५ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ३

ह्या आधीच्या  लेखामध्ये आपण पृथ्वीचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे ) , परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे ), दिवस- रात्र यांचे चक्र ह्याविषयी काही उदाहरणे पाहिली. आज आणखी काही उदाहरणे पाहू. 

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ३

श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ आणि अध्याय २१ मध्ये पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण त्यामुळे निर्माण होणारे दिवस रात्र यांचे चक्र तसेच अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची कल्पना ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. आपण सविस्तर पाहू.


एतेन हि दिवो मण्डलमानं तद्विद उपदिशन्ति

यथा द्विदलयोर्निष्पावादीनां ते अन्तरेणान्तरिक्षं

तदुभयसन्धितम् ॥ 

वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

तद्विदः हि एतेन यथा निष्पावादीनां द्विदलयोः (तथा) दिवः मंडलमानं उपदिशन्ति ते अन्तरेण तदुभयसंधितम् अन्तरिक्षं (अस्ति)|

तज्ञ लोक खरोखर ह्या भूमंडलप्रमाणावरून जसे पावटा वगैरेंच्या दोन पानांचे तसे स्वर्गाच्या वर्तुळाचे प्रमाणे सांगतात त्याच्या मध्ये त्या दोघांच्या सांध्यावर लागून ठेविलेले आकाश आहे. 

 येथे मंडलमानम् असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजेच ही पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीवरून दिसणारे आकाश सुद्धा आपल्याला गोल भासते आणि क्षितिजाला टेकलेले दिसते. 

यत्रोदेति तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति

यत्र क्वचन स्यन्देनाभितपति तस्य हैष

समानसूत्रनिपाते प्रस्वापयति तत्र गतं न पश्यन्ति

ये तं समनुपश्येरन् ||

वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

यत्र उदीत तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति एषः यत्र क्वचन स्यंदेन अभितपति तस्य ह समानसूत्रनिपाते प्रस्वापयति ये तं समनुपश्येरन् ते तत्र गतं न पश्यन्ति |

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ज्याठिकाणी उदयाला येतो, त्याच ठिकाणच्या सारख्या सुताच्या समोरील समांतररेषेत अस्ताला जातो, हा सूर्य ज्याठिकाणी कोठेतरी घाम येण्याइतक्या उन्हाने उष्ण प्रकाश देतो, त्याच्याच सारख्या सुताच्या समोरील समांतर रेषेत असणार्‍यांना गाढ झोपी नेतो, जे त्या सूर्याला स्वतःच्या प्रदेशात पहातात, ते समोरील समांतर रेषेतील मध्यरात्री झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात पहात नाहीत.

वरील श्लोकात पृथ्वीच्या गोलार्धाचे वर्णन केले आहे. ज्या गोलार्धात सूर्यप्रकाश असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात अंधार असतो. 

गोलार्ध म्हणजेच पृथ्वीचा अर्धा भाग. काल्पनिक रेषांनी पृथ्वीचे दोन भाग आधुनिक विज्ञानाने केले आहेत. अक्षवृत्त : उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, रेखावृत्त : पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. 

पृथ्वी गोल आहे आणि तिचे परिवलन आणि परिभ्रमण यांमुळे दिवस रात्र चक्र घडते ही क्रिया प्राचीन ऋषींना ज्ञात होती त्यांनी वरील श्लोकात समांतर सूत्र (म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त ह्यांचा) उल्लेख केला आहे. श्रीमद्भागवत हा आपल्या संस्कृतील अतिशय मान्यताप्राप्त आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळे त्यातील उल्लेखावर शंका घेण्याचे कारण नाही. पृथ्वी गोल असल्याने वेगवेगळ्या वेळी सूर्याची वेगवेगळी स्थिती दिसून येते ह्याची संपूर्ण माहिती भारतीय ऋषींना होती. श्रीमद्भागवत पुराणांत ह्याची सविस्तर माहिती दिली आहे. सर्व भागवत आचार्यांना माझी विनंती आहे की भागवतातील श्रीकृष्ण चरित्राबरोबरच इतर स्कंदांतील माहिती सुद्धा सांगावी म्हणजे आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातील वैज्ञानिक तत्वे शोधता येतील. 


वेदविज्ञानरंजन - ११ : पृथ्वी गोल आहे भाग - ३

 वेदविज्ञानरंजन - ११ : पृथ्वी गोल आहे भाग - ३

आजच्या भागात पृथ्वीसंबंधीत श्रीमद्भागवत ग्रंथातील काही वैशिष्ट्ये पाहू.

पृथ्वी गोल आहे - भाग ३

श्रीमद्भागवत पुराण स्कंध ५ - अध्याय २५ (श्रीसंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती ) (भूविवरविध्युपवर्णनम्) - श्लोक २ आणि श्लोक १२ 

श्लोक :२

यस्येदं क्षितिमण्डले भगवतोऽनन्तमूर्तेः

सहस्रशिरस एकस्मिन्नेव शीर्षणि ध्रियमाणं

सिद्धार्थ इव लक्ष्यते ॥ २ ॥

यस्य अनंतमूर्तेः सहस्रशिरसः भगवतः एकस्मिन् एव शीर्षणि ध्रियमाणं इदं क्षितिमंडलं सिद्धार्थः इव उपलक्ष्यते |ज्या असंख्यस्वरूपी हजारो मस्तके असणार्‍या शेषावतारी भगवंताच्या एकाच मस्तकावर धारण केलेले हे पृथ्वीमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे अगदी अल्पसे दिसते. ॥२॥

ह्या भगवान अनंताची (शेषाची ) एक हजार मस्तके आहेत. ह्यापैकी एका मस्तकावर ठेवलेले हे क्षितिमंडल (क्षिती =पृथ्वी ) पृथ्वीमंडल ( गोल पृथ्वी  ) मोहरीच्या दाण्याएवढी दिसते. (सिद्धार्थः इव उपलक्ष्यते) सिद्धार्थः म्हणजे अतिशय छोटा दाणा

मूर्धन्यर्पितमणुवत्सहस्रमूर्न्घो ।

भूगाेलं  सगिरिसरित्समुद्रसत्वम् || १२||

अन्वयार्थ :

सगिरिसरित्समुद्रसत्त्वं भूगोलं सहस्रमूर्ध्नः मूर्धनि अणुवत् अर्पितं सहस्रजिह्वः कः आनंत्यात् अनिमितविक्रमस्य भूम्नः वीर्याणि अधिगणयेत् |पर्वत, नद्या, समुद्र व प्राणी ह्यांसह भूगोल हजार फणांच्या शेषाच्या मस्तकावर अणूसारखा ठेवला आहे (तोलला आहे ) . इथे शेषावर पृथ्वी कशी काय आहे? अंतराळवीरांना तर शेष कुठेच दिसला नाही 😝 अशी टिंगल करण्यात येते. शेष शब्दाचा अर्थ नीट जाणून न घेतल्यामुळे झालेला हा गैरसमज आहे. तुम्हाला गणितातील निःशेष भागाकार ही संज्ञा माहिती असेल. भागाकार केल्यावर बाकी काहीच राहत नाही ती शून्य असते म्हणजेच शेष काही राहत नाही त्याला निःशेष भागाकार म्हणतात. ह्याचा अर्थ शेष म्हणजे उरलेले आणि निःशेष म्हणजे न उरलेले किंवा संपलेले. 

आता इथे शेष म्हणजे अंतराळ कारण आपल्या आकाशगंगेत ग्रह,नक्षत्र, तारे व्यापलेले आहेत. आणि जे काही उरलेले आहे म्हणजे शेष आहे ते म्हणजे अंतराळ, अंतरिक्ष. आपण नीट अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की आपल्या ब्रह्मांडांत अनेक आकाशगंगा आहेत. येथे सहस्रमूर्ध्नः हा शब्द अनेक  (हजारो )ह्या अर्थी योजला आले. आपण इंटरनेट वर आकाशगंगा (Galaxy ) पाहतो. त्यात आकाशगंगा सर्पिलाकृती म्हणजे सापाच्या आकृतीसारख्या दिसतात. वेटोळे घातलेला साप आहे असा भास होतो. हबल ह्या दूर्बिणीद्वारे नासाने आकाशगंगांची छायाचित्रे टिपली आहेत. आपले आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की अनेक आकाशगंगा आहेत. अंतराळात हा भूगोल म्हणजे पृथ्वी अगदी अणू एव्हढी आहे. ह्याचा अर्थ अणू ही संकल्पना भारतीयांना कणाद ऋषींच्या आधीपासून ज्ञात होती. कणाद ऋषींनी अणूवर विस्तृत भाष्य केले आहे ते पुढे कधीतरी पाहूच.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १० मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने आणि इतर स्कंध त्यामानाने दुर्लक्षित असल्याने इतर स्कंधांतील भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही.  माझी सर्व आचार्यांना विनंती आहेत की भागवत सप्ताहात श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत. 

पहा किती विचार केला आहे आपल्या ऋषींनी!  अतिप्रचंड विस्तार असलेल्या ह्या ब्रह्मांडातील एक भूगोल हा अगदी छोट्या कणा एवढा म्हणजेच अणूएवढाच दिसतो. इथे हा भूगोल तोलला आहे म्हणजे balance केलेला आहे कारण पृथ्वीचे स्वतःचे गुरूत्वबल, सूर्याचे आणि इतर ग्रहांचे पृथ्वीवर असणारे आकर्षण बल यांचा तोल (balance) साधून पृथ्वी शेषावर (अंतराळात ) परिभ्रमण करीत आहे. माझा हा लेख वाचून तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ती गोष्ट आपल्या प्राचीन ग्रंथांत लिहिली आहे.ह्यापुढे जर कोणीही पृथ्वीचा भार शेषावर आहे ह्यासंदर्भात हेटाळणी केली तर त्याला सडेतोड उत्तर द्या. 

एव्हढा स्पष्ट दाखला श्रीमद्भागवत पुराणांत देऊन सुद्धा आपल्याकडील विद्वान शास्त्रज्ञांच्या मनात ह्यावर अधिक संशोधन करावे असे येत नाही का? आपण असे किती दिवस  पाश्चात्य वैज्ञानिकांचे गोडवे गाण्यात धन्यता मानणार आहोत? असो. ह्यापुढे तरी आपल्या धर्मग्रंथांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करावा ही नम्र विनंती. 


🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - १० : पृथ्वी गोल आहे - भाग २

 वेदविज्ञानरंजन - १० : पृथ्वी गोल आहे - भाग २

ह्या भागात श्रीमद्भागवत पुराणांतील ह्या संबंधीचे वर्णन पाहू.

पृथ्वी गोल आहे - भाग २ 

श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ - अध्याय १६ (भुवनकोशवर्णनम् ) - श्लोक १, श्लोक ४ आणि श्लोक ५ मध्ये  पृथ्वी गोल आहे असे ठाम मत व्यक्त केले आहे.

श्लोक : १

उक्तस्त्वया *भूमण्डलायामविशेषो* यावदा-
दित्यस्तपति यत्र चासौ ज्योतिषां गणैश्चन्द्रमा वा
सहदृश्यते ॥ १ ॥


ह्याचा अन्वयार्थ पाहू :

यावत् आदित्यः तपति च यत्र असौ चन्द्रमाः ज्योतिषां गणैः सह वा दृश्यते भूमण्डलायामविशेषः त्वया उक्तः|

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

जितक्या दूरपर्यंत सूर्य प्रकाशतो आणि जेथे हा चंद्र नक्षत्रांच्या समूहांसह दिसतो भूमंडळाच्या लांबीरुंदीचा विशिष्ट विस्तार तुझ्याकडून सांगितला गेला. ॥१॥

श्लोक :४

न वै महाराज भगवतो मायागुणविभूतेः काष्ठां
मनसा वचसा वाधिगन्तुमलं विबुधायुषापि
पुरुषस्तस्मात्प्राधान्येनैव भूगोलकविशेषं
नामरूपमानलक्षणतो व्याख्यास्यामः ॥ ४ ॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

महाराज पुरुषः भगवतः मायागुणविभूतेः काष्ठां मनसा वा वचसा वै अधिगन्तुं विबुधायुषा अपि न अलं तस्मात् प्राधान्येन एव भूगोलकविशेषं नामरूपमानलक्षणतः व्याख्यास्यामः |

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

हे परीक्षित राजा! पुरुष परमेश्वराच्या मायेच्या गुणांच्या सामर्थ्याच्या अंताला मनाने किंवा वाणीने खरोखर जाणण्यास देवांच्या आयुष्याइतक्या काळानेहि समर्थ नाही तरीहि मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच भूमंडलाचे ( भूगोलकविशेषम् ) विशेष वर्णन नावे, स्वरूपे, प्रमाण व लक्षणे ह्यांच्या योगाने आम्ही सांगतो. ॥४॥

श्लोक :५
यो वायं द्वीपः कुवलयकमलकोशाभ्यन्तरकोशो
नियुतयोजनविशालः समवर्तुलो यथा पुष्करपत्रम् ॥ ५ ॥


ह्याचा अन्वयार्थ पाहू :

यः वा अयं द्वीपः कुवलयकोशाभ्यन्तरकोशः नियुतयोजनविशालः यथा पुष्करपत्रं समवर्तुलः ||५ ||

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

जे खरोखर हे द्वीप भूमंडळरूपी  कमळाच्या आतील गाभ्याच्या घेरातील एक घेरच असे एक लक्ष योजने विस्ताराचे कमळाच्या पानाप्रमाणे सारखे वेटोळे ॥५॥

येथे भूगोल, समवर्तुळ असे शब्द योजले आहेत. त्यावरून पृथ्वी गोल होती हे त्याकाळी निश्चित ज्ञात होते हे लक्षात येते. पुढचा मुद्दा असा की त्या काळात एव्हढे प्रचंड ज्ञान कसे मिळविले? एक म्हणजे वेदकालीन विमानांमध्ये बसून (अंतराळात जाऊन ) त्यांनी पृथ्वीचे अवलोकन केले असणार किंवा योगबळाने हे सर्व ज्ञान ऋषींना प्राप्त झाले असणार. काहीतरी एक विधान मान्य करावेच लागेल. पृथ्वी गोल आहे ही केवळ कल्पना नाही किंवा ऋषींचा वेळ जात नव्हता म्हणून काहीतरी लिहिले असावे असे मानणे  हे चुकीचे आहे. ह्याच स्कंधातील पुढील श्लोकांत पृथ्वीवरील सात खंड, सात समुद्र ह्यांची अगदी लांबीरूंदीसहित माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी मूळ श्रीमद्भागवत आवर्जून वाचावे.

श्रीमद्भागवत पुराणातील अजून एक उदाहरण पाहू :

स्कंद ५ - अध्याय २५ (श्रीसंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती ) (भूविवरविध्युपवर्णनम्) - श्लोक १ मध्ये पृथ्वीच्या भूगर्भातील आकर्षण शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे रुपकात्मक वर्णन केले आहे. त्याकाळी सृष्टीतील तत्त्वांना देवतांची रूपके देण्याची पद्धत होती. खालील श्लोकात संकर्षण देवता म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती हिचे वर्णन आढळते.

श्लोक :१

तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरआस्ते या
वै कला भगवतस्तामसी समाख्याताऽनन्त इति
सात्वतीया द्रष्ट्टदृश्ययोःसङ्कर्षणमहमित्यभिमान-
लक्षणं यं सङ्कर्षणमित्याचक्षते ॥ १ ॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरे भगवतः या वै तामसी कला आस्ते सा अनंतः इति समाख्याता सात्वतीयाः यं संकर्षणं अहं इति अभिमानलक्षणं संकर्षणं इति आचक्षते |

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

त्या पाताळाच्या मूलप्रदेशी तीस योजने अंतरावर परमेश्वराची जी खरोखर तमोगुणी कला आहे, ती अनंत अशा नावाने प्रसिद्ध आहे, सात्विक तंत्रमार्गे जाणारे भगवद्‍भक्त ज्या अनंताला आकर्षण करणारा असा आहे, ‘मी आहे’ असा अभिमान आहे लक्षण ज्याचे असा संकर्षण असे म्हणतात. ॥१॥

इथे ऋषी सांगतात की पाताळाच्या खाली दूरवर पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे तिथे जी शक्ती आहे (तामसी कला ) ती पृथ्वीवरील वस्तूंचे संकर्षण करते म्हणजेच त्यांना आकर्षून घेते.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १० मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही. माझी सर्व आचार्यांना विनंती आहे की भागवत सप्ताहात श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत. आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...