माझा परिचय

Showing posts with label आर्यभट्ट. Show all posts
Showing posts with label आर्यभट्ट. Show all posts

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - ९ : पृथ्वी गोल आहे - भाग १

 वेदविज्ञानरंजन - ९ : पृथ्वी गोल आहे - भाग १ 

 पृथ्वी गोल आहे - भाग १

भूगोलाच्या किंवा विज्ञानाच्या पुस्तकात पृथ्वी गोल आहे (भू- गोल) असा सिद्धांत मांडून तो विद्यार्थ्यांना शिकविला जातो. त्यासाठी नेहमीप्रमाणे ह्या सिद्धांताचे श्रेय पाश्चात्य शास्त्रज्ञांना देऊन आपण मोकळे होतो. आपल्या प्राचीन ग्रंथांची हेटाळणी करणाऱ्यांची टीका अशी आहे की पृथ्वी चपटी आहे असे भारताचे ज्ञान आहे. ह्याचे खंडन करण्यासाठी खालील उदाहरणे पाहू.

आता आपण थोर भारतीय गणिती आर्यभट्ट ( कार्यकाळ अंदाजे इ. स. ४७६ ते  इ. स. ५५०) यांनी पृथ्वी गोल आहे ह्याचे कसे प्रतिपादन केले आहे ते पाहू

वृत्तपंजरमध्ये कक्ष्या परिवेष्टित: खगमध्यगतः । मृञ्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः 

वर्तुळाकार अशा, नक्षत्रांच्या पिंजऱ्यात ( म्हणजेच नक्षत्रांनी बनलेल्या खगोलाच्या ) मध्यभागी, ( ग्रहांच्या ) कक्षांनी परिवेष्टित अशी पृथ्वी आकाशमध्यावर आहे. तसेच माती, पाणी, तेज व वायू यांनी बनलेला हा भूगोल ( पृथ्वीरूपी गोल ) सर्व बाजूंनी गोल (वृत्तः) आहे.

अनुलोमगतिर्नौस्थः पश्यत्यचलं विलोमगं यद्वत्।

अचलानि भानि तद्वत् समपश्चिमगानि लंकायाम्।।  (आर्यभटीय, गोलपाद, श्लोक ९)

नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाणाऱ्या नावेवरील माणसास ज्याप्रमाणे काठावरील डोंगर, टेकडी किंवा स्थिर वस्तू प्रवाहाच्या उलट दिशेने मागे जात आहेत असे वाटते. त्याचप्रमाणे लंकेतील ( विषुववृत्तावरील ) मनुष्यास नक्षत्रे स्थिर असूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे सारख्याच गतीने जात आहेत असे वाटते. (पृथ्वीचे परिवलन - परिभ्रमण )

अशाप्रकारे पृथ्वी गोल आहे ह्याची अनेक उदाहरणे आपल्या पुरातन, प्राचीन वाङ्मयात सापडतात परंतु, आपण पृथ्वी गोल आहे ह्याचे श्रेय मात्र निकोलस कोपर्निकस  (कार्यकाळ : १९ फेब्रुवारी इ. स. १४७३ - २४ मे इ. स. १५४३) ह्या शास्त्रज्ञाला दिले. शालेय भूगोलाच्या पुस्तकात हेच  शिकविले जाते.

कोपर्निकस आणि गॅलिलिओ ह्यांनी हा सिद्धांत मांडला तेव्हा चर्चने त्यांना दोषी ठरविले कारण बायबल मध्ये सांगितले आहे की पृथ्वी गोल नाही आणि ती स्थिर असून इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात.  म्हणजे १४ शे १५ शे सालापर्यंत परदेशाला काही माहिती नव्हते. परंतु आपल्याकडे त्या आधीच १००० वर्षे हे माहिती होते. मग आता मला सांगा की पाश्चात्य संस्कृती मागास होती की आपली वैदिक संस्कृती मागास होती?  हे सर्व माहीत असून सुद्धा पाठ्यपुस्तकात खरी माहिती ठेवायला आपले सरकार तयार नाही? सगळीकडे हिंदुत्व आड येते???

आपलेच सिद्धांत जेव्हा परदेशी माणूस आपल्याला सांगतो तेव्हाच आपल्याला पटते ही आपली शोकांतिका आहे. इंग्रजांनी त्यांची ख्रिश्चन संस्कृती, त्यांची शिक्षण प्रणाली आपल्यावर लादली के मान्य आहे. परंतु, स्वातंत्र्याची ७५ वर्षे होऊन सुद्धा आपल्या संस्कृतीचा प्रसार होत नाही हे दुर्दैव  आहे. भारतीय विज्ञान शिक्षण मंडळाला पृथ्वी गोल आहे ह्याचा शोध पुरातन वेदांमध्ये, आणि प्राचीन ग्रंथांत शोधावे असे कधीच वाटले नाही का?? निदान आता तरी सरकारने ह्यात लक्ष घालावे आणि *विज्ञान, भूगोल ह्याच्या पाठ्यपुस्तकात पृथ्वी गोल आहे ह्या सिद्धांताच्या उदाहरणांचा समावेश करावा ही नम्र विनंती. सर्व पालकांना, शिक्षकांनाही नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ह्याची माहिती जरूर द्यावी.


🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


 


 


Monday, 19 December 2022

वेदविज्ञानरंजन- ४

 वेदविज्ञानरंजन_४

वेदविज्ञानरंजन_३ ह्या माझ्या मागील लेखात  आपण थोर भारतीय गणिती आर्यभट्ट

याने मांडलेली Pi संकल्पना पहिली. आता अजून काही श्लोक, सूत्रे पाहू ज्याच्यातून कदाचित

Pi (पाय ) चे मूल्य सापडू शकते.

खालील कटपयादि सूत्र समजावून घेण्याचा प्रयत्न करू.

कादि नव टादि नव पादि पञ्चक यद्यशष्टक क्षः शून्यम् 

कादि नव म्हणजे क पासून सुरू होणारी नऊ अक्षरे आणि त्यांच्या संख्या

क (1) ख (2) ग (3) घ (4) ङ (5) च (6) छ (7) ज (8) झ (9)

टादि नव म्हणजे ट पासून सुरू होणारी नऊ अक्षरे आणि त्यांच्या संख्या

ट (1) ठ (2) ड (3) ढ (4) ण (5) त (6) थ (7) द (8) ध (9)

पादि पञ्चक म्हणजे प अक्षरापासून सुरू होणारी पाच अक्षरे आणि त्यांच्या संख्या

प (1) फ (2) ब (3) भ (4) म (5)

यद्यशष्टक म्हणजे य पासून पुढील आठ अक्षरे आणि त्याच्या संख्या

य (1) र (2) ल (3) व(4) श(5) ष(6) स (7)  ह (8)

क्षः शून्यम् म्हणजे क्ष(0)

न (0)

ह्याला व्यंजन कूटांक असे म्हणतात.

कटपयवर्गभवैरिह पिन्डान्त्यैरक्षरैरंकाः

नञि च शून्यं श्रेयं तथा स्वरे केवले कथिताम् 

ह्यामध्ये स्वरांसाठी (अ, आ, इ.) अनुस्वारांसाठी, मात्रांसाठी, जोडाक्षरांसाठी  आणि न

व्यंजनासाठी 0 ( शून्य ) ही संख्या योजली आहे.

खालील श्लोकात आपण व्यंजन कूटांक पद्धतीचा विचार करु.

गोवर्धन पीठ, जगन्नाथ पुरी येथील 143 वे शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थ ऱ्यांनी

खालील श्लोकात पाय चे मूल्य सांगितले आहे.

आता भगवान श्रीकृष्णांची स्तुती करणारा पुढील श्लोक पाहू


गोपीभाग्य मधुव्रात शृंगिशोदधिसंधिगः |

खलजीवितखाताव गलहालारसंधर || 

ह्याचा अर्थ पाहू:

हे कृष्णा! तू गोपींचे भाग्य आहेस, मधु राक्षसाचा वध करणारा आहेस, तू पशूंचा रक्षक

असून तू समुद्राची खोली मोजली आहेस. तू दुर्जनांचा नाशक असून खांद्यावर नांगर घेतला

आहेस आणि अमृत धारण केले आहेस, तू आमचे रक्षण कर

वरील श्लोकात श्रीकृष्णांचे वर्णन जरी असले तरी Pi ची संख्या सूत्र रूपाने दडली आहे.

सर्वांत वर दिलेल्या कटपयादि सूत्राने ती संख्या पाहू.

वरील श्लोकातील एकेक अक्षरांपुढे त्याची संख्या ठेवू

गोपीभाग्य = ग (3) प(1) भ(4) य(1)

मधुव्रातः = म(5) धु(9) रा(2) त(6)

ह्याप्रमाणे वरील श्लोकातील एकेक अक्षर आणि त्याची संख्या क्रमाने मांडली असता आणि

पहिल्या अंकानंतर दशांश चिन्ह दिल्यास Pi ची संख्या मिळते.

Pi = 3.141596......

चंद्रांशु चंद्रा धमकुंभिपाला |

आनूननुन्ननन नुन्न नित्यम् ||

परीघ = चंद्रांशु चंद्रा धमकुंभिपाला

            625   62  941413 

व्यास = आनूननुन्ननन नुन्न नित्यम्

             0000000   00  01

येथे 1 हा अंक य ह्या व्यंजनासाठी वापरण्यात आला आहे

अंकानां वामतो गतिः ह्या नियमाप्रमाणे अंक डावीकडून (अंक वाचणार्‍यांच्या ) उजवीकडे

वाचावेत. त्यामुळे

पाय = परीघ / व्यास

पाय = 31414926526/10000000000

पाय = 3.1414926526

वैदिक गणितानुसार आपल्याला पाय चे मूल्य मिळते.


वरील व्यंजन कूटांकाला अनुसरून अजून एक उदाहरण पाहू

लेखातहे:

भद्राम्बुद्धिसिद्धजन्मगणितश्रद्धा स्म यद् भूपगी:

भ (4) द्रा (2) म्बु (3) धी (9) सी (7)

द्ध (9) ज (8)  न्म (5) ग (3) नी (5) त (3)

श्र (2) द्धा (9) स्म (5) यद् (1) भू (4) पा (1) गीः (3)

पुन्हा एकदा अंकानां वामतो गतिः या सूत्राप्रमाणे हे अंक डावीकडून उजवीकडे ठेवल्यास

पाय ची संख्या मिळेल

पाय = 3.141592...

वेदकाळापासून सिद्धांताची मांडणी सूत्रबद्धतेने केली असल्याने त्याचे महत्व शोधून लागावे

लागते. त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. भारतावर झालेली अनेक परकीय आक्रमणे,

नालंदा सारख्या विद्यापीठांची झालेली अपरिमित हानी यामुळे हे सर्व ज्ञान काळाच्या

उदरात लुप्त झाले आणि त्याचे सर्व श्रेय आता पाश्चिमात्य विद्वान घेतात आणि आपण आणि

आपले सरकार त्यांचे गोडवे गाण्यात धन्यता मानते ही खरी शोकांतिका आहे. शाळेच्या

अभ्यासक्रमात वैदिक गणित आणि प्राचीन भारतीय गणितीय सूत्रे यांचा समावेश नसल्याने

विद्यार्थ्यांना ह्याची माहिती होत नाही आणि ज्ञानाचा प्रसार होत नाही. माझी सर्व

शिक्षकांना आणि सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून शालेय

अभ्यासक्रमात समाविष्ट करून घ्यावे.

वेदविज्ञानरंजन - ३ गणितातील एक स्थिरांक पाय (CONSTANT NUMBER - Pi)

 #वेदविज्ञानरंजन_३

आजच्या भागात आपण गणितातील एक स्थिरांक (CONSTANT NUMBER) पाय

ह्याची माहिती घेऊ.

प्राचीन थोर भारतीय गणिती आर्यभट्ट ह्याने सर्वप्रथम पाय ची संकल्पना मांडली.

त्याने लिहिलेला श्लोक खालील प्रमाणे आहे.

 चतुराधिकम् शतमष्टगुणम् द्वाषष्टिः तथा सहस्राणाम्

अयुतद्वयविष्कम्भस्य आसन्नः वृत्तपरिणाहः 

आता ह्या श्लोकाचा सोपा अर्थ पाहू :

चतुराधिकम् शतम् म्हणजे १०० मध्ये ४ मिळवा. अष्टगुणम् आलेल्या संख्येला ८ ने गुणा.

त्या संख्येत द्वाषष्टिः तथा सहस्राणाम् म्हणजे ६२००० मिळवा. जी संख्या तयार होईल

त्याला अयुतद्वय म्हणजे २०००० संख्येने भागा. भागाकार करून जे उत्तर येईल ती संख्या

म्हणजे पाय चे approximate उत्तर आहे. वरील श्लोकात विष्कम्भ ह्याचा अर्थ वर्तुळाचा

व्यास  असा आहे. अयुतद्वयविष्कम्भस्य म्हणजे वर्तुळाचा व्यास २०,०००  आहे आणि

approximate ह्या शब्दासाठी आसन्नः  असा शब्द योजला आहे.

आर्यभट्ट ह्याने कितीतरी अचूक मूल्य दिले आहे हे पहा. त्यावरून भारतीय विद्वानांच्या

ज्ञानाचा खूप अभिमान वाटतो.

पाय = वर्तुळाचा परीघ / वर्तुळाचा व्यास

पाय = (१०० +४) *८ +६२०००/२००००

पाय =३.१४१६

वरील श्लोकाचा अर्थ आपण इंग्लिश भाषेत पाहू.

Add 4 to 100 multiply by 8 and add 62000 this is approximately

circumference of the circle whose diameter is 20,000

Pi = circumference / diameter

Circumference: (100 +4) *8 +62000 =62832

Diameter: 20000

Pi =62832 / 20000

Pi = 3.1416 (approximately)

It’s remarkable that Aryabhatta mentioned that the value of Pi is

approximately calculated


आता महान भारतीय गणिती आर्यभट्ट ह्याने इसवी सन पूर्व पाचव्या - सहाव्या शतकापूर्वी

इतका स्पष्ट सिद्धांत मांडून सुद्धा Pi ह्या स्थिरांकाचे (CONSTANT NUMBER) श्रेय

मात्र William Jones (year 1706)  ह्या विदेशी गणितज्ञाला (  Mathematician )

दिले जाते हीच आपली शोकांतिका आहे.

माझी सरकारला तसेच सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना गणित

शिकवतांना ही सर्व माहिती द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय विद्वान

गणितज्ञांची माहिती होईल.

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...