माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७९

#वेदविज्ञानरंजन_७९

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३*

समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. ह्यातील यंत्रार्णव अध्यायातील खालील श्लोक पाहूया.
🚩
*दंडैश्चक्रैच दंतैश्च सरणिभ्रमणादिभि: |*
शक्तेरूत्पांदनं किं वा चालानं *यंत्रमुच्यते* ॥
🚩

दंड- Lever , चक्र- Pulley, दंत- toothed wheel, सरणि- inclined plane, भ्रमण- Screw ‌
ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता शक्ती निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी असते. म्हणजेच, दंड, चक्र, दंत, सरणि, भ्रमण ह्यांच्या मदतीने शक्तीचे उत्पादन होते आणि गती प्राप्त होते.

ह्या यंत्रांची गती कश्या प्रकारे असावी ह्याचे वर्णन पुढील श्लोकात केले आहे :

🚩
*तिर्यगूर्ध्वंमध: पृष्ठे पुरत: पार्श्वयोरपि |*
*गमनं सरणं पात इति भेदा: क्रियोद्भवा:॥*
🚩

(१) तिर्यग्‌- slanting (२) ऊर्ध्व upwards (३) अध:- downwards (४) पृष्ठे- backwards (५) पुरत:-forward (६) पार्श्वयो:- sideways

वरील श्लोकात गतीचे विविध प्रकार वर्णिले आहेत. तिरकी, उर्ध्वगामी, अधोगामी, पुढे जाणारी, मागे जाणारी, बाजूला वळणारी अश्याप्रकारे गतीची दिशा सांगितली आहे. ह्यावरून प्राचीन भारतात भौतिकशास्त्र किती प्रगत होते ह्याची कल्पना येते.

*जलविद्युत निर्माण करण्यासाठी उपयोगात येणारे यंत्र (जनित्र )* ह्याचा उल्लेख भोजराजा ह्याच्या *समरांगण सूत्रधार* ह्या ग्रंथात आहे
🚩
धारा च जलभारश्च पयसो भ्रमणं तथा॥
यथोच्छ्रायो यथाधिक्यं यथा नीरंध्रतापि च।
एवमादीनि भूजस्य जलजानि प्रचक्षते॥
🚩

वाहणाऱ्या, प्रवाहित जलधारेचा उपयोग म्हणजे त्यातील शक्तीचा उपयोग *जलविद्युत* निर्माण करण्यासाठी होतो. ह्या जलधारेच्या वेगामुळे चक्र फिरते. ही जलधारा उंचावरून पडणारी असेल (धबधबा ) तर तिचा वेग अधिक असतो आणि त्यामुळे जनित्र फिरते आणि त्यातून *शक्ती* (विजेची ) निर्मिती होते.

अशाप्रकारचे अतिशय आधुनिक तंत्रज्ञान प्राचीन भारतात अवगत होते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७८

#वेदविज्ञानरंजन_७८

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - २*

वाल्मीकी रामायणातील युद्धकांडात रावणाच्या लंकेतील विविध अद्ययावत यंत्रांचा उल्लेख केला आहे.

द्वारेषु तासां चत्वारः सङ्‌क्रमाः परमायताः ।
*यंत्रैरुपेता* बहुभिः महद्‌भिः गृहपंक्तिभिः ॥ १६ ॥

उक्त चारी दरवाजांच्या समोर त्या खदंकावर मचाणांच्या रूपात चार संक्रम ॥*॥ (लाकडाचे पूल) आहेत जे फारच विस्तृत आहेत त्यावर बरीचशी मोठ मोठी यंत्रे लावलेली आहेत आणि त्यांच्या आसपास परकोटावर बनविलेल्या घरांच्या रांगा आहेत. ॥१६॥
(॥*॥- संक्रम : असे कळून येत आहे की संक्रम अशा प्रकारचे पूल होते की ज्यांना जेव्हां आवश्यकता असेल तेव्हा यंत्रांच्या द्वारा खाली पाडले जात असे, म्हणूनच शत्रूची सेना आल्यावर तिला खंदकात पाडण्याची योजना होती.

शत्रुसैन्य पुलावर आले की मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने तो पूल पाडला जात असे. ह्या पुलाखाली पाण्याने भरलेले प्रचंड मोठे खंदक होते. साहजिकच शत्रुसैन्य खंदकात पडून बुडून जात असे. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी की सर्वांत आधी चाल करून येणारे शत्रुसैन्य उभे राहू शकेल इतका *बळकट पूल* निर्माण करायला हवा. म्हणजेच पूल तयार करण्याचे तंत्र अवगत हवे. त्यानंतर असा दणकट पूल पाडण्यासाठी तितकेच *मजबूत यंत्रही हवे.* ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान *त्रेतायुगात अवगत होते* हे निश्चित आश्चर्य वाटणारे आहे.

त्रायन्ते सङ्‌क्रमास्तत्र परसैन्यागते सति ।
*यंत्रै* स्तैरवकीर्यन्ते परिखासु समन्ततः ॥ १७ ॥

जेव्हा शत्रूची सेना येते, तेव्हा यंत्रांच्या द्वारा त्या संक्रमांचे रक्षण केले जाते तसेच त्या यंत्रांच्या द्वाराच त्यांना सर्व बाजूनी खंदकात पाडले जाते आणि तेथे पोहोचलेल्या शत्रूसेनेला सर्व बाजूस फेकून दिले जाते. ॥

परिखाश्च शतघ्न्यश्च *यंत्राणि विविधानि* च ।
शोभयन्ति पुरीं लङ्‌कां रावणस्य दुरात्मनः ॥ २३ ॥

खंदक, शताघ्नि आणि *तर्‍हेतर्‍हेची यंत्रे* दुरात्मा रावणाच्या त्या लंकानगरीची शोभा वाढवीत आहेत. ॥२३॥

वरील श्लोकात पुन्हा एकदा विविध प्रकारच्या यंत्रांचा उल्लेख केला आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७७

#वेदविज्ञानरंजन_७७

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - १*

वाल्मीकी रामायण बालकांड, सर्ग क्र. ५ मध्ये अयोध्यापुरीच्या संपन्नतेचे वर्णन केले आहे. त्यात अयोधायापुरीत अनेक प्रकारची यंत्रे होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्या संबंधी श्लोक खालीलप्रमाणे आहे.

🚩 कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
*सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभिः ॥ १० ॥* 🚩

अयोध्यापुरी पुरी मोठमोठ्या फाटकांनी आणि तोरणांनी सुशोभित झालेली होती. तिच्यामध्ये पृथक् पृथक् बाजार होते. तेथे *सर्व प्रकारची यंत्रे* आणि अस्त्र शस्त्र संचित केलेली होती. त्या पुरीत सर्व कलांचे शिल्पी निवास करीत होते. ॥ १०

ह्या अयोध्या नगरीत अतिशय संपन्नता होती आणि सर्व कलांचे शिल्पी म्हणजे तंत्रज्ञ, अभियंते निवास करीत होते. ह्याचा अर्थ अभियांत्रिकीच्या विविध शाखा त्रेतायुगात सुद्धा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. विविध प्रकारची यंत्रे होती म्हणजे यंत्रशास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते.

वाल्मीकी रामायण युद्धकांड, सर्ग क्र. २० मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य *यंत्रैः* परिवहन्ति च ॥ ६० ॥🚩

महाकाय महाबलाढ्‍य वानर हत्तींप्रमाणे मोठ मोठ्‍या शिळा आणि पर्वतांना उपटून *यंत्रांच्या द्वारा* (विशिष्ट साधनांच्या द्वारा) समुद्रतटावर घेऊन येत होते.

समुद्र सेतू बांधतानाचे हे वर्णन आहे. महाकाय वृक्ष, प्रचंड मोठ्या शिळा एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा समुद्रात आणण्यासाठी मोठ्या मोठ्या *यंत्रांचा उपयोग* होत असे असे प्रस्तुत श्लोकावरून स्पष्ट होते. आता ही यंत्रे म्हणजे जे. सी. बी. किंवा क्रेन सारखी यंत्रे असावीत कारण महाकाय वृक्ष आणि शिलाखंड उचलून समुद्रतटावर आणण्यासाठी तितकीच *मजबूत यंत्रे* हवीत.

वाल्मीकी रामायण, युद्धकांड सर्ग ४ मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
*तत्रेषूपलयन्त्राणि बलवन्ति महान्ति च ।*
*आगतं परसैन्यं तु तैः तत्र प्रतिनिवार्यते ॥ १२ ॥*🚩

त्या दरवाजांवर मोठी विशाल आणि *प्रबळ यंत्रे* लावलेली आहेत, जी तीर आणि दगडांच्या गोळ्यांची वृष्टि करतात. त्यांच्या द्वारा आक्रमण करणार्‍या शत्रुसैन्याला पुढे येण्यापासून अडविले जाते.

समुद्रावरील सेतू पार करून सर्व वानरसेनेसहित प्रभू श्रीरामचंद्र लंकेत प्रवेश करतात. त्यावेळी हनुमान लंकेच्या युद्धसज्जतेचे वर्णन करतात. *लंकेच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठी यंत्रे लावली आहेत* जी दगडांचा वर्षाव करतात. आता गोळ्यांचा वर्षाव करणारी यंत्रे म्हणजे तोफा किंवा तत्सम यंत्रे. आजच्या भाषेत आपण AK 47 ह्या बंदूकीतून बर्‍याच गोळ्या मारू शकतो. अशाप्रकारची यंत्रे रावणाकडे होती. आता अशाप्रकारची यंत्रे तयार करण्यासाठी आवश्यक ज्ञान नक्कीच रावणाकडे असणार.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७६

#वेदविज्ञानरंजन_७६

*रसायनशास्त्र विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा लेख जरूर पाठवावा ही नम्र विनंती.*

*प्राचीन भारतीय रसायनशास्त्र भाग - २*

आजच्या भागात आपण प्राचीन भारतीय
रसायनशास्त्राची माहिती घेणार आहोत.

🚩 *तीर्यक्पतन यंत्र* 🚩

🚩
क्षिपेद्रसं घटे दीर्घे नताधोनालसंयुते |
तन्नालं निक्षिपेदन्यघटकुक्ष्यन्तरे खलु ||
तत्र रुद्ध्वा मृदा सम्यग्वदने घटयेरथः |
अधस्ताद्रसकुम्बस्य ज्वालयेत्तीव्रपावकम् ||
इतरस्मिन्घटे तोयं प्रक्षिपेत्स्वादुशीतलम् |
तिर्यक्पातनमेथद्धि वार्तिकैरभिधीयते ||
🚩

*क्षिपेद्रसं घटे दीर्घे नताधोनालसंयुते |*

एक रसायन (ज्यातील घटक वेगळे करायचे आहेत असे रसायन) एका घटात (मळ्यात, भांड्यात ) ठेवा. त्या घटाला एक *अधोमुखी नळी* बसवा (जी जमिनीच्या दिशेने झुकलेली आहे )

*तन्नालं निक्षिपेदन्यघटकुक्ष्यन्तरे खलु ||*

*त्या नळीचे दुसरे टोक खाली जमिनीवर ठेवलेल्या एका घटाला जोडा.*

*तत्र रुद्ध्वा मृदा सम्यग्वदने घटयेरथः |*

*ती नळी आणि दोन घट यांचे जोड मातीने आणि कापडाने घट्ट बांधा*.

*अधस्ताद्रसकुम्बस्य ज्वालयेत्तीव्रपावकम् ||*

*ज्या घटात रसायन ठेवले आहे त्या घटाखाली अग्नी प्रज्वलित करा.*

*दुसरा घट जो जमिनीवर ठेवला आहे (ज्याला अधोमुखी नळी जोडली आहे ) त्यावर थंड पाणी टाका.*

*तिर्यक्पातनमेथद्धि वार्तिकैरभिधीयते ||*

ह्या यंत्राला *तिर्रक्पतन यंत्र* असे म्हणतात आणि त्याचा उपयोग *ऊध्वपतन पद्धतीने (distillation ) रसायनातील घटक वेगळे करण्यासाठी होतो.*

ज्यांच्या तापमानामध्ये बरेच अंतर असते अशाच घटकांचे ऊर्ध्वपातन करून त्यांना वेगळे करता येते. या पद्धतीने गुलाबाच्या फुलातील सुगंधी द्रव्य मिळविता येते, मद्यार्क (अल्कोहॉले) तयार करता येतात, सांडपाण्यापासून शुद्ध पाणी मिळवता येते व खनिज तेलापासून पेट्रोल मिळवता येते. औद्योगिक क्षेत्रात ही प्रक्रिया अनेक ठिकाणी उपयोगी पडते. लहान प्रमाणात करावयाचे ऊर्ध्वपातन गट पद्धतीने करतात.

यामध्ये एखाद्या हंड्यासारख्या भांड्यात, पाण्यात कालविलेले घन पदार्थाचे घटक भरतात व ते भांडे शेगडीवर ठेवून मंद आगीने तापवतात. भांड्यातील पाणी तापून वाफ उत्पन्न होते व पाण्यात कालविलेल्या घटकांतील सहज *बाष्पनशील* (बाष्प होऊन उडून जाणारे) घटक बाहेर पडून वाफेत मिसळतात. ही वाफ भांड्याच्या तोंडावर बसवलेल्या नळीवाटे एका *संघनकात* (वाफ थंड करण्यासाठी वापरलेल्या भांड्यात) जाते. तेथे थंड पाण्याने वाफ थंड होऊन द्रवरूप होते व संघनकाच्या खाली बसवलेल्या टाकीत साठते. भांड्यामध्ये सुगंधी द्रव्ये असल्यास ती बाष्परूपाने वाफेबरोबर बाहेर जातात व पुन्हा द्रवरूप घेऊन ऊर्ध्वपातित पाण्यावर तरंगतात. *तेलासारखी हलकी द्रव्ये पाण्यातून सहज वेगळी काढता येतात.*

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७५

#वेदविज्ञानरंजन_७५

*रसायनशास्त्र विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा लेख जरूर पाठवावा ही नम्र विनंती.*

*प्राचीन भारतीय रसायनशास्त्र भाग - १*

आजच्या भागात आपण प्राचीन भारतीय
रसायनशास्त्राची माहिती घेणार आहोत.

वाग्भट ह्यांनी लिहिलेल्या *रसरत्नसमुच्चय* ह्या ग्रंथात रसशाळा (Chemistry Lab )  ह्याचे छान वर्णन केले आहे.

🚩
रसशालां प्रकुर्वीत सर्वबाधाविवर्जिते
सर्वोषधिमये देशे रम्ये कूपसमन्विते ||१||
🚩

रसशाळा म्हणजे प्रयोगशाळा अश्या ठिकाणी असावी की जी बाहेरील गोंधळापासून मुक्त असेल. प्रयोगशाळेभोवती *विविध औषधी वनस्पती* असलेला प्रदेश असावा आणि *मुबलक प्रमाणात पाणी* असावे.
🚩
यक्षत्र्यक्षरसहस्राक्षदिग्विभागसुशोभने
नानोपकरणोपेतां प्रकारेण सुशोभिताम् ||२||
🚩

प्रयोगशाळेच्या भोवती उंच कुंपण ( भिंत असावी ) प्रयोगशाळेत *विविध प्रकारची उपकरणे* असावीत
🚩
शालायाः पूर्वदिग्विभागे स्थापयेद्रसभैरवम् |
वह्निकर्माणि चाग्नेये याम्ये पाषाणकर्म च ||३ ||
🚩

*रसभैरव* म्हणजे प्रयोगशाळेची देवता *पूर्व दिशेला* स्थापन करावी. *प्रयोगशाळेतील भट्टी* किंवा अग्नीचे स्थान *आग्नेय दिशेस* आणि *दगडांचे साहित्य दक्षिणेस* ठेवावे.

🚩
नैऋत्ये शस्त्रकर्माणि वारुणो क्षालनादिकम् |
शोषणं वायुकोणे च वेधकर्मोत्तरे तथा ||४ ||
🚩

कापण्यासाठी उपयोगात असणार्‍या सुऱ्या किंवा इतर *शस्त्रे नैऋत्य दिशेस* असावीत आणि *पश्चिम दिशेस धुण्याची आणि साफसफाईची जागा* असावी. *ईशान्य दिशेकडे प्रयोगशाळेतील साहित्य वाळवावे.*

🚩
स्थापनं सिद्धवस्तूनां प्रकुर्यादीशकोणके |
पदार्थसंङ्ग्रहः कार्यो रससाधनहेतुकः ||५ ||
🚩

*धातुकाम उत्तर दिशेकडे* करावे आणि प्रयोगशाळेत तयार झालेली द्रव्ये ईशान्य दिशेकडे साठवावीत.

अशाप्रकारे, प्रयोगशाळेची रचना कशी असावी ह्याचे वर्णन आपल्याला वरील श्लोकांत दिसून येते.

रसार्णव ह्या ग्रंथात धातूंचे गुणधर्म सांगितले आहेत.
ते खालीलप्रमाणे आहेत.
🚩
सुवर्णं रजतं ताम्रं तीक्ष्णं वङ्गं भुजङ्ममम् |
लोहन्तु षड्विधं तच्च  यथापूर्वम् तदक्षयम् ||
🚩

Gold, silver, copper, iron, lead, zinc are the 6 types of metals, their stability (resistance towards corossion / reactivity ) is in the reverse order of the above.

सोने, चांदी, तांबे, लोह, शिसे आणि जस्त असे धातूंचे काही प्रकार सांगितले आहेत.

रसरत्नसमुच्चय ह्या ग्रंथात ६ प्रकारचे लवण (Sault) सांगितले आहे. ते खालीलप्रमाणे :

🚩
लवणानि षडुच्यन्ते सामुद्रं सैन्धवं बिडम् |
सौर्वचलं रोमकञ्च चूल्लिकालवणं तथा ||
🚩

अशाप्रकारे प्राचीन भारतात रसायनशास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७४

#वेदविज्ञानरंजन_७४

आजच्या लेखात आपण प्राचीन भारतीय संस्कृतीमधील नौकाबांधणी आणि नौकानयन ह्याची माहिती घेऊ.

*नौकाबांधणी, नौकासंचालन*

ऋग्वेद मंडल १ सूक्त २५ मंत्र ७

🚩
वेदा यो वीनां पदमन्तरिक्षेण पतताम् |
वेद नावः समुद्रियः ||७||
🚩
*आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग जे जाणतात ते समुद्रात संचार करणार्‍या नौकांचे मार्ग सुद्धा जाणतात.*

ह्याचा अर्थ *पक्ष्यांच्या उडण्याच्या दिशांचा अभ्यास* ऋग्वेदातील ऋषींनी केला असला पाहिजे. त्या दिशांवरुन आपली *नौका समुद्रात कोणत्या दिशेने न्यावी ह्याची माहीती* त्यांना निश्चित होती. आता नौका समुद्रातून चालवायची म्हणजे * समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी तितकीच भरभक्कम नौका* हवी. वेदकाळात ह्याचे तंत्र अवगत होते.

ऋग्वेद मंडल १ सूक्त ९७ मंत्र ८
🚩
स नः सिन्धुमिव नावयाति पर्षा स्वस्तये |
अप नः शोशुचदघम् ||८||
🚩
(नावया सिन्धुं इव ) म्हणजे नौकेने समुद्र किंवा नदी पार करणे शक्य आहे असे म्हटले आहे. आता नदी पार करण्यासाठी छोटी होडी, गलबत ह्याचा उपयोग होतो. पण मोठा समुद्र पार करण्यासाठी प्रचंड मोठ्या जहाजाची आवश्यकता आहे. समुद्रप्रवास हा *भारतीयांना निषिद्ध नाही.* समुद्र प्रवास करणे वाईट आहे असे वेदांनी अजिबात सांगितलेले नाही. आपल्याला फक्त कोलंबस ह्याचा सागरी प्रवास इतिहासात शिकविला जातो. परंतु, त्याच्याही कितीतरी हजार वर्षे आधी भारतीय मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्र प्रवास करीत असत.

शंभर वल्ह्यांची नाव

ऋग्वेद मंडल १ सूक्त ११६ मंत्र ५

🚩शतारित्रां नावमातस्थिवांसम् ||५ ||🚩

ह्यात अश्विनी कुमारांना प्रार्थना केली आहे की अथांग समुद्रात *शंभर वल्ह्यांनी चालणारी नाव* असून त्यावर चढलेल्या भुज्यूला तुम्ही घरी पोहोचवलेत.

महाभारत आदिपर्वात *यंत्राद्वारे* चालणाऱ्या नावेचे उल्लेख आहेत.

🚩सर्ववातसहां नावं *यंत्रयुक्तां* पताकिनीम्। 🚩

सर्व प्रकारची वादळे सहन करणारी, मोठमोठी निशाणे असलेली आणि *यंत्रांनी युक्त* अशी नाव आहे. महाभारत हे द्वापारयुगात घडले त्याचा काळ साधारण इ. पू. ५५०० वर्षे इतका मागे जातो. त्याकाळी सुद्धा *यंत्रविज्ञान खूप प्रगत* होते आणि *पाश्चात्य देशात ह्याची माहितीही नव्हती* हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७३

#वेदविज्ञानरंजन_७३

*वेदांतील स्थापत्यशास्त्र - भाग - २* 🌺
🚩
ब्रह्मणा शालां निमितां कविभिर्निमिता मिताम् |
इन्द्राग्नी रक्षतां शालाममृतौ सोम्यं सदः ||१९ ||
🚩

(ब्रह्मणा निमितां शालां ) ज्ञानी माणसाने निर्माण केलेल्या शाळेचे (घराचे ) आणि कवींनी दिलेल्या प्रमाणात बांधलेल्या शाळेचे रक्षण इंद्र आणि अग्नी यांनी करावे.

येथे *ब्रह्मा म्हणजे ज्ञानी* माणसाने निर्माण केलेले घर असा उल्लेख आहे. ज्ञानी माणूस म्हणजे कोण? घर निर्माण करण्याचे *ज्ञान असलेला आर्किटेक्ट,* विद्वान. कवींनी दिलेल्या प्रमाणात म्हणजे योग्य *नकाशाच्या आधारे मोजमाप* घेऊन उत्तम कारागिरांच्या मदतीने घर बांधावे.
🚩
कुलाले$धि कुलायं कोशे कोशः समुब्जितः |
तत्र मर्तो विजायते यस्माद् विश्वं प्रजायते ||२० ||
🚩
दुसरा मजला बांधायचा असेल तर एकाच्या वर एक अशाप्रकारे बांधावा. जसे (  कुलाये अधि कुलायं ) म्हणजे एकावर एक असे घरटे बांधतात, (कोशे कोशः ) एका कोशावर एक कोश ठेवतात अशाप्रकारे *बहुमजली घर* बांधावे. अशा उत्तम घरात मनुष्याचा जन्म होवो. पक्षीसुद्धा प्रसूतीच्या आधी उत्तम घरटे तयार करतात ते पाहून मनुष्याने सुद्धा आपल्या घरातील एका ठिकाणी *प्रसूतीचे स्थान* तयार करावे. म्हणजे बाळंतिणीची खोली असावी.
🚩
या द्विपक्षा चतुष्पक्षा षट् पक्षा या निमीयते |
अष्टपक्षां दशपक्षां शालां मानस्य पत्नीमग्निर्गर्भ इवा शये ||२१ ||
🚩

दोन खोल्यांचे, चार, सहा, आठ, दहा खोल्यांचे घर बांधावे. (मानस्य पत्नीं शालां) इथे खूप महत्त्वाचा अर्थ आहे. गृहनिर्माण करण्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला *वास्तुरचनाकार म्हणजेच मानपती* असे नाव होते. त्याने दिलेल्या प्रमाणानुसार तयार केलेली *शाळा (घर ) म्हणजेच मानपत्नी* होय. मानपत्नी ह्याचा अर्थ घर (शाळा ) असा आहे. घरातील माणसांच्या संख्येवर खोल्यांची आणि मजल्यांची संख्या ठरविणे आवश्यक आहे. अशा *घराच्या गर्भात अग्नी* असावा. बाहेर असलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी घरात अग्नी आणि शुद्ध पाणी असणे आवश्यक आहे.
🚩
हविर्धानमग्निशालं पत्नीनां सदनं सदः |
सदो देवानामसि देवि साले ||७||
🚩

हे (शाले देवि ) गृहरूपी देवते! (हविर्धानं) हवन करण्याचे स्थान, (अग्निशालं) *अग्नीशाला* म्हणजे स्वयंपाकघर जिथे चूल पेटलेली असते,(पत्नीनां सदनं ) *स्त्रियांचे राहण्याचे ठिकाण* (खोली ) (सदः ) राहण्याचे ठिकाण (living room ) (देवानां सदः ) देवांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे *देवघर* असावे. ह्याचा अजून एक अर्थ असा की अतिथी देवो भव | अशी आपली शिकवण आहे ह्या अतिथीरूपी देवाचे राहण्याचे ठिकाण ( Guest Room ) असावी. घराची रचना अशाप्रकारे असावी ह्याचे संपूर्ण वर्णन केले आहे. ह्यावरून वेदकाळात गृहनिर्माण आणि स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते हे लक्षात येते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७२

#वेदविज्ञानरंजन_७२

🌺 *वेदांतील स्थापत्यशास्त्र - भाग - १* 🌺

अथर्ववेदात घर कसे बांधावे ह्याचे उत्तम उल्लेख सापडतात (स्थापत्यशास्त्र ) अथर्ववेद ६.१०६. १ते ३ मध्ये ह्याचे सुंदर वर्णन केले आहे ते पाहू.

🚩
आयने ते परायणे दुर्वा रोहतु पुष्पिणीः |
उत्सो वा तत्र जायतां हृदो वा पुण्डरीकवान् ||१||
🚩

(ते आयने परायणे )  घराच्या पुढे आणि मागे (पुष्पिणीः दुर्वाः रोहन्तु ) फुलांनी युक्त असे दुर्वा, गवत असावे. म्हणजेच आधुनिक भाषेत (Lawn )   असावे. (तत्र वा उत्सः जायतां )  तेथे एक हौद असावा. येथे कदाचित *जलतरणतलाव* (स्विमिंग पूल ) असा अर्थ अभिप्रेत असावा. (वा पुण्डरीकवान् हृदः ) किंवा त्या तलावात कमळाची फुले असावीत.

🚩
अपामिदं न्ययनं समुद्रस्य निवेशनम् |
मध्ये हृदस्य नो गुहाः पराचीना मुखा कृधि ||२||
🚩
(इदं अपां न्ययनं ) पाण्याचा छान प्रवाह असावा. कदाचित नदीकाठी घर आसवे असा आशय असावा. (समुद्रस्य निवेशनम् ) जवळ समुद्राचे स्थान असावे. म्हणजे समुद्राच्या काठावर घर असावे. (हृदस्य मध्ये नः गृहाः ) तलावाच्या मध्यभागी घर असावे. (मुखाः पराचीना कृधि ) घराची दारे परस्पर विरुद्ध दिशांना हवीत. *सूर्यप्रकाश घरांमध्ये असावा आणि उत्तम प्रकारे हवा खेळती असावी ह्यासाठी दारे समोरासमोर असणे आवश्यक आहे*.
🚩
हिमस्य त्वा जरायुणा शाले परि व्ययामसि |
शीतहृदा हि नो भुवो$ग्निष्कृष्णोतु भेषजम् ||३||
🚩

हे शाले!  घराला उद्देशून म्हटले आहे. (त्वा हिमस्य जरायुणा ) तुला शीत आवरणाने (परि व्ययामसि ) घेरले आहे. ह्याचा अर्थ घराभोवती शीत आवरण आहे. बाहेरील तापमान जास्त झाल्यास घर थंड राहावे ह्यासाठी योजना केली आहे. (नः शीतहृदाः भुवः) थंड पाणी असलेले तलाव बरेच असावेत. (अग्निः भेषजं कृणोतु ) *अग्नीने थंडी निवारण करावी.*

येथे दोन प्रकारांचा उल्लेख केला आहे. जर बाहेर तापमान जास्त असेल तर घर थंड हवे. आणि बाहेर जर थंड तापमान असेल तर घरात अग्नी हवा म्हणजे उष्णता निर्माण होईल. *खऱ्या अर्थाने वातानुकूलित घर* कसे असावे ह्याचे वर्णन येथे वाचायला मिळते (Air conditioned house )

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७१

#वेदविज्ञानरंजन_७१

*प्राचीन उद्योग - व्यवसाय भाग - २*

वेदकालीन संस्कृती ही अत्यंत पुढारलेली असून अत्यंत उत्कृष्ट न्यायदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

यजुर्वेद अध्याय ३० मंत्र १० खालीलप्रमाणे :

🚩प्रश्निनमुपशिक्षायाSअभिप्रश्निनम्मर्यादायै प्रश्नविवाकम् 🚩

*वादी - प्रश्न विचारणारा - प्रश्निनम्*
*प्रतिवादी - उत्तर देणारा - अभिप्रश्निनन्*
*मर्यादायै -   न्याय - अन्याय ह्याची व्यवस्था पाहणे.*

अथर्ववेद कांड २ सूक्त २७ मंत्र १ खालीलप्रमाणे आहे.
🚩
नेच्छत्रुः प्राशं जयाति सहमानाभिभूरसि |
प्राशं प्रतिप्राशो जह्वरसानकृण्वोषधे ||१||
🚩

*वादी - प्रश्न विचारणारा - प्राश्*
*प्रतिवादी - उत्तर देणारा - प्रतिप्राश्*

वरील दोन मंत्रांवरून असे दिसून येते की वेदकालीन न्यायव्यवस्था अतिशय परिपूर्ण होतो होती, वकील, आरोपी, अशील, न्यायाधीश अतिशय उत्तम पद्धतीने न्यायव्यवस्था सांभाळत असत.

🚩व्यापार आणि वाणिज्य : Trade and commerce🚩

अथर्ववेदात *आठ मंत्र असलेले एक सूक्त* आहे. ते व्यापाराशी सबंधित आहे. ह्यात *इंद्राला व्यापारी* असे संबोधले आहे.

🚩
इन्द्रमहं वणिजं चोदयामि स न ऐतु पुरएता नो अस्तु |
नुदन्नरातिं परिपन्थिनं मृगं स ईशानो धनदा अस्तु मह्यम् ||१||
🚩
ये पन्थानो बहवो देवयाना अन्तरा द्यावापृथिवी संचरन्ति |
ते मा जुषन्तां पयसा घृतेन यथा क्रीत्वा धनमाहराणि ||२||
🚩
मी व्यापारी असलेल्या इंद्राला प्रार्थना करतो की त्याने आमचे मार्गदर्शन करावे. *लुटारूंपासून आमचे रक्षण* करावे. *द्युलोक आणि पृथ्वी ह्याच्या मध्ये जाण्या येण्याचा जो मार्ग आहे त्यात आमच्या साठी तूप आणि दूध भरपूर असावे.*  त्या मार्गांनी जाऊन आणि व्यापार करून आम्हाला *भरपूर धनलाभ होवो.*

येथे *द्युलोक आणि पृथ्वी* यांच्या मधील जाण्या येण्याचा मार्ग म्हणजे *आकाशमार्ग* होय. ह्या आकाशमार्गाने जाणारी जी *देवयाने आहेत म्हणजे विमाने* आहेत त्याद्वारे वस्तूंचा क्रय विक्रय व्यापार चालत असावा. म्हणजेच आजच्या भाषेत *import- एक्सपोर्ट आयात - निर्यात*. आता तूप आणि दूध भरपूर असावे असे म्हटले आहे. त्याचा अर्थ काय? तर ह्याचा अर्थ समृद्धी असा आहे. तूप आणि दूध हे समृद्धीचे समृद्धीचे द्योतक आहेत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला आपण म्हणतो की तो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे. ह्याचा अर्थ जन्माच्या वेळी त्या बाळाच्या तोंडात खरोखर चांदीचा चमचा असतो का? तर नाही. समृद्धी दर्शविण्यासाठी सोने, चांदी, दूध, तूप असे शब्दप्रयोग करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तूर्तास इथेच थांबतो. पुढील भागात पुन्हा नवीन विषय घेऊन भेटू.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७०

#वेदविज्ञानरंजन_७०

*प्राचीन उद्योग - व्यवसाय भाग - १*

आजच्या लेखात आपण *वेदकाळातील
विविध उद्योग - व्यवसाय* ह्या संबंधी माहिती घेणार आहोत.

यजुर्वेद ३०.७ मध्ये खालील मंत्र आहे.
🚩
तपसे कौलालम् मायायै कर्मारम् रूपाय मणिकारम् शुभे वपम् शरव्यायै इषुकारम् हेत्यै धनुष्कारम् कर्मणे ज्याकारम् दिष्टाय रज्जुसर्जम् मृत्यवे मृगयुमिती अन्तकाय श्वनिनम् ||
🚩

*मणिकार* - दागिने घडवणारा. सोने चांदी यांपासून विविध आभूषणे तयार करणारा.
*कर्मार* - लोहार लोखंडापासून विविध अस्त्र तयार करणारा.
*ज्याकार* - धनुष्याची दोरी म्हणजेच प्रत्यंचा तयार करणारा.
*धनूष्कार* - विविध प्रकारची धनुष्य तयार करणारा.
*इषुकार* - बाण तयार करणारा.

यजुर्वेद ३०.६ मध्ये खालील श्लोक आहे

🚩
नृत्ताय सूतम् गीताय शैलूषम् धर्माय सभाचरम् नरिष्ठायै भीमलम् नर्माय रेभम् हसाय कारिम् आनन्दायेत्यानन्दाय स्त्रीषखम् कुमारीपुत्रम् मेधायै *रथकारम्* धैर्याय तक्षाणम् ||६||
🚩

*रथकारम्* - रथकार अतिशय सुंदर रथ तयार करीत असत. विशेषतः युद्धात ह्या रथांचा खूप उपयोग होत असे. वेदांमध्ये सुंदर रथ तयार करण्यास विशेष महत्व दिले आहे.

यजुर्वेद ३९.१७ खालील मंत्र आहे

🚩
बीभत्सायै पौल्कसँवर्णाय हिरण्यकारन्तुलायै वाणिजम्पश्चादोषाय ग्लाविनँविश्वेभ्यो भूतेभ्यः सिध्मलम्भूत्यै जागरणमभूत्यै स्वपनमार्त्यै जनवादिनँव्युद्धर्या$अपगल्भँ सँशराय प्रच्छिदम् ||
🚩

प्रस्तुत श्लोकात *हिरण्यकार*असा शब्द योजला आहे. हिरण्यकार म्हणजे सोनार. वेदकाळात आपली भारतभूमी अतिशय संपन्न होती. *भारतातून सोन्याचा धूर निघत असे* असा उल्लेख आहे. साहजिकच सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी सोनारांची आवश्यकता असे.

*सूचिकर्म, शिवणकाम (tailoring)*

अथर्ववेद मंडल ७ सूक्त ४८ मंत्र १
🚩
राकामहं सुहवा सुष्टुती हुवे शृणोतु नः सुभगा बोधतुत्मना |
सीव्यत्वपः सूच्याच्छिद्यमानया ददातु वीरं शतदायमुक्थ्य$म् ||१||

अच्छिद्यमानया सूच्या अपः सीव्यतु
🚩

कधीही *न तुटणाऱ्या सूईचा उपयोग* करुन कपडे शिवावेत.

येथे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. *सुई अतिशय बारीक* असते. अश्या प्रकारची सुई तयार करण्याचे तंत्रज्ञान वेदकालीन ऋषींना ज्ञात होते. न तुटणारी सुई तयार करण्यासाठी असा धातू हवा की जो *वज्रासमान कठीण* असेल. म्हणजेच वेदकाळात धातुविज्ञान प्रगत होते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६९

#वेदविज्ञानरंजन_६९

आजच्या लेखात आपण *वेदकाळातील विविध शस्त्रास्त्रे* ह्याची माहिती घेणार आहोत.

दिव्य अस्त्र

🚩 *आग्नेय अस्त्र - अग्निबाण - missile*

वेदांमध्ये विविध अस्त्रांचा उल्लेख आहे. आग्नेय अस्त्र असे अस्त्र आहे की ज्यामुळे *आग चारही बाजूंना पसरते आणि धुराचे प्रचंड लोट उठतात. त्यामुळे शत्रूसैन्य बेशुद्ध होते, डोळ्यांना अंधत्व येते आणि शत्रूची सेना पराजित होते.* हे सर्व वर्णन खालील मंत्रात आहे.
अथर्ववेद कांड ६ सूक्त ६७ मंत्र २

🚩मूढा अमित्राश्चरताशीर्षाण इवाहयः |
तेषां वो अग्निमूढानामिन्द्रो हन्तु वरंवरम् ||२||
🚩
हे (अमित्राः ) शत्रूंनो! तुम्ही (मूढाः ) *स्मृतिभ्रंश* झाल्यासारखे ( अशीर्षाणः अहयः इव चरत ) तुम्ही डोके कापले गेलेल्या सापासारखे चाला. (अग्निमूढानां तेषां वः ) आमच्या *आग्नेय अस्त्राने तुम्ही सर्व मोहित* झाला आहात (स्मृतिभ्रंश ) आणि (वरंवरं इंद्रः हन्तु ) मोठ्या मोठ्या वीरांना (शत्रुसैन्यातील ) इंद्राने मारावे.

🚩 *वायव्यास्त्र*

ह्याच्या प्रयोगाने *वावटळ आणि वादळ यांच्या सारखी जोरदार हवा* वाहते. सर्व ठिकाणी आग आणि *धुळीचे साम्राज्य* पसरते. शत्रुसेनेला पुढे काहीच दिसत नाही ह्याचे वर्णन खालील दोन मंत्रांत केले आहे.
🚩
*इंद्रसेनां मोहयामित्राणाम् |*
*अग्नेर्वातस्य ध्राज्या तान् विषूचो वि नाशय ||५ ||*
🚩
हे (इंद्र) नरेश ! (अमित्राणां सेनां मोहय ) शत्रुसेनेला घाबरवून टाक. (अग्नेः व्रातस्य ध्राज्या )  अग्नी आणि वायूच्या प्रचंड वेगाने (तान् ) त्या शत्रुसैन्याला (विषूवः विनाशय ) चारही बाजूंनी हल्ला करुन ठार कर.

🚩
इंद्रः सेनां मोहयतु मरुतो घ्नन्त्वोजसा |
चक्षूस्यग्निरा दत्तां पुनरेतु पराजिता ||६||
🚩

*अग्निः चक्षूंषि आदत्तां -  अग्नी म्हणजे प्रकाशाने त्या शत्रूंचे डोळे घ्यावेत.*

*अग्निपुराण अध्याय २४८ मंत्र २*
🚩
*यंत्रमुक्तं पाणिमुक्तं मुक्तसंधारितं तथा |*
*अमुक्तं बाहुयुद्धं च पंचधा तत् प्रकीर्तितम् ||*
🚩

अग्निपुराणात शस्त्रास्त्रांचे ५ प्रकार वर्णन केले आहेत.

१. *यंत्रमुक्त* - यंत्रातून मुक्त होणारे म्हणजे यंत्राद्वारे फेकले जाणारे अस्त्र. म्हणजे बंदूक, तोफ वगैरे यांतून सोडले जाणारे गोळे.

२. *पाणिमुक्त* - पाणि म्हणजे हातातून सोडले जाणारे. भाला वगैरे

३. *मुक्तसंधारित* - फेकून पुन्हा त्याच ठिकाणी येणारे अस्त्र. बूमरँग वगैरे अश्या प्रकारचे अस्त्र अजून आधुनिक विज्ञानाने बहुतेक तयार केलेले नाही.

४. *अमुक्त* - हातात ठेवून शत्रू संहारक अस्त्र. खड्ग, परशू वगैरे

५. *बाहुयुद्ध* - हातानी करावयाचे युद्ध तलवार, ढाल वगैरे

*कौटिलीय अर्थशास्त्र* ह्या ग्रंथात अजून काही शस्त्रास्त्रांचे वर्णन आहे. ते खालीलप्रमाणे

१. *सर्वतोभद्र* -  चहूबाजूंनी गोळीबार करणारे यंत्र,. मशीनगन

२. *जामदग्न्य* - एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बाण सोडणारे यंत्र.

३. *पर्जन्यक* - आग विझवण्यासाठी उपयोगात येणारे वारुण अस्त्र. थोडक्यात अग्निशामक बंब

४. *पांचालिक* -  अतिशय तीक्ष्ण धार असलेले यंत्र. हे यंत्र पाण्याच्या आत ठरवले जायचे. ह्याला आपण जल सुरंग ( Mine ) म्हणू शकतो.

ह्याशिवाय इतर *रासायनिक शस्त्रास्त्रांचाही उल्लेख* आहे.
विषारी वायू सोडणारे शस्त्र, आंधळे करणारे शस्त्र, पाणी विषारी बनवणारे शस्त्र , रोग निर्माण करणारे शस्त्र (आपण सर्वांनी जी करोना साथ अनुभवली तोही असाच एक प्रकार आहे. )

अशाप्रकारे अनेक अद्ययावत शस्त्रास्त्रे, रनगाडे, लढाऊ विमाने वेदकाळात अस्तित्वात होती. ह्या सर्वाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. ह्यावरून असे म्हणता येईल की वेदकालीन भारतीय संस्कृती ही अतिप्रगत संस्कृती होती.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६८

#वेदविज्ञानरंजन_६८

आज आपण वेदकालीन शेतीसंदर्भात माहिती पाहणार आहोत.

*अथर्ववेदात वनस्पतींमधील हरित द्रव्याचा स्पष्ट उल्लेख आहे.*

अथर्ववेद मंडल १० सूक्त ८ मंत्र ३१

🚩
अविर्वै नाम देवतर्तेनास्ते परीवृता |
तस्या रूपेणेमे वृक्षा हरिता हरितस्रजः ||३१ ||
🚩

*अवि* नावाची एक देवता आहे (हरित द्रव ). ती सत्याने व्यापलेली आहे. तिच्या रूपाने हे *सर्व वृक्ष हिरवे आणि हिरव्या पानांचे आहेत.*

आता झाडांची पाने हिरवी का दिसतात? ह्याचे कारण झाडाच्या पानांत हरितद्रव्य असते. त्यामुळे पाने हिरवी असतात. झाडाच्या पानांतील हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश ह्यांच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण क्रिया होते आणि झाडे अन्न तयार करतात, झाडे वाढतात. हे सर्व आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे. ह्या सर्व प्रक्रियेचे ज्ञान वेदकाळातील भारतीयांना होते. त्याकाळी निसर्गातील विविध घटकांना देवतेची उपमा द्यायची असा प्रघात होता. त्यामुळेच अवि म्हणजे हरितद्रव्यास देवता असे म्हटले आहे.

*जल* - उत्तम शेतीसाठी नदी, विहिरी, तलाव यांतील पाण्याचे सिंचन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उत्तम जल आणि औषधींची आवश्यकता आहे. येथे औषधी म्हणजे किटकनाशके,   फवारणी.

यजुर्वेद १८.३५
🚩
सम् मा सृजामि पयसा पृथिव्याः सम् मा सृजामि अद्भिः ओषधीभिः सः अहम् वाजम् सनेयम् अग्ने ||३५||
🚩

६. खत - उत्तम शेतीसाठी शेणखत आणि इतर खते योग्य प्रमाणात टाकावीत त्याने पीक उत्तम होते.

अथर्ववेद  मंडल ३ सूक्त १४ मंत्र ३  खालीलप्रमाणे आहे.
🚩
संजग्माना अबिभ्युषीरस्मिन् गोष्ठे करीषिणीः |
बिभ्रतीः सोम्यं मध्वनमीवा उपेतन ||३||
🚩

ह्या गोशाळेत राहणारी आणि *उत्तम गोबर - शेणखत* निर्माण करणारी, शांत मधुरस म्हणजे दूध धारण करणारी, निरोगी गाय आम्हाला प्राप्त होवो.

*कृषीचे रक्षण*

हतं तर्दं समङ्कमाखुमश्विना छिन्तं शिरो अपि पृष्टीः शृणीतम् |
यवान्नेददानपि नह्यतं मूखमथाभयं कृणुतं धान्या$य ||१||

शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे बसवावे. जनावरांचे तोंड बांधुन ठेव.

अशाप्रकारचे शेतीविषयक परिपूर्ण ज्ञान आपल्या वेदांमध्ये सांगितले आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

*टीप :हे सर्व ज्ञान कृषिविद्यापीठांमध्ये दिले जावे अशी माझी कृषि विभागाला विनंती आहे*.

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६७

#वेदविज्ञानरंजन_६७

🚩 *वेदकालीन शेती* 🚩

शेतीसंदर्भात एक उल्लेख ऋग्वेदात आढळतो
ऋग्वेद मंडल १० सूक्त ३४ मंत्र १३
🚩
*अक्षैर्मा दीव्यः कृषिमित्कृषस्व वित्ते रमस्व बहु* *मन्यमानः |*
🚩
हे जुगारी लोकांनो! जुगार कधीही खेळू नका. परिश्रमपूर्वक शेती करा. त्या शेतीतून मिळालेल्या धनात आनंद माना.

*कृषिपराशर* ग्रंथात पराशर ऋषींनी पाऊस मोजण्याचे तंत्र सांगितले आहे पर्जन्यमानाचा उपयोग करून पाऊस मोजला आहे.

🚩
शतयोजनविस्तीर्णं त्रिंशद्योजनमुच्छ्रितम् । (२६.२)
आढकस्य भवेन्मानं मुनिभिः परिकीर्तितम् ॥ (२६.३)
🚩

१ द्रोण = ४ अधक = ६.४ सेंटिमीटर

*१००  योजन रुंद आणि ३०० योजन उंच असलेल्या सरोवरात पडलेल्या पावसाचे मोजमाप करून ठेवले आहे.*

शतपथ ब्राह्मण १.६.१.३ मध्ये ४ शब्दांत संपूर्ण शेतीचे वर्णन केले आहे

🚩 कृषन्तः वपन्तः लुनन्तः मृणन्तः | 🚩

*कृषन्तः - कर्षण - शेताची नांगरणी करणे*
*वपन्तः -  वपन - पेरणी, लावणी करणे*
*लुनन्तः - लुनन - तयार झालेल्या पिकाची कापणी करणे*
*मृणन्तः - मर्दन - मळणी, उफणणी करून धान्य स्वच्छ करावे आणि खाण्यायोग्य अन्न प्राप्त करावे.*

उत्तम शेतीसाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते.
१. उर्वरा भूमी, २.  उत्तम बीज ३. सूर्यप्रकाश
४. वायू, ५. जल ६.कृषीचे रक्षण ७. उत्तम खते

१. *उर्वरा भूमी* - अथर्ववेदात लिहिले आहे की उर्वरा भूमीत पेरणी केल्यास उत्तम प्रकारचे धान्य मिळते. त्यामुळे त्यामुळे *उर्वरा भूमीला नमस्कार* केला आहे.

अथर्ववेद मंडल १० सूक्त ६ मंत्र ३३
🚩
यथा बीजमुर्वरायां कृष्टे फालेन रोहति |
एवा मयि प्रजा पशवो $न्नमन्नं वि रोहतु ||३३||
🚩

२. *उत्तम बीज* - बीज जर उत्तम असेल तर पीक चांगले येते. शेती चांगली होते.

ऋग्वेद मंडल १० सूक्त ९४ मंत्र १३

🚩वपन्तो बीजमिव धान्याकृतः 🚩

धान्यासाठी उत्तम बीज पेरावे.

३. *सूर्यप्रकाश* - उत्तम सूर्यप्रकाश असेल तरच चांगली शेतीतून होऊ शकते. शेतीसाठी विविध प्रकारच्या अग्नीची गरज आहे. सूर्यप्रकाश हवाच, त्याचबरोबर जमिनीतील उष्मा सुद्धा गरजेचा आहे.

यजुर्वेद १८. ३१ खालील मंत्र आहे.

🚩 विश्वेअद्य मरुतो विश्वे ऊती विश्वे भवन्तु अग्नयः समिद्धा विश्वे नः देवा अवसा आगमन्तु विश्वमस्तु द्रविणं वाजः अस्मे ||३१ || 🚩

*वाजः - अन्नम्*

४. *वायू* - शेतीसाठी उत्तम वायूची आवश्यकता आहे. कार्बन डाय ऑक्साईड, ऑक्सिजन आणि पानांतील हरित द्रव (Chlorophyll ) यांमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया होते (Photosynthesis ) आणि वनस्पती अन्न तयार करतात.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

*टीप :हे सर्व ज्ञान कृषिविद्यापीठांमध्ये दिले जावे अशी माझी कृषि विभागाला विनंती आहे*.

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६६

#वेदविज्ञानरंजन_६६

🚩 *वेदकालीन शेती* 🚩

शेतीसंदर्भात *अथर्ववेद कांड ३, सूक्त १७ मध्ये ८ मंत्र* दिले आहेत. शेती कशी करावी, जमीन कशी नांगरणी करावे, खते कशी वापरावीत ह्याची सर्व माहिती पुढील ९ मंत्रांत दिली आहे. ते पाहू :

🚩 *सीरा युञ्जन्ति कवयो युगा वि तन्वते पृथक् |*
*धीरा देवेषु सुम्नयौ ||१||*  🚩

देवांची स्तुती करणारे कवी सुख प्राप्त करण्यासाठी नांगर धरतात (नांगरणी करतात)
जमिनींची मशागत करतात.

🚩 *युनक्त सीरा वि युगा तनोत कृते योनौ वपतेह बीजम् |*
*विराजः श्नुष्टिं सभरा असन्नो नेदीय इत् सृण्यः* *पक्वमा यवन् ||२||* 🚩

नांगरणी करा, मशागत करा आणि तयार झालेल्या शेतात बीज पेरणी करा.

🚩
*लाङ्गलं पवीरवत् सुशीमं सोमसत्सरु |*
*उदिद् वपतु गामविं प्रस्थावद् रथवाहनं पीबरी च प्रफव्य्रम् ||३||* 🚩

वज्रासमान कठीण अश्या नांगराने किंवा लाकडांची मूठ असलेल्या नांगराने शेती करावी.

इथे पहा की वज्रासमान कठीण असा धातू वापरुन नांगर तयार केला आहे. म्हणजेच *धातुविज्ञान ह्या क्षेत्रात अतिशय प्रगत होते*

🚩
*इन्द्रः सीतां निगृह्णातु तां पूषामि रक्षतु |*
*सा नः पयस्वती दुहामुत्तरामुत्तरां समाम् ||४||*
🚩
नांगरुन झालेल्या भूमीवर वृष्टी करणार्‍या इंद्राने पाऊस पाडावा, त्यानंतर (पूषा ) म्हणजे सूर्याने त्याचे उत्तम रक्षण करावे. म्हणजेच पाऊस आणि ऊन योग्य प्रमाणात मिळाले तर उत्तम शेती होते आणि छान धान्य मिळते.

🚩  *शुनं सुफाला वितुदन्तु भूमिं शुनं कीनाशा अनु यन्तु वाहान् |*
*शुनासीरा हविषा तोषमाना सुपिप्पला* *ओषधीःकर्तमस्मै ||५ ||* 🚩

सुंदर हलक्या नांगरांनी भूमीची नांगरणी करावी. बैलांच्या मागे मागे जाऊन व्यवस्थित करावे. वायू आणि सूर्य यांनी हवनाने संतुष्ट व्हावे आणि शेतकऱ्यांसाठी उत्तम धान्य पिकवावे.

*जी बियाणे पेरायची आहेत त्यांचे हवन करावे* असे सांगितले आहे. त्यामुळे जलवायू शुद्ध होतात, उत्तम वृष्टी होते आणि शुद्ध शेतीमुळे शुद्ध धान्य मिळते.

🚩
*शुनं वाहाः शुनं नरः कृषतु लाङ्गलम् |*
*शुनं वरत्रा बध्यन्तां शुनमष्ट्रामुदिङ्गय ||६||*
🚩

बैल सुखी होवोत, मानव सुखीच होवो. नांगरणी करून छान शेती होवो. बैलांना छान बांधा आणि चाबूक वापरुन त्यांना नियंत्रणात ठेवा.

🚩 *शुनासीरेह स्म मे जुषेथाम् |*
*यद् दिवि चक्रथुः पयस्तेनेमामुप सिञ्चतम् ||७||* 🚩

वायू आणि सूर्य आमच्या हवनाने संतुष्ट होवोत आणि जे जल आकाशात आहे (पर्जन्य ) त्याचे ह्या भूमीवर सिंचन करा.

🚩
*सीते वन्दामहे त्वार्वाची सुभगे भव |*
*यथा नः सुमना असो यथा नः सुफला भुवः ||९||*
🚩

हे भूमी आम्ही तुला वंदन करतो. तू आमच्यासाठी उत्तम धान्य उत्पन्न करणारी हो.

🚩
*घृतेन सीता मधुना समक्ता विश्वैर्देवैरनुमता मरुद्भिः |*
*सा नः सीते पयसाभ्याववृत्स्वोर्जस्वती घृतवत् पिन्वमाना ||९||*
🚩

तूप आणि दूध यांनी उत्तम प्रकारे भूमी सिंचन करावी.

येथे *पंचामृताने भूमी सिंचन करावी* असे म्हटले आहे म्हणजे *वेदकाळात कित्ती सुबत्ता* असेल हे लक्षांत येते.

अन्न हे धान्यापासून निर्माण होते. धान्याशिवाय ह्या जगात काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे सर्वांनी शक्य झाल्यास *शेती करावी म्हणजे धान्य पिकवावे* असे पराशर ऋषी सांगतात ( *कृषि पराशर ग्रंथ* )

🚩
*अन्नं हि धान्यसंजातं धान्यं कृपया विना न च ।*(७.१)
*तस्मात् सर्वं परित्यज्य कृषिं यत्नेन कारयेत् ॥* (७.२)
🚩

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६५

#वेदविज्ञानरंजन_६५

*_आजचा माझा लेख मुख्यतः शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावा. पालकांनी आणि शिक्षकांनी लेख विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवावा_*
*_विशेषतः गणित अध्यापक मंडळ, गणित शिकविणाऱ्या शिक्षकांनी ह्या लेखाचा आवर्जून अभ्यास करावा तसेच विविध शाळांच्या What's app समूहावर प्रस्तुत लेख पाठविण्यात यावा ही नम्र विनंती_*

आजच्या लेखात आपण वेदकाळातील गणितीय संख्यांच्या उल्लेखांची माहिती घेऊ.

कृष्ण यजुर्वेदात संख्या चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या आहेत.

🚩
सकृत्ते अग्ने नमः | *द्विस्ते* नमः |....
*दशकृत्वस्ते* नमः | *शतकृत्वस्ते* नमः |
*आसहस्रकृत्वस्ते* नमः |
*अपरिमितकृत्वस्ते* नमः |
🚩

O fire, salutations to you once, twice, thrice...
Salutations ten times, hundred times, thousand time,
Salutations to you unlimited times

हे अग्नी! तुला एकदा, दोनदा, तीनदा नमस्कार असो. तुला दहा वेळा, शंभर वेळा, हजार वेळा नमस्कार असो. आणि तुला अनंत वेळा नमस्कार असो.

वेदकाळात संपूर्ण जगात वैदिक संस्कृती नांदत होती. *संपूर्ण अंकगणिताचे ज्ञान भारतीयांना होते. एव्हढेच नव्हे तर दशमान पद्धत सुद्धा भारतीयांना अवगत होती कारण दहाच्या पटीत अग्नीला नमस्कार केला आहे.*

तैत्तिरीय संहिता ७.२.४९ मध्ये खालील श्लोक आहे.

🚩
शताय स्वाहा सहस्राय स्वाहा अयुताय स्वाहा नियुताय स्वाहा प्रयुताय स्वाहा अर्बुदाय स्वाहा न्यर्बुदाय स्वाहा समुद्राय स्वाहा मध्याय स्वाहा अन्ताय स्वाहा... परार्धाय स्वाहा
🚩

वरील श्लोकात *परार्ध* ह्या संख्येपर्यंत स्वाहाकार सांगितला आहे. येथे परार्ध म्हणजे *१०^१७ म्हणजे १० चा घातांक १७*.  इतक्या मोठ्या प्रमाणात संख्यांची गणना करण्याची आवश्यकता वेदकालीन प्रगत गणितशास्त्रात होती.

ऋग्वेद मंडल २ सूक्त १८ मंत्र ५ खालीलप्रमाणे आहे.

🚩
आ विंशता त्रिंशता याह्यर्वाङ् चत्वारिंशता हरिभिर्युजानः |
आ पञ्चाशता सुरथेभिरिन्द्रा षष्ट्या सप्तत्या सोमपेयम् ||५ ||
🚩

हे इंद्र! तू वीस, तीस घोड्यांद्वारे आमच्या जवळ ये. चाळीस घोड्यांनी युक्त असा तू आमच्या पर्यंत ये. पन्नास, साठ, सत्तर घोड्यांनी युक्त अश्या रथात बसुन सोमरस पिण्यासाठी आमच्याकडे ये.

वरील मंत्रात इंद्राला २०,३०,४०,५०,६०,७० घोड्यांच्या रथात बसून यायची विनंती केली आहे. आता रथाला इतके घोडे जोडता येतील का? निश्चित नाही. मग घोड्यांची संख्या हे कशाचे प्रतिक आहे? तर *घोड्यांची संख्या हे अश्वशक्तीचे प्रतिक आहे. २०,३०४०,५०,६०,७० अश्वशक्ती असलेल्या रथात* बसून ये असे इंद्राला सांगितले आहे. आता इंजिनाची शक्ती मोजण्याचे एकक म्हणजे अश्वशक्ती आहे. ह्याचा अर्थ इंद्र इंजिन असलेल्या रथात म्हणजे *विमानासारख्या वाहनात बसून येत असावा* असा निष्कर्ष आपण काढू शकतो. वेदकाळात *विमाने अस्तित्वात होती* ह्याची उदाहरणे आपण पुढच्या काही लेखांमध्ये पाहूच.

ऋग्वेद मंडल ३ सूक्त ९ मंत्र ९ खालीलप्रमाणे आहे.
🚩
त्रीणि शता त्री सहस्राण्यग्निं त्रिंशच्च देवा नव चासर्पयन् |
🚩

(त्री सहस्राणि, त्रीणि शता, त्रिंशत् च नव च देवा:) तीन हजार तीनशे एकोणचाळीस देवांनी (अग्निं असर्पयन् ) अग्नीचे पूजन केले.

*३३३९ = ३३+ ३०३ + ३००३*

ही संख्या *इंद्रलोकातील देवतांची संख्या* आहे. ज्यांची वेगवेगळी कार्ये आहेत. जसे वायूची देवता पवन, पर्जन्याची देवता इंद्र वगैरे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६४

#वेदविज्ञानरंजन_६४

*_आजचा माझा लेख मुख्यतः शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावा. पालकांनी आणि शिक्षकांनी लेख विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवावा_*
*_विशेषतः गणित अध्यापक मंडळ, गणित शिकविणाऱ्या शिक्षकांनी ह्या लेखाचा आवर्जून अभ्यास करावा तसेच विविध शाळांच्या What's app समूहावर प्रस्तुत लेख पाठविण्यात यावा ही नम्र विनंती_*

आजच्या लेखात आपण गणितातील काही नियम पाहणार आहोत. *ब्रह्मगुप्त ह्यांनी त्यांच्या ब्रह्मस्फुटसिद्धांत ग्रंथात* धन (positive ) आणि ऋण (negative ) संख्यांचे नियम लिहून ठेवले आहेत. ते नियम आपण पाहू.

*धन संख्या आणि ऋण संख्या ह्यांच्या बेरजेचे नियम*

*१. दोन धन संख्यांची बेरीज धन संख्या आणि दोन ऋण संख्यांची बेरीज ऋण संख्या असते*

🚩 *धनयोर्धनम्ऋणमृणयोः* 🚩

७+३=१० आणि -७+(-३)= - १०
p+p= positive and  n+n=negative

*२. धन आणि ऋण संख्या ह्यांची बेरीज म्हणजे त्यांच्या स्थानीय किंमतीमधील फरक होय*

🚩*धनर्णयोरन्तरम्* 🚩

-७ +३= - ४

P+n = difference of their magnitudes

*३.धन आणि ऋण संख्या ह्यांची स्थानीय किंमत समान असेल तर त्यांची बेरीज शून्य असते.*

🚩*समैक्यं खम्* 🚩

-७+ (-७) = ०

P+n =zero if they are of same magnitudes

🚩 *शून्ययोः शून्यं 🚩

०+०= ०
zero +zero =zero

*धन आणि ऋण संख्यांच्या वजाबाकी नियम*

* १.दोन धन संख्यांची वजाबाकी धन संख्या असते*.

🚩 *ऊनमधिकाद्विशोध्यं धनम्* 🚩

७-३=४

Larger p_ smaller p = positive

*२.दोन ऋण संख्यांची वजाबाकी म्हणजे त्यांच्या स्थानीय किंमतींतील फरक असून जी संख्या मोठी असेल त्या संख्येचे चिह्न वजाबाकी करुन आलेल्या अंकाला मिळते.*

🚩ऋणमृणाद्अधिकमूनात् 🚩

-७- (-३) = - ४

*३.शून्यातून शून्य वजा केले असता वजाबाकी शून्य येते.*

🚩शून्यं आकाशम् 🚩

० - ०= ०

zero - zero =zero

*धन आणि ऋण संख्यांच्या गुणाकाराचे नियम*

🚩 ऋणमृणधनयोर्घातो 🚩

*१.एक धन आणि एक ऋण संख्यांचा गुणाकार ऋण संख्या असतो.*

७ x ( - ३) = -२१

N*p= n

*२.दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो*

🚩धनमृणयोः 🚩

-७x(-३)= २१

N*n =p

*३.दोन धन संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो*

🚩धनवधो धनं भवति 🚩

७x३ =२१

P*p = p

*४.दोन शून्यांचा गुणाकार शून्य असतो*

🚩खशून्ययोर्वा 🚩

zero * zero = zero

*धन आणि ऋण संख्यांच्या भागाकाराचे नियम*

*१.दोन धन संख्यांचा भागाकार धन संख्या असतो*

🚩धनभक्तं धनम् 🚩

८÷२ = ४

P÷p=p

*२.दोन ऋण संख्यांचा भागाकार धन संख्या असतो*

🚩ऋणहृतमृणं धनं 🚩

-८ ÷ (- २) = ४

N ÷ n = p

*३.शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार शून्य येतो.*

🚩खमृणधनविभक्तं 🚩

Z÷ p/n= zero

वरील सर्व उदाहरणांवरुन आपल्या लक्षात येते की प्राचीन भारतात गणितशास्त्र अत्यंत प्रगत होते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ६३ - उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि रेखावृत्त*

#वेदविज्ञानरंजन_६३

*टीप : प्रस्तुत लेख माझ्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावेत. ह्या लेखातील माझे नाव काढून घेऊन स्वतःचे  नाव घालून पुढे पाठवू नये*

*उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि रेखावृत्त*

सूर्य सिद्धांत ग्रंथात भूगोलाध्याय ह्या अध्यायातील ३४ व्या श्लोकात ह्या संबंधी विस्तृत माहिती दिली आहे.

🚩
अनेकरत्ननिचयो जाम्बूनदमयो गिरिः
भूगोलमध्यगो मेरुरुभयत्र विनिर्गतः ||३४ ||
🚩

अनेक रत्नांच्या समूहाने युक्त ह्या भूगोलाच्या म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून आणि पृथ्वीच्या दोन भागांतून ( *उत्तर आणि दक्षिण*  ) जाणारा हा मेरू पर्वत आहे. ह्याचा अर्थ पृथ्वी गोल आहे हे भारतीय विद्वानांना ज्ञात होते. हे सांगण्यासाठी *परदेशी विद्वानांची आवश्यकता नाही.*

येथे रेखांशाची संकल्पना मांडली आहे. पृथ्वीला दोन ध्रुव असतात. त्या *उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारी जी रेखा असते त्याला आपण रेखावृत म्हणतो.* ते रेखावृत्त म्हणजेच  पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेला मेरू पर्वत आहे. किंवा ज्याचे अजून एका प्रकारे विश्लेषण करता येईल की पृथ्वीच्या मध्यातून म्हणजे *उत्तर आणि दक्षिण ध्रुवातून गेलेला मेरू पर्वत म्हणजे पृथ्वीचा आस असावा, ज्याच्या भोवती पृथ्वी फिरते आहे.*

🚩
उपरिष्टात् स्थितास्तस्य सेन्द्रा देवा महर्षयः |
अधस्तादसुरास्तद्वद् द्विषन्तो$न्योनमाश्रिताः ||
🚩

*मेरु पर्वताच्या वरच्या भागात (उत्तर ध्रुव ) इंद्र देवता आणि महर्षी गण राहतात आणि खालच्या (दक्षिण ध्रुव) भागात असुर लोक राहतात. देव आणि असूर यांच्यात परस्पर द्वेष भावना असते.*

उत्तर भागात देवता राहतात असे म्हटले आहे. देवता म्हणजे सकारात्मक ऊर्जा positive energy आणि दक्षिण भागात असुर राहतात म्हणजे नकारात्मक ऊर्जा negative energy. येथे स्पष्ट केले आहे की पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा धन प्रभारित असतो आणि दक्षिण ध्रुव हा ऋणप्रभारित असतो. *धन प्रभार - positive energy - देवता*
*ऋण प्रभार - negative energy - असुर*
आणि त्यांच्यात *परस्पर द्वेषभावना असते म्हणजे दोन विरुद्ध प्रभार असतात.*

चुंबकाची सुई उत्तर दिशा म्हणजे उत्तर ध्रुवाची दिशा दाखवते. खरे पाहता उत्तर दिशा दाखविणारा चुंबकाचा दक्षिण ध्रुव असतो. विजातीय ध्रुवांमध्ये परस्पर आकर्षण असते (opposite poles attract each other ) त्यामुळे चुंबकाचा दक्षिण ध्रुव (negative ) हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे ( positive ) आकर्षिला जातो. हे सर्व आधुनिक विज्ञान सांगते. पण *सूर्यसिद्धांत ह्या ग्रंथात हजारो वर्षांपासून हेच लिहिले आहे.*  म्हणूनच दक्षिणेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे रक्ताभिसरण होताना ते पायाकडे होते आणि मेंदूला तुलनेने कमी रक्तपुरवठा होतो. असे आपले शास्त्र सांगते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...