#वेदविज्ञानरंजन_५५
*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*
🌺 *अनेक सूर्य, अनेक ब्रह्मांड* 🌺
नासाने मान्य केल्यानुसार विश्वात अनेक आकाशगंगा आहेत त्या अनेक आकाशगंगांचे अनेक सूर्य देखील आहेत. हा शोध नासा ह्या संस्थेला काही दुर्बिणी किंवा अवकाशयाने ह्यांच्या माध्यामातून लागला आणि हा शोध अगदी अलिकडचा आहे. जगातील सर्वांत प्राचीन लिखित वाङ्मय असलेल्या *वेदांमध्येदेखील ह्याचा उल्लेख आहे.* त्याचा अभ्यास आपण करू.
अथर्ववेद कांड १३, सूक्त ३, मंत्र १० मध्ये सात सूर्याचा उल्लेख आहे
🚩यस्मिन् *सूर्या* अर्पिताः *सप्त* साकम् ||१०|| 🚩
ब्रह्मांड जे एकत्र झालेल्या तेजाने व्यापले आहे त्यात *सात सूर्य एकत्र राहतात.* त्यांची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : *शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्ररूप*
महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या वेदांनी ह्या सात सूर्याचा अभ्यास करून *त्यांच्या तत्त्वांना नांवे सुद्धा दिली आहेत* जे अजून आधुनिक पाश्चिमात्य वैज्ञानिकांना जमले नाही.
सामवेदाचे एक ब्राह्मण आहे त्याला *ताण्ड्य ब्राह्मण* असे म्हणतात. त्यात अध्याय २३, खंड १५, मंत्र ३ मध्ये पुन्हा एकदा सात सूर्यांचा उल्लेख केला आहे.
त्रि वै *सप्त सप्तादित्याः* ||३||
ह्यात सुद्धा *सात सूर्यांचा उल्लेख* आहे.
ऋग्वेद मंडल ९, सूक्त ११४, मंत्र ३ ह्या मध्ये अनेक सूर्यांचा उल्लेख केला आहे.
सप्तदिशो *नानासूर्याः* सप्त होतार ऋत्विज:|
देवा आदित्या ये सप्त तेभिः सोमाभि रक्ष न
इन्द्रायेन्दो परि स्रव||
सात दिशा, ऋतू, यज्ञकर्ता सात ऋत्विज आणि सात सूर्य आहेत. हे सोमा! त्यांच्या बरोबर आमचे पण रक्षण कर आणि तू इंद्रासाठी वाहत रहा.
समर्थ रामदास स्वामी ह्यांनी सुद्धा *लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा असे म्हटले आहे. म्हणजेच अनेक ब्रह्मांडे आहेत आणि त्यात माळा म्हणजे आकाशगंगा आहेत हे समर्थ रामदास स्वामी ह्यांना ज्ञात होते.*
आपल्या प्राचीन संस्कृत वाङ्मयात हे सर्व सिद्धांत मांडले आहेत असे दिसून येते. इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्राचीन काळी अवकाशयाने, दुर्बिणी अशी साधने नव्हती तरीदेखील अचूक शास्त्रीय माहिती कशी काय मिळाली? इतका अचूक तर्क करणे शक्य आहे काय? तर ह्याचे उत्तर असे देता येईल की *अवकाशयाने प्राचीन भारतात अस्तित्वात होती, त्यातून अवकाशयात्रा होत असे. ह्याचे पुरावे वेदांमध्ये दिले आहेत.*
किंवा दुसरे उत्तर म्हणजे *योगबळाने आपल्या ऋषींनी हे ज्ञान मिळवले असावे. सूक्ष्मरूप घेऊन विश्वात संचार करून हे अमूल्य ज्ञान प्राप्त करून घेतले असावे.*
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका* हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार* ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण
No comments:
Post a Comment