माझा परिचय

Saturday, 6 May 2023

वेदविज्ञानरंजन - ५६

 


#वेदविज्ञानरंजन_५६

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *पाण्यातील वायू आणि वेद* 🌺

पाण्यातील ऑक्सिजन -  अग्नी आणि हायड्रोजन -  सोम ह्याचे वेदांतील वर्णन आपण पाहू.

*अथर्ववेद* कांड ३, सूक्त १३, मंत्र ५ खालील प्रमाणे आहे.

🚩आपो भद्रा घृतमिदाप *आसन्नग्नीषोमौ* बिभ्रत्याप इत्ताः |
तीव्र रसो मधुपृचामरंगम आ मा प्राणेन सह वर्चसा गमेत् ||५||🚩

जल हे कल्याण करणारे आणि तेज वाढविणारे आहे. *हे जल अग्नी आणि सोम धारण करतात.* पूर्ण तृप्ती देणारा हा मधुर रस जीवन आणि तेजाबरोबर मला प्राप्त होवो.

पाण्यामध्ये असे काही घटक आहेत त्यामुळे आपले तेज वाढते. *शुद्ध पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन* याच दोन घटकांनी तयार होते असे आधुनिक विज्ञान सांगते. वरील मंत्रात पाण्यात अग्नी आणि सोम आहेत असे स्पष्टपणे नमूद केले आहे. म्हणजेच *ऑक्सिजन -  अग्नी आणि हायड्रोजन -  सोम ह्या पाण्यात आहेत असे स्पष्ट होते.*

*ऋग्वेद* मंडल १, सूक्त २३, मंत्र २० खालील प्रमाणे आहे.

🚩अप्सु मे *सोमो* अब्रवीदन्तर्विश्वानि भेषजा
*अग्निं* च विश्वशम्भुवमापश्च विश्वभेषजीः ||२० ||🚩

जलात सर्व प्रकारची औषधे आहेत आणि *सर्वांना सुख देणारा अग्नी आणि सोम सुद्धा आहेत.*
आत्ताची water theory सुद्धा हेच सांगते

ब्रह्मांड पुराण २४/६ मत्स्य पुराण १२८/५-६ वायू पुराण ५३/५ मध्ये पाण्यामध्ये अग्नी आहे ह्याचे वर्णन केले आहे.

  🚩वैद्यतो जाठर सौरो ह्यपागर्भास्त्रयो$ग्नयः |
तस्मादप पिबन् सूर्यो गोभिर्दीप्यत्यसौ दिवि ||🚩

जलाच्या गर्भात (अपागर्भ ) *तीन प्रकारचा अग्नी* असतो.
विद्युत म्हणजेच त्या *अग्निपासून विद्युत निर्मिती* करता येते, पाणी हा विजेचा सुवाहक आहे.
जाठर म्हणजे पाण्याच्या जठरात, *गर्भात असा अग्नी आहे की जो भडकलेल्या अग्नीला शांत करतो.*  हिर्‍याने हिरा कापतात त्याप्रमाणे पाण्यात असलेल्या जाठर नावच्या अग्नीमुळे भडकलेला अग्नी शांत होतो. त्यामुळेच आग शांत करण्यासाठी पाणी फवारण्यात येते. पाण्याच्या गर्भात म्हणजे समुद्राच्या तळाशी सुद्धा अग्नी असतो त्याला *वडवानल* असेही म्हणतात

*अथर्ववेद*  कांड १० सूक्त ८ मंत्र ४०

🚩 *अप्स्वा$सीन्मातरिश्वा* प्रविष्ट: प्रविष्टा देवा : सलिलान्यासन् |🚩

वायू (मातरिश्व ) जळात प्रविष्ट आहे. सर्व देव जळात प्रविष्ट आहेत. आता पाण्यात कोणते वायू असतात? ऑक्सिजन आणि हायड्रोजन येथे *मातरिश्वा म्हणजे ऑक्सिजन* होय.

ऋग्वेद मंडल ७ सूक्त ४९ मंत्र ४ खालीलप्रमाणे आहे.

🚩 यासु राजा वरुणो यासु सोमो विश्वे देवा यासूर्जं मदन्ति |
वैश्वानरो यास्वग्निः प्रविष्टस्ता आपो देवीरिह मामवन्तु ||४||🚩

*वरुण*  पाण्यात राहतो. *सोम* पाण्यात राहतो. विश्व संचालक *अग्नी पाण्यात राहतो. हे दिव्य जल! आमचे रक्षण करा.*

ऋग्वेद, अथर्ववेद, पुराणे ह्यात अगदी ठासून सांगितले आहे की *पाण्यात वरुण, सोम आहेत म्हणजेच आत्ताच्या भाषेत पाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्यांच्या संयोगाने तयार झाले आहे.* वेदकाळात पाण्यातील घटकांना वेगळी नावे होती आत्ताच्या विज्ञानात त्याला वेगळी नावे आहेत इतकेच. आपल्या पुरातन वैदिक वाङ्मयात अगदी स्पष्ट पुरावा दिला आहे.

आपल्याला शाळांतून शिकविण्यात आले आहे की पाण्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस असतो ह्याचा शोध Henry Cavendish (1731 - 1810 ) ह्या शास्त्रज्ञांनी लावला. वेद, पुराणे ह्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही ह्याचे कारण मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धती. अजूनही आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत जगतो आहोत हे दुर्दैव आहे. आपण विज्ञाननिष्ठ राहून वेद, उपनिषदे, पुराणे ह्यांचा अभ्यास करायला हवा आणि आपली उज्ज्वल भारतीय परंपरा, त्यातील ज्ञान जगासमोर आणायला हवे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व what's app ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...