माझा परिचय

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १४ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग २

वेदविज्ञानरंजन - १४ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग २


ह्या आधीच्या  लेखामध्ये आपण पृथ्वीचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे ) , परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे ), दिवस- रात्र यांचे चक्र ह्याविषयी काही उदाहरणे पाहिली. आज आणखी काही उदाहरणे पाहू.

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग २

ऋग्वेद (१०.१८९.३) मध्ये खालील श्लोक आहे

त्रिं॒शद्धाम॒ वि रा॑जति॒ वाक्प॑तं॒गाय॑
धीयते । प्रति॒ वस्तो॒रह॒ द्युभि॑: ॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

त्रिंशत् । धाम । वि । राजति । वाक् । पतङ्गाय । धीयते । प्रति । वस्तोः । अह । द्युऽभिः ॥

वाक् म्हणजे पृथ्वी  (वाचा, वाणी नव्हे ), वस्तोः म्हणजे दिवस रात्रीच्या (अहोरात्र ), त्रिंशत धाम म्हणजे तीस मुहूर्त (दिवसाच्या चोवीस तासांचे विभाजन ) विराजते म्हणजे प्राप्त होते, द्युभिः म्हणजे दिनक्रमाने, पतङ्गाय म्हणजे सूर्यात आश्रय घेते.

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

पृथ्वी सूर्यावर आश्रित असल्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्री तीस मुहूर्त होतात.

येथे आश्रित असल्याने म्हणजे सूर्यावर अवलंबून आहे म्हणजेच सूर्याच्या आकर्षण शक्तीने बांधलेली आहे. ती सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरते त्यामुळे दिवस, रात्र, ऋतू निर्माण होतात.

अथर्ववेद (१२.१.१८) मधील खालील श्लोक लिहिला आहे :

म॒हत्स॒धस्थं॑ मह॒ती ब॒भूवि॑थ म॒हान्वेग॑ ए॒जथु॑र्वे॒पथु॑ष्टे।

महती म्हणजे तू खूप मोठी आहेस, महत् सधस्थम् म्हणजे तुझा सहवास सुद्धा खूप मोठा आहे. महान्वेग: म्हणजे तुझा मोठा वेग आहे.एजथुःवेपथुः म्हणजे चालणे (सूर्याभोवती फिरणे ) हालणे, डोलणे (स्वतःभोवती फिरणे ) हेसुद्धा मोठे आहे.

येथे पृथ्वीचा वेग, तिचे चालणे म्हणजे परिभ्रमण हालणे, डोलणे म्हणजे परिवलन यांचा स्पष्ट उल्लेख आहे.

अथर्ववेद (१२.१.३६) मधील खालील श्लोक लिहिला आहे :

ग्री॒ष्मस्ते॑ भूमे व॒र्षाणि॑ श॒रद्धे॑म॒न्तः शिशि॑रो वस॒न्तः।
ऋ॒तव॑स्ते॒ विहि॑ता हाय॒नीर॑होरा॒त्रे पृ॑थिवि नो दुहाताम् ||


ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(भूमे) हे भूमि ! (ते) तुझे (ग्रीष्मः) घाम ऋतु [ज्येष्ठ-आषाढ़], (वर्षाणि) वर्षा [श्रावण-भाद्र], (शरत्) शरद् ऋतु [आश्विन-कार्तिक], (हेमन्तः) शीतकाल [अग्रहायण-पौष], (शिशिरः) शिशिर [माघ-फाल्गुन] आणि (वसन्तः) वसन्त ऋतू [चैत्र-वैशाख] (ऋतवः) ऋतु आहेत , [उनको] (पृथिवि) हे पृथिवी ! (विहिताः) विहित [स्थापित] (हायनीः) अनेक वर्षांपर्यंत (ते) तुझे (अहोरात्रे) दिन-रात्र [दोन] (नः) पूर्ण होतात.

वरील श्लोकातून दिसून येते की पृथ्वीवरील सहा ऋतू आणि दिवसरात्र ह्याचे ज्ञान वेदकाळातील ऋषींना होते. आता साधे निरीक्षण पहा की दिवस- रात्र, आणि ऋतूंचे चक्र हे पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण यांमुळे निर्माण होते.

नेहमीप्रमाणेच आपण ह्या सर्व शोधांचे श्रेय निकोलस कोपर्निकसन ह्यांना देऊन मोकळे झालो. आपले वेद ( ज्यांचा काळ सुद्धा निश्चित करणे अवघड आहे, इतके ते प्राचीन आहेत ) सुद्धा आपल्याला हेच सर्व सिद्धांत सांगत आहेत पण मुख्य मुद्दा हाच आहे की लक्षांत कोण घेतो?

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...