माझा परिचय

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १३ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

 वेदविज्ञानरंजन - १३ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

ह्या  लेखांमध्ये आपण पृथ्वी गोल आहे ह्या सिद्धांताची वैदिक ग्रंथांतील उदाहरणे पाहिली. आजच लेखात आपण पृथ्वीचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे ) , परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे ), दिवस- रात्र यांचे चक्र ह्याविषयी माहिती घेऊया. 

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

अथर्ववेद कांड १२, सूक्त १ आणि मंत्र ४८  मध्ये लिहिले आहे :

म॒ल्वं बिभ्र॑ती गुरु॒भृद्भ॑द्रपा॒पस्य॑ नि॒धनं॑ तिति॒क्षुः।

व॑रा॒हेण॑ पृथि॒वी सं॑विदा॒ना सू॑क॒राय॒ वि जि॑हीते मृ॒गाय॑ ॥१.४८॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

मल्वम् । बिभ्रती । गुरुऽभृत् । भद्रपापस्य । निऽधनम् । तितिक्षु: । वराहेण । पृथिवी । सम्विदाना । सूकराय । वि । जिहीते । मृगाय 

मल्वम् म्हणजे धारण सामर्थ्य , गुरुभृत् म्हणजे गुरुत्व, बिभ्रति म्हणजे धारण करणारी (अशी आपली पृथ्वी आहे ) (इथे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ति कार्यरतआहे हे सांगितले आहे. त्यासाठी आपल्याला न्यूटनची आवश्यकता नाही.) 

भद्रपापस्य म्हणजे चांगले, वाईट, निऽधनम् समूह, तितिक्षु: म्हणजे सहन करणारी (अशी पृथ्वी ) वराहेण म्हणजे मेघांबरोबर (काळ्या ढगांबरोबर )(येथे वराह ह्याचा अर्थ डुक्कर असा नसून मेघ असा आहे )   सम्विदाना म्हणजे मिळालेली पृथिवी सूकराय म्हणजे सुखद किरणे असणार्‍या , मृगाय    म्हणजे सूर्यासाठी, वि  जिहीते म्हणजे विविध प्रकार प्राप्त करते.

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

 पृथ्वी आपल्या धारण शक्तीमुळे (गुरूत्वबल ) सर्व पदार्थांना आपल्याकडे धरून ठेवते. पृथ्वी सूर्यासमोरून चालते त्यामुळे पाणी आकाशात चढते (मेघ ) आणि  पृथ्वीवर वर्षाव होतो. प्रस्तुत श्लोकातून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीवर गुरूत्वबल आहे ह्या दोहोंचा अर्थबोध होतो.

आता आपण पृथ्वीच्या परिभ्रमणाचा यजुर्वेदामधील उल्लेख पाहू. यजुर्वेद अध्याय ३ मंत्र ६ मध्ये खालील श्लोक आहे. 

आयं गौः पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन् मा॒तरं॑ पु॒रः। पि॒तरं॑ च प्र॒यन्त्स्वः॑ 

आता ह्याचा अन्वयार्थ पाहू :

आ। अयम्। गौः। पृश्निः। अक्रमीत्। असदत्। मातरम्। पुरः। पितरम्। च। प्रयन्निति प्रऽयन्। स्वरिति स्वःआ) अभ्यर्थे (अयम्) प्रत्यक्षः (गौः) यो गच्छति स भूगोलः। गौरिति पृथिवीनामसु पठितम्। (निघं॰१.१) गौरिति पृथिव्या नामधेयम्। यद् दूरं गता भवति। यच्चास्यां भूतानि गच्छन्ति (निरु॰२.५) (पृश्निः) अन्तरिक्षे। 


ही गोलरूपी पृथ्वी  पितरम्  म्हणजे पालन करणार्‍या, स्वः म्हणजे सूर्यलोकाच्या, पुरः म्हणजे पुढे पुढे, मातरम् म्हणजे आपल्या योनीरूप जलासमवेत, पृश्निः म्हणजे अंतरिक्ष - अंतराळात, आक्रमित म्हणजे चारही बाजूंनी फिरते. 

ह्याचा सोपा अर्थ पाहू : 

माणसांनी हे जाणले पाहिजे की, जल व अग्नी यांनी निर्माण झालेली ही पृथ्वी जलासह अंतरिक्षामध्ये सूर्याभोवती आपल्या कक्षेत फिरत असते त्यामुळेच क्रमाक्रमाने दिवस व रात्र शुक्ल किंवा कृष्णपक्ष, ऋतू व अयन इत्यादी काल विभाजन होत असते.

अथर्ववेद कांड १२, सूक्त १, मंत्र १० मध्ये लिहिले आहे : 

याम॒श्विना॒वमि॑मातां॒ विष्णु॒र्यस्यां॑ विचक्र॒मे।

ह्याचा अर्थ पाहू :

(याम्)  ज्या (भूमीवर ) (अश्विनौ) दिन आणि रात्र (अमिमाताम्) मोजतात म्हणजेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र असे चक्र सुरु असते कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते (पृथ्वीचे परिवलन) 

अथर्ववेद कांड १२, सूक्त १, मंत्र १८ मध्ये लिहिले आहे : 

म॒हत्स॒धस्थं॑ मह॒ती ब॒भूवि॑थ म॒हान्वेग॑ ए॒जथु॑र्वे॒पथु॑ष्टे।

महती म्हणजे तू खूप मोठी आहेस, महत् सधस्थम् म्हणजे तुझा सहवास सुद्धा खूप मोठा आहे. महान्वेग: म्हणजे तुझा मोठा वेग एजथुः म्हणजे चालणे (सूर्याभोवती फिरणे ) आणि वेपथुः म्हणजे हालणे (स्वतःभोवती फिरणे ) हेसुद्धा मोठे आहे. 

सर्व विद्वानांनी वेदांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला तर अजून काही नवीन सिद्धांत सापडतील की जे अजून आधुनिक विज्ञानाने मांडले नाहीत. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...