माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७८

 

#वेदविज्ञानरंजन_७८

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - २*

वाल्मीकी रामायणातील युद्धकांडात रावणाच्या लंकेतील विविध अद्ययावत यंत्रांचा उल्लेख केला आहे.

द्वारेषु तासां चत्वारः सङ्‌क्रमाः परमायताः ।
*यंत्रैरुपेता* बहुभिः महद्‌भिः गृहपंक्तिभिः ॥ १६ ॥

उक्त चारी दरवाजांच्या समोर त्या खदंकावर मचाणांच्या रूपात चार संक्रम ॥*॥ (लाकडाचे पूल) आहेत जे फारच विस्तृत आहेत त्यावर बरीचशी मोठ मोठी यंत्रे लावलेली आहेत आणि त्यांच्या आसपास परकोटावर बनविलेल्या घरांच्या रांगा आहेत. ॥१६॥
(॥*॥- संक्रम : असे कळून येत आहे की संक्रम अशा प्रकारचे पूल होते की ज्यांना जेव्हां आवश्यकता असेल तेव्हा यंत्रांच्या द्वारा खाली पाडले जात असे, म्हणूनच शत्रूची सेना आल्यावर तिला खंदकात पाडण्याची योजना होती.

शत्रुसैन्य पुलावर आले की मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने तो पूल पाडला जात असे. ह्या पुलाखाली पाण्याने भरलेले प्रचंड मोठे खंदक होते. साहजिकच शत्रुसैन्य खंदकात पडून बुडून जात असे. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी की सर्वांत आधी चाल करून येणारे शत्रुसैन्य उभे राहू शकेल इतका *बळकट पूल* निर्माण करायला हवा. म्हणजेच पूल तयार करण्याचे तंत्र अवगत हवे. त्यानंतर असा दणकट पूल पाडण्यासाठी तितकेच *मजबूत यंत्रही हवे.* ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान *त्रेतायुगात अवगत होते* हे निश्चित आश्चर्य वाटणारे आहे.

त्रायन्ते सङ्‌क्रमास्तत्र परसैन्यागते सति ।
*यंत्रै* स्तैरवकीर्यन्ते परिखासु समन्ततः ॥ १७ ॥

जेव्हा शत्रूची सेना येते, तेव्हा यंत्रांच्या द्वारा त्या संक्रमांचे रक्षण केले जाते तसेच त्या यंत्रांच्या द्वाराच त्यांना सर्व बाजूनी खंदकात पाडले जाते आणि तेथे पोहोचलेल्या शत्रूसेनेला सर्व बाजूस फेकून दिले जाते. ॥

परिखाश्च शतघ्न्यश्च *यंत्राणि विविधानि* च ।
शोभयन्ति पुरीं लङ्‌कां रावणस्य दुरात्मनः ॥ २३ ॥

खंदक, शताघ्नि आणि *तर्‍हेतर्‍हेची यंत्रे* दुरात्मा रावणाच्या त्या लंकानगरीची शोभा वाढवीत आहेत. ॥२३॥

वरील श्लोकात पुन्हा एकदा विविध प्रकारच्या यंत्रांचा उल्लेख केला आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...