माझा परिचय

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - ९ : पृथ्वी गोल आहे - भाग १

 वेदविज्ञानरंजन - ९ : पृथ्वी गोल आहे - भाग १ 

 पृथ्वी गोल आहे - भाग १

भूगोलाच्या किंवा विज्ञानाच्या पुस्तकात पृथ्वी गोल आहे (भू- गोल) असा सिद्धांत मांडून तो विद्यार्थ्यांना शिकविला जातो. त्यासाठी नेहमीप्रमाणे ह्या सिद्धांताचे श्रेय पाश्चात्य शास्त्रज्ञांना देऊन आपण मोकळे होतो. आपल्या प्राचीन ग्रंथांची हेटाळणी करणाऱ्यांची टीका अशी आहे की पृथ्वी चपटी आहे असे भारताचे ज्ञान आहे. ह्याचे खंडन करण्यासाठी खालील उदाहरणे पाहू.

आता आपण थोर भारतीय गणिती आर्यभट्ट ( कार्यकाळ अंदाजे इ. स. ४७६ ते  इ. स. ५५०) यांनी पृथ्वी गोल आहे ह्याचे कसे प्रतिपादन केले आहे ते पाहू

वृत्तपंजरमध्ये कक्ष्या परिवेष्टित: खगमध्यगतः । मृञ्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः 

वर्तुळाकार अशा, नक्षत्रांच्या पिंजऱ्यात ( म्हणजेच नक्षत्रांनी बनलेल्या खगोलाच्या ) मध्यभागी, ( ग्रहांच्या ) कक्षांनी परिवेष्टित अशी पृथ्वी आकाशमध्यावर आहे. तसेच माती, पाणी, तेज व वायू यांनी बनलेला हा भूगोल ( पृथ्वीरूपी गोल ) सर्व बाजूंनी गोल (वृत्तः) आहे.

अनुलोमगतिर्नौस्थः पश्यत्यचलं विलोमगं यद्वत्।

अचलानि भानि तद्वत् समपश्चिमगानि लंकायाम्।।  (आर्यभटीय, गोलपाद, श्लोक ९)

नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाणाऱ्या नावेवरील माणसास ज्याप्रमाणे काठावरील डोंगर, टेकडी किंवा स्थिर वस्तू प्रवाहाच्या उलट दिशेने मागे जात आहेत असे वाटते. त्याचप्रमाणे लंकेतील ( विषुववृत्तावरील ) मनुष्यास नक्षत्रे स्थिर असूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे सारख्याच गतीने जात आहेत असे वाटते. (पृथ्वीचे परिवलन - परिभ्रमण )

अशाप्रकारे पृथ्वी गोल आहे ह्याची अनेक उदाहरणे आपल्या पुरातन, प्राचीन वाङ्मयात सापडतात परंतु, आपण पृथ्वी गोल आहे ह्याचे श्रेय मात्र निकोलस कोपर्निकस  (कार्यकाळ : १९ फेब्रुवारी इ. स. १४७३ - २४ मे इ. स. १५४३) ह्या शास्त्रज्ञाला दिले. शालेय भूगोलाच्या पुस्तकात हेच  शिकविले जाते.

कोपर्निकस आणि गॅलिलिओ ह्यांनी हा सिद्धांत मांडला तेव्हा चर्चने त्यांना दोषी ठरविले कारण बायबल मध्ये सांगितले आहे की पृथ्वी गोल नाही आणि ती स्थिर असून इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात.  म्हणजे १४ शे १५ शे सालापर्यंत परदेशाला काही माहिती नव्हते. परंतु आपल्याकडे त्या आधीच १००० वर्षे हे माहिती होते. मग आता मला सांगा की पाश्चात्य संस्कृती मागास होती की आपली वैदिक संस्कृती मागास होती?  हे सर्व माहीत असून सुद्धा पाठ्यपुस्तकात खरी माहिती ठेवायला आपले सरकार तयार नाही? सगळीकडे हिंदुत्व आड येते???

आपलेच सिद्धांत जेव्हा परदेशी माणूस आपल्याला सांगतो तेव्हाच आपल्याला पटते ही आपली शोकांतिका आहे. इंग्रजांनी त्यांची ख्रिश्चन संस्कृती, त्यांची शिक्षण प्रणाली आपल्यावर लादली के मान्य आहे. परंतु, स्वातंत्र्याची ७५ वर्षे होऊन सुद्धा आपल्या संस्कृतीचा प्रसार होत नाही हे दुर्दैव  आहे. भारतीय विज्ञान शिक्षण मंडळाला पृथ्वी गोल आहे ह्याचा शोध पुरातन वेदांमध्ये, आणि प्राचीन ग्रंथांत शोधावे असे कधीच वाटले नाही का?? निदान आता तरी सरकारने ह्यात लक्ष घालावे आणि *विज्ञान, भूगोल ह्याच्या पाठ्यपुस्तकात पृथ्वी गोल आहे ह्या सिद्धांताच्या उदाहरणांचा समावेश करावा ही नम्र विनंती. सर्व पालकांना, शिक्षकांनाही नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ह्याची माहिती जरूर द्यावी.


🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


 


 


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...