माझा परिचय

Tuesday, 20 December 2022

वेदविज्ञानरंजन - ७ छांदोग्य उपनिषदातील सूर्याचे वर्णन



वेदविज्ञानरंजन - ७

आज आपण उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या सूर्याच्या पृष्ठभागाची माहिती घेऊ.

छांदोग्य उपनिषदांमध्ये (अंदाजे इ. स. पू. ८ वे किंवा ६ वे शतक ) सूर्याच्या पृष्ठभागाचे वर्णन करण्यात आले आहे. तृतीय प्रपाठक, खंड पहिला (सूर्याची देवमधु संकल्पना ) ह्यात  खालीलप्रमाणे श्लोक उपलब्ध आहे. 

ॐ असौ वा आदित्यो देवमधु तस्य द्यौरेव |

तिरश्चीनवंशो अंतरिक्षपूपो मरिचयः पुत्रा: ||

ह्याचा अर्थ असा की आदित्य भगवान ह्याची भक्ती जरूर करावी कारण आदित्य हा देवांचा मध (देवमधु) आहे. ह्याचा द्यौ लोक आणि आदित्य लोक असा आहे कि जिथे ह्या मधाचे पोळे आहे. अंतराळातील सूर्याची किरणे मध गोळा करण्याचे काम करतात.

त्याच उपनिषदांमध्ये पुढे काही श्लोक दिले आहेत. त्याचा फक्त अर्थ इथे देतो.

तस्य ये प्राञ्चो रश्मयस्ता एवास्य प्राच्यो मधुनाड्यः |

ऋच एव मधुकृत ऋग्वेद एव पुष्प ता अमृता आपस्ता वा एता ऋचः ||

ह्याच सूर्याची पूर्व दिशेकडून येणार किरणे मध उत्पन्न करतात. ऋग्वेद हा सुगंधित पुष्प आहे आणि त्याच्या ऋचा ह्या मध गोळा करणार्‍या मधमाशा आहेत. ह्या ऋग्वेद रुपी फुलाचे अध्ययन केल्याने आपल्याला यश, तेज, ऐश्वर्य, आणि अन्न प्राप्त झाले आहे.

म्हणजेच छांदोग्य उपनिषदांमध्ये सूर्याचा पृष्ठभाग हा मधमाशांच्या पोळ्यासारखा ( honeycomb) आहे असे उदाहरण देऊन सांगितले आहे. इथे फक्त आणी फक्त मधमाश्यांच्या पोळाचाच उल्लेख केला आहे. इतर कोणतीही उपमा दिली नाही. हे प्रत्यक्ष जाण्याशिवाय शक्य नाही. आता आधुनिक विज्ञान ह्याबाबत काय म्हणते ते पाहू.

Danial K. Inouye Solar Telescope ह्या दुर्बिणीद्वारे आधुनिक विज्ञानाने सूर्याच्या पृष्ठभागाचा शोधून घेतला आणि त्यावर खालील मुद्दा मांडला आहे.

The surface of the Sun is like honeycomb. The honeycomb like pattern is made up of of cells of plasma that roil over the Sun's entire surface and draw heat from the center of the Sun

म्हणजेच आधुनिक वैज्ञानिक टेलिस्कोप द्वारा सूर्याचा अभ्यास केल्यावर सूर्याचा पृष्ठभाग हा मधमाशीच्या पोळ्यासारखा आहे असे शास्त्रज्ञांना आढळून आले. मग हाच मुद्दा आजपासून हजारो वर्षे आधी लिहिलेल्या छांदोग्य उपनिषदांमध्ये मांडण्यात आला होता ह्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होते. त्या काळी telescope सारखी अत्याधुनिक साधने नव्हती असे जर मानले तर मग इतका अचूक मुद्दा उपनिषदांमध्ये कसा काय मांडला?

ह्याचा अर्थ काढता येईल की हजारो वर्षांपूर्वी उत्तम प्रतीच्या दुर्बिणी म्हणजेच telescope तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतीय ऋषींना अवगत होत किंवा योग बळावर, ध्यानात जाऊन त्यांनी सूर्याचा पृष्ठभाग जाणून घेतला असावा. खगोल शास्त्राचा (astronomy ) अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी भारतीय वेदांतील खगोलशास्त्र सुद्धा अभ्यासावे भारतीय वेद, उपनिषदे ही ऋषिमुनींचा वेळ जात नव्हता म्हणून काहीतरी बिनबुडाच्या कल्पना करून आणि फक्त देवांची स्तुती करण्यासाठी लिहिलेली नसून वैज्ञानिक सिद्धांत त्यात ठासून भरले आहेत. हेच सांगायचा माझा प्रयत्न आहे.

जयतु वेदविज्ञानम् 

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

1 comment:

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...