माझा परिचय

Thursday 8 December 2022

वेदविज्ञानरंजन - १

 वेदविज्ञानरंजन - १



सर्वप्रथम आपण आज गुरुत्वाकर्षण बल, त्याचा प्राचीन ऋषींनी मांडलेला सिद्धांत पाहणार आहोत. 

परमाणूची संकल्पना मांडणारे महर्षी कणाद (अंदाजे इ. स. पू. ४थे किंवा ५ वे शतक ) यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रांत  गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे.  

संयोगाभावे गुरूत्वात् पतनम्  असे अतिशय सोपे सूत्र म्हणजेच गुरुत्वाकर्षण सिद्धांत होय. 

आता त्याचा अर्थ सोप्या भाषेत पाहू. 

संयोगाभावे म्हणजे एखाद्या वस्तूवर जर संयोगाचा म्हणजेच बलाचा अभाव असेल तर ती वस्तू गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे (गुरूत्वात् ) खाली पडते (पतनम् ) 

In the absence of SANYOG (contact with external forces ) an object falls  due to GURUTVA (Mass) अतिशय सुंदर आणि सूत्रबद्ध रीतीने महर्षी कणाद यांनी हे सूत्र मांडले आहे. अजून एका ऋग्वेदातील ऋचेत गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 

 अजः न क्षाम् दाधार पृथिवीम् तस्तम्भ द्याम् मंत्रेभिः सत्यैः  

ह्याचा अर्थ खालीलप्रमाणे 

The unborn force of field (अजः) , keeps us (नाह ) rooted to the earth (क्षाम् ). The same ever resent force (तत् ) or field holds (स्तम्भ ) the earth (पृथिवीम् ) in space (द्याम् ) असे काहीतरी बल आहे की जे आपल्याला पृथ्वीवर धरून ठेवते आणि तशाच प्रकारचे बल पृथ्वीला अवकाशात धरून ठेवते. ह्यातून पृथ्वीची स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीला अवकाशात धरून ठेवणारी सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती दोहोंचा अर्थबोध होतो. 

वराहमिहिर ( अंदाजे इ. स. पू. ६ वे शतक ) यांच्या पंचसिद्धांतीका ह्या ग्रंथात त्यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 

गगनम् उपैति शिखिशिखा क्षिप्तम् अपि 

क्षितिम् उपैति गुरू किञ्चित् वद्वदिह 

मानवानामसुराताम् तद्वदेवाधः 

ह्याचा अर्थ खालीलप्रमाणे 

Any heavy object (गुरू ) of thrown above towards the sky falls back to the ground

वस्तुमान असलेली वस्तू आकाशाच्या दिशेने फेकली असता ती जमिनीवर येऊन पडते 

GRAVITY ह्या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन शब्द GRAVIS पासून झाली असून मूळ संस्कृत शब्द GURU (Heaviness, Mass fullness ) असा आहे

थोर गणिती भास्कराचार्य (द्वितीय ) कार्यकाळ अंदाजे इ. स. १११४ ते इ. स. ११८५ ह्यांनी सुद्धा न्यूटनच्या आधी सुमारे ५०० वर्षे सिद्धांत शिरोमणी ह्या ग्रंथात गुरूत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. सिद्धांत शिरोमणी - गोलाध्याय - भुवनकोश ह्यातील गुरुत्वाकर्षण सिद्धांत खालीलप्रमाणे :

 मरुच्लो भूरचला स्वभावतो यतो विचित्रावतवस्तु शक्त्यः |

आकृष्टीशक्तिश्च मही तथा यत् खस्थं गुरुस्वाभिमुखं स्वशक्तया |

आकृष्यते तत्पतीतेव भाति समेसमन्तात् क्व पतत्वियं खे | 

 ह्याचा अर्थ पुढीलप्रमाणे :

पृथ्वीमध्ये आकर्षण शक्ति आहे. पृथ्वी आपल्या आकर्षण शक्तीने पदार्थांना, वस्तूंना आपल्याकडे खेचते आणि आकर्षणामुळे ते जमिनीवर पडतात. अवकाशात मात्र विविध ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांचे संतुलन राखते आणि समान शक्ति सर्व बाजूंनी असल्यामुळे सर्व ग्रह अवकाशात तरंगतात. 

The earth has its own gravitational force due to which an object gets attracted towards the earth and falls on it. But in the space the gravitational force of different planes balances each other and these forces are applied by all sides. Due to which planets can move in the space. 

आता अंदाजे सन १६७८ मध्ये न्यूटन यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षण नियम पाहू :

Every particle  attracts every other particle in the universe with a force which is directly proportional to the production of their masses and inversely proportional to the square of the distance between their centers

आता असे आहे की गुरुत्वाकर्षण नियम प्रस्थापित करण्याचे श्रेय न्यूटनकडे जाते. न्यूटन यांनी सिद्धांत विषद करून सांगितला आणि त्याचे सूत्र (Formula ) सुद्धा सिद्ध केला. ह्याबद्दल काहीच दुमत नाही. परंतु, त्यांच्या आधी कितीतरी शतके भारतीय वेद, उपनिषदे ह्यांत सुद्धा हाच सिद्धांत आपल्या प्राचीन ऋषींनी, वैज्ञानिकांनी सुद्धा केला आहे. परंतु, त्यांचा उल्लेख कुठेही नाही असे का? आता शाळांमधील शिक्षकांनाच प्राचीन भारतीय वेद, उपनिषदे आणि त्यांनी मांडलेल्या सिद्धांताविषयी काही माहिती नाही. तर ते शिक्षक मुलांना काय सांगणार? न्यूटन झाडाखाली बसला होता. वरून सफरचंद खाली पडले आणि त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला ही गोष्ट शाळांमध्ये अगदी रंगवून सांगितली जाते. पण आपल्या वेदांमधील ह्याच सिद्धांतावर काहीही भाष्य केले जात नाही*. हीच आपली शोकांतिका आहे आपल्या भारत देशाचे, शिक्षण अभ्यासक्रमाचे (मेकॉले प्रणीत शिक्षणपद्धती) हे दुर्दैव आहे की जाणीवपूर्वक वेदांतील विज्ञान नजरेआड केले गेले. माझी शालेय शैक्षणिक विभागाला विनंती आहे की गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे श्रेय न्यूटनला जरी दिले गेले असले तरीही शालेय विज्ञान पुस्तकात  वर उल्लेख केलेल्या वेद, उपनिषदे यांतील गुरुत्वाकर्षण सूत्राचा सुद्धा उल्लेख करावा. म्हणजेच आपल्या पूर्वजांचे, वेदांचे ज्ञान किती सखोल होते हे सर्वांना समजेल आणि त्याचा प्रसार होईल. अजून बरेच दाखले द्यायचे आहेत. परंतु ते पुढील लेखात देईन. तूर्तास इथेच थांबतो. 

          🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

टीप : येथे न्यूटन यांना कुठेही कमी लेखायचा हेतू नसून वेद, उपनिषदे ह्यांनी न्यूटनच्या कितीतरी शतके आधीच गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला होता हे ठसवायचे आहे.

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...