#वेदविज्ञानरंजन_४३
🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३* 🌺
गेल्या शनिवारच्या लेखात आपण चंद्र- सूर्यग्रहण तसेच सूक्ष्मजीव ह्यांचा महाभारतातील उल्लेख ह्यावर माहिती घेतली होती. आज *पृथ्वीच्या आकारासंबंधी* अजून माहिती घेऊ
महाभारत भीष्मपर्व अंतर्गत *जम्बूखंडविनिर्मण पर्व* ह्यात सुदर्शन द्वीप म्हणजे *पृथ्वीचे वर्णन* केले आहे.
संजय धृतराष्ट्राला सांगतात की..
सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन |
*परिमण्डलो* महाराज द्वीपोSसौ चक्रसंस्थितः ||१३ ||
हे कुरुनन्दन! मी सुदर्शन नावाच्या द्वीपाचे म्हणजेच पृथ्वीचे वर्णन करतो. महाराज *पृथ्वी ही चक्रासारखी गोलाकार* आहे.
महाभारताचे लेखक वेदव्यास ह्यांनी संजय आणि धृतराष्ट्र ह्यांच्यातील वरील संवाद लिहून ठेवला आहे. येथे *पृथ्वी गोलाकार आहे* असे म्हटले आहे. आता पृथ्वी गोल आहे हे इतके अचूक विधान करण्यासाठी त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि ती *सर्व माहिती संजय ह्यांना होती.* पृथ्वी गोल आहे ह्याची माहिती *सर्वांत आधी अंदाजे इ.स.पू.५०० वर्षे ग्रीक तत्ववेत्त्यांना होती* असे आपल्याला गूगल सांगते. परंतु, आपल्या महाभारत ग्रंथात हीच माहिती एव्हढेच नव्हे तर *पृथ्वीवरील सर्व खंडांची पूर्ण वर्णन दिलेले आहे.* महाभारत हे अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षांपूर्वी लिहिले गेले असल्याने *पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडण्याचा मान महाभारत ग्रंथास आणि वेदव्यास, संजय ह्यांना मिळायला हवा* . *रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ* ह्या माझ्या लेखमालिकेत मी लिहिले होते की पृथ्वी गोल आहे ह्याचा सर्व संदर्भ वाल्मीकी रामायण, किष्किंधा कांड ह्यात दिलेला असून *वानरराज सुग्रीव ह्यांनी पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत* मांडला आहे. आपले *वेद हे जगातील अत्यंत प्राचीन लिखित वाङ्मय* आहे. त्यातसुद्धा पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडला आहे. वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेअंतर्गत मी *पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण ह्याचा वेदांतील उल्लेख* ह्या लेखांमध्ये पृथ्वी गोल आहे ह्याचा उल्लेख केला आहे. थोडक्यात काय तर वेद, रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांत पृथ्वी गोल आहे ह्याचा स्पष्ट उल्लेख असताना ह्याच्या *सिद्धांताचे श्रेय मात्र परदेशी वैज्ञानिकांना* दिले गेले. आपल्या स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली तरीही आपण अजूनही *गुलामगिरीच्या मानसिकतेत* आहोत. आपल्याच ग्रंथातील *अनेक वैज्ञानिक संदर्भ* आपण पुढे आणत नाही, ह्या सर्व ग्रंथांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करीत नाही. ह्याची *खूप खंत वाटते.* आपला *सनातन धर्म हा विज्ञानावर आधारलेला असून अनेक वैज्ञानिक संदर्भ आपल्याला आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करताना सापडतात आणि आपण अचंबित* होतो. परंतु, त्याचा अभ्यास न करता आपण * परदेशी शास्त्रज्ञांचे गोडवे* गाण्यात धन्यता मानीत आहोत. ही सर्व माहिती *पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली तरच नवीन पिढीला समजेल* आणि त्यावर अधिक संशोधन होऊ शकेल. ह्यासाठी *सरकार दरबारी पाठपुरावा* करणे आवश्यक आहे. तूर्तास आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ही सर्व माहिती द्यावी आणि *रामायण, महाभारत असे ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वाचण्यास उद्युक्त* करावे.
महाभारतात चंद्र- पृथ्वी आणि चंद्रावरील डाग ह्यांची खूप छान माहिती मिळते. ती खालीलप्रमाणे
पश्यन्नपि यदा *लक्ष्म जगत् सोमे* न विन्दति
एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ||८||
चंद्रावर जो कलंक आहे ते पृथ्वीचे चिह्न आहे परंतु, ते फक्त पृथ्वीचे चिह्न आहे. प्रत्यक्ष पृथ्वी नाही.
त्याप्रमाणे प्रत्येकाला *मी आहे* ह्या स्वरुपात आत्म्याचे ज्ञान आहे परंतु, संपूर्ण आत्म्याचे यथार्थ ज्ञान नाही.
आपल्याला *चंद्रावर डाग दिसतात ते डाग म्हणजे चंद्रावर संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.* चंद्रावर डाग हा फक्त पृथ्वीचा नकाशा आहे पण प्रत्यक्ष पृथ्वी नाही. याचाच अर्थ प्रत्येकाला स्व चे म्हणजे आत्म्याचे अगदी थोडे ज्ञान असते त्यावरून आत्म्याची कल्पना करता येते. परंतु, संपूर्ण आत्म्याचे ज्ञान होणे खूप कठीण आहे. *चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे. आता चंद्रावरील डाग हे पृथ्वीचा नकाशा कसा? ह्याची *रंजक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.* तोपर्यंत
जयतु वेदविज्ञानम्
No comments:
Post a Comment