माझा परिचय

Sunday, 30 April 2023

वेदविज्ञानरंजन - ५२

 

#वेदविज्ञानरंजन_५२

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ६* 🌺

*अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्यांची संकल्पना* 

*श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ आणि अध्याय २१* मध्ये पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण त्यामुळे निर्माण होणारे दिवस रात्र यांचे चक्र तसेच *अक्षवृत्त आणि रेखावृत्त* यांची कल्पना ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. आपण सविस्तर पाहू.
🚩
एतेन हि दिवो मण्डलमानं तद्विद उपदिशन्ति
यथा द्विदलयोर्निष्पावादीनां ते अन्तरेणान्तरिक्षं
तदुभयसन्धितम् ॥
🚩
वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

तद्विदः हि एतेन यथा निष्पावादीनां *द्विदलयोः* (तथा) दिवः मंडलमानं उपदिशन्ति ते अन्तरेण तदुभयसंधितम् अन्तरिक्षं (अस्ति)|

तज्ञ लोक खरोखर ह्या *भूमंडलप्रमाणावरून* जसे पावटा वगैरेंच्या दोन पानांचे तसे स्वर्गाच्या *वर्तुळाचे प्रमाणे* सांगतात त्याच्या मध्ये त्या दोघांच्या सांध्यावर लागून ठेविलेले आकाश आहे.
येथे *मंडलमानम्* असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजेच ही *पृथ्वी गोल* आहे आणि पृथ्वीवरून दिसणारे आकाश सुद्धा आपल्याला गोल भासते आणि क्षितिजाला टेकलेले दिसते.

🚩
यत्रोदेति तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति
यत्र क्वचन स्यन्देनाभितपति तस्य हैष
समानसूत्रनिपाते प्रस्वापयति तत्र गतं न पश्यन्ति
ये तं समनुपश्येरन् ||
🚩

वरील श्लोकाचा अन्वयार्थ पाहू :

यत्र उदीत तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति एषः यत्र क्वचन स्यंदेन अभितपति तस्य ह समानसूत्रनिपाते प्रस्वापयति ये तं समनुपश्येरन् ते तत्र गतं न पश्यन्ति |

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ज्याठिकाणी उदयाला येतो, त्याच ठिकाणच्या सारख्या *सुताच्या समोरील समांतररेषेत अस्ताला जातो*, हा सूर्य ज्याठिकाणी कोठेतरी *घाम येण्याइतक्या उन्हाने उष्ण प्रकाश देतो*, त्याच्याच सारख्या सुताच्या समोरील समांतर रेषेत असणार्‍यांना *गाढ झोपी नेतो*, जे त्या सूर्याला *स्वतःच्या प्रदेशात* पहातात, ते समोरील *समांतर रेषेतील मध्यरात्री झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात पहात नाहीत.*

वरील श्लोकात पृथ्वीच्या गोलार्धाचे वर्णन केले आहे. ज्या *गोलार्धात सूर्यप्रकाश असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात अंधार असतो.*
गोलार्ध म्हणजेच पृथ्वीचा अर्धा भाग. काल्पनिक रेषांनी पृथ्वीचे दोन भाग आधुनिक विज्ञानाने केले आहेत. अक्षवृत्त : उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, रेखावृत्त : पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध.
पृथ्वी गोल आहे आणि तिचे परिवलन आणि परिभ्रमण यांमुळे दिवस रात्र चक्र घडते ही क्रिया प्राचीन ऋषींना ज्ञात होती त्यांनी वरील श्लोकात *समांतर सूत्र (म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त ह्यांचा) उल्लेख* केला आहे. श्रीमद्भागवत हा आपल्या संस्कृतील अतिशय मान्यताप्राप्त आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळे त्यातील *उल्लेखावर शंका घेण्याचे कारण नाही.* पृथ्वी गोल असल्याने वेगवेगळ्या वेळी सूर्याची वेगवेगळी स्थिती दिसून येते ह्याची संपूर्ण माहिती भारतीय ऋषींना होती. श्रीमद्भागवत पुराणांत ह्याची सविस्तर माहिती दिली आहे. सर्व भागवत आचार्यांना माझी विनंती आहे की भागवतातील श्रीकृष्ण चरित्राबरोबरच इतर स्कंदांतील माहिती सुद्धा सांगावी म्हणजे आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातील वैज्ञानिक तत्वे शोधता येतील.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.*

श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ ही लेखमालिका इथे समाप्त होत असून पुढील शनिवारपासून *वेदांतील विज्ञान ही लेखमालिका चालू होईल*

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...