वेदविज्ञानरंजन - २० - संस्कृत भाषा
संगणकासाठी अतिशय उपयुक्त आणि सर्वाधिक शुद्ध अशी ही आपली अभिजात भाषा आहे. ह्या भाषेचे संवर्धन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेदविज्ञानरंजन ह्या लेखांसाठी संशोधन करताना जे जे संदर्भ मी पाहतो ते सर्व संस्कृत भाषेतच आहेत म्हणूनच आज संस्कृत भाषेतील शब्द विश्वातील विविध भाषांमध्ये कशा प्रकारे सामावलेले आहेत ह्याचा आपण अभ्यास करूया.
खालील प्रदेशांच्या भाषा ह्या संस्कृतोद्भव आहेत.
Avestan of ancient persia, ancient Greek, ancient Latin in Italy and Lithuania and Baltik Nations
सन २०१९ मध्ये लिथुआनिया सरकारने एक पुस्तक प्रसिद्ध केले होते ज्यात लिथुआनिया भाषेतील १०,००० संस्कृत शब्द दिलेले आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती मा. वैंकय्या नायडू यांना हे पुस्तक लिथुआनिया सरकारकडून भेट देण्यात आहे होते. भारतीय मीडियाने ही बातमी दाखवल्याचे मला तरी स्मरत नाही. इथेच आपली चूक होते. आपणच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवणे गरजेचे आहे. आता संस्कृत आणि लिथुआनिया भाषेतील काही साम्य असलेले शब्द पाहू. संस्कृत भाषेतील मूळ शब्द अपभ्रंश स्वरुपात जगातील भाषांमध्ये वापरले जातात.
English Sanskit Lithuanian
Fire agni (अग्नी ) Ugnis (उग्नीस )
God. Deva (देव ) Deivas (देईवास)
Death. Mrutyu(मृत्यू ) Mirtis (मिर्तीस)
Day. Dina.(दिन ) Diena (दिएना )
Tooth. Dant (दंत ) Dantis (दंतिस )
आता इतर काही भाषांमधील संस्कृतोद्भव शब्द पाहू
*Spanish language (स्पॅनिश भाषा )*
English Sanskit Spanish
Name naam (नाम ) nombre (नोम्ब्रे)
Day Din (दिन ) Dias (दिआस )
You twam (त्वम् ) tu, tus (तू,तूस )
Father. Pita (पिता ) Pedre (पेद्रे )
Mother Mata (माता ) Madre (माद्रे )
One. Un (उन ) Uno (उनो )
Two Dwau (द्वौ ) Dos (दोस )
Three Tri (त्रि) Tres (त्रेस )
Dutch Language डच भाषा
English Sanskit Dutch
Name Naam (नाम ). Naam (नाम)
Japanese Language जपानी भाषा
English Sanskit Japanese
The word usedto ask
questions Kim (किम् ) Ka (का )
Name Naam (नाम) Namaye (नामाए )
Service seva(सेवा ) Seva (सेवा )
संस्कृत भाषेतून तयार झालेली विविध देशांची नावे :
Egypt (इजिप्त) - अजपती म्हणजे राम. इजिप्त मध्ये जे प्राचीन शासक होते त्यांची नावे रामेशिस १, रामेशिस २ रामेशिस ह्या शब्दाचा संदर्भ राम +ईश म्हणजेच श्रीरामांशी आहे. आपल्याला माहिती आहे की अरबस्तानात उत्तम प्रकारच्या घोड्यांची पैदास होत असे. अर्व म्हणजे घोडा त्यांचे स्थान म्हणजे अर्वस्थान - अरबस्तानात म्हणजे (Arbastan)
Russia हे नाव ऋषीय ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. ह्या प्रदेशात वैदिक संस्कृतीमध्ये बरेच ऋषी राहत असत. वैदिक ऋषींचे जनक कश्यप ऋषी त्यांच्या नावावरुन समुद्राला कश्यपीय समुद्र Caspian sea असे नाव देण्यात आले. आपल्याला मक्का - मदीना माहिती आहे. मुसलमान धर्मीय हज यात्रेला जातात आणि काबाला प्रदक्षिणा घालतात.काबा हे प्राचीन शिवलिंग आहे असेही काही ठिकाणी वाचनात आले आहे. तर मक्का हा मूळ संस्कृत शब्द मखः म्हणजे यज्ञ ह्या पासून आणि मदिना हा शब्द मेदिनी म्हणजे भूमी ह्या संस्कृत शब्दांतून तयार झालेला आहे. ह्याचा एकत्रित अर्थ
मक्का - मदिना - मखः मेदिनी म्हणजे यज्ञभूमी असा आहे.
Atlantic हा शब्द अटलांटिक अ- तल - अन्त (अथांग, अतल) Guatemala- गौतमालय
प्राचीन काळी मद्र साम्राज्याचा भाग असलेल्या स्पेन ह्या देशाची राजधानी Madrid (माद्रिद) महाभारतातील पांडूची पत्नी माद्री हिच्याशी संबंध असणारे नाव आहे हे.
इटली ह्या देशातील Vatican city (वाटिकन) ह्याचे मूळ नाव वाटिका असे होते. इटली देशाचे जुने नाव एट्रूटिया असे होते. हे नाव मूळ शब्द - एट्री -अत्री म्हणजेच अत्री ऋषींच्या नावाशी साधर्म्य साधणारे हे नाव आहे. मी हे सर्व मला वाटले म्हणून सांगत नाहिये. Vatican city येथे उत्खनन करण्यात आले तेव्हा तेथे शिवलिंग सापडले. ह्याचा उल्लेख Encyclopedia Britannica एट्रूटिया शीर्षक ह्याचा मध्ये आहे. ज्याना इच्छा असेल त्यांनी इंटरनेट वर ह्या संबंधी माहिती वाचावी.
Rome ह्या शहराचे नाव राम ह्याच्या नावावरून आणि Ravenna शहराचे नाव रावण ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. प्राचीन काळी (ख्रिस्तपूर्व काळी ) संपूर्ण विश्वात वैदिक संस्कृती नांदत होती आणि संस्कृत भाषा सर्वत्र प्रचलित होती ह्याचे पुरावे अधून मधून मिळत असतात परंतु, राजकीय हेतूने हे पुरावे जगासमोर आणले जात नाहीत.
आपल्यावर इंग्रज सरकारने राज्य केले आणि इंग्रजी भाषेचा प्रसार केला. ह्या इंग्रजी भाषेतील कितीतरी शब्द मूळ संस्कृत शब्दापासून तयार झाले आहेत. त्याची थोडी उदाहरणे आपण पाहू :
English Sanskit
Drop. Draps ( द्रप्स )
Father (papa ) Pita (पिता )
Mother (mummy ) Mata (माता )
Sister स्वसा
Brother. भ्राता
Master महा स्तर - उच्च प्रतिभा
College - Sollage C चा उच्चार स असाही होतो जसे की census, celcius. त्यानुसार सॉला आणि शाला - ज निर्माण होणे म्हणजे शाळेपासून निर्माण होणे
शाला - ज - सॉला-ज- sollage - college
Education अध्ययन
Dictionary दीक्षान्तरी
Matrimonial मातृमनल - मातृत्वाची आस असणारे मन
Patient प्रशांत
Impatient अ- प्रशांत
Hand हस्त
Mouth मुख
Pancreas पाचनक्रियास पचनासाठी उपयोगात येणारा अवयव
Sergon शल्यजन
One उन
Two द्वौ
Door द्वार
Tree तरु
Preacher प्रचारक
Navy नावि
Son सूनु
Sweat स्वेद
अशाप्रकारे अनेक शब्द आहेत आणि त्याची यादी खूप मोठी आहे. उदाहरणासाठी मी वर काही शब्द दिले आहेत. जगातील अनेक भाषांमध्ये संस्कृत शब्द आहेत आणी ह्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment