माझा परिचय

Wednesday, 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ६८

 

#वेदविज्ञानरंजन_६८

आज आपण वेदकालीन शेतीसंदर्भात माहिती पाहणार आहोत.

*अथर्ववेदात वनस्पतींमधील हरित द्रव्याचा स्पष्ट उल्लेख आहे.*

अथर्ववेद मंडल १० सूक्त ८ मंत्र ३१

🚩
अविर्वै नाम देवतर्तेनास्ते परीवृता |
तस्या रूपेणेमे वृक्षा हरिता हरितस्रजः ||३१ ||
🚩

*अवि* नावाची एक देवता आहे (हरित द्रव ). ती सत्याने व्यापलेली आहे. तिच्या रूपाने हे *सर्व वृक्ष हिरवे आणि हिरव्या पानांचे आहेत.*

आता झाडांची पाने हिरवी का दिसतात? ह्याचे कारण झाडाच्या पानांत हरितद्रव्य असते. त्यामुळे पाने हिरवी असतात. झाडाच्या पानांतील हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश ह्यांच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण क्रिया होते आणि झाडे अन्न तयार करतात, झाडे वाढतात. हे सर्व आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे. ह्या सर्व प्रक्रियेचे ज्ञान वेदकाळातील भारतीयांना होते. त्याकाळी निसर्गातील विविध घटकांना देवतेची उपमा द्यायची असा प्रघात होता. त्यामुळेच अवि म्हणजे हरितद्रव्यास देवता असे म्हटले आहे.

*जल* - उत्तम शेतीसाठी नदी, विहिरी, तलाव यांतील पाण्याचे सिंचन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उत्तम जल आणि औषधींची आवश्यकता आहे. येथे औषधी म्हणजे किटकनाशके,   फवारणी.

यजुर्वेद १८.३५
🚩
सम् मा सृजामि पयसा पृथिव्याः सम् मा सृजामि अद्भिः ओषधीभिः सः अहम् वाजम् सनेयम् अग्ने ||३५||
🚩

६. खत - उत्तम शेतीसाठी शेणखत आणि इतर खते योग्य प्रमाणात टाकावीत त्याने पीक उत्तम होते.

अथर्ववेद  मंडल ३ सूक्त १४ मंत्र ३  खालीलप्रमाणे आहे.
🚩
संजग्माना अबिभ्युषीरस्मिन् गोष्ठे करीषिणीः |
बिभ्रतीः सोम्यं मध्वनमीवा उपेतन ||३||
🚩

ह्या गोशाळेत राहणारी आणि *उत्तम गोबर - शेणखत* निर्माण करणारी, शांत मधुरस म्हणजे दूध धारण करणारी, निरोगी गाय आम्हाला प्राप्त होवो.

*कृषीचे रक्षण*

हतं तर्दं समङ्कमाखुमश्विना छिन्तं शिरो अपि पृष्टीः शृणीतम् |
यवान्नेददानपि नह्यतं मूखमथाभयं कृणुतं धान्या$य ||१||

शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे बसवावे. जनावरांचे तोंड बांधुन ठेव.

अशाप्रकारचे शेतीविषयक परिपूर्ण ज्ञान आपल्या वेदांमध्ये सांगितले आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

*टीप :हे सर्व ज्ञान कृषिविद्यापीठांमध्ये दिले जावे अशी माझी कृषि विभागाला विनंती आहे*.

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...