#वेदविज्ञानरंजन_६७
🚩 *वेदकालीन शेती* 🚩
शेतीसंदर्भात एक उल्लेख ऋग्वेदात आढळतो
ऋग्वेद मंडल १० सूक्त ३४ मंत्र १३
🚩
*अक्षैर्मा दीव्यः कृषिमित्कृषस्व वित्ते रमस्व बहु* *मन्यमानः |*
🚩
हे जुगारी लोकांनो! जुगार कधीही खेळू नका. परिश्रमपूर्वक शेती करा. त्या शेतीतून मिळालेल्या धनात आनंद माना.
*कृषिपराशर* ग्रंथात पराशर ऋषींनी पाऊस मोजण्याचे तंत्र सांगितले आहे पर्जन्यमानाचा उपयोग करून पाऊस मोजला आहे.
🚩
शतयोजनविस्तीर्णं त्रिंशद्योजनमुच्छ्रितम् । (२६.२)
आढकस्य भवेन्मानं मुनिभिः परिकीर्तितम् ॥ (२६.३)
🚩
१ द्रोण = ४ अधक = ६.४ सेंटिमीटर
*१०० योजन रुंद आणि ३०० योजन उंच असलेल्या सरोवरात पडलेल्या पावसाचे मोजमाप करून ठेवले आहे.*
शतपथ ब्राह्मण १.६.१.३ मध्ये ४ शब्दांत संपूर्ण शेतीचे वर्णन केले आहे
🚩 कृषन्तः वपन्तः लुनन्तः मृणन्तः | 🚩
*कृषन्तः - कर्षण - शेताची नांगरणी करणे*
*वपन्तः - वपन - पेरणी, लावणी करणे*
*लुनन्तः - लुनन - तयार झालेल्या पिकाची कापणी करणे*
*मृणन्तः - मर्दन - मळणी, उफणणी करून धान्य स्वच्छ करावे आणि खाण्यायोग्य अन्न प्राप्त करावे.*
उत्तम शेतीसाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते.
१. उर्वरा भूमी, २. उत्तम बीज ३. सूर्यप्रकाश
४. वायू, ५. जल ६.कृषीचे रक्षण ७. उत्तम खते
१. *उर्वरा भूमी* - अथर्ववेदात लिहिले आहे की उर्वरा भूमीत पेरणी केल्यास उत्तम प्रकारचे धान्य मिळते. त्यामुळे त्यामुळे *उर्वरा भूमीला नमस्कार* केला आहे.
अथर्ववेद मंडल १० सूक्त ६ मंत्र ३३
🚩
यथा बीजमुर्वरायां कृष्टे फालेन रोहति |
एवा मयि प्रजा पशवो $न्नमन्नं वि रोहतु ||३३||
🚩
२. *उत्तम बीज* - बीज जर उत्तम असेल तर पीक चांगले येते. शेती चांगली होते.
ऋग्वेद मंडल १० सूक्त ९४ मंत्र १३
🚩वपन्तो बीजमिव धान्याकृतः 🚩
धान्यासाठी उत्तम बीज पेरावे.
३. *सूर्यप्रकाश* - उत्तम सूर्यप्रकाश असेल तरच चांगली शेतीतून होऊ शकते. शेतीसाठी विविध प्रकारच्या अग्नीची गरज आहे. सूर्यप्रकाश हवाच, त्याचबरोबर जमिनीतील उष्मा सुद्धा गरजेचा आहे.
यजुर्वेद १८. ३१ खालील मंत्र आहे.
🚩 विश्वेअद्य मरुतो विश्वे ऊती विश्वे भवन्तु अग्नयः समिद्धा विश्वे नः देवा अवसा आगमन्तु विश्वमस्तु द्रविणं वाजः अस्मे ||३१ || 🚩
*वाजः - अन्नम्*
४. *वायू* - शेतीसाठी उत्तम वायूची आवश्यकता आहे. कार्बन डाय ऑक्साईड, ऑक्सिजन आणि पानांतील हरित द्रव (Chlorophyll ) यांमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया होते (Photosynthesis ) आणि वनस्पती अन्न तयार करतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
*टीप :हे सर्व ज्ञान कृषिविद्यापीठांमध्ये दिले जावे अशी माझी कृषि विभागाला विनंती आहे*.
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक )
No comments:
Post a Comment