#वेदविज्ञानरंजन_६९
आजच्या लेखात आपण *वेदकाळातील विविध शस्त्रास्त्रे* ह्याची माहिती घेणार आहोत.
दिव्य अस्त्र
🚩 *आग्नेय अस्त्र - अग्निबाण - missile*
वेदांमध्ये विविध अस्त्रांचा उल्लेख आहे. आग्नेय अस्त्र असे अस्त्र आहे की ज्यामुळे *आग चारही बाजूंना पसरते आणि धुराचे प्रचंड लोट उठतात. त्यामुळे शत्रूसैन्य बेशुद्ध होते, डोळ्यांना अंधत्व येते आणि शत्रूची सेना पराजित होते.* हे सर्व वर्णन खालील मंत्रात आहे.
अथर्ववेद कांड ६ सूक्त ६७ मंत्र २
🚩मूढा अमित्राश्चरताशीर्षाण इवाहयः |
तेषां वो अग्निमूढानामिन्द्रो हन्तु वरंवरम् ||२||
🚩
हे (अमित्राः ) शत्रूंनो! तुम्ही (मूढाः ) *स्मृतिभ्रंश* झाल्यासारखे ( अशीर्षाणः अहयः इव चरत ) तुम्ही डोके कापले गेलेल्या सापासारखे चाला. (अग्निमूढानां तेषां वः ) आमच्या *आग्नेय अस्त्राने तुम्ही सर्व मोहित* झाला आहात (स्मृतिभ्रंश ) आणि (वरंवरं इंद्रः हन्तु ) मोठ्या मोठ्या वीरांना (शत्रुसैन्यातील ) इंद्राने मारावे.
🚩 *वायव्यास्त्र*
ह्याच्या प्रयोगाने *वावटळ आणि वादळ यांच्या सारखी जोरदार हवा* वाहते. सर्व ठिकाणी आग आणि *धुळीचे साम्राज्य* पसरते. शत्रुसेनेला पुढे काहीच दिसत नाही ह्याचे वर्णन खालील दोन मंत्रांत केले आहे.
🚩
*इंद्रसेनां मोहयामित्राणाम् |*
*अग्नेर्वातस्य ध्राज्या तान् विषूचो वि नाशय ||५ ||*
🚩
हे (इंद्र) नरेश ! (अमित्राणां सेनां मोहय ) शत्रुसेनेला घाबरवून टाक. (अग्नेः व्रातस्य ध्राज्या ) अग्नी आणि वायूच्या प्रचंड वेगाने (तान् ) त्या शत्रुसैन्याला (विषूवः विनाशय ) चारही बाजूंनी हल्ला करुन ठार कर.
🚩
इंद्रः सेनां मोहयतु मरुतो घ्नन्त्वोजसा |
चक्षूस्यग्निरा दत्तां पुनरेतु पराजिता ||६||
🚩
*अग्निः चक्षूंषि आदत्तां - अग्नी म्हणजे प्रकाशाने त्या शत्रूंचे डोळे घ्यावेत.*
*अग्निपुराण अध्याय २४८ मंत्र २*
🚩
*यंत्रमुक्तं पाणिमुक्तं मुक्तसंधारितं तथा |*
*अमुक्तं बाहुयुद्धं च पंचधा तत् प्रकीर्तितम् ||*
🚩
अग्निपुराणात शस्त्रास्त्रांचे ५ प्रकार वर्णन केले आहेत.
१. *यंत्रमुक्त* - यंत्रातून मुक्त होणारे म्हणजे यंत्राद्वारे फेकले जाणारे अस्त्र. म्हणजे बंदूक, तोफ वगैरे यांतून सोडले जाणारे गोळे.
२. *पाणिमुक्त* - पाणि म्हणजे हातातून सोडले जाणारे. भाला वगैरे
३. *मुक्तसंधारित* - फेकून पुन्हा त्याच ठिकाणी येणारे अस्त्र. बूमरँग वगैरे अश्या प्रकारचे अस्त्र अजून आधुनिक विज्ञानाने बहुतेक तयार केलेले नाही.
४. *अमुक्त* - हातात ठेवून शत्रू संहारक अस्त्र. खड्ग, परशू वगैरे
५. *बाहुयुद्ध* - हातानी करावयाचे युद्ध तलवार, ढाल वगैरे
*कौटिलीय अर्थशास्त्र* ह्या ग्रंथात अजून काही शस्त्रास्त्रांचे वर्णन आहे. ते खालीलप्रमाणे
१. *सर्वतोभद्र* - चहूबाजूंनी गोळीबार करणारे यंत्र,. मशीनगन
२. *जामदग्न्य* - एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बाण सोडणारे यंत्र.
३. *पर्जन्यक* - आग विझवण्यासाठी उपयोगात येणारे वारुण अस्त्र. थोडक्यात अग्निशामक बंब
४. *पांचालिक* - अतिशय तीक्ष्ण धार असलेले यंत्र. हे यंत्र पाण्याच्या आत ठरवले जायचे. ह्याला आपण जल सुरंग ( Mine ) म्हणू शकतो.
ह्याशिवाय इतर *रासायनिक शस्त्रास्त्रांचाही उल्लेख* आहे.
विषारी वायू सोडणारे शस्त्र, आंधळे करणारे शस्त्र, पाणी विषारी बनवणारे शस्त्र , रोग निर्माण करणारे शस्त्र (आपण सर्वांनी जी करोना साथ अनुभवली तोही असाच एक प्रकार आहे. )
अशाप्रकारे अनेक अद्ययावत शस्त्रास्त्रे, रनगाडे, लढाऊ विमाने वेदकाळात अस्तित्वात होती. ह्या सर्वाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. ह्यावरून असे म्हणता येईल की वेदकालीन भारतीय संस्कृती ही अतिप्रगत संस्कृती होती.
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक )
No comments:
Post a Comment