माझा परिचय

Monday, 19 December 2022

वेदविज्ञानरंजन- ४

 वेदविज्ञानरंजन_४

वेदविज्ञानरंजन_३ ह्या माझ्या मागील लेखात  आपण थोर भारतीय गणिती आर्यभट्ट

याने मांडलेली Pi संकल्पना पहिली. आता अजून काही श्लोक, सूत्रे पाहू ज्याच्यातून कदाचित

Pi (पाय ) चे मूल्य सापडू शकते.

खालील कटपयादि सूत्र समजावून घेण्याचा प्रयत्न करू.

कादि नव टादि नव पादि पञ्चक यद्यशष्टक क्षः शून्यम् 

कादि नव म्हणजे क पासून सुरू होणारी नऊ अक्षरे आणि त्यांच्या संख्या

क (1) ख (2) ग (3) घ (4) ङ (5) च (6) छ (7) ज (8) झ (9)

टादि नव म्हणजे ट पासून सुरू होणारी नऊ अक्षरे आणि त्यांच्या संख्या

ट (1) ठ (2) ड (3) ढ (4) ण (5) त (6) थ (7) द (8) ध (9)

पादि पञ्चक म्हणजे प अक्षरापासून सुरू होणारी पाच अक्षरे आणि त्यांच्या संख्या

प (1) फ (2) ब (3) भ (4) म (5)

यद्यशष्टक म्हणजे य पासून पुढील आठ अक्षरे आणि त्याच्या संख्या

य (1) र (2) ल (3) व(4) श(5) ष(6) स (7)  ह (8)

क्षः शून्यम् म्हणजे क्ष(0)

न (0)

ह्याला व्यंजन कूटांक असे म्हणतात.

कटपयवर्गभवैरिह पिन्डान्त्यैरक्षरैरंकाः

नञि च शून्यं श्रेयं तथा स्वरे केवले कथिताम् 

ह्यामध्ये स्वरांसाठी (अ, आ, इ.) अनुस्वारांसाठी, मात्रांसाठी, जोडाक्षरांसाठी  आणि न

व्यंजनासाठी 0 ( शून्य ) ही संख्या योजली आहे.

खालील श्लोकात आपण व्यंजन कूटांक पद्धतीचा विचार करु.

गोवर्धन पीठ, जगन्नाथ पुरी येथील 143 वे शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थ ऱ्यांनी

खालील श्लोकात पाय चे मूल्य सांगितले आहे.

आता भगवान श्रीकृष्णांची स्तुती करणारा पुढील श्लोक पाहू


गोपीभाग्य मधुव्रात शृंगिशोदधिसंधिगः |

खलजीवितखाताव गलहालारसंधर || 

ह्याचा अर्थ पाहू:

हे कृष्णा! तू गोपींचे भाग्य आहेस, मधु राक्षसाचा वध करणारा आहेस, तू पशूंचा रक्षक

असून तू समुद्राची खोली मोजली आहेस. तू दुर्जनांचा नाशक असून खांद्यावर नांगर घेतला

आहेस आणि अमृत धारण केले आहेस, तू आमचे रक्षण कर

वरील श्लोकात श्रीकृष्णांचे वर्णन जरी असले तरी Pi ची संख्या सूत्र रूपाने दडली आहे.

सर्वांत वर दिलेल्या कटपयादि सूत्राने ती संख्या पाहू.

वरील श्लोकातील एकेक अक्षरांपुढे त्याची संख्या ठेवू

गोपीभाग्य = ग (3) प(1) भ(4) य(1)

मधुव्रातः = म(5) धु(9) रा(2) त(6)

ह्याप्रमाणे वरील श्लोकातील एकेक अक्षर आणि त्याची संख्या क्रमाने मांडली असता आणि

पहिल्या अंकानंतर दशांश चिन्ह दिल्यास Pi ची संख्या मिळते.

Pi = 3.141596......

चंद्रांशु चंद्रा धमकुंभिपाला |

आनूननुन्ननन नुन्न नित्यम् ||

परीघ = चंद्रांशु चंद्रा धमकुंभिपाला

            625   62  941413 

व्यास = आनूननुन्ननन नुन्न नित्यम्

             0000000   00  01

येथे 1 हा अंक य ह्या व्यंजनासाठी वापरण्यात आला आहे

अंकानां वामतो गतिः ह्या नियमाप्रमाणे अंक डावीकडून (अंक वाचणार्‍यांच्या ) उजवीकडे

वाचावेत. त्यामुळे

पाय = परीघ / व्यास

पाय = 31414926526/10000000000

पाय = 3.1414926526

वैदिक गणितानुसार आपल्याला पाय चे मूल्य मिळते.


वरील व्यंजन कूटांकाला अनुसरून अजून एक उदाहरण पाहू

लेखातहे:

भद्राम्बुद्धिसिद्धजन्मगणितश्रद्धा स्म यद् भूपगी:

भ (4) द्रा (2) म्बु (3) धी (9) सी (7)

द्ध (9) ज (8)  न्म (5) ग (3) नी (5) त (3)

श्र (2) द्धा (9) स्म (5) यद् (1) भू (4) पा (1) गीः (3)

पुन्हा एकदा अंकानां वामतो गतिः या सूत्राप्रमाणे हे अंक डावीकडून उजवीकडे ठेवल्यास

पाय ची संख्या मिळेल

पाय = 3.141592...

वेदकाळापासून सिद्धांताची मांडणी सूत्रबद्धतेने केली असल्याने त्याचे महत्व शोधून लागावे

लागते. त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. भारतावर झालेली अनेक परकीय आक्रमणे,

नालंदा सारख्या विद्यापीठांची झालेली अपरिमित हानी यामुळे हे सर्व ज्ञान काळाच्या

उदरात लुप्त झाले आणि त्याचे सर्व श्रेय आता पाश्चिमात्य विद्वान घेतात आणि आपण आणि

आपले सरकार त्यांचे गोडवे गाण्यात धन्यता मानते ही खरी शोकांतिका आहे. शाळेच्या

अभ्यासक्रमात वैदिक गणित आणि प्राचीन भारतीय गणितीय सूत्रे यांचा समावेश नसल्याने

विद्यार्थ्यांना ह्याची माहिती होत नाही आणि ज्ञानाचा प्रसार होत नाही. माझी सर्व

शिक्षकांना आणि सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून शालेय

अभ्यासक्रमात समाविष्ट करून घ्यावे.

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...