माझा परिचय

Friday 23 December 2022

वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

आजच्या लेखात आपण सूर्य - चंद्र - पृथ्वी यांचा परस्पर संबंध आणि ब्रह्मांडातील अनेक सूर्य  यांची माहिती घेणार आहोत. 

ऋग्वेद मंडल १०, सूक्त ८५, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सत्येन उत्तभिता भूमिः सूर्येण उत्तभिता द्यौः ऋतेन आदित्याः तिष्ठन्ति दिवि सोमः अधि श्रितः ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(भूमिः सत्येन उत्तभिता ) म्हणजे पृथ्वी अग्नीद्वारा सांभाळली जाते. (द्यौः सूर्येण उत्तभिता ) म्हणजे प्रकाशित तारांगण आणि आकाश सूर्यामुळे सांभाळले जाते. (आदित्याः ऋतेन तिष्ठन्ति ) सूर्याची आदान शक्ती आहे. (दिवि सोमः अधिश्रितः ) चंद्र सूर्याच्या आश्रयाला आहे. 

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ब्रह्माने पृथ्वीला आकाशात धारण केले आहे. 

म्हणजेच ब्रह्मांडात पृथ्वी आहे. 

सूर्य हा द्युलोकाला म्हणजे नक्षत्र तारामंडल यांना प्रकाशित करतो. त्यानंतर सोम म्हणजे चंद्र हा सूर्याचा आश्रित आहे. म्हणजेच तोसुद्धा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधला गेला आहे आणि सूर्यामुळे तो प्रकाशित होतो. 

यजुर्वेद अध्याय १८ मंत्र ४० मध्ये म्हटले आहे की 

सुषुम्णः सूर्यरश्मिश्चन्द्रमा नक्षत्राणि अप्सरसः भेकुरयः नाम 

ह्याचा अर्थ पाहू : ज्यामुळे उत्तम सुख प्राप्त होते असा सूर्य चंद्राला प्रकाशित करतो. आकाशात पसरलेली नक्षत्रे ही चंद्राच्या अप्सरा आहेत असे वाटते. ह्यात सूर्याने चंद्र प्रकाशित होतो असे स्पष्ट दिसते. 

माझ्या माहिती प्रमाणे  ग्रीस तत्त्ववेत्ता, गणितज्ञ अनेक्सागोरस (Anaxagoras ) ( जन्मः इ. स. पू. ४९९ आणि मृत्यू इ. स. पू. ४२८ ) ह्यांनी असे विधान केले होते की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. तो सूर्याच्या किरणांनी प्रकाशित होतो. त्याला ह्या वक्तव्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. म्हणजे त्या काळी चर्चच्या विरोधात काही वक्तव्य केले की लगेच शिक्षा करीत असत.

 (https://mathshistory.st-andrews.ac.uk/Biographies/Anaxagoras/) 

आपले वेद तर इ. स. पू. हजारो वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत आणि त्यात ह्या सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. मग मला सांगा की आपण मागास का आपल्याला मागास म्हणणारे पाश्चात्य विद्वान मागास? 

अनेक सूर्य, अनेक ब्रह्मांड

अथर्ववेद कांड १३, सूक्त ३, मंत्र १० मध्ये सात सूर्याचा उल्लेख आहे

यस्मिन् सूर्या अर्पिताः सप्त साकम् ||१०||

ब्रह्मांड जे एकत्र झालेल्या तेजाने व्यापले आहे त्यात सात सूर्य एकत्र राहतात. त्यांची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्ररूप


 ताण्ड्य ब्राह्मण ग्रंथातील अध्याय २३, खंड १५, मंत्र ३ मध्ये पुन्हा एकदा सात सूर्यांचा उल्लेख केला आहे.

त्रि वै सप्त सप्तादित्याः ||३||

ऋग्वेद मंडल ९, सूक्त ११४, मंत्र ३  ह्या मध्ये अनेक सूर्यांचा उल्लेख केला आहे. 

सप्तदिशो नानासूर्याः सप्त होतार ऋत्विज:|

देवा आदित्या ये सप्त तेभिः सोमाभि रक्ष न 

इन्द्रायेन्दो परि स्रव||

सात दिशा, ऋतू, यज्ञकर्ता सात ऋत्विज आणि सात सूर्य आहेत. हे सोमा! त्यांच्या बरोबर आमचे पण रक्षण कर आणि तू इंद्रासाठी वाहत रहा. 

आपले आधुनिक विज्ञान अजून पर्यंत सात सूर्य कोणते आहेत ते शोधू शकले नाहीत. इथे मी म्हणतो की आमच्या वेदांत उल्लेख आहेत पण आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाही. आज इथेच थांबतो पुढील लेखात नवीन विषय घेऊन भेटू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...