माझा परिचय

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - २७ : जलचक्र भाग - २

 वेदविज्ञानरंजन - २७ : जलचक्र भाग - २

शाळेत आपण जे जलचक्र (Water Cycle) शिकलो होतो त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत कसा केला आहे ते आपण पाहू. 

महर्षी कणाद कालावधी सुमारे (इ. स. पू. ४०० - ६००)यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रे ह्या ग्रंथात जलचक्राची सूत्रे लिहिली आहेत. ती खालील प्रमाणे 

ह्या आधीच्या लेखात वेदविज्ञानरंजन - २६ आपण जलचक्राशी संबंधित सूत्रे अभ्यासली होती. उर्वरित सूत्रे आजच्या लेखात  पाहू :

नोदनापीडनात्  संयुक्तसंयोगाच्च 

नोदन आपीडनात् : नोदन नावाच्या विशेष वातचक्राच्या दाबामुळे ढग तयार होण्यास पोषक वातावरण तयार होते. 

संयुक्त संयोगात् च : जल आणि वायू यांच्या एकत्रित संयोगामुळे ढग आकाशात पोहोचतात*. ढगातील पाण्याच्या बिंदूंमध्ये आंतरिक संघनन होते (condensation) आणि पाण्याने भरलेले ढग तयार होतात. 

अपां संयोगाभावे गुरुत्वात् पतनम्

अपाम् : पावसाळी मेघ 

संयोगाभावे : संयोगाच्या अभावामुळे म्हणजेच पाण्याच्या कणांमधील बंध म्हणजेच संघनित अवस्था निघून जाते* पाण्याचे कण वेगवेगळे होतात आणि त्याचा भार सहन न झाल्याने 

गुरुत्वात् पतनम् : गुरुत्वाकर्षणामुळे खाली जमिनीवर पडतात म्हणजेच पाऊस सुरू होतो

 इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महर्षी कणाद यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख केला आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती ही संकल्पना भारतीयांनाही इ. स. पू. काळापासून ज्ञात होती. परंतु, आपण त्याचे श्रेय मात्र न्यूटनला देऊन बसलो हीच खरी शोकांतिका आहे. 

७२५ वर्षांपूवी ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या ओव्यांमध्ये जलचक्राचे वर्णन करतात :

तया उदकाचेनि आवेशे |

प्रगटले तेज लखलखीत दिसे ||

मग तया विजेमाजी असे |

सलील कायी ||

मी सूर्याचेनि वेषे |

तपे तै हे शोषे ||

पाठी इंद्र होवोनि वर्षे |

मग पुढती भरे ||

माऊली म्हणतात की सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते. मी म्हणजे परमात्माच पाणी शोषून घेतो. त्या वाफेचे ढग बनतात. आणि मीच इंद्रदेवाच्या रूपाने पाऊस पाडतो.

आधुनिक पाश्चात्य विज्ञानाने जलचक्राची प्रक्रिया शोधून काढली असली तरी, महर्षी कणाद आणि ज्ञानेश्वर माऊली यांना त्याआधीच कितीतरी शतके जलचक्र प्रक्रिया अवगत होती. 

जलचक्र ह्या नैसर्गिक घटनेचे अतिशय उत्तम पद्धतीने दस्तऐवजीकरण (Documentation) आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवले आहे परंतु, आपण मात्र त्याचे श्रेय निल्स वालेरियस ह्या स्वीडीश शास्त्रज्ञाला देण्यात धन्यता मानतो हे आपले दुर्दैव आहे. 

Nils Wallerius (1 January 1706 - 16 August 1764) was a Swedish physicist, philosopher and theologian. He was one of the first scientists to study and document the characteristics of evaporation through modern scientific methods

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...