माझा परिचय

Tuesday, 20 December 2022

वेदविज्ञानरंजन - ८ प्राचीन भारतातील अंतराळयान

 वेदविज्ञानरंजन_८

प्राचीन भारतातील अंतराळयान (Space shuttle ) ह्या विषयावर माहिती पाहू. 

विश्वातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणार्‍या ऋग्वेदातील मंडल क्र. ४ मधील सूक्त क्र. ३६ श्लोक १  मध्ये ऋभव ऋषींनी रचलेले अंतराळयानाचे वर्णन करणारे सूक्त (ज्याला ऋभु सूक्त असे म्हणतात) खालीलप्रमाणे आहे.

अनश्वो जातो अनभीशुरुक्थ्यो रथस्त्रिचक्रः परि वर्तते रजः ।

महत्तद्वो देव्यस्य प्रवाचनं द्यामृभवः पृथिवीं यच्च पुष्यथ ॥१॥

रथं ये चक्रुः सुवृतं सुचेतसोऽविह्वरन्तं मनसस्परि ध्यया ।

ताँ ऊ न्वस्य सवनस्य पीतय आ वो वाजा ऋभवो वेदयामसि ॥२॥


ह्या वरील सूक्ताचा मराठी भाषेतील अर्थ पाहू :

सर्वप्रथम ह्या अंतराळयानाचे वर्णन केले आहे. घोडे नसलेले (अनश्व ) वाहन (रथ ) असून त्याला तीन चाके (त्रिचक्रः ) आहेत. ह्यावर ताबा मिळविणे कठीण आहे (अनभीशु:). हे वाहन मौखिक (उक्थ्यः ) आज्ञांप्रमाणे चालू शकते. हवेतून उडत असताना हे वाहन जराही इकडे तिकडे हलत नाही, भरकटत नाही (विह्वरन्तम्). हे वाहन अतिशय प्रचंड आकाराचे असते (महत्त) तसेच वर्तुळाकार (सुवृतं ) आहे. 

पुढील ओळीत ह्या ऋभू ऋषींचा गौरव  केला आहे.

अतिशय बुद्धिमान (सुचेतसः) असलेले हे ऋभू तुमचा गौरव आहे. अंतराळात (द्याम् ) संचार करण्यासाठी तुम्ही जे यान तयार केलेले आहे ते नक्कीच कौतुकास्पद  (प्रवाचनम् ) आहे.

पुढील ओळीत हे अंतराळयानाचे वैशिष्ट्य सांगितले आहे 

हे तुम्ही तयार केलेले यान (रथं ये चक्रुः ) मनोवेगाने प्रवास करते (मनसस्परि ध्यया)

आता वरील सर्व अर्थ इंग्रजी भाषेत पाहू :

The vehicle is without horses. It has three wheels. It has no controls. It runs on verbal commands. It is circular and well balanced. It does not tremble while flying. It is very huge.

Of great intellect born, you RIBHU. In space you manufacture the vehicle is glorified. The vehicle which you manufactured, have made it with tremendous power of concentration and its beyond mind.

इथे वेदांच्या टीकाकारांना पुराव्यासह उदाहरण दिले आहे. अशाप्रकारचे यान निश्चित अस्तित्वात असणार त्याशिवाय इतके योग्य वर्णन लिहिणे शक्य नाही शिवाय हे यान मनोवेगाने प्रवास करते म्हणजे मनाद्वारे लहरी प्रक्षेपित करुन यानाचे नियंत्रण करणे  इतके प्रगत तंत्रज्ञान होते त्या काळात. अशाप्रकारे *गोल तबकडीच्या आकाराचे अंतराळयान' अजूनही आधुनिक तंत्रज्ञान विकसित करू शकलेले नाही असे वाटते. परंतु, आपण जर उडत्या तबकड्यांचा  ( UFO : Unidentified Flying Object) विषय पाहिला तर त्यांचा आकार अणि ऋग्वेदात वर्णन केलेला आकार सारखाच आहे. ह्या उडत्या तबकड्यांचा संबंध परग्रहवासींशी लावला जातो. आपल्या वेदांमध्ये एकापेक्षा जास्त ब्रह्मांडे आहेत असा उल्लेख आहे त्यामुळे परग्रहवासी लोक असण्याची शक्यता आहे. 

इथे ऋग्वेदात अंतराळयानाचे वर्णन अतिशय स्पष्ट शब्दांत केले आहे. असे असून सुद्धा अंतराळयानाचे सर्व श्रेय परदेशी वैज्ञानिकांना देऊन आपण मोकळे झालो आणि आपल्या ऋभू देवतांची साधी आठवण सुद्धा आपल्याला राहिली नाही हे आपले दुर्दैव. 

No one person invented the first spacecraft, but rather it was the work of a very large team. The first ship to safely put a man in space and orbit the earth was Vostok 1, piloted by Yuri Gagarin in 1961.

माझी सर्व पालकांना आणि शिक्षकांना विनंती आहे की आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना माझा वरील लेख जरूर दाखवावा आणि वेदकाळी भारतीयांनी विज्ञानात किती प्रगती केली होती ही समजवावे. 

टीप : वरील लेखात आधुनिक पाश्चात्य वैज्ञानिकांना कमी लेखण्याचा प्रयत्न नसून प्राचीन भारतीय विज्ञानाची प्रगती दाखविणे हाच हेतू आहे. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

1 comment:

  1. Sir, You have gathered full information in one platform. As such it will be very convenient to read as and when required .Thank you.

    ReplyDelete

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...