माझा परिचय

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३१ : सापेक्ष गतीचा (Relative Motion ) सिद्धांत

 वेदविज्ञानरंजन - ३१ : सापेक्ष गतीचा (Relative Motion ) सिद्धांत

हिंदू धर्माचे प्रवर्तक भगवत्पूज्यपाद श्रीमद् आद्यशंकराचार्य विरचित शांकरभाष्य ह्या ग्रंथात आईन्स्टाईनच्या कित्येक शतके आधीच सापेक्ष गतीचा (Relative Motion ) सिद्धांत मांडला आहे. त्यातील श्लोक आपण पाहू.

नौस्थस्य नावि गच्छन्त्या तटस्थेषु अगतिषु नगेषु प्रतिकूलगतिदर्शनात् |

दूरेषु चक्षुषा असन्निकृष्टेषु गच्छत्सु गत्याभावदर्शनात् ||

ह्याचा अर्थ इंग्रजी भाषेत पाहू :

A person going by boat will see the trees on the banks moving backwards, though they are stationary. However he will see the heavenly bodies such as stars and planet above are stationary even if they are in constant motion. This is called the example of relative motion.

ह्याचा मराठी भाषेतील अर्थ असा आहे :

जेव्हा नावाडी होडी मधून प्रवास करीत असतो, तेव्हा काठावरची झाडे त्या नावाड्याला मागे मागे म्हणजे होडीच्या विरुद्ध दिशेने पळताना दिसतात. परंतु ती झाडे प्रत्यक्षात मात्र काठावर स्थिर असतात. ह्याउलट पृथ्वीवरील माणसाला आकाशातील ग्रह स्थिर दिसतात, परंतु, प्रत्यक्ष मात्र ते फिरत असतात. ह्या प्रकाराला सापेक्ष गती असे म्हणतात.

पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ग्रहसुद्धा स्वतःभोवती फिरतात हेच अप्रत्यक्षरित्या येथे सांगितले आहे. त्यामध्ये असलेल्या सापेक्ष गतीमुळे पृथ्वीवरून पाहणार्‍या माणसाला ग्रह स्थिर आहेत असे वाटते. पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या ग्रहांच्या गतीचा अभ्यास त्या काळी केला जात असे, त्यासाठी वेधशाळा होत्या. ह्याचा अर्थ पाश्चात्य शास्त्रज्ञांनी सांगायच्या कितीतरी शतके आधीच अनेक खगोलीय घटना भारतीयांना ज्ञात होत्या. पहा बरे! किती प्रगत संस्कृती होती आपली! 

बरेच वेळा ट्रेन मधून जाताना आपल्याला हा अनुभव येतो. आपली ट्रेन एखाद्या विशिष्ट वेगात चालली असते. शेजारील ट्रॅक वरून दुसरी ट्रेन वेगात येते. एक क्षण असा येतो की आपली ट्रेन आणि शेजारील ट्रॅक वरून येणारी दुसरी ट्रेन ह्यांची गती, वेग समान होतो आणि त्या दोन्ही ट्रेन स्थिर असल्या सारखा भास होतो.  ह्यालाच सापेक्ष गती (Relative Motion ) असे म्हणतात.

आता  आईन्स्टाईन ह्यांनी मांडलेला सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहू :

It is possible to define relative motion as comparing one object's motion with that of another object moving with the same velocity.

आता वरील उदाहरणात असे दिसून येते की आईन्स्टाईनच्या अनेक शतके आधीच आद्य शंकराचार्य यांनी सापेक्ष गतीचा सिद्धांत मांडला होता. परंतु, त्याचे श्रेय मात्र दुर्दैवाने आईन्स्टाईनला दिले जाते.

माझी सर्व पालकांना, आणि शिक्षकांना विनंती आहे की आपल्या मुलांना वरील लेख जरूर वाचून दाखवावा. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...