माझा परिचय

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३२ : श्रीमद्भगवद्गीतेतील विज्ञान

 #वेदविज्ञानरंजन - ३२ : श्रीमद्भगवद्गीतेतील विज्ञान

श्रीमद्भगवद्गीतेतील विज्ञान

वेदविज्ञानरंजन - ३१ ह्या मागील लेखात आपण श्रीमद् आद्यशंकराचार्य ह्यांनी मांडलेला सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहिला. आता अंदाजे इ.स.पू. ५००० वर्षांपेक्षा अधिक पुरातन असलेल्या श्रीमद् भगवद्गीतेतील सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहू. गीतेतील ४ थ्या अध्यायातील १८ वा श्लोक खालील प्रमाणे आहे. 

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः |

स बुद्धिमानमनुष्येषु स युक्त: कृत्सनकर्मकृत् ||१८ ||

ह्याचा अर्थ इंग्रजी भाषेत पाहू 

He who sees action (or motion) in inaction (or inertia ) and who see the inaction (or inertia ) in action ( or motion) is an intelligent ones among humans 

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

जी व्यक्ती स्वतः काही कर्म न करता (अकर्म ) (स्वतः स्थिर राहून ) कर्म पाहते (गतीचा अनुभव घेते ) आणि जी व्यक्ती कर्म करून ( गतीशील असून ) अकर्म पाहते ( स्थिर अनुभव घेते  ) ती व्यक्ती अतिशय बुद्धिमान गणली जाते. 

ह्यातील सोपा अर्थ पाहू :

जो माणूस स्वतः स्थिर असून त्याने वेग असलेले दृश्य पाहिले तर त्याला ते दृश्य अस्थिर दिसते. ह्याउलट जो माणूस वेग असलेल्या दृश्यात असेल तर त्याला स्थिर असलेले अस्थिर दिसते. आता एक सोपे उदाहरण घेऊया. 

समजा आपण ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वर उभे आहोत (जो स्थिर आहे) तर वेगात जाणारी ट्रेन आपल्याला दिसून येते म्हणजेच तिचा वेग जाणवतो कारण ती अस्थिर  आहे. ह्याउलट आपण जर ट्रेन मध्ये बसलेलो असू आणी ट्रेन वेगात असेल तर, स्थिर असलेला प्लॅटफॉर्म आपल्याला वेगात मागे मागे जाताना दिसतो. 

आता साक्षात भगवंताच्या मुखातून सापेक्ष गतीचा नियम गीतेत सांगितलेला आहे.  खरे म्हणजे   आईन्स्टाईनप्रमाणेच ह्या सापेक्ष गतीचे श्रेय भगवान श्रीकृष्णांना द्यावयास हवे. ह्यावरून सापेक्ष गतीचा सिद्धांताचे मूळ भारतीय आहे असे सिद्ध होते. 

गीतेच्या अध्याय क्रमांक १५ (पुरुषोत्तमयोग)  मध्ये पहिलाच श्लोक आहे.

ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् | छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ||

मुळे वर आणि फांद्या खाली असलेला अश्वत्थ वृक्ष वर्णिलेला आहे. ह्यातील वैज्ञानिक अर्थ घेणे खूप आवश्यक आहे. आपला मेंदू म्हणजे आपले मूळ आणि मेंदूपासून शरीरात पसरलेल्या नाड्या / शिरा म्हणजे त्या मेंदूरूपी मुळाच्या फांद्या आहेत. शरीरशास्त्रातील अगदी प्राथमिक ज्ञान भगवंतांनी आपल्या गीतारूपी बोधात दिले आहे. शरीरशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांनी ह्याचा उल्लेख जरूर करावा अशी माझी विनंती आहे. 

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...