माझा परिचय

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३० : गतीचे प्रकार

 वेदविज्ञानरंजन - ३० : कणाद 

आजच्या लेखात आपण महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक दर्शन ह्या ग्रंथात लिहिलेली भौतिक शास्त्राशी संबंधित माहिती पाहू.

महर्षी कणाद गतीचे प्रकार सांगितले आहेत. 

उत्क्षेपणामवक्षेपणामकुञचनम् प्रसारणम् गमन् इति कर्मणि

उत्क्षेपण (upward motion) - वस्तूला वर फेकणे 

अवक्षेपण (downward motion) - वस्तूला 

आकुञ्चन (shearing motion )

प्रसारण (Motion due to release in tensile strength)

गमन (rectilinear motion)

ह्या सर्व गतींचे ज्ञान प्रयोगांवर आधारित असून महर्षी कणाद यांनी त्या गतींना दिलेली नावेसुद्धा सार्थ आहेत. 

आपल्या निसर्गातील तत्वे पंचमहाभूतांनी तयार झालेली आहेत. आधुनिक विज्ञानसुद्धा ह्याला मान्यता देते. 

पृथ्वी, आप (जल ), वायू, तेज आणि आकाश ह्या पाच तत्त्वांनी द्रव्य तयार झाले आहे असे महर्षी कणाद म्हणतात. आधुनिक विज्ञानात हेच शिकविले जाते. The matter has 5 stages viz. Solid (पृथ्वी ), Liquid (जल ), Gas (वायू ), Energy (तेज ), Plasma (आकाश ) 

वैशेषिक ग्रंथात 2.2.1. ते 2.2.4 ह्या सूत्रांमध्ये द्रव्याच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे :

१. स्थायू अवस्था : 

रूपरसगन्धस्पर्शवती पृथिवी |

महर्षी कणाद यांनी पृथ्वीला स्थायू द्रव्याची उपमा दिलेली आहे. 

वरील सूत्राचा अर्थ पाहू :

रूप (color ), रस (taste ), गन्ध (smell ), स्पर्श (temperature ) 

एखाद्या स्थायू पदार्थाचा रंग आपण पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, स्पर्श म्हणजे तापमान अनुभवू शकतो. 

२. द्रव अवस्था :

रूपरसस्पर्शवत्य आपो द्रवाः स्निग्धाः |

वरील सूत्राचा अर्थ पाहू :

रूप (color ), रस ( taste), स्पर्श (temperature )

म्हणजे आपण द्रव पदार्थाचा रंग पाहू शकतो, चव घेऊ शकतो, त्याचे तापमान अनुभवू शकतो. 

हे नियम सामान्य द्रव पदार्थाला लागू आहेत. उदा. पाणी (ह्यालाही काही अपवाद आहेत. कारण काही द्रव पदार्थांना वासही असतो. ) 

३. वायू अवस्था :

स्पर्शवान् वायु: |

वरील सूत्राचा अर्थ पाहू :

आपण फक्त स्पर्शाने वायू अनुभवू शकतो. शुद्ध हवेसाठी हा नियम लागू आहे (ह्यालाही अपवाद आहे. काही वायूंना वास आणि रंग असतो) 

ह्यातील महत्त्वाचा मुद्दा असा की पदार्थाच्या (द्रव्याच्या) अवस्थांचे दस्तऐवजीकरण (Documentation ) आपल्या संस्कृतीत खूप खूप आधीच झालेले आहे. महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे. इतक्या वर्षांपूर्वी प्रयोग करून, त्यातील निष्कर्ष पडताळून पाहून ते सूत्रबद्ध रितीने लिहून ठेवण्याचे महान कार्य महर्षी कणाद यांनी केले आहे. दुर्दैवाने ह्याची माहिती खुद्द भारतीयांनाच नाही. शालेय पाठ्यपुस्तकांतून ह्याचा कुठेही उल्लेख नाही.

संदर्भग्रंथ : PHYSICS IN ANCIENT INDIA 

लेखक : Narayan Gopal Dongre and Shankar Gopal Nene

ज्यांना महर्षी कणाद ह्यांच्या वैशेषिक दर्शन ग्रंथांतील सूत्रांची अधिक माहिती हवी असेल त्यांनी वरील पुस्तक नक्की विकत घेऊन वाचावे. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...