माझा परिचय

Thursday 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - २१: सूर्य पृथ्वी आकर्षण

वेदविज्ञानरंजन - २७ : सूर्य पृथ्वी आकर्षण 

सूर्य आणि पृथ्वी यांतील आकर्षण सबंध ह्यावर आजचा लेख आहे. आपण सविस्तर माहिती घेऊ. जगातील सर्वांत प्राचीन अश्या ऋग्वेदातील मंडल १०, सूक्त १४९, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सविता यंत्रैः पृथिवीम् अरम्णात् अस्कम्भने सविता द्याम् अदृंहत् अश्वम् इव अधुक्षत् धुनिम् अन्तरिक्षम् अतूर्ते बद्धम् सविता समुद्रम् ||

(सविता ) सूर्य (यंत्रैः ) नियंत्रण सामर्थ्याने (पृथिवीम् ) पृथ्वीला (अस्कम्भने ) निरालंब अंतराळात (अरम्णात् ) सांभाळतो, अवलंबित करतो (द्याम् ) द्युलोक (अदृंहत् ) वर ताणतो (अतूर्ते अन्तरिक्षम् ) अभेद्य, सूक्ष्म, अचल अशा अंतराळात (बद्धम् ) अवरुद्ध (समुद्रम् ) येथे तारकांचा नक्षत्रांचा समुद्र (धुनिम् )  मेघ (अश्वम् इव ) घोड्याप्रमाणे (अधुक्षत् ) घोडेस्वारासारखा उत्तेजित करतो.

आता वरील मंत्राचा सोपा अर्थ पाहू. अंतराळातील सूर्य स्वतःच्या नियंत्रण सामर्थ्याने म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीला सांभाळतो म्हणजेच पृथ्वीला योग्य कक्षेत फिरवतो. द्युलोकाला म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे जे आकाश आहे त्याला ताणून धरतो. घोडेस्वार जसे चाबकाचे फटके मारून किंवा लगामाच्या मदतीने घोड्याला उत्तेजित करतो, त्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी मेघांना उत्तेजित (मेघाला वृष्टीसाठी आंदोलित करतो ) करतो आणि पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होते.

म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये आकर्षण शक्ती आहे हे व्यवस्थित स्पष्टपणे लिहिले आहे.हा सिद्धांत समजण्यासाठी परदेशी वैज्ञानिकांनांची मदत घेण्याची आवश्यकता नाही.

ह्याच सूक्तातील पुढचा मंत्र पाहू :

ऋग्वेदातील मंडल १०, सूक्त १४९, मंत्र २ मध्ये खालील मंत्र आहे :

यत्र समुद्र : स्कभित वि औनत् अपाम् नपात् सविता तस्य वेद अतः भू अतः आ उताथितम् रजः अतः द्यावापृथिवी इति अप्रथेताम् ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(यत्र) ज्याच्या आश्रयाला (समुद्रः स्कभित ) आकाशातील समुद्र, जलाशय वायूद्वारा सांभाळलेला आहे (वि औनत् ) भूमीला ओले करतो (अपां नपात् ) भूमीवर पाणी पडते (सविता तस्य वेद ) परमात्मा सूर्य त्याला जाणतो (अतः भू - अतः रजः उताथितम् )  ह्यातून अंतरिक्ष उत्पन्न होते (अतः द्यावापृथिवी अप्रथेताम् ) द्यावापृथिवी उत्पन्न होतात. आता सोपा अर्थ पाहू :

परमात्म्याच्या (सूर्याच्या ) आश्रयाने आकाशाचा जलाशय वायू सांभाळतो म्हणजे आकाशात मेघ दाटले आहेत त्यात पाणी आहे म्हणजे आकाशात जलाशय, समुद्र आहे असे म्हटले आहे. हे फक्त सूर्यच जाणतो. त्यापासून द्युलोक म्हणजे दीप्तमान आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील पर्जन्यवृष्टी सांगितलेली आहे. तसेच सूर्याकडून पृथ्वीची निर्मिती झाली असे विधान केले आहे. महत्त्वाचा भाग असा की सूर्याने नुसती पृथ्वी निर्माण करून सोडून दिले नाही. तर तो तिला सांभाळतोय म्हणजे आपल्या कक्षेत फिरवून गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधून ठेवतो आहे सूर्यापासून इतर सर्व ग्रह उत्पन्न झाले असे आधुनिक विज्ञान सांगते. त्यासाठी Big Bang theory शिकविली जाते. पण मग आपल्या ऋग्वेदात पण हेच सांगितले आहे हे वरील दोन मंत्रांवरून स्पष्ट समजते. अर्थात ह्यासाठी ऋग्वेदात नासदीय सूक्त दिले आहे. त्याचा अभ्यास आपण पुढे नक्कीच करणार आहोत. 

थोर खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी आपल्या आर्यभटीयम् गोलपाद - ३७ ह्या ग्रंथात  ग्रहण कसे होते हे सांगितले आहे. 

छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया |

 अन्वयार्थ : शशी सूर्यं छादयति च महती भूच्छाया शशिनं (छादयति ) |

आता ह्याचा अर्थ पाहू :

चंद्र सूर्याला आच्छादित करतो आणि पृथ्वीची मोठी सावली चंद्राला आच्छादित करते  शेवटी ग्रहण म्हणजे काय? हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, जेव्हा हे तिघे सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते असे आधुनिक विज्ञान सांगते. आपण ह्याचे श्रेय केप्लर (इ. स. १६०५ ) यांना देतो. पण आपल्याच आर्यभट्टांनी( इ. स. ४७६ - इ. स. ५५०) केप्लरच्या कितीतरी आधीच ह्याचे ग्रहण होण्याचे कारण दिलेले आहे. 

 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...