माझा परिचय

Friday 23 December 2022

वेदविज्ञानरंजन - २४ : वेदांतील संख्यांचा उल्लेख

वेदविज्ञानरंजन  - २४ : वेदांतील संख्यांचा उल्लेख

शुक्ल यजुर्वेद ग्रंथांत अध्याय १७ श्लोक २ मध्ये १० च्या पटीतील संख्यांचा स्पष्ट उल्लेख आहे.

इमा मे ऽ अग्न ऽ इष्टका धेनवः सन्त्व् एका च दश च दश च शतं च शतं च सहस्रं च सहस्रं चायुतं चायुतं च नियुतं च नियुतं च प्रयुतं चार्बुदं च न्यर्बुदꣳ समुद्रश् च मध्यं चान्तश् च परार्धश् चैता मे ऽ अग्न इष्टका धेनवः सन्त्व् अमुत्रामुष्मिंल् लोके ॥

ह्याचा अर्थ आणि त्यामधील गणित आपण पाहू :

हे अग्नदेवता!  ह्या विटा (इष्टका ) (यज्ञात वापरल्या जाणाऱ्या विटा ) माझ्यासाठी गाई होवोत ( म्हणजे गाईप्रमाणे फळ देणाऱ्या, मदत करणाऱ्या )(पुढे त्या विटांची संख्या सांगितली आहे ) एक (१)  दश (१०)  शत (१००)  सहस्र (१,०००) अयुत (१०,०००) नियुत (लक्ष या १००,०००)  प्रयुत (१,०००,०००)  अर्बुद (१००,०००,०००) न्यर्बुद (अब्ज १,०००,०००,०००) समुद्र (१००,०००,०००,०००,०००) मध्य (१,०००,०००,०००,०००,०००)  अन्त्य (१०,०००,०००,०००,०००,०००)  परार्ध (१००,०००,०००,०००,०००,०००)  


१ ह्या संख्येवर सतरा शून्ये ठेवल्यानंतर तयार होणाऱ्या संख्येला सुद्धा त्यात परार्ध असे नावे होते. ह्या सर्व संख्यांचा उपयोग यज्ञवेदीची रचना करण्यासाठी व्हावयाचा. यज्ञवेदी कशा आकाराची असावी, त्यात किती विटा  असाव्यात ह्याचे शास्त्र असायचे. उगाचच काहीतरी रचून यज्ञ केले जात नसत त्याला शास्त्रीय बैठक होती. आता वरील संख्यांना अजून काही नावे दिली आहेत तीही पाहू :

भास्कराचार्य यांच्या लीलावती (१०-११) ग्रंथात 

खालील उल्लेख आहेत :

एक-दश-शत-सहस्रायुत-लक्ष-प्रयुत-कोटयः क्रमशः।

अर्बुदमब्जं खर्व-निखर्व-महापद्म-शङ्कवस्तस्मात्॥

जलधिश्चान्त्यं मध्यं परार्धमिति दशगुणोत्तराः संज्ञाः।

संख्यायाः स्थानानां व्यवहारार्थं कृताः पूर्वैः॥

ह्याचा अर्थ पाहू :

eka (एक): one (10^0=1)

daśa (दश): ten (10^1=10)

śata (शत): hundred (10^2=100)

sahasra (सहस्र): thousand (10^3=1,000)

ayuta (अयुत): ten thousand (10^4=10,000)

lakṣa (लक्ष): hundred thousand (10^5=100,000)

prayuta (प्रयुत): million (10^6=1,000,000)

koṭi (कोटि): ten million (10^7=10,000,000)

arbuda (अर्बुद): hundred million (10^8=100,000,000)

abja (अब्ज): billion (10^9=1,000,000,000)

kharva (खर्व): ten billion (10^10=10,000,000,000)

nikharva (निखर्व): hundred billion (10^11=100,000,000,000)

mahāpadma (महापद्म): trillion (10^12=1,000,000,000,000)

śaṅku (शङ्कु): ten trillion (10^13=10,000,000,000,000)

jaladhi (जलधि): hundred trillion (10^14=100,000,000,000,000)

antya (अन्त्य): quadrillion (10^15=1,000,000,000,000,000)

madhya (मध्य): ten quadrillion (10^16=10,000,000,000,000,000)

parārdha (परार्ध): hundred quadrillion (10^17=100,000,000,000,000,000)


कृष्ण यजुर्वेदात संख्या चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या आहेत.

सकृत्ते अग्ने नमः | द्विस्ते नमः |....

दशकृत्वस्ते नमः | शतकृत्वस्ते नमः |

आसहस्रकृत्वस्ते नमः |

अपरिमितकृत्वस्ते नमः |


O fire, salutations to you once, twice, thrice...

Salutations ten times, hundred times, thousand time,

Salutations to you unlimited times

हे अग्नीदेवता!   तुला एकदा, दोनदा, तीनदा, दहा वेळा, शंभर वेळा, हजार वेळा नमस्कार असो. वरील श्लोकात दिसून येते. की संख्येच्या पुढे शून्य ठेवले असता संख्येची किंमत बदलते ही गोष्ट भारतीयांना वेदकाळापासून ज्ञात होती. 

तैत्तिरीय संहिता ७.२.४९ ह्यात दहाच्या पटीत खालील संख्यांचा उल्लेख आहे. 

शताय स्वाहा सहस्राय स्वाहा अयुताय स्वाहा नियुताय स्वाहा प्रयुताय स्वाहा अर्बुदाय स्वाहा न्यर्बुदाय स्वाहा समुद्राय स्वाहा मध्याय स्वाहा अन्ताय स्वाहा... परार्धाय स्वाहा

 वरील श्लोकात पुन्हा एकदा दहाच्या पटतील संख्यांचा चढता क्रम दिसून येतो. 

ऋग्वेद २.१८.५ ह्यात खालील मंत्र आहे 

आ विंशता त्रिंशता याह्यर्वाङ् चत्वारिंशता हरिभिर्युजानः |

आ पञ्चाशता सुरथेभिरिन्द्रा षष्ट्या सप्तत्या सोमपेयम् ||५ ||

हे इंद्र! तू वीस, तीस घोड्यांद्वारे आमच्या जवळ ये. चाळीस घोड्यांनी युक्त असा तू आमच्या पर्यंत ये. पन्नास, साठ, सत्तर घोड्यांनी युक्त अश्या रथात बसुन सोमरस पिण्यासाठी आमच्याकडे ये. 

परकीय आक्रमण सातत्याने होत राहिल्यामुळे आपण आपल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानापासून वंचित राहिलो. इंग्रजांनीच सर्व काही आपल्याला शिकविले ह्याच भ्रमात आपण आहोत आणि आपण भारतीय कसे मागास होतो हेच बिंबवण्याचे कार्य इंग्रजांनी केले.

शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी  वेद हे अतिप्राचीन असून जगातील पहिले लिखित वाङ्मय म्हणून त्यास मान्यता आहे. ह्यावरून आपल्याला प्राचीन भारतीय ग्रंथातील ज्ञानाची ओळख होते. प्राचीन गणितज्ञ आणि ऋषी यांच्या बुद्धीची चमक दिसून येते. त्यामुळे आम्हाला आम्ही ह्या श्रेष्ठ संस्कृती मध्ये जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...