माझा परिचय

Friday 23 December 2022

वेदविज्ञानरंजन - २३ : संस्कृत भाषा संगणकाची भाषा

वेदविज्ञानरंजन - २३ : संस्कृत भाषा संगणकाची भाषा

आजचा  हा लेख IT (माहिती तंत्रज्ञान ) , Computers (संगणक) क्षेत्रात कार्यरत असणार्‍या किंवा Engineering (अभियांत्रिकी ) करणार्‍या सदस्यांनी जरूर वाचावा ही विनंती


जगातील सर्वांत जुनी असलेली भाषा म्हणजे संस्कृत भाषा होय. हीच संस्कृत भाषा संगणकाची भाषा आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध आहे. आता ही भाषा संगणकासाठी अतिशय उपयुक्त कशी आहे ह्याचे उदाहरण पाहू. 

अंदाजे इ. स. पू. २०० ते ३०० वर्षांपूर्वी पिंगलाचार्य ऋषींनी छंदःशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे संस्कृत भाषेत श्लोक म्हणताना विशिष्ट लयीत, शब्दांवर विशिष्ट आघात करून, स्वर वर खाली करून म्हणायचे असतात. मराठी शाळेमध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा पुस्तकात लघु - गुरू अशी जोडी असायची. वृत्तबद्ध काव्य लिहिताना ही जोडी अतिशय महत्त्वाची आहे. त्यावरून वृत्ताचा प्रकार, नाव ठरत असे. ह्या लघु (ल) - गुरू (गु ) (L - लघु, G- गुरू ) ह्याचा अतिशय सुंदर विस्तार पिंगलाचार्य ऋषींनी केला आहे आणि सध्याच्या युगात उपयोगात असणार्‍या द्विआधारी संख्या (Binary Numbers) ह्यांचा पाया रचला आहे. छंदःशास्त्र ग्रंथातील ८ व्या अध्यायातील २०,२१ आणि २२ सूत्रांत ही माहिती दिली आहे. 

द्विकौ ग्लौ ||२०||

म्हणजे फक्त २ गण

गु 

मिश्रौ च ||२१ || 

म्हणजे ह्या लघु - गुरू गणांचे मिश्रण :

ल  ल

गु  ल 

ल  गु 

गु   गु 

पृथग्ल मिश्र ||२२|| 

म्हंजे त्यांचे पुन्हा मिश्रण करा :

ल  ल  ल

ल  ल  गु

ल  गु  ल

ल  गु   गु

गु  ल  ल

गु   ल  गु

गु   गु   ल

गु   गु   गु

ह्या ठिकाणी ल =1 आणि गु = 0 मानू

ल  ल  ल       1 1 1       7

ल  ल  गु        1 1 0       6

ल  गु  ल        1 0 1       5

ल  गु   गु       1 0 0        4

गु  ल  ल        0 1 1       3

गु   ल  गु       0 1 0        2

गु   गु   ल       0 0 1        1

गु   गु   गु        0 0 0        0

Information technology (माहिती तंत्रज्ञान ) ह्या क्षेत्रात कार्य करणार्‍या लोकांना ह्या Binary Number System चा उपयोग चांगलाच माहिती आहे. ही प्रणाली अगदी अलिकडे पाश्चात्य वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. आपण मोबाईल फोन वर जे बोलतो,  चित्र पाहतो त्याच्या मुळाशी हेच  द्विआधारीत संख्याशास्त्र आहे. पुन्हा एकदा त्याचे श्रेय पिंगलाचार्य ऋषींना देण्यात आले नाही. श्रेय तर सोडाच पण पिंगलाचार्य ऋषींचा साधा नामोल्लेख सुद्धा कुठेही आढळत नाही ह्याचे खूप दुःख वाटते. आता इथे एक प्रश्न विचारला जातो की एव्हढे प्रगत तंत्रज्ञान होते तर मग ते सर्व कसे काय लोप पावले?  प्रगत तंत्रज्ञान होते तर त्याचा पुरावा  काय? 

भारतावर जी अनेक आक्रमणे झाली त्यात आपले महत्त्वाचे दस्तऐवज  परकीयांनी लुटून नेले. तक्षशिला सारख्या विद्यापीठांत आपले अनेक उत्तम ग्रंथ जाळले गेले. आजही आपल्याकडील काही दुर्मिळ ग्रंथ परदेशी ग्रंथालयात ठेवले आहेत . त्यामुळे सर्व प्रगत तंत्रज्ञान लोप पावले आणि त्यातील ज्ञानास आपण मुकलो आहोत. परंतु, ज्याअर्थी सिद्धांत मांडले आहेत त्याअर्थी विविध  प्रयोग करुन त्याचे निष्कर्ष पाहून ह्या सर्व सिद्धांतांची मांडणी केलेली आहे हे निश्चित सांगता येते. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...