माझा परिचय

Sunday 25 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३४ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - २

 वेदविज्ञानरंजन - ३४

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - २

महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील किष्किंधा कांडात वानरराज सुग्रीव यांनी काही भौगोलिक संदर्भ दिलेले आहेत. त्याची माहिती घेऊ. सीतेच्या शोधार्थ वानरराज सुग्रीव यांनी चारही दिशांना आपल्या वानरांना पाठविले होते. त्यातील दक्षिण दिशेचे वर्णन करताना सुग्रीव आपल्या वानरांना खालील श्लोक सांगतात 

किष्किंधा कांड सर्ग ४१, श्लोक क्रमांक १२ 

नदीं गोदावरीं चैव सर्वमेवानुपश्यत ।

तथैवांध्रांश्च पुण्ड्रांश्च चोलान्

पाण्ड्यानश्च केरलान् ॥ १२ ॥

हे वानरांनो! जनकनंदिनी सीतामाईचा शोध घेण्यासाठी तुम्ही दक्षिण दिशेकडे जा. तिथे आंध्र , पुंड्र, चोळ, पांड्य आणि केरळ ह्या देशांत सीतेचा शोध घ्या.

रामायण हे त्रेतायुगात घडले म्हणणे आजपासून दोन युगे आधीच घडले आहे. त्यातील आंध्र आणि केरळ ही राज्ये त्याच नावाने आजही अस्तित्वात आहेत.

किष्किंधा कांड सर्ग ४१, श्लोक क्रमांक ४४ आणि ४५

ततः परं न वः सेव्यः पितृलोकः सुदारुणः |

राजधानी यमस्यैषां कष्टेन तमसाऽऽवृता ॥ ४४ ॥

हे वानरांनो!  त्याच्या पुढे (दक्षिण ध्रुव  ) अत्यंत भयानक पितृलोक आहे, तेथे तुम्ही लोकांनी जाता कामा नये. ही भूमि यमराजाची राजधानी आहे, जी कष्टमय अंधःकाराने आच्छादित आहे. ॥४४ १/२॥

येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अंधःकाराने आच्छादित अश्या भूमीचे वर्णन केले आहे. दक्षिण ध्रुवावर सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते असे आधुनिक विज्ञान सांगते. येथे वानरराज सुग्रीव याला आणि पर्यायाने महर्षी वाल्मिकी यांना सुद्धा पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे आणि तिथे अंधःकार असतो ही गोष्ट ज्ञात होती. सुग्रीव हा संपूर्ण पृथ्वी फिरलेला होता आणि त्याला संपूर्ण भूगोलाचे ज्ञान होते. 

एतावदेव युष्माभिः वीरा वानरपुंगवाः ।

शक्यं विचेतुं गंतुं वा नातो गतिमातां गतिः ॥ ४५ ॥

वीर वानरपुंगवांनो! दक्षिण दिशेला एवढ्याच अंतरापर्यंत तुम्हाला जायचे आहे. त्याच्या पुढे पोहोचणे असंभव आहे कारण त्यापुढे प्राण्यांची वस्ती नाही.

ह्याचा अर्थ कोणत्याही परदेशी शास्त्रज्ञाच्या आधी वानरराज सुग्रीव यांनी दक्षिण ध्रुवाविषयी भाष्य केले होते हे मी आवर्जून सांगतो.

किष्किंधा कांड सर्ग ४०, श्लोक क्रमांक ५९

उत्तरेण परिक्रम्य जंबूद्वीपं दिवाकरः ।

दृश्यो भवति भूयिष्ठं शिखरं तन्महोच्छ्रयम् ॥ ५९ ॥

सूर्यदेव उत्तर दिशेस फिरून जंबूद्वीपाची परिक्रमा करून येतात आणि सौमनस नामक अत्यंत उंच शिखरावर स्थित होतात तेव्हा जंबूद्वीपातील लोकांना सूर्यदेवांचे अधिक स्पष्ट दर्शन होते. 

येथे वाननराज सुग्रीव यांनी सूर्यदेव उत्तर दिशेस फिरुन येतात असे म्हंटले आहे म्हणजे येथे *सूर्याच्या उत्तरायणाचा संबंध आहे. जंबूद्वीपातील लोकांना सूर्याचे अधिक स्पष्ट दर्शन होते म्हणजे उत्तरायणात सूर्य जास्त वेळ तळपतो आणि दिवस जास्त मोठा असतो. पावसाची चिह्ने नसल्याने डिसेंबर ते मे महिन्यात आकाश निरभ्र असते आणि त्यामुळे जंबूद्वीपातील लोकांना म्हणजे भारतीय लोकांना सूर्य अधिक स्पष्ट दिसतो. 

किष्किंधा कांड सर्ग ४३, श्लोक क्रमांक ५५

स तु देशो विसूर्योऽपि तस्य भासा प्रकाशते ।

सूर्यलक्ष्म्या ऽभिविज्ञेयः तपतेव विवस्वता ॥ ५५ ॥

तो देश सूर्यहित आहे तरीही सोमगिरीच्या प्रभेने सदा प्रकाशित होत राहतो. तप्त सूर्याच्या प्रकाशाने जे देश प्रकाशित होतात त्याप्रमाणेच त्याला सूर्यदेवाच्या प्रभेने प्रकाशित आल्यासारखे मानले पाहिजे. 

वानरराज सुग्रीव यांनी सीतेच्या शोधासाठी वानरांना उत्तर दिशेकडे जायला सांगितले आहे. त्यावेळी उत्तर दिशेकडील देशांचे वर्णन सुग्रीव यांनी केले आहे.  येथे असे काही देश आहेत की जेथे सूर्योदय होत नाही. आधुनिक विज्ञानाने सांगितले आहे की उत्तरेकडील (उत्तर ध्रुवाजवळील ) नॉर्वे, ग्रीनलँड, डेन्मार्क, फिनलँड, कॅनडा आणि रशिया यांचा उत्तरेकडील भाग येथे पूर्ण सूर्योदय होत नाही

तेथील देश सोमगिरीच्या प्रभावाने प्रकाशित होतात असेही वानरराज सुग्रीव सांगतात. Northern lights असे नाव आधुनिक विज्ञानाने दिले आहे. नॉर्वे देशातील आकाशात निरनिराळ्या रंगांची उधळण होत असते आणि त्यामुळे ते आकाश प्रकाशमान दिसते. तेथे पूर्ण सूर्यास्त आणि सूर्योदय होत नाही. ह्या northern lights चा खेळ पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक तिथे जातात.

आता हे northern lights कसे तयार होतात ते पाहू :

When particles meet the earth's magnetic shield, they are led towards an oval round the magnetic north pole where they interact with the upper parts of the atmosphere. After that the released energy is called as Northern Lights. 

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे प्रकाश किरण वातावरणाशी संयोग पावतात आणि त्यामुळे विविध रंगांच्या प्रभा आकाशात दिसतात. 

वानरराज सुग्रीव सांगतात की सोमगिरीच्या प्रभेने तो देश सदा प्रकाशित होत राहतो.  ह्यातील सोमगिरी म्हणजे पृथ्वीचा उत्तर ध्रुव असावा. आता Northern Light ह्याचा शोध लावल्याचे श्रेय रामायणातील वाननराज सुग्रीव यांना द्यावयास हवे. परंतु, ते श्रेय आपण गॅलिलिओला देऊन मोळके झालो.  Google वर शोधल्यास खालील माहिती मिळते.

The northern lights were first described and named by galileo galilei in 1619

मग ह्या आधी अनेक हजार वर्षे ह्याचा उल्लेख रामायणात करून वाननराज सुग्रीव ह्यांनी त्याचे निरीक्षण नोंदले आहे. सुग्रीव उत्तर ध्रुवाच्या देशापर्यंत कसे पोहोचले असतील? त्यांनी कशाच्या सहाय्याने प्रवास केला असेल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...