#वेदविज्ञानरंजन_६३
*टीप : प्रस्तुत लेख माझ्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावेत. ह्या लेखातील माझे नाव काढून घेऊन स्वतःचे नाव घालून पुढे पाठवू नये*
*उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि रेखावृत्त*
सूर्य सिद्धांत ग्रंथात भूगोलाध्याय ह्या अध्यायातील ३४ व्या श्लोकात ह्या संबंधी विस्तृत माहिती दिली आहे.
🚩
अनेकरत्ननिचयो जाम्बूनदमयो गिरिः
भूगोलमध्यगो मेरुरुभयत्र विनिर्गतः ||३४ ||
🚩
अनेक रत्नांच्या समूहाने युक्त ह्या भूगोलाच्या म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून आणि पृथ्वीच्या दोन भागांतून ( *उत्तर आणि दक्षिण* ) जाणारा हा मेरू पर्वत आहे. ह्याचा अर्थ पृथ्वी गोल आहे हे भारतीय विद्वानांना ज्ञात होते. हे सांगण्यासाठी *परदेशी विद्वानांची आवश्यकता नाही.*
येथे रेखांशाची संकल्पना मांडली आहे. पृथ्वीला दोन ध्रुव असतात. त्या *उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारी जी रेखा असते त्याला आपण रेखावृत म्हणतो.* ते रेखावृत्त म्हणजेच पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेला मेरू पर्वत आहे. किंवा ज्याचे अजून एका प्रकारे विश्लेषण करता येईल की पृथ्वीच्या मध्यातून म्हणजे *उत्तर आणि दक्षिण ध्रुवातून गेलेला मेरू पर्वत म्हणजे पृथ्वीचा आस असावा, ज्याच्या भोवती पृथ्वी फिरते आहे.*
🚩
उपरिष्टात् स्थितास्तस्य सेन्द्रा देवा महर्षयः |
अधस्तादसुरास्तद्वद् द्विषन्तो$न्योनमाश्रिताः ||
🚩
*मेरु पर्वताच्या वरच्या भागात (उत्तर ध्रुव ) इंद्र देवता आणि महर्षी गण राहतात आणि खालच्या (दक्षिण ध्रुव) भागात असुर लोक राहतात. देव आणि असूर यांच्यात परस्पर द्वेष भावना असते.*
उत्तर भागात देवता राहतात असे म्हटले आहे. देवता म्हणजे सकारात्मक ऊर्जा positive energy आणि दक्षिण भागात असुर राहतात म्हणजे नकारात्मक ऊर्जा negative energy. येथे स्पष्ट केले आहे की पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा धन प्रभारित असतो आणि दक्षिण ध्रुव हा ऋणप्रभारित असतो. *धन प्रभार - positive energy - देवता*
*ऋण प्रभार - negative energy - असुर*
आणि त्यांच्यात *परस्पर द्वेषभावना असते म्हणजे दोन विरुद्ध प्रभार असतात.*
चुंबकाची सुई उत्तर दिशा म्हणजे उत्तर ध्रुवाची दिशा दाखवते. खरे पाहता उत्तर दिशा दाखविणारा चुंबकाचा दक्षिण ध्रुव असतो. विजातीय ध्रुवांमध्ये परस्पर आकर्षण असते (opposite poles attract each other ) त्यामुळे चुंबकाचा दक्षिण ध्रुव (negative ) हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे ( positive ) आकर्षिला जातो. हे सर्व आधुनिक विज्ञान सांगते. पण *सूर्यसिद्धांत ह्या ग्रंथात हजारो वर्षांपासून हेच लिहिले आहे.* म्हणूनच दक्षिणेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे रक्ताभिसरण होताना ते पायाकडे होते आणि मेंदूला तुलनेने कमी रक्तपुरवठा होतो. असे आपले शास्त्र सांगते.
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका* हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार* ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक )
No comments:
Post a Comment