माझा परिचय

Wednesday 14 June 2023

वेदविज्ञानरंजन - ६२

 #वेदविज्ञानरंजन_६२ 


आजच्या भागात आपण एक अतिशय विस्मयकारक माहिती पाहणार आहोत. माझ्या आधीच्या बर्‍याच लेखांमध्ये पृथ्वी गोल आहे ह्याची माहिती प्राचीन भारतातील विद्वानांना होती ह्याविषयी आपण वाचले आहेच. पृथ्वी गोल असल्यामुळे जगाच्या विविध भागांत दिवस आणि रात्र ह्यांच्या वेळा बदलत असतात. हे आपल्याला माहिती आहे. आजकाल इंटरनेट आणि गूगल च्या माध्यामातून जगात कुठल्या वेळी दिवस, रात्र आहे. किती वाजले आहेत हे सर्व आपल्याला एका क्लिक वर समजते. परंतु, आजपासून हजारो वर्षांपूर्वी आपल्या संस्कृत ग्रंथांत पृथ्वीवरील विविध देशांच्या किंवा खंडांच्या वेळेबाबत माहिती लिहिलेली आढळते. 



भास्कराचार्य सिद्धांत शिरोमणी ग्रंथ अध्याय : गोलाध्याय : भुवनकोशः 


श्लोक १७ 


लङ्का कुमध्ये यमकोटिरस्याः प्राक् पश्चिमे रोमकपत्तनं च |

अधस्ततः सिद्धपुरं सुमेरुः सौम्ये$थ याम्ये वडवानलश्च ||१७||

आर्यभटीय गोलपाद - 


उदयो यो लङ्कायां सोऽस्तमयः सवितुरेव सिद्धपुरे ।

मध्याह्नो यवकोट्यां रोमकविषयेऽर्धरात्रः स्यात् ।।


लङ्कापुरे अर्कस्य यदोदयः स्यात् 

तदा दिनार्द्धं यमकोटिपुर्याम् |

अधस्तदा सिद्धपुरे अस्तकालः 

स्याद्रोमके रात्रिदलं तदैव ||४४||


लङ्कापुरे अर्कस्य यदोदयः स्यात् येथे लंका ह्या शब्दाचा अर्थ श्रीलंका म्हणणे साधारण विषुववृत्ताजवळील प्रदेश. जेव्हा तिथे अर्कस्य उदयः म्हणजे सूर्योदय होतो साधारण सकाळी ५.३० ची वेळ त्यावेळी यमकोटीपुरीत (New Zealand ) अर्धा दिवस असतो म्हणजे दुपार होते दुपारी १२.०० ची वेळ. 

अधस्तदा सिद्धपुरे अस्तकालः त्यावेळी सिद्धपुरीत म्हणजे साधारण Texas किंवा Mexico ह्याचा परिसर (अमेरिका खंड ) तिथे सूर्यास्त होतो म्हणजे साधारण संध्याकाळी ६ ची वेळ. 

रोमके रात्रिदलं तदैव म्हणणे रोमपुरीत (Europe खंड ) रात्र असते साधारण रात्री १२. ०० ची वेळ 


श्लोकात दिलेल्या विविध प्रदेशांच्या नावावरून ते प्रदेश ओळखणे आजच्या काळात कठीण आहे. तरीही आत्ताच्या timezone नुसार यवकोटी\यमकोटी म्हणजे साधारण New Zealand च्या आसपासचा प्रदेश, सिद्धपुरी म्हणजे अमेरिका खंडाचा मध्यभाग किंवा दक्षिणभाग (CENTRAL TIME ZONE ) रोमकम् म्हणजे साधारण Europe खंडाचा काही प्रदेश (CET ZONE) 


भारतातील सूर्योदयाची वेळ पहाटे ५.३० किंवा ६ अशी मानल्यास आर्यभट्टांच्या वरील श्लोकांचा आधार घेऊन आपल्याला पृथ्वीवरी विविध प्रदेश आणि त्यांच्या वेळा ह्यांची पडताळणी करता येते.


ह्या सर्वांतील मुख्य मुद्दा असा की प्राचीन भारतीय गणितशास्त्र जाणणाऱ्या ह्या विद्वानांनी भारतात राहून पृथ्वीच्या इतर भागात साधारण किती वाजले असतील आणि सूर्याची स्थिती काय असेल हे कसे काय जाणले? ह्याचा कसा काय अंदाज बांधला? आधुनिक विज्ञानाशी हे सर्व निष्कर्ष बर्‍यापैकी मिळते जुळते आहेत. ह्याचा अर्थ पृथ्वी गोल आहे, ती स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते हे सर्व सिद्धांत प्राचीन भारतात ज्ञात होते. कदाचित विमानासारख्या एखाद्या यंत्रात बसून त्यांनी हवेतून ही सर्व निरीक्षणे नोंदली असावीत. थोडक्यात म्हणजे ह्याचे श्रेय परदेशी शास्त्रज्ञांना न देता भास्कराचार्य आणि आर्यभट्ट अशा भारतीय वैज्ञानिकांना देणे आवश्यक आहे.



थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.* 


जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती. 

*www.ancientindianscience.com* 


प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती. 

ज्यांना ही *लेखमालिका* हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार* ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382* 


संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...