माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७४

 

#वेदविज्ञानरंजन_७४

आजच्या लेखात आपण प्राचीन भारतीय संस्कृतीमधील नौकाबांधणी आणि नौकानयन ह्याची माहिती घेऊ.

*नौकाबांधणी, नौकासंचालन*

ऋग्वेद मंडल १ सूक्त २५ मंत्र ७

🚩
वेदा यो वीनां पदमन्तरिक्षेण पतताम् |
वेद नावः समुद्रियः ||७||
🚩
*आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग जे जाणतात ते समुद्रात संचार करणार्‍या नौकांचे मार्ग सुद्धा जाणतात.*

ह्याचा अर्थ *पक्ष्यांच्या उडण्याच्या दिशांचा अभ्यास* ऋग्वेदातील ऋषींनी केला असला पाहिजे. त्या दिशांवरुन आपली *नौका समुद्रात कोणत्या दिशेने न्यावी ह्याची माहीती* त्यांना निश्चित होती. आता नौका समुद्रातून चालवायची म्हणजे * समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी तितकीच भरभक्कम नौका* हवी. वेदकाळात ह्याचे तंत्र अवगत होते.

ऋग्वेद मंडल १ सूक्त ९७ मंत्र ८
🚩
स नः सिन्धुमिव नावयाति पर्षा स्वस्तये |
अप नः शोशुचदघम् ||८||
🚩
(नावया सिन्धुं इव ) म्हणजे नौकेने समुद्र किंवा नदी पार करणे शक्य आहे असे म्हटले आहे. आता नदी पार करण्यासाठी छोटी होडी, गलबत ह्याचा उपयोग होतो. पण मोठा समुद्र पार करण्यासाठी प्रचंड मोठ्या जहाजाची आवश्यकता आहे. समुद्रप्रवास हा *भारतीयांना निषिद्ध नाही.* समुद्र प्रवास करणे वाईट आहे असे वेदांनी अजिबात सांगितलेले नाही. आपल्याला फक्त कोलंबस ह्याचा सागरी प्रवास इतिहासात शिकविला जातो. परंतु, त्याच्याही कितीतरी हजार वर्षे आधी भारतीय मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्र प्रवास करीत असत.

शंभर वल्ह्यांची नाव

ऋग्वेद मंडल १ सूक्त ११६ मंत्र ५

🚩शतारित्रां नावमातस्थिवांसम् ||५ ||🚩

ह्यात अश्विनी कुमारांना प्रार्थना केली आहे की अथांग समुद्रात *शंभर वल्ह्यांनी चालणारी नाव* असून त्यावर चढलेल्या भुज्यूला तुम्ही घरी पोहोचवलेत.

महाभारत आदिपर्वात *यंत्राद्वारे* चालणाऱ्या नावेचे उल्लेख आहेत.

🚩सर्ववातसहां नावं *यंत्रयुक्तां* पताकिनीम्। 🚩

सर्व प्रकारची वादळे सहन करणारी, मोठमोठी निशाणे असलेली आणि *यंत्रांनी युक्त* अशी नाव आहे. महाभारत हे द्वापारयुगात घडले त्याचा काळ साधारण इ. पू. ५५०० वर्षे इतका मागे जातो. त्याकाळी सुद्धा *यंत्रविज्ञान खूप प्रगत* होते आणि *पाश्चात्य देशात ह्याची माहितीही नव्हती* हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...