माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७६

 

#वेदविज्ञानरंजन_७६

*रसायनशास्त्र विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा लेख जरूर पाठवावा ही नम्र विनंती.*

*प्राचीन भारतीय रसायनशास्त्र भाग - २*

आजच्या भागात आपण प्राचीन भारतीय
रसायनशास्त्राची माहिती घेणार आहोत.

🚩 *तीर्यक्पतन यंत्र* 🚩

🚩
क्षिपेद्रसं घटे दीर्घे नताधोनालसंयुते |
तन्नालं निक्षिपेदन्यघटकुक्ष्यन्तरे खलु ||
तत्र रुद्ध्वा मृदा सम्यग्वदने घटयेरथः |
अधस्ताद्रसकुम्बस्य ज्वालयेत्तीव्रपावकम् ||
इतरस्मिन्घटे तोयं प्रक्षिपेत्स्वादुशीतलम् |
तिर्यक्पातनमेथद्धि वार्तिकैरभिधीयते ||
🚩

*क्षिपेद्रसं घटे दीर्घे नताधोनालसंयुते |*

एक रसायन (ज्यातील घटक वेगळे करायचे आहेत असे रसायन) एका घटात (मळ्यात, भांड्यात ) ठेवा. त्या घटाला एक *अधोमुखी नळी* बसवा (जी जमिनीच्या दिशेने झुकलेली आहे )

*तन्नालं निक्षिपेदन्यघटकुक्ष्यन्तरे खलु ||*

*त्या नळीचे दुसरे टोक खाली जमिनीवर ठेवलेल्या एका घटाला जोडा.*

*तत्र रुद्ध्वा मृदा सम्यग्वदने घटयेरथः |*

*ती नळी आणि दोन घट यांचे जोड मातीने आणि कापडाने घट्ट बांधा*.

*अधस्ताद्रसकुम्बस्य ज्वालयेत्तीव्रपावकम् ||*

*ज्या घटात रसायन ठेवले आहे त्या घटाखाली अग्नी प्रज्वलित करा.*

*दुसरा घट जो जमिनीवर ठेवला आहे (ज्याला अधोमुखी नळी जोडली आहे ) त्यावर थंड पाणी टाका.*

*तिर्यक्पातनमेथद्धि वार्तिकैरभिधीयते ||*

ह्या यंत्राला *तिर्रक्पतन यंत्र* असे म्हणतात आणि त्याचा उपयोग *ऊध्वपतन पद्धतीने (distillation ) रसायनातील घटक वेगळे करण्यासाठी होतो.*

ज्यांच्या तापमानामध्ये बरेच अंतर असते अशाच घटकांचे ऊर्ध्वपातन करून त्यांना वेगळे करता येते. या पद्धतीने गुलाबाच्या फुलातील सुगंधी द्रव्य मिळविता येते, मद्यार्क (अल्कोहॉले) तयार करता येतात, सांडपाण्यापासून शुद्ध पाणी मिळवता येते व खनिज तेलापासून पेट्रोल मिळवता येते. औद्योगिक क्षेत्रात ही प्रक्रिया अनेक ठिकाणी उपयोगी पडते. लहान प्रमाणात करावयाचे ऊर्ध्वपातन गट पद्धतीने करतात.

यामध्ये एखाद्या हंड्यासारख्या भांड्यात, पाण्यात कालविलेले घन पदार्थाचे घटक भरतात व ते भांडे शेगडीवर ठेवून मंद आगीने तापवतात. भांड्यातील पाणी तापून वाफ उत्पन्न होते व पाण्यात कालविलेल्या घटकांतील सहज *बाष्पनशील* (बाष्प होऊन उडून जाणारे) घटक बाहेर पडून वाफेत मिसळतात. ही वाफ भांड्याच्या तोंडावर बसवलेल्या नळीवाटे एका *संघनकात* (वाफ थंड करण्यासाठी वापरलेल्या भांड्यात) जाते. तेथे थंड पाण्याने वाफ थंड होऊन द्रवरूप होते व संघनकाच्या खाली बसवलेल्या टाकीत साठते. भांड्यामध्ये सुगंधी द्रव्ये असल्यास ती बाष्परूपाने वाफेबरोबर बाहेर जातात व पुन्हा द्रवरूप घेऊन ऊर्ध्वपातित पाण्यावर तरंगतात. *तेलासारखी हलकी द्रव्ये पाण्यातून सहज वेगळी काढता येतात.*

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...