#वेदविज्ञानरंजन_६६
🚩 *वेदकालीन शेती* 🚩
शेतीसंदर्भात *अथर्ववेद कांड ३, सूक्त १७ मध्ये ८ मंत्र* दिले आहेत. शेती कशी करावी, जमीन कशी नांगरणी करावे, खते कशी वापरावीत ह्याची सर्व माहिती पुढील ९ मंत्रांत दिली आहे. ते पाहू :
🚩 *सीरा युञ्जन्ति कवयो युगा वि तन्वते पृथक् |*
*धीरा देवेषु सुम्नयौ ||१||* 🚩
देवांची स्तुती करणारे कवी सुख प्राप्त करण्यासाठी नांगर धरतात (नांगरणी करतात)
जमिनींची मशागत करतात.
🚩 *युनक्त सीरा वि युगा तनोत कृते योनौ वपतेह बीजम् |*
*विराजः श्नुष्टिं सभरा असन्नो नेदीय इत् सृण्यः* *पक्वमा यवन् ||२||* 🚩
नांगरणी करा, मशागत करा आणि तयार झालेल्या शेतात बीज पेरणी करा.
🚩
*लाङ्गलं पवीरवत् सुशीमं सोमसत्सरु |*
*उदिद् वपतु गामविं प्रस्थावद् रथवाहनं पीबरी च प्रफव्य्रम् ||३||* 🚩
वज्रासमान कठीण अश्या नांगराने किंवा लाकडांची मूठ असलेल्या नांगराने शेती करावी.
इथे पहा की वज्रासमान कठीण असा धातू वापरुन नांगर तयार केला आहे. म्हणजेच *धातुविज्ञान ह्या क्षेत्रात अतिशय प्रगत होते*
🚩
*इन्द्रः सीतां निगृह्णातु तां पूषामि रक्षतु |*
*सा नः पयस्वती दुहामुत्तरामुत्तरां समाम् ||४||*
🚩
नांगरुन झालेल्या भूमीवर वृष्टी करणार्या इंद्राने पाऊस पाडावा, त्यानंतर (पूषा ) म्हणजे सूर्याने त्याचे उत्तम रक्षण करावे. म्हणजेच पाऊस आणि ऊन योग्य प्रमाणात मिळाले तर उत्तम शेती होते आणि छान धान्य मिळते.
🚩 *शुनं सुफाला वितुदन्तु भूमिं शुनं कीनाशा अनु यन्तु वाहान् |*
*शुनासीरा हविषा तोषमाना सुपिप्पला* *ओषधीःकर्तमस्मै ||५ ||* 🚩
सुंदर हलक्या नांगरांनी भूमीची नांगरणी करावी. बैलांच्या मागे मागे जाऊन व्यवस्थित करावे. वायू आणि सूर्य यांनी हवनाने संतुष्ट व्हावे आणि शेतकऱ्यांसाठी उत्तम धान्य पिकवावे.
*जी बियाणे पेरायची आहेत त्यांचे हवन करावे* असे सांगितले आहे. त्यामुळे जलवायू शुद्ध होतात, उत्तम वृष्टी होते आणि शुद्ध शेतीमुळे शुद्ध धान्य मिळते.
🚩
*शुनं वाहाः शुनं नरः कृषतु लाङ्गलम् |*
*शुनं वरत्रा बध्यन्तां शुनमष्ट्रामुदिङ्गय ||६||*
🚩
बैल सुखी होवोत, मानव सुखीच होवो. नांगरणी करून छान शेती होवो. बैलांना छान बांधा आणि चाबूक वापरुन त्यांना नियंत्रणात ठेवा.
🚩 *शुनासीरेह स्म मे जुषेथाम् |*
*यद् दिवि चक्रथुः पयस्तेनेमामुप सिञ्चतम् ||७||* 🚩
वायू आणि सूर्य आमच्या हवनाने संतुष्ट होवोत आणि जे जल आकाशात आहे (पर्जन्य ) त्याचे ह्या भूमीवर सिंचन करा.
🚩
*सीते वन्दामहे त्वार्वाची सुभगे भव |*
*यथा नः सुमना असो यथा नः सुफला भुवः ||९||*
🚩
हे भूमी आम्ही तुला वंदन करतो. तू आमच्यासाठी उत्तम धान्य उत्पन्न करणारी हो.
🚩
*घृतेन सीता मधुना समक्ता विश्वैर्देवैरनुमता मरुद्भिः |*
*सा नः सीते पयसाभ्याववृत्स्वोर्जस्वती घृतवत् पिन्वमाना ||९||*
🚩
तूप आणि दूध यांनी उत्तम प्रकारे भूमी सिंचन करावी.
येथे *पंचामृताने भूमी सिंचन करावी* असे म्हटले आहे म्हणजे *वेदकाळात कित्ती सुबत्ता* असेल हे लक्षांत येते.
अन्न हे धान्यापासून निर्माण होते. धान्याशिवाय ह्या जगात काहीही महत्त्वाचे नाही. त्यामुळे सर्वांनी शक्य झाल्यास *शेती करावी म्हणजे धान्य पिकवावे* असे पराशर ऋषी सांगतात ( *कृषि पराशर ग्रंथ* )
🚩
*अन्नं हि धान्यसंजातं धान्यं कृपया विना न च ।*(७.१)
*तस्मात् सर्वं परित्यज्य कृषिं यत्नेन कारयेत् ॥* (७.२)
🚩
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक )
No comments:
Post a Comment