माझा परिचय

Wednesday, 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७०

 

#वेदविज्ञानरंजन_७०

*प्राचीन उद्योग - व्यवसाय भाग - १*

आजच्या लेखात आपण *वेदकाळातील
विविध उद्योग - व्यवसाय* ह्या संबंधी माहिती घेणार आहोत.

यजुर्वेद ३०.७ मध्ये खालील मंत्र आहे.
🚩
तपसे कौलालम् मायायै कर्मारम् रूपाय मणिकारम् शुभे वपम् शरव्यायै इषुकारम् हेत्यै धनुष्कारम् कर्मणे ज्याकारम् दिष्टाय रज्जुसर्जम् मृत्यवे मृगयुमिती अन्तकाय श्वनिनम् ||
🚩

*मणिकार* - दागिने घडवणारा. सोने चांदी यांपासून विविध आभूषणे तयार करणारा.
*कर्मार* - लोहार लोखंडापासून विविध अस्त्र तयार करणारा.
*ज्याकार* - धनुष्याची दोरी म्हणजेच प्रत्यंचा तयार करणारा.
*धनूष्कार* - विविध प्रकारची धनुष्य तयार करणारा.
*इषुकार* - बाण तयार करणारा.

यजुर्वेद ३०.६ मध्ये खालील श्लोक आहे

🚩
नृत्ताय सूतम् गीताय शैलूषम् धर्माय सभाचरम् नरिष्ठायै भीमलम् नर्माय रेभम् हसाय कारिम् आनन्दायेत्यानन्दाय स्त्रीषखम् कुमारीपुत्रम् मेधायै *रथकारम्* धैर्याय तक्षाणम् ||६||
🚩

*रथकारम्* - रथकार अतिशय सुंदर रथ तयार करीत असत. विशेषतः युद्धात ह्या रथांचा खूप उपयोग होत असे. वेदांमध्ये सुंदर रथ तयार करण्यास विशेष महत्व दिले आहे.

यजुर्वेद ३९.१७ खालील मंत्र आहे

🚩
बीभत्सायै पौल्कसँवर्णाय हिरण्यकारन्तुलायै वाणिजम्पश्चादोषाय ग्लाविनँविश्वेभ्यो भूतेभ्यः सिध्मलम्भूत्यै जागरणमभूत्यै स्वपनमार्त्यै जनवादिनँव्युद्धर्या$अपगल्भँ सँशराय प्रच्छिदम् ||
🚩

प्रस्तुत श्लोकात *हिरण्यकार*असा शब्द योजला आहे. हिरण्यकार म्हणजे सोनार. वेदकाळात आपली भारतभूमी अतिशय संपन्न होती. *भारतातून सोन्याचा धूर निघत असे* असा उल्लेख आहे. साहजिकच सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी सोनारांची आवश्यकता असे.

*सूचिकर्म, शिवणकाम (tailoring)*

अथर्ववेद मंडल ७ सूक्त ४८ मंत्र १
🚩
राकामहं सुहवा सुष्टुती हुवे शृणोतु नः सुभगा बोधतुत्मना |
सीव्यत्वपः सूच्याच्छिद्यमानया ददातु वीरं शतदायमुक्थ्य$म् ||१||

अच्छिद्यमानया सूच्या अपः सीव्यतु
🚩

कधीही *न तुटणाऱ्या सूईचा उपयोग* करुन कपडे शिवावेत.

येथे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. *सुई अतिशय बारीक* असते. अश्या प्रकारची सुई तयार करण्याचे तंत्रज्ञान वेदकालीन ऋषींना ज्ञात होते. न तुटणारी सुई तयार करण्यासाठी असा धातू हवा की जो *वज्रासमान कठीण* असेल. म्हणजेच वेदकाळात धातुविज्ञान प्रगत होते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...