माझा परिचय

Wednesday, 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७१

 

#वेदविज्ञानरंजन_७१

*प्राचीन उद्योग - व्यवसाय भाग - २*

वेदकालीन संस्कृती ही अत्यंत पुढारलेली असून अत्यंत उत्कृष्ट न्यायदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

यजुर्वेद अध्याय ३० मंत्र १० खालीलप्रमाणे :

🚩प्रश्निनमुपशिक्षायाSअभिप्रश्निनम्मर्यादायै प्रश्नविवाकम् 🚩

*वादी - प्रश्न विचारणारा - प्रश्निनम्*
*प्रतिवादी - उत्तर देणारा - अभिप्रश्निनन्*
*मर्यादायै -   न्याय - अन्याय ह्याची व्यवस्था पाहणे.*

अथर्ववेद कांड २ सूक्त २७ मंत्र १ खालीलप्रमाणे आहे.
🚩
नेच्छत्रुः प्राशं जयाति सहमानाभिभूरसि |
प्राशं प्रतिप्राशो जह्वरसानकृण्वोषधे ||१||
🚩

*वादी - प्रश्न विचारणारा - प्राश्*
*प्रतिवादी - उत्तर देणारा - प्रतिप्राश्*

वरील दोन मंत्रांवरून असे दिसून येते की वेदकालीन न्यायव्यवस्था अतिशय परिपूर्ण होतो होती, वकील, आरोपी, अशील, न्यायाधीश अतिशय उत्तम पद्धतीने न्यायव्यवस्था सांभाळत असत.

🚩व्यापार आणि वाणिज्य : Trade and commerce🚩

अथर्ववेदात *आठ मंत्र असलेले एक सूक्त* आहे. ते व्यापाराशी सबंधित आहे. ह्यात *इंद्राला व्यापारी* असे संबोधले आहे.

🚩
इन्द्रमहं वणिजं चोदयामि स न ऐतु पुरएता नो अस्तु |
नुदन्नरातिं परिपन्थिनं मृगं स ईशानो धनदा अस्तु मह्यम् ||१||
🚩
ये पन्थानो बहवो देवयाना अन्तरा द्यावापृथिवी संचरन्ति |
ते मा जुषन्तां पयसा घृतेन यथा क्रीत्वा धनमाहराणि ||२||
🚩
मी व्यापारी असलेल्या इंद्राला प्रार्थना करतो की त्याने आमचे मार्गदर्शन करावे. *लुटारूंपासून आमचे रक्षण* करावे. *द्युलोक आणि पृथ्वी ह्याच्या मध्ये जाण्या येण्याचा जो मार्ग आहे त्यात आमच्या साठी तूप आणि दूध भरपूर असावे.*  त्या मार्गांनी जाऊन आणि व्यापार करून आम्हाला *भरपूर धनलाभ होवो.*

येथे *द्युलोक आणि पृथ्वी* यांच्या मधील जाण्या येण्याचा मार्ग म्हणजे *आकाशमार्ग* होय. ह्या आकाशमार्गाने जाणारी जी *देवयाने आहेत म्हणजे विमाने* आहेत त्याद्वारे वस्तूंचा क्रय विक्रय व्यापार चालत असावा. म्हणजेच आजच्या भाषेत *import- एक्सपोर्ट आयात - निर्यात*. आता तूप आणि दूध भरपूर असावे असे म्हटले आहे. त्याचा अर्थ काय? तर ह्याचा अर्थ समृद्धी असा आहे. तूप आणि दूध हे समृद्धीचे समृद्धीचे द्योतक आहेत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला आपण म्हणतो की तो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे. ह्याचा अर्थ जन्माच्या वेळी त्या बाळाच्या तोंडात खरोखर चांदीचा चमचा असतो का? तर नाही. समृद्धी दर्शविण्यासाठी सोने, चांदी, दूध, तूप असे शब्दप्रयोग करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तूर्तास इथेच थांबतो. पुढील भागात पुन्हा नवीन विषय घेऊन भेटू.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...