#वेदविज्ञानरंजन_६५
*_आजचा माझा लेख मुख्यतः शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावा. पालकांनी आणि शिक्षकांनी लेख विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवावा_*
*_विशेषतः गणित अध्यापक मंडळ, गणित शिकविणाऱ्या शिक्षकांनी ह्या लेखाचा आवर्जून अभ्यास करावा तसेच विविध शाळांच्या What's app समूहावर प्रस्तुत लेख पाठविण्यात यावा ही नम्र विनंती_*
आजच्या लेखात आपण वेदकाळातील गणितीय संख्यांच्या उल्लेखांची माहिती घेऊ.
कृष्ण यजुर्वेदात संख्या चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या आहेत.
🚩
सकृत्ते अग्ने नमः | *द्विस्ते* नमः |....
*दशकृत्वस्ते* नमः | *शतकृत्वस्ते* नमः |
*आसहस्रकृत्वस्ते* नमः |
*अपरिमितकृत्वस्ते* नमः |
🚩
O fire, salutations to you once, twice, thrice...
Salutations ten times, hundred times, thousand time,
Salutations to you unlimited times
हे अग्नी! तुला एकदा, दोनदा, तीनदा नमस्कार असो. तुला दहा वेळा, शंभर वेळा, हजार वेळा नमस्कार असो. आणि तुला अनंत वेळा नमस्कार असो.
वेदकाळात संपूर्ण जगात वैदिक संस्कृती नांदत होती. *संपूर्ण अंकगणिताचे ज्ञान भारतीयांना होते. एव्हढेच नव्हे तर दशमान पद्धत सुद्धा भारतीयांना अवगत होती कारण दहाच्या पटीत अग्नीला नमस्कार केला आहे.*
तैत्तिरीय संहिता ७.२.४९ मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
शताय स्वाहा सहस्राय स्वाहा अयुताय स्वाहा नियुताय स्वाहा प्रयुताय स्वाहा अर्बुदाय स्वाहा न्यर्बुदाय स्वाहा समुद्राय स्वाहा मध्याय स्वाहा अन्ताय स्वाहा... परार्धाय स्वाहा
🚩
वरील श्लोकात *परार्ध* ह्या संख्येपर्यंत स्वाहाकार सांगितला आहे. येथे परार्ध म्हणजे *१०^१७ म्हणजे १० चा घातांक १७*. इतक्या मोठ्या प्रमाणात संख्यांची गणना करण्याची आवश्यकता वेदकालीन प्रगत गणितशास्त्रात होती.
ऋग्वेद मंडल २ सूक्त १८ मंत्र ५ खालीलप्रमाणे आहे.
🚩
आ विंशता त्रिंशता याह्यर्वाङ् चत्वारिंशता हरिभिर्युजानः |
आ पञ्चाशता सुरथेभिरिन्द्रा षष्ट्या सप्तत्या सोमपेयम् ||५ ||
🚩
हे इंद्र! तू वीस, तीस घोड्यांद्वारे आमच्या जवळ ये. चाळीस घोड्यांनी युक्त असा तू आमच्या पर्यंत ये. पन्नास, साठ, सत्तर घोड्यांनी युक्त अश्या रथात बसुन सोमरस पिण्यासाठी आमच्याकडे ये.
वरील मंत्रात इंद्राला २०,३०,४०,५०,६०,७० घोड्यांच्या रथात बसून यायची विनंती केली आहे. आता रथाला इतके घोडे जोडता येतील का? निश्चित नाही. मग घोड्यांची संख्या हे कशाचे प्रतिक आहे? तर *घोड्यांची संख्या हे अश्वशक्तीचे प्रतिक आहे. २०,३०४०,५०,६०,७० अश्वशक्ती असलेल्या रथात* बसून ये असे इंद्राला सांगितले आहे. आता इंजिनाची शक्ती मोजण्याचे एकक म्हणजे अश्वशक्ती आहे. ह्याचा अर्थ इंद्र इंजिन असलेल्या रथात म्हणजे *विमानासारख्या वाहनात बसून येत असावा* असा निष्कर्ष आपण काढू शकतो. वेदकाळात *विमाने अस्तित्वात होती* ह्याची उदाहरणे आपण पुढच्या काही लेखांमध्ये पाहूच.
ऋग्वेद मंडल ३ सूक्त ९ मंत्र ९ खालीलप्रमाणे आहे.
🚩
त्रीणि शता त्री सहस्राण्यग्निं त्रिंशच्च देवा नव चासर्पयन् |
🚩
(त्री सहस्राणि, त्रीणि शता, त्रिंशत् च नव च देवा:) तीन हजार तीनशे एकोणचाळीस देवांनी (अग्निं असर्पयन् ) अग्नीचे पूजन केले.
*३३३९ = ३३+ ३०३ + ३००३*
ही संख्या *इंद्रलोकातील देवतांची संख्या* आहे. ज्यांची वेगवेगळी कार्ये आहेत. जसे वायूची देवता पवन, पर्जन्याची देवता इंद्र वगैरे.
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक )
No comments:
Post a Comment