माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७३

 

#वेदविज्ञानरंजन_७३

*वेदांतील स्थापत्यशास्त्र - भाग - २* 🌺
🚩
ब्रह्मणा शालां निमितां कविभिर्निमिता मिताम् |
इन्द्राग्नी रक्षतां शालाममृतौ सोम्यं सदः ||१९ ||
🚩

(ब्रह्मणा निमितां शालां ) ज्ञानी माणसाने निर्माण केलेल्या शाळेचे (घराचे ) आणि कवींनी दिलेल्या प्रमाणात बांधलेल्या शाळेचे रक्षण इंद्र आणि अग्नी यांनी करावे.

येथे *ब्रह्मा म्हणजे ज्ञानी* माणसाने निर्माण केलेले घर असा उल्लेख आहे. ज्ञानी माणूस म्हणजे कोण? घर निर्माण करण्याचे *ज्ञान असलेला आर्किटेक्ट,* विद्वान. कवींनी दिलेल्या प्रमाणात म्हणजे योग्य *नकाशाच्या आधारे मोजमाप* घेऊन उत्तम कारागिरांच्या मदतीने घर बांधावे.
🚩
कुलाले$धि कुलायं कोशे कोशः समुब्जितः |
तत्र मर्तो विजायते यस्माद् विश्वं प्रजायते ||२० ||
🚩
दुसरा मजला बांधायचा असेल तर एकाच्या वर एक अशाप्रकारे बांधावा. जसे (  कुलाये अधि कुलायं ) म्हणजे एकावर एक असे घरटे बांधतात, (कोशे कोशः ) एका कोशावर एक कोश ठेवतात अशाप्रकारे *बहुमजली घर* बांधावे. अशा उत्तम घरात मनुष्याचा जन्म होवो. पक्षीसुद्धा प्रसूतीच्या आधी उत्तम घरटे तयार करतात ते पाहून मनुष्याने सुद्धा आपल्या घरातील एका ठिकाणी *प्रसूतीचे स्थान* तयार करावे. म्हणजे बाळंतिणीची खोली असावी.
🚩
या द्विपक्षा चतुष्पक्षा षट् पक्षा या निमीयते |
अष्टपक्षां दशपक्षां शालां मानस्य पत्नीमग्निर्गर्भ इवा शये ||२१ ||
🚩

दोन खोल्यांचे, चार, सहा, आठ, दहा खोल्यांचे घर बांधावे. (मानस्य पत्नीं शालां) इथे खूप महत्त्वाचा अर्थ आहे. गृहनिर्माण करण्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला *वास्तुरचनाकार म्हणजेच मानपती* असे नाव होते. त्याने दिलेल्या प्रमाणानुसार तयार केलेली *शाळा (घर ) म्हणजेच मानपत्नी* होय. मानपत्नी ह्याचा अर्थ घर (शाळा ) असा आहे. घरातील माणसांच्या संख्येवर खोल्यांची आणि मजल्यांची संख्या ठरविणे आवश्यक आहे. अशा *घराच्या गर्भात अग्नी* असावा. बाहेर असलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी घरात अग्नी आणि शुद्ध पाणी असणे आवश्यक आहे.
🚩
हविर्धानमग्निशालं पत्नीनां सदनं सदः |
सदो देवानामसि देवि साले ||७||
🚩

हे (शाले देवि ) गृहरूपी देवते! (हविर्धानं) हवन करण्याचे स्थान, (अग्निशालं) *अग्नीशाला* म्हणजे स्वयंपाकघर जिथे चूल पेटलेली असते,(पत्नीनां सदनं ) *स्त्रियांचे राहण्याचे ठिकाण* (खोली ) (सदः ) राहण्याचे ठिकाण (living room ) (देवानां सदः ) देवांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे *देवघर* असावे. ह्याचा अजून एक अर्थ असा की अतिथी देवो भव | अशी आपली शिकवण आहे ह्या अतिथीरूपी देवाचे राहण्याचे ठिकाण ( Guest Room ) असावी. घराची रचना अशाप्रकारे असावी ह्याचे संपूर्ण वर्णन केले आहे. ह्यावरून वेदकाळात गृहनिर्माण आणि स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते हे लक्षात येते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...