#वेदविज्ञानरंजन_७२
🌺 *वेदांतील स्थापत्यशास्त्र - भाग - १* 🌺
अथर्ववेदात घर कसे बांधावे ह्याचे उत्तम उल्लेख सापडतात (स्थापत्यशास्त्र ) अथर्ववेद ६.१०६. १ते ३ मध्ये ह्याचे सुंदर वर्णन केले आहे ते पाहू.
🚩
आयने ते परायणे दुर्वा रोहतु पुष्पिणीः |
उत्सो वा तत्र जायतां हृदो वा पुण्डरीकवान् ||१||
🚩
(ते आयने परायणे ) घराच्या पुढे आणि मागे (पुष्पिणीः दुर्वाः रोहन्तु ) फुलांनी युक्त असे दुर्वा, गवत असावे. म्हणजेच आधुनिक भाषेत (Lawn ) असावे. (तत्र वा उत्सः जायतां ) तेथे एक हौद असावा. येथे कदाचित *जलतरणतलाव* (स्विमिंग पूल ) असा अर्थ अभिप्रेत असावा. (वा पुण्डरीकवान् हृदः ) किंवा त्या तलावात कमळाची फुले असावीत.
🚩
अपामिदं न्ययनं समुद्रस्य निवेशनम् |
मध्ये हृदस्य नो गुहाः पराचीना मुखा कृधि ||२||
🚩
(इदं अपां न्ययनं ) पाण्याचा छान प्रवाह असावा. कदाचित नदीकाठी घर आसवे असा आशय असावा. (समुद्रस्य निवेशनम् ) जवळ समुद्राचे स्थान असावे. म्हणजे समुद्राच्या काठावर घर असावे. (हृदस्य मध्ये नः गृहाः ) तलावाच्या मध्यभागी घर असावे. (मुखाः पराचीना कृधि ) घराची दारे परस्पर विरुद्ध दिशांना हवीत. *सूर्यप्रकाश घरांमध्ये असावा आणि उत्तम प्रकारे हवा खेळती असावी ह्यासाठी दारे समोरासमोर असणे आवश्यक आहे*.
🚩
हिमस्य त्वा जरायुणा शाले परि व्ययामसि |
शीतहृदा हि नो भुवो$ग्निष्कृष्णोतु भेषजम् ||३||
🚩
हे शाले! घराला उद्देशून म्हटले आहे. (त्वा हिमस्य जरायुणा ) तुला शीत आवरणाने (परि व्ययामसि ) घेरले आहे. ह्याचा अर्थ घराभोवती शीत आवरण आहे. बाहेरील तापमान जास्त झाल्यास घर थंड राहावे ह्यासाठी योजना केली आहे. (नः शीतहृदाः भुवः) थंड पाणी असलेले तलाव बरेच असावेत. (अग्निः भेषजं कृणोतु ) *अग्नीने थंडी निवारण करावी.*
येथे दोन प्रकारांचा उल्लेख केला आहे. जर बाहेर तापमान जास्त असेल तर घर थंड हवे. आणि बाहेर जर थंड तापमान असेल तर घरात अग्नी हवा म्हणजे उष्णता निर्माण होईल. *खऱ्या अर्थाने वातानुकूलित घर* कसे असावे ह्याचे वर्णन येथे वाचायला मिळते (Air conditioned house )
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.* इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*
संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक )
No comments:
Post a Comment