माझा परिचय

Wednesday 14 June 2023

वेदविज्ञानरंजन - ५७

 

#वेदविज्ञानरंजन_५७

आजच्या भागात आपण *वेदांतील धातुविज्ञान* ह्याविषयी माहिती घेणार आहोत.

अथर्ववेद कांड ५ सूक्त २८ मंत्र १ खालीलप्रमाणे आहे.

🚩नव प्राणान्नवभिः सं मिमीते दीर्घायुत्वाय
शतशारदाय |
हरिते त्रीणि रचते त्रीणि त्रीण्ययसि त्रीणि तपसाविष्ठितानि 🚩

शंभर वर्षे दीर्घायूसाठी नऊ प्राण नऊ इंद्रियांमध्ये स्थिर असतात. *सोन्याचे तीन, लोहाचे तीन, चांदीचे तीन* असे नऊ धागे उष्णता निर्माण करतात.

अथर्ववेद कांड ११ सूक्त ३ मंत्र ७ खालीलप्रमाणे आहे.

🚩श्याममयोस्य मांसानि लोहितमस्य लोहितम्
त्रपु भस्म हरितं वर्णः पुष्करमस्य गंधः | 🚩

काळे *लोह* ह्याचे मास आहे, *लाल लोह रक्त* आहे, *जस्त* हे त्याचे भस्म आहे. पुष्कर हा गंध आहे. ह्यात शर्व - रुद्र देवतेचे वर्णन आहे.

*छांदोग्योपनिषद्* ४,१७,७  ह्यातील मंत्र खालीलप्रमाणे आहे.

🚩 तद्यथा लवणेन सुवर्ण संदध्यात् सुवर्णेन |
रजतं रजतेन त्रपु त्रपुणा सीसं सीसेन लोहं लोहेन दारु चर्मणा || 🚩

*चांदीला सुवर्णाने, जस्ताला चांदीने, शिश्याला जस्ताने, लोहारा शिश्याने, आणि लाकडाला लोहाने, चामड्याने शुद्ध केले जाते.*

यजुर्वेद अध्याय १८, मंत्र, १३ खालीलप्रमाणे आहे. आपण धार्मिक कार्य करताना जे रुद्र सूक्त म्हणतो त्यातील खालील मंत्र आहेत.

🚩 अश्मा च मे मृत्तिका च मे.....
हिरण्यं च मे अयश्च मे श्यामं च मे लोहं च मे सीसं च मे त्रपु च मे यज्ञेन कल्पन्ताम् 🚩

*सोने, लोखंड, शिसे, जस्त असे जे धातू आहेत त्यांचा उपयोग विश्वाच्या कल्याणासाठी करावा.*

महर्षी कणाद वैशेषिक दर्शन अध्याय २, आह्निक १:

🚩 त्रपुसीसलोहरजतसुवर्णानामग्निसंयोगाद्
द्रवत्वमद्भिः सामान्यम् ||७|| 🚩

*जस्त, शिसे, लोह, चांदी, सुवर्ण यांचा अग्नीबरोबर संयोग झाला की ते वितळतात आणि पाण्यासारखे होतात.*

वरील विविध उदाहरणे वाचल्यास लक्षात येते की अतिशय प्रगत असे धातुविज्ञान वेदकाळात ज्ञात होते. वरील बर्‍याच श्लोकांत, मंत्रात जस्त ह्या धातूचा उल्लेख आला आहे. तांबे आणि पितळ ह्या धातूंचे मिश्रण केले असता जस्त हा धातू तयार होतो. *तांबे + पितळ = जस्त* म्हणजेच धातूंच्या मिश्रणातून नवीन धातू तयार करण्याची कला वेदकाळी अस्तित्वात होती. त्याचप्रमाणे
*धातू वितळवून त्यापासून नवीन धातू तयार करण्याचे ज्ञान होते. त्याकाळी नौकाबांधणी, शस्त्रास्त्र निर्मिती, रथ, विमाने ह्यांची निर्मिती ह्यासाठी खूप मोठ्याप्रमाणात धातूकाम केले जात असे.*

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...