माझा परिचय

Wednesday 14 June 2023

वेदविज्ञानरंजन - ६०

 

#वेदविज्ञानरंजन_६०

*अगस्ती ऋषी आणि विद्युतशक्ती भाग - १*

आज आपण अगस्ती संहिता ग्रंथातील एक महत्त्वाचे वैज्ञानिक तत्व अभ्यासणार आहोत. हायड्रोजन वायू भरलेला फुगा आकाशात कशाप्रकारे सोडायचा ह्याचे पूर्ण शास्त्रीय ज्ञान प्रस्तुत ग्रंथात सांगितले आहे. डॉ. नारायण गोपाळ डोंगरे आणि डॉ. शंकर गोपाळ नेने ह्या दोन शास्त्रज्ञांनी 'PHYSICS IN ANCIENT INDIA' ह्या त्यांच्या पुस्तकात अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.

🚩
संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रं सुशोभितम् |छादयेच्छिखिग्रीवेण चार्द्राभिः काष्ठपांसुभिः ||
🚩

(सुशोभितम् ताम्रपत्रं) एक सुंदर, स्वच्छ तांब्याचा पत्रा घ्यावा. (मृण्मये पात्रे संस्थाप्य ) मातीच्या पात्रात, कुंभात ठेवावा. (छादयेत् शिखिग्रीवेण) कोळशाच्या भुकटीचे आच्छादन त्यावर करावे. (आर्द्राभिः काष्ठपांसुभिः ) थोडी ओलसर अशी विशिष्ट प्रकारची भुकटी त्यावर पसरावी.

🚩
दस्ता लोष्ठो निधातव्यः पारदाच्छादिततस्ततः
संयोगाज्जायते तेजो मैत्रावरुणसंज्ञितम् ||
🚩

(दस्ता लोष्ठो निधातव्यः) जस्त, विशिष्ट प्रकारची माती आणि पारा यांचे मिश्रण करावे आणि वर उल्लेख केलेल्या मातीच्या भांड्यात ठेवावे. त्याच्या संयोगाने मैत्रावरुण तेज उत्पन्न होते.

येथे *मैत्रावरुण तेज म्हणजे विद्युतधारा* होय (positive and negative electricity ) अगस्ती ऋषींना पाण्यातून विद्युतनिर्मिती कशी करायची तसेच, पाण्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू असतात आणि (H2O) पाण्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता पाण्याचे पृथक्करण होऊन त्यापासून *ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू वेगळे करता येतात* ह्या संपूर्ण प्रक्रियेचे ज्ञान होते. वरील प्रक्रियेत जस्ताचा उपयोग केला आहे. म्हणजेच त्या काळात भारतातील *धातुविज्ञान अत्यंत प्रगत* होते *दोन धातूंचे मिश्रण करणे, धातू शुद्ध करणे, त्यांवर रासायनिक प्रक्रिया* करणे अशाप्रकारची सर्व कार्ये चालत असत. पुढचा भागात अजून पुढचे दोन श्लोक पाहू.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...