माझा परिचय

Wednesday 14 June 2023

वेदविज्ञानरंजन - ५९

 

#वेदविज्ञानरंजन_५९

*वराहमिहीर यांच्या बृहत्संहिता ह्या ग्रंथात अध्याय क्र. ५४ उदकार्गल* नावाचा आहे. त्यात *भूगर्भातील भूजल कसे शोधावे, झरे कसे असावेत ह्या संबंधी खूप छान शास्त्रीय माहिती* दिली आहे. ह्यातील काही निवडक श्लोक आपण पाहू.
*उदक म्हणजे पाणी, अर्गल म्हणजे अवरोध. ह्या अवरोधाला दूर करून भूजलास जमिनीवर आणता येते.*

🚩
धर्म्यं यशस्यं च वदाम्योSहंदकार्गलं येन जलोपलब्धिः।
पुंसां यथाङ्गेषु शिरास्त्तयैव क्षितावपि प्रोन्नतनिम्नसंस्थाः ||१||
🚩
ज्याप्रमाणे मानवी *शरीरात शिरा* असतात, नाड्या असतात   त्याप्रमाणे *भूमीतसुद्धा विविध शिरा असतात, त्यातून पाणी वाहते.*

🚩
एकेन वर्णेन रसेन चाम्भश्चयुतं नभस्तो वसुधाविशेषात्।
नानारसत्वं बहुवर्णतां च गतं परी यं क्षितितुल्यमेव ||२ ||
🚩

*आकाशातून पडणारे जल, पाऊस सारख्याच रंगाचे आणि चवीचे असते. ते ज्या भुईवर पडते, त्यानुसार त्या पाण्याला चव आणि रंग प्राप्त होतो. जशी भूमी, तसेच पाणी*.

🚩
पुरहूतानलमयनिर्ऋतिवरुणपवनेन्दुशङ्करा देवाः।
विज्ञातव्याः क्रमशः प्राच्याद्यानां दिशां पतयः||३ ||

दिक्पतिसंज्ञाश्च शिरा नवमी मध्ये महाशिरानाम्नी।
एताभ्योSन्याः शता शो विनसृता नामभिः प्रथिताः।।४।।

पातालादूर्ध्वशिरा शुभाश्चतुर्दिक्षु संस्थिता याश्च।
कोणदिगुत्था न शुभाः शिरानिमित्तान्यतो वक्ष्ये।।५।।
🚩

आठ दिशांचे आठ स्वामी आहेत.
इन्द्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, सोम आणि ईशान. ह्यांच्या नावाने आठ मुख्य शिरा असतात. उदा. ऐन्द्री, आग्नेयी, याम्या. मध्यभागी एक महाशिरा असते आणि त्याच्याकडून शेकडो शिरा निघतात. जी शिरा पाताळातून वर येते आणि चारही दिशांना पसरते ती शुभ असते.

🚩
यदि वेतसोSम्बुरहिते देशे हस्तैस्त्रिभिस्ततः पश्चात्।
सार्धे पुरुषे तोयं वहति शिरा पश्चिमा तत्र।।६।।
🚩

*दुष्काळग्रस्त परदेशात वेतस नावाचा वृक्ष असेल तर, त्याच्या पश्चिम दिशेला तीन हात अंतरावर, दीड पुरुष खोल पश्चिम शिरा प्रवाहित असते*

🚩
चिह् नमपि चार्ध पुरुषे मंडूकः पाण्डूरोSथ मृत्पीता।
पुटभेदकश्च तस्मिन् पाषाणो भवति तोपनधः।।७।।
🚩

अर्धा पुरुष खणल्यावर तिथे पांढरा बेडूक असतो, पिवळ्या रंगाची माती असते आणि त्याच्या खाली जलधारा असते.

वरील सर्व श्लोक वाचल्यावर असे लक्षात येते की *वराहमिहिर ह्यांनी प्रचंड अभ्यास करून, प्रयोग करून अनेक निष्कर्ष काढले आहे. विविध अनुमाने काढली आहेत.* आताच्या काळात हे सर्व पूर्ण १०० % लागू होणार नाही. परंतु, त्यामुळे वराहमिहिर ह्यांचे महत्त्व कुठेही कमी होत नाही. वराहमिहिर हे एक ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रचंड अभ्यास करून ही सर्व माहिती संस्कृत भाषेत लिहून ठेवली आहे. *आपलीच संस्कृत भाषा आपल्याला आता वाचता येत नसल्याने तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी ह्या उक्ती प्रमाणे आपण सर्व श्रेय पाश्चिमात्य वैज्ञानिकांना देऊन मोकळे झालो.*

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...