माझा परिचय

Wednesday 14 June 2023

वेदविज्ञानरंजन - ६१

 

#वेदविज्ञानरंजन_६१

*अगस्ती ऋषी आणि विद्युतशक्ती भाग - १*

*हायड्रोजन गॅस फुगा*  आणि *विद्युतविलेपन*

अनेन जलभंगोस्ति प्राणोदानेषु वायुषु |
एवं शतानां कुम्भानाम् संयोगः कार्यकृत् स्मृतः ||

(अनेन जलभंगोस्ति) ज्यामुळे जलभंग होतो म्हणजे पाण्याचे पृथक्करण होते. (प्राणोदानेषु वायुषु) प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि उदान म्हणजे हायड्रोजन वायू निर्माण होतात. अशाप्रकारे (शतानां कुम्भानाम् संयोगः ) शंभर कुंभ एकत्र आणले तर त्यापासून तयार होणारा हायड्रोजन छान कार्य करतो.

वायुबन्धकवस्त्रेण निबद्धो यानमस्तके |
उदानः स्वलघुत्वेन विभर्त्याकाशयानकम् ||

(वायुबन्धकवस्त्रेण) ज्यात वायू बांधलेला असतो असे वस्त्र म्हणजे हवा भरलेला फुगा. (यानमस्तके ) म्हणजे यानाच्या डोक्यावर बांधावा. (उदानः स्वलघुत्वेन) त्या फुग्यात हायड्रोजन वायू सोडावा. (विभर्त्याकाशयानकम्) त्या हायड्रोजन वायूने भरलेल्या फुग्यामुळे ते यान आकाशात उडते.

जुन्या चित्रपटांमध्ये हायड्रोजन गॅस फुग्यात बसून आकाशात उडणारी माणसे आपण पाहिली आहेत. ह्या प्रकाराचा शोध हजारो वर्षांपूर्वी महर्षि अगस्ती ह्यांनी लावला होता. त्यांनी ही सप्रमाण आणि उदाहरणासह वरील श्लोकात सांगितले आहे. फुगा ह्या शब्दासाठी अतिशय सुंदर शब्द अगस्ती ऋषींनी योजला आहे तो म्हणजे *वायुबंधक वस्त्र* ह्या वस्त्रात आपण वायू बांधून ठेवू शकतो असे वस्त्र. परंतु, दुर्दैवाने ह्याचे श्रेय खालील शास्त्रज्ञाला देण्यात आले आहे.

एम. चार्ल्स यांनी असा हायड्रोजन वायू भरलेला फुगा इ. स. १८०० - १८०४ मध्ये पॅरिस येथे उडविला होता.

*विद्युतविलेपन प्रक्रिया -*

कृत्रिमस्वर्णरजतलेपः सत्कृतिरुच्यते |
यवक्षारमयोधानौ सुशक्तजलसन्निधौ |
आच्छादयति तत्ताम्रंस्वर्णेन रजतेन वा |
सुवर्णलिप्तं तत्ताम्रं शातकुंभमिति स्मृतम् ||
(अगस्त्यसंहिता )

कृत्रिम सुवर्ण किंवा चांदीच्या लेपाला सत्कृती असे म्हणतात. लोखंडाच्या भांड्यात एक सुशक्त जल म्हणजे आम्ल (Acid ) घ्यावे. त्याच्या सान्निध्यात सोने, चांदी(यवक्षार ) आणि तांबे आणले असता रासायनिक प्रक्रिया होऊन तांब्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुलामा, लेप चढतो. सोन्याचा लेप असलेल्या त्या तांब्याला *शातकुंभ* असे म्हणतात.
ह्याचा अर्थ विद्युतविलेपन प्रक्रिया (electroplating technique ) प्राचीन काळापासून भारतीयांना ज्ञात होते. विद्युतधारा (electric current )(Andre Marie Ampere ) मोजण्याचे आणि विभवांतर (Voltage ) (Alessandro Volta ) मोजण्याचे एकक (Unit ) (Ampere and Volt ) हे पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या नावावर न राहता अगस्ती ऋषींच्या नावे असायला हवे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर (समूहांत) पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...